सिंधुदुर्ग किल्ला (मालवण) कोकण Sindhudurg Fort Malvan

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • Sindhudurg Fort, Malvan, Konkan, सिंधुदुर्ग किल्ला (मालवण) कोकण
    For Latest Update Follow me on INSTAGRAM: / pragat.loke
    सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे. नोव्हेंबर २५, इ.स. १६६४ रोजी किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली.
    भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २१ जून, इ.स. २०१० रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे
    शिवाजी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला फार महत्त्व होते. किल्ल्याचे क्षेत्र कुरटे बेटावर ४८ एकरावर पसरलेले आहे. तटबंदीची लांबी साधारण तीन किलोमीटर आहे. बुरुजांची संख्या ५२ असून ४५ दगडी जिने आहेत. ह्या किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या काळातील गोड्या पाण्याच्या दगडी विहीरी आहेत. त्यांची नावे दूध विहीर, साखर विहीर व दही विहीर अशी आहेत. या किल्ल्याच्या तटबंदीच्या भिंतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी तीस ते चाळीस शौचालयाची निर्मिती केली आहे. या किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांचे शंकराच्या रूपातील एक मंदिर आहे. हे मंदिर इ.स. १६९५मध्ये शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराज यांनी बांधलेछत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान मालवण येथील जंजिरा म्हणजे हा सिंधुदुर्ग किल्ला होय. महाराजांकडे ३६२ किल्ले होते. या सर्व किल्ल्यांचा पूर्वेस विजापूर, दक्षिणेस हुबळी, पश्चिमेस अरबी समुद्र आणि उत्तरेस खानदेश-वऱ्हाड या देशापर्यंतचा विस्तार होता. भुईकोट आणि डोंगरी किल्यांच्या बरोबरीने सागरी मार्गावरील शत्रूंची स्वारी परतून लावण्यासाठी जलदुर्गाची निर्मिती महत्त्वाची आहे, हे ओळखून शिवाजी महाराजांनी सागरी किल्ले निर्माण केले. चांगल्या, भक्कम आणि सुरक्षित स्थळांचा शोध घेऊन समुद्रकिनाऱ्यााची पाहणी झाली. इ.स. १६६४ साली मालवण जवळील कुरटे नावाचे काळा कभिन्न खडक असलेले बेट किल्ल्यासाठी निवडले. महाराजांच्या हस्ते किल्ल्यांच्या तटांची पायाभरणी झाली. आज मोरयाचा दगड या नावाने ही जागा प्रसिद्ध आहे. एका खडकावर गणेशमूर्ती, एकीकडे सूर्याकृती आणि दुसरीकडे चंद्राकृती कोरून त्या जागी महाराजांनी पूजा केली.
    असं म्हणतात की, किल्ला बांधण्यासाठी एक कोटी होन खर्ची पडले. उभारणीसाठी तीन वर्षांचा कालावधी लागला. ज्या चार कोळी लोकांनी सिंधुदुर्ग बांधण्यासाठी योग्य स्थळ शोधले, त्यांना गावे इनामे देण्यात आली. ऐतिहासिक सौदर्य लाभलेला सिंधुदुर्ग हा किल्ला ज्या कुरटे खडकावर तीन शतके उभा आहे, तो शुद्ध काळाकभिन्न खडक मालवण पासून सुमारे अर्धा मैल समुद्रात आहे. या खडकावर समुद्र मार्गानी व्यापलेले क्षेत्र सुमारे ४८ एकर आहे. त्यांचा तट २ मैल इतका आहे. तटाची उंची ३० फूट असून रूंदी १२ फूट आहे. तटास ठिकठिकाणी भक्कम असे एकंदर २२ बुरुज आहेत. बुरुजाभोवती धारदार खडक आहे. पश्चिमेस आणि दक्षिणेस अथांग सागर पसरला आहे. पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडे तटाच्या पायात ५०० खंडी शिसे घातले असून या तटाच्या बांधणीस ८० हजार होन खर्ची पडले.
    Sindhudurg Fort (Marathi सिंधुदुर्ग किल्ला) is a historical fort that occupies an islet in the Arabian Sea, just off the coast of Maharashtra in Western India. The fort was built by Chhatrapati Shivaji Maharaj. The fortress lies on the shore of Malvan town of Sindhudurg District in the Konkan region of Maharashtra, 450 kilometres (280 mi) south of Mumbai.[1] It is a protected monument.
    This fort was constructed by Shivaji Maharaj, the chhatrapati of the Maratha Empire.[3] The main objective was to counter rising influence of foreign colonizers (English, Dutch, French and Portuguese merchants) and to curb the rise of Siddis of Janjira. Construction was supervised by Hirojee Indulkar, in 1664. The fort was built on a small island which was known as the Khurte bet

Komentáře • 64

  • @PragatLoke
    @PragatLoke  Před 4 lety +2

    FOLLOW Me on INSTAGRAM : instagram.com/pragat.loke/

  • @दिनेशपरुळेकर

    प्रगत ,,,श्री छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे दर्शन नाही घडवले ,, तसेच राजांच्या हाता पायांचे ठसे पण नाही दाखवले ....

  • @ajayrathod8288
    @ajayrathod8288 Před 4 lety +1

    Bast

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Před rokem

    Apratim. Khoop. Sundar.

  • @namratakadam1173
    @namratakadam1173 Před 4 měsíci

    खूप छान माहिती

  • @malvangamer9783
    @malvangamer9783 Před 3 lety +1

    मालवण ❤️

  • @girishtondare7444
    @girishtondare7444 Před 2 lety

    Nice information

  • @prashantborgaonkar3609
    @prashantborgaonkar3609 Před 4 lety +11

    मी हा किल्ला बघितला नाही पण स्वतः बघत असल्याचा अनुभव आला..... Thanks

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 Před 3 lety +1

    Mast👌 👍

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Před měsícem

    Rajancha. Gad. Apratim. 🚩

  • @nisargpreminitin.1800
    @nisargpreminitin.1800 Před 4 lety +9

    प्रगत दादा खुप छान व्हिडीओ बनवलात सिंधुदुर्ग मी कधी पाहीलो नव्हतो आज तुमच्या व्हिडीओ द्वारे पहायला मिळाले तुमचे आसेच नवनवीन व्हिडीओ पहायला मिळोत
    🙏🙏👍👍👌👌

  • @vinayakkadam3111
    @vinayakkadam3111 Před 4 lety +2

    मी जाऊन आलोय, खूप सुंदर आहे किल्ला. Restoration चे काम चालू आहे,आणि मच्छी मार्केट पण भारी आणि स्वच्छ आहे.

  • @maheshsitaramsatam9557

    Great Sindhudurg Fort Malvan

  • @satyavanbhute1221
    @satyavanbhute1221 Před 3 lety +1

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vaishnavipatil3331
    @vaishnavipatil3331 Před 3 lety

    खूपच छान 👍👌👌

  • @kishoremirchandani8671

    Jai Bhavani🙏 Jai Shivray🙏

  • @JaiHo10155
    @JaiHo10155 Před 4 lety +3

    Very nice pragat sir👌

  • @saurabhsawant3756
    @saurabhsawant3756 Před 4 lety +5

    धन्यवाद सर तुम्ही किल्ले सिंधुदुर्ग चा व्हिडिओ बनवला ते.

  • @aditya76ambre
    @aditya76ambre Před 4 lety +22

    भाऊ शिवरायांच्या हाता पायाचे ठसे दाखवायला विसरलास. आत शिरल्या शिरल्या उजवीकडे आहेत. 2 आठवड्यापूर्वीच जाऊन आलो इथे.
    जय भवानी जय शिवाजी!!

  • @onkargaikwad6921
    @onkargaikwad6921 Před 4 lety

    Khup chan video mast

  • @limitbreakerharshuharshu4226

    खूपच छान सुंदर

  • @sheetalbamane1409
    @sheetalbamane1409 Před 4 lety

    Mast 👌👌 Junya Aathavani Jagya Zalya.

  • @AtulKumar-ss1xc
    @AtulKumar-ss1xc Před 4 lety

    Jay sivray

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Před 4 lety

    Khup chaan

  • @sureshsatbhaye8211
    @sureshsatbhaye8211 Před 4 lety

    Very nice

    • @PragatLoke
      @PragatLoke  Před 4 lety

      Thanks For Latest Update Follow me on INSTAGRAM : instagram.com/pragat.loke/

  • @AmetraGhag
    @AmetraGhag Před 4 lety

    khup chan video............

  • @prashantsawant713
    @prashantsawant713 Před 4 lety

    Jay Bhavani Jay Shivaji

  • @TravelEkSafar
    @TravelEkSafar Před 4 lety +2

    mi swata ek youtuber ahe. ani video sathi ghetleli mehnat disat ahe...khup masta editing & sequence.. keep it up

  • @rajulakade7653
    @rajulakade7653 Před 4 lety

    Kaddkkkk

  • @rohandabhade9239
    @rohandabhade9239 Před 4 lety

    Video khup Chan ahe. Killa atta open ahe Ka janyasathi.

  • @JaiHo10155
    @JaiHo10155 Před 4 lety +2

    सर मी शेतकरी पोरगा आहे
    मला तुम्हीं मुंबई च हळद मार्केट
    सध्या काय चालू आहे सांगू शकाल का

  • @sajitabhagade4284
    @sajitabhagade4284 Před 4 lety +1

    Mi jaun aley chan ahe..

  • @homeshpatil5015
    @homeshpatil5015 Před 4 lety +1

    गोड पाणी त जंजीरा किल्यामधी सुध्दा आहे

  • @saurabhsawant3756
    @saurabhsawant3756 Před 4 lety

    आरे हो सर ते राहूनच घेलं.

  • @balrajingle5898
    @balrajingle5898 Před 4 lety

    किल्यावर मुकामी राहायची सोय आहे का

  • @siddharajscubadivingmalvan6276

    Yat ek gupt samudrakhalun gelela ahe to ozor cave madhe baher padto

  • @swapnilmalpe
    @swapnilmalpe Před 4 lety

    nice video pragat,
    tu tuzya video sathi coppa setting kai karto YES or NO????

  • @Soneri_pari
    @Soneri_pari Před 2 lety

    नमस्कार
    मी तुमचे सर्वच व्हीडीओ पाहत असतो
    तुम्ही चांगली माहीती देत आहात
    मी तुमचा नियमित सस्क्राईबर बनलोय
    म्हनुन तुमचे व्हीडीओ मला दिसत आहेत
    - धन्यवाद

  • @prakashy4926
    @prakashy4926 Před 4 lety +2

    1.30 तासात पूर्ण किल्ला फिरून होतो का दादा

    • @santoshgunganali9333
      @santoshgunganali9333 Před 4 lety

      नाही

    • @prakashy4926
      @prakashy4926 Před 4 lety

      1.30 तासापेक्षा अधिक वेळ थांबू शकतो का किल्ल्यावर

  • @vivekitengg1
    @vivekitengg1 Před 4 lety

    Which best villege on konkan ..which should be near from pune ...5 to 5.30 hours distance?? pls help ..i would like to buy agriculture land for mango and kaju....

    • @isheddesouza4613
      @isheddesouza4613 Před 4 lety

      Sir do you want fruit giving garden in Vengurla taluka. If yes please call 8007429187

  • @vaibhavkandalkar8529
    @vaibhavkandalkar8529 Před 4 lety +2

    meet malvani life you tube blogger

  • @meghagamare6082
    @meghagamare6082 Před 3 lety

    दादा, आम्ही सुद्धा मालवण ला गेलो होतो. सिंधुदुर्ग किल्ला संपूर्ण बघितला. तटबंदी अजूनही भक्कम आहे. पुर्ण राउंड एक तास लागला तटावरून.

  • @macchindranehe7547
    @macchindranehe7547 Před 4 lety

    Machhindra

  • @vijaykumarbalraj8218
    @vijaykumarbalraj8218 Před 4 lety

    How do go this place bro

    • @explorekonkanwithsapaletou6706
      @explorekonkanwithsapaletou6706 Před 4 lety

      ⚜SAPALE TOURS & TRAVELS ⚜
      🔰We provide good car on "rent" service at resonable rates from kankavli to any place in Maharashtra, Goa & Karnataka.( India)
      🔰We have "Ac/Non Ac" cars for Rental Purpose.
      🔰 "Railway/Airport" pick up-drop service.
      🔰Also We arrange "Sindhudurg sight"& "Goa"Tours.
      ☎Contact No: 919152850703
      Thank you.

  • @sucharita6
    @sucharita6 Před 4 lety

    jay shivaray
    sindhudurgatil ranful
    czcams.com/video/qJCx2qTMnYY/video.html

  • @manohard4466
    @manohard4466 Před 4 lety

    Kahi nahi sidhudurg made

    • @saurabhsawant3756
      @saurabhsawant3756 Před 4 lety +1

      Kay मंत्यात tumhi

    • @govindborkar4915
      @govindborkar4915 Před 4 lety +2

      सिंधुदुर्ग येथे राहण्याची सोय आहे का?

    • @saurabhsawant3756
      @saurabhsawant3756 Před 4 lety +1

      @@govindborkar4915 Ho aahe

    • @santoshgunganali9333
      @santoshgunganali9333 Před 4 lety +2

      एका नारळाच्या झाडा मधुन दोन फांदया आल्या आहेत ते काय तुमच्या घरात हाय 1 no fort

    • @govindborkar9191
      @govindborkar9191 Před 4 lety +1

      सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बद्दल माहिती फारच छान आहे