वडापाव | Giveaway🤩 | एक किलोचे परफेक्ट प्रमाण | Vada Pav Recipe In Marathi | कृष्णाई गझने

Sdílet
Vložit
  • čas přidán 31. 10. 2021
  • नमस्कार,
    दिवाळी निमित्त तुमच्यासाठी खास आपण giveaway ठेवला आहे त्यासाठी तुम्हा सर्वांना
    1.नवीन असल्यास चॅनेल ला प्रथम subscribe करा व्हिडीओ पूर्ण बघा तसेच व्हिडीओ ला लाईक करा कमेंट आणि शेअर करा.
    2.या व्हिडीओ वर एक युनिग अशी कमेंट करा.
    वडापाव साहित्य:
    1 किलो बटाटे
    60 ग्रॅम मिरची
    40 ग्रॅम आलं
    40 ग्रॅम लसूण
    अर्धा किलो बेसन
    कोथिंबीर
    मीठ
    खायचा सोडा
    पाणी
    फोडणीसाठी साहित्य:
    तेल
    1 चमचा मोहरी
    अर्धा चमचा जिरं
    एक मोठा चमचा उडीद डाळ
    1 चमचा हळद
    कढीपत्ता
    मिरची भजी:
    • कुरकुरीत बटाटा भजी आणि...
    पालक भजी आणि सुकी लाल चटणी:
    • अभीदादाच्या हातची कुरक...
    गोल भजी आणि गोड चटणी:
    • गोल भजी | गोल कांदा भज...
    कांदाभजी:
    • गरमागरम कुरकुरीत कांदा...
    बटाटाभजी:
    • कुरकुरीत बटाटा भजी आणि...
    झणझणीत मिसळ पाव:
    • झणझणीत मिसळ पाव | Misa...
    Thank you for watching❤️
    You can also send me your recipe pics which you made by watching my recipe videos on my instagram page.
    kokan_asth
    pCPmrEeXDT...
    Please
    Do Like, share and subscribe❤️

Komentáře • 1,2K

  • @deepakagine4366
    @deepakagine4366 Před rokem +53

    खुप छान, तुमचे vdo पाहून माझ्या मित्राने पुण्याला हॉटेल सुरू केले आणि मला सांगितले की रत्नागिरीला त्यांना भेटून माझ्याशी बोलणे करून दे .

  • @misaianimazilifestyle2455
    @misaianimazilifestyle2455 Před 2 lety +106

    माझे आई वडील श्रीमंत नाहीत पण त्यांनी मला सर्वात महाग वस्तू दिली ती म्हणजे संस्कार काकू तुम्ही अभी दादा आणि कृष्णाई यांना खूप छान संस्कार दिलेत मला इथे एकच सांगायचं आहे काकूंनी खूप कष्ट करून रक्ताच पाणी करून तुम्हाला वाढवले आहे आणि या माऊलीची तुम्ही जशी अता काळजी घेतात तशीच घ्याल अशी खात्री आहे तुम्हाला दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा आणि तुम्ही खूप पुढे जावेत यासाठी साई चरणी प्रार्थना .....

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Před 2 lety +6

    ताई, बाब्या आणि अभि, माझी कमेंट ही बक्षीस पात्र नसेलही कदाचित पण मनातलं जे लेखणीतून उतरवतोय ते मात्र तंतोतंत खरं आहे.1) जेव्हापासून तुमच्या रेसिपीज पाहायला लागलो तेव्हापासून रेसिपी दाखवायला एक सुंदर मोठं आणि सर्व सुखसोयिंनी समृद्ध असं स्वयंपाकघरच असायला हवं हा समज दूर झाला 2)रेसिपी दाखवयाच्या म्हणजे कॅमेराला सामोरं जायच्या आधी स्वतःला तयार करायचं अर्थात मेकअप वगैरे हाही भ्रम फोल ठरला 3)राहणीमान अगदी साधं अगदी सर्वसामान्य पण पदार्थ दाखवणाऱ्या हाताची चव आणि त्याचा वाणीतील गोडवा हे आणि हेच सर्वात माहित्वाचं असतं तरंच तो बनवलेला पदार्थ अवीट गोडीचा आणि करणाऱ्याच्या प्रेमाने ओतंबून भरलेला असतो हे तर प्रखर्षाने जाणवलं. आणि त्यासाठी किंमती क्रॉकरी जेवायला आणि डायनिंग टेबल बसायला नसेल तरी चालेल फक्त पुढ्यात आलेला आणि ताटात वाढलेला पदार्थ हा प्रेमाचा आणि आपुलकीचा असला पाहिजे.ही तुमच्या रेसिपीची सर्वात महत्वाची बाजू आहे आणि ती तुम्ही कायम टिकवाल अशी आशा करतो.. अनेक शुभेच्छासह 🙏

  • @sujatachavan8901
    @sujatachavan8901 Před 2 lety +15

    माझीही एक वडापावची टपरी आहे. आज मला तुमच्या वडापावची रेसिपी पाहून अजून उत्तम प्रकारे वडापाव बनवण्याची प्रेरणा मिळाली. माझ आणि माझ्या कुटुंबाच त्यावरच पोट भरत. काकु तुम्ही खुप समजून सांगता. तुमच्या बोलण्यातच खुप आपुलकी आहे. तुम्हाला पाहीले की मिच मला दिसते. मला ही एक मुलगा व मुलगी आहे. धन्यवाद काकु

  • @anilpatil9577

    काकूंनी खूप तळमळीने सांगितल्या प्रमाणे प्रत्येकाने लक्ष घालून शिका खूप सुंदर दादा ❤ काकूंची अँक्शन शिक्षक सुद्धा शाळेत शिकवत नसतील अशी खूप सुंदर🎉

  • @recipesbysandhya938
    @recipesbysandhya938 Před 2 lety +21

    आग्रा व इंदुरी बटाट्याला फरक पहिल्यांदाच समजला अतिशय उपयुक्त माहीती

  • @sonalchandawale6947
    @sonalchandawale6947 Před 2 lety +12

    कृष्णाई, तुझ्या आई आणि दादा नी एकदम भारी रेसिपी दाखवली..आम्ही घरी प्रयत्न केला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता पर्यंत केलेल्या "वडापाव रेसिपी" मधे ही एकदम A One Recipe !!! खूप भारी झाला वडा ☺️☺️👍👍

  • @roshanisawant6197
    @roshanisawant6197 Před 2 lety +9

    ओ अभि शेठ, तुम्ही नादच केलात थेट. वडापाव दुनीएतील नम्बर वन फ़ूड आहे, जो गरीबा पासून श्रीमंत हि आवडीने खातात. धन्यवाद तिघांना ही.

  • @lalannarvekar3521
    @lalannarvekar3521 Před 2 lety +6

    कृष्णाई, रेसिपी सांगताना ज्या भाषेत तुम्ही सांगता ना , त्यामुळे रेसिपी सहज समजून करता येते.त्याहीपेक्षा सोपं म्हणजे घरात उपलब्ध असलेल्या सामानातून रेसिपी करता येते.वायफळ बडबड नाही की भपका नाही.हे मला खूप भावते.आत्ता जी तुम्ही वडापावची रेसिपी दाखवली ती पाहून कोणीही सहज वडापावची गाडी टाकून आपला उदरनिर्वाह चालवू शकेल.अशाच रेसिपी दाखवा व लोकांची मने जिंका.कृष्णाई तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

  • @aartimayekar8903
    @aartimayekar8903 Před 2 lety +6

    मस्त एक नंबर वडा पाव आणि काकी हात किती पटपट चालतो वडा पाव तुमच्या गाडीवर छान भेटतो मी आणलाय एकदा खूप खुप छान रेसिपी आणि भरपूर यश मिळो अशीच प्रगती होऊ दे

  • @shrutiraorane8075
    @shrutiraorane8075 Před 2 lety +4

    Tuze 100k subscribe kadhihoti yachi aaturta &silver play button tula lavakar milo

  • @cheta121
    @cheta121 Před 2 lety +82

    नाही बडेजावपणा ,नाही दिखावा ,जसे असाल तसे तुम्ही रेसिपीस दाखवतात ,तुमच्या बोलण्यानेच घरचे वाटतात तुम्ही .

  • @anujaagashe778
    @anujaagashe778 Před 2 lety +92

    साधी राहणी आणि उच्च विचारसरणी.... ही म्हण तुमच्या कुटुंबाला अगदी साजेशी आहे.... वडापाव ची रेसिपी एकदम छान..... तोंडाला पाणी सुटले..... कोकणातलं वातावरण आणि तुमची कोकणातली भाषा मनाला खूप भावते ❤️❤️

  • @gouribapat5034
    @gouribapat5034 Před 2 lety +16

    दिवाळीची मिठाई खाता खाता काहीतरी चटपटीत खायची इच्छा झाली. नेमके हेच ओळखून अभी, कृष्णाई आणि काकूंनी मस्त अशी वडापावची रेसिपी दाखवली.रेसिपी इतकी छान की तोंडातून आपोआप वाहवा निघाली. कृष्णाई तुझे खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना शुभ दीपावली.

  • @baalah7
    @baalah7 Před 2 lety +58

    वडा पाव - महाराष्ट्र ची शान 🙌🏼

  • @atharvsuryawanshivlogs5914
    @atharvsuryawanshivlogs5914 Před 2 lety +19

    कष्टाळू आईचे कष्टाळू मुले..... रेसिपी खूपच छान 👍

  • @sukanyak8719
    @sukanyak8719 Před 2 lety +26

    Krushnai ची आई खुप उत्तम प्रकारे समजाऊन सांगतात,

  • @Mugdha1111
    @Mugdha1111 Před 2 lety +8

    खूप छान! Most awaited recipe..

  • @epicanimation5671
    @epicanimation5671 Před 2 lety +13

    Kaku Kiti Premane bolata tumhi …khap chan asatat tumchya recipe ….kanda bhaji tar khup sundar Zail Sarvana khup aavadli gharat …..thank you very much to you all …. Happy Diwali

  • @shilpamahajan3616
    @shilpamahajan3616 Před 2 lety +9

    खरंच तू खूप हुशार आहे कृष्णाई, अभी खूप शांत आहे, दोघी नाण्यांच्या दोन बाजू आहेत