Mann Suddha Tujha | मन सुद्ध तुझं | अ‍ॅनिमा - अ‍ॅनिमस | भाग 13

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 08. 2024
  • #ABPMajha #MarathiNews
    Mann Suddha Tujha | मन सुद्ध तुझं | अ‍ॅनिमा - अ‍ॅनिमस | भाग 13
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our CZcams channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    / abpmajhatv
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

Komentáře • 614

  • @sunandachitale9144
    @sunandachitale9144 Před 2 lety +12

    सध्या इतर वाहिन्यांवर त्याच्या त्याच सुड मालिका पाहण्यापेक्षा ही छोटी छोटी कथानक पाहायला फारच आवडली.. निखळ आनंद मिळाला.. यात सामाजिक प्रबोधन पण चांगल्या पद्धतीने सांगितले आहे जी आत्ता काळाची गरज आहे.. सर्वांना धन्यवाद.. आणि शुभेच्छा..

  • @shridharchhatre2058
    @shridharchhatre2058 Před 2 lety +24

    मी जवळ जवळ सर्व भाग पहिले आहेत आणि ते मला खूप आवडले.डाॅ.मुलमुले, लेखक, दिग्दर्शक, कलाकार इ.सर्वांचे आभार. पुढील भागांची वाट पाहतो.

  • @yogitanilakhe3963
    @yogitanilakhe3963 Před 2 lety +85

    Please , ही मालिका बंद करू नका , वेगवेगळ्या प्रश्नांचीउत्तरं देत रहा ,शालेय विद्यार्थी , तरुण पिढी खूप प्रश्न आहेत

  • @dineshw9281
    @dineshw9281 Před 2 lety +70

    खुपच सुंदर कथातत्व , प्रत्येक घरात कुठेना कुठे एक कथा घडत आहे ! सर्वच कलाकार उत्तम ! स्वप्नील जोशी मात्र प्रत्येक घराचा आधार झालाय असे वाटते !!!

    • @vandanadevasthali1957
      @vandanadevasthali1957 Před 2 lety +1

      Khoop chaan sadar kele ahe

    • @smitisawant3038
      @smitisawant3038 Před 2 lety +1

      Malika ka band kartat

    • @aratitatte3290
      @aratitatte3290 Před 2 lety +1

      Khup Chan lekhan
      Uttam kalakar....
      Thank you

    • @rekhakhade447
      @rekhakhade447 Před 2 lety

      खूपच वैचारीक पातळीवर ही मालिका आहे आता सर्वच पिढीला मार्गदर्शन होईल, आता नविन पिढीला लग्न किंवा मूल असणे हा नकारत्मक विचाराच्या जवळ आहेत त्याविषयालाही हात घातला असता तर खूप छान झाले असते
      धन्यवाद🙏

    • @vidyagovind7253
      @vidyagovind7253 Před 2 lety

      Vidya bhale
      Mali ka khupch chagali aahe
      prattekach tyatunch kahi nahi
      nakki upyoi

  • @smitajoshi617
    @smitajoshi617 Před 2 lety +49

    खुप सुंदर मालिका आहे. पुढील भाग पाहण्यासाठी उत्सुकता आहे.खुप दिवसांनी छान मालिका पाहायला मिळाली त्या बद्दल धन्यवाद.

  • @smitapatil6531
    @smitapatil6531 Před 2 lety +29

    सर्वच एपिसोड खूपच सुंदर अजूनही असे बरेचसे मानसिक गुंता सोडवणारे एपिसोड असावेत.

  • @gigglemotion
    @gigglemotion Před 2 lety +64

    Please continue...this series is more important than political and bollywood news...eagerly waiting for 2nd season.....

    • @sureshmahajan727
      @sureshmahajan727 Před 2 lety +1

      खूप छान मालिका होती अगदी सर्वाथाने खूप धन्यवाद आम्हाला पण व्यक्त होण्यासाठी असे कोणी भेटेल का?

    • @rohinisuryavanshi1481
      @rohinisuryavanshi1481 Před rokem

      मी वारंवार पहात असते. मानसशास्त्रीय प्रबोधनाबरोबर शुद्ध सात्विक मराठी भाषेसाठी ही हे भाग वारंवार पहावेसे वाटतात. एक संस्कार उजळणी म्हणू यातं. 🙏

  • @meeraghayal6150
    @meeraghayal6150 Před 2 lety +7

    चंद्रकांत सर खूप खूप आभार. पण ही सिरीयल बंद करु नका. प्रचंड , भरपूर विषय आहेत . समाजात दुःख अडचणी आहेत. कुठेतरी स्वतःला कल्पून प्रश्न सुटू शकतील.
    please continue it

  • @priyankachitarlewar6837
    @priyankachitarlewar6837 Před 2 lety +10

    सगळे भाग अतिशय सुरेख पद्धतीने मांडले गेले . सगळ्यातून काहीनाकाही शिकायला मिळालं .ही मालिका आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल ...सगळ्यांचे आभार ..sesion 2साठी शुभेच्छा....धन्यवाद...

  • @pradnyapavagi9283
    @pradnyapavagi9283 Před 2 lety +5

    अप्रतिम !! 12 वा 13 हे भाग तर अप्रतिम.. अगदी कळसच आहेत सर्व भागांवर. खरंच खूप प्रश्न आहेत विषय म्हणून पुढे उभे असलेले. लेखन, दिग्दर्शन, अभिनय सर्वच बाबतीत मालिका सुरेख. टायटल सॉन्ग ही किती समर्पक आहे.. खूप इफ्फेक्टिव्ह.
    दुसऱ्या सिझन च्या प्रतीक्षेत !!

  • @asmitadixit8612
    @asmitadixit8612 Před 2 lety +9

    चंद्रकांत sir, and ur team.
    Great job done sir.
    खूप खूप धन्यवाद

  • @anaghakeskar3280
    @anaghakeskar3280 Před 2 lety +29

    All the episodes are worth watching. The content, dialogues, the choice of characters and cast is good. It is a pleasure watching Swapnil Joshi in the role of a mature psychiatrist. My expectations from him have increased. Only one suggestion: Probably due to the time available for expressing the problems, it wrongly conveys that the psychiatrist's work is quite simple and he gets positive response from all his patients in a single sitting. I fear this may induce people to expect miracles from the psychiatrist. I do not know how you would be tackle that problem but it can be suggested that there have been a series of sessions before the problems was concluded. Your team may accept this challenge with your creative mind without compromising with the footage. Thanks for presenting this serial and I do hope that you will come with more such problems in the average families in our society.

    • @gayatriajit9178
      @gayatriajit9178 Před 2 lety

      Maam, are you a mental health professional?

    • @anjalikulkarni2158
      @anjalikulkarni2158 Před 2 lety

      सर्वच भाग अतिशय भावपूर्ण व सुंदर आहेत.
      आणि एक वेगळा विषय प्रेक्षकांसमोर खूप
      प्रगल्भपणे मांडला आहे. Abp maza व सर्व teamला धन्यवाद. पुढील भागांची आतुरतेने वाट पहात आहे.

    • @vanitaziman5035
      @vanitaziman5035 Před 2 dny

      You said it🙌👍

  • @rajivanmudholkar8452
    @rajivanmudholkar8452 Před 2 lety +7

    ग्रेट मालिका ! घरोघरी मातीच्याच चुली ! समाजातील सुप्त आणि गुप्त परिस्थितीचा संदेश दिल्याबद्दल तुमचे सर्वांचे अभिनंदन !

  • @varshamore7536
    @varshamore7536 Před 2 lety +9

    खुपच छान वाटत ही मालिका बघताना. यातील प्रत्येक वाक्य, प्रत्येक शब्द एक धडा, आयुष्याला एक अर्थ देउन जातात. ABP maza चे खुप आभार. स्वप्निल जोशी मस्त. Waiting for next season.

  • @akashtandel9633
    @akashtandel9633 Před 2 lety +5

    This is the Quality content missing from almost every Indian channels. ABP maza has done an amazing thing here! My friend recommended this to me and am I glad she did.
    I thank the whole team and looking forward to more lessons to learn ❤️

  • @anjalipatil2134
    @anjalipatil2134 Před 2 lety +5

    मी सर्व भाग बघितले. खुप छान. विषय मांडणी संतुलीत. समाजाला अश्या प्रकारच्या प्रबोधनाची गरज. आम्ही दिलासा बहूउद्देशीय संस्था, जलगाव च्या माध्यमातून हेच कार्य करतोय. इतर सासबहू पेक्षा वेगला आणि आवश्यक विषय निवडल्या बद्दल चंद्रकांत कुलकर्णी व सर्व टिमचे अभिनंदन.

  • @meenapingle9055
    @meenapingle9055 Před měsícem +2

    फारच अप्रतिम ! मी पुन्हा एकदा आपले पहिल्या season चे सर्व भाग पाहिले. पहिला season हा फक्त १३ भागांचाच होता. परंतु second season हा कायम चालू रहावा ही इच्छा. मानसिक गुंता सोडवणे ही आज काळाची फार मोठी गरज आहे. ही मालिका शैक्षणिक मालिकाही आहे.
    डॉ. मुलमुले, दिग्दर्शक, लेखक आणि कलाकार या सर्वांचेच आभार. 🙏

  • @rajanikolarkar438
    @rajanikolarkar438 Před 26 dny +1

    डॉ क्टर मुलमुले यांचं लेखन आणि निरीक्षण अप्रतिम..आणि सादरीकरण तर लाजबाब

  • @drvaishalikale-galande8790

    खरच योग्य विषय, छान मांडणी, मालिका छान वाटली आणि भावली सुध्दा ⭐⭐⭐⭐⭐

  • @ninadsule5979
    @ninadsule5979 Před 2 lety +10

    Well done Rajas. Loved your performance. Swapnil is awesome as always; loved this one; thanks ABP Majha

  • @sandeepgokhale5226
    @sandeepgokhale5226 Před 2 lety +14

    Watched only a few episodes as of now and realized that this is of a different level than most so called serials and there is a objective similar to those movies or serials of earlier times that just entertainment or commercial angle. Every aspect of this creation is different and excellent. Please continue with same zeal and honest objectives in future episodes. Take time if needed but don't loose the benchmark that you all have created. God bless 🙏🙏🙏

    • @pradeepdeo6575
      @pradeepdeo6575 Před 2 lety +1

      One of the best serial I came across in last 4 yeas

  • @manisbhat
    @manisbhat Před 4 dny +1

    खूपच दर्जेदार मालिका.....अतिशय सुंदर विषय, कलाकार, अभिनय मस्तच

  • @sanjaykhair6839
    @sanjaykhair6839 Před 2 lety +2

    सर्व टीमचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत.भाषा, संवाद,नाट्यमंच रचना तसेच एकूण टायमिंग अप्रतिम!श्री. स्वप्निल जोशी यांचा दर्जेदार अभिनय मनाला भावतो.अशाच समाजोपयोगी मालिका भविष्यात व्हाव्यात ही प्रार्थना!

  • @sadhanakarve9113
    @sadhanakarve9113 Před 2 lety +7

    अप्रतिम. बंद करू नका. वेगळे विषय बघायचे आहेत

  • @Anandachisadhna
    @Anandachisadhna Před 7 měsíci +1

    मन शुद्ध तुझं ही मुलमु ले सर नी लिहलेली आपण प्रस्तुत केलेली मालिका माझे सारखे हळवे व्यक्तीस उदबोधक जाणवते.
    आभारी आहोत.

  • @ashanesarkar9825
    @ashanesarkar9825 Před měsícem +1

    Khup sunder Malika.
    Sagalyanchi kame uttam zali aahet.
    Swapnil cha abhinay sunder aani dilkhulas.👍👍👍

  • @sumanmahajan1127
    @sumanmahajan1127 Před 2 lety +3

    अहाहा,काय सुंदर कलाकृती आहे प्रत्येक भाग आवर्जून पुन्हा पहावसा ,समजून घ्यावासा वाटला, सायकॉलजी ग्रुप्स वर खूप forward सुद्धा केला जातोय आणि खूप छान complements येत आहेत.सगळ्या टीम ल खूप खूप धन्यवाद,plz दुसरे पर्व येऊ देत,खूप शिकायला मिळतं आहे.आणि स्वप्नील जोशी फारच उत्तम काम करत आहेत.बाकीचे कलाकार ,तंत्रज्ञ,लेखक ,दिग्दर्शक,music सगळे अप्रतिम,मराठीतील उत्कृष्ट कलाकृती म्हणून स्मरणात राहील.

  • @ajitdighe6554
    @ajitdighe6554 Před 2 lety +1

    न संपणार्या गोष्टी, अश्या प्रकारच्या मालिकांचा अतीरेक झाला आहे, अश्या वेळी संपणार्या कथा, अश्या रूपाने सादर केलेल्या ह्या गोष्टी, त्या पण अत्यंत क्लिष्ट विषय एकदम. सोपा करुन सांगणे , दाखवणे हे मनाला भावल. गोष्टीला the end असावा, जो आपण दाखवला.
    झालेल्या भागांसाठी अभिनंदन, येणाऱ्या भागांसाठी शुभेच्छा.

  • @sandeeppatil7202
    @sandeeppatil7202 Před 2 lety +2

    जोशी सर यांची मनोपचार तज्ज्ञां ची भुमिका खुप सुंदर साकारली. समस्येचा मुळात जाऊन सोडविण्या चा प्रयत्न.👌👍

  • @gayatriajit9178
    @gayatriajit9178 Před 2 lety +7

    Thanks a lot for the 13 episodes. It was a fruitful learning opportunity especially being a psychology student. Pls do come with season 2 with more different cases. All actors, writers and people behind this endeavor did a splendid job.
    Keep going and eagerly waiting for season 2.

  • @nehapillai7063
    @nehapillai7063 Před 26 dny +1

    फार फार सुरेख विषय आणि सादरीकरण... लिहिलंयही सुरेख आणि या सर्वांनीत्याचं अक्षरशः सोन केलंय...❤❤loved it ..!😊

  • @2008aa6
    @2008aa6 Před 2 lety +6

    This whole series was top notch. The emotional quotient of this couple’s kids was exceptional and I liked that it busted the typical thinking or conclusion that kids in a troubled marriage cannot grow up to be perseptive, well adjusted, sensitive and balanced adults. And that’s absolutely the beauty of parenting, you don’t have to be perfect to be a good parent, our kids see us exactly as we are, our flaws, our limitations as well as our finer points nothing escapes them. I think not every couple in a troubled marriage can patch up, but every couple in troubled marriage with kids can keep hope that they can still raise awesome kids!

  • @abhijeetdiwakar8845
    @abhijeetdiwakar8845 Před 2 lety +1

    वाह मालिकेची सांगता फार सुंदर पद्धतीने झालीये.
    पुढच्या सिझनची आतुरता नक्कीच आहे.
    आजच्या भागाबद्दल सांगायचं तर मुलांनी डोळ्यात पाणी आणलं. सुंदर काम केलं आहे दोघांनी.
    सर्वांना असंच सुयश आणि सुआरोग्य लाभो हीच इच्छा.
    मन सुद्ध तुझं च्या सर्व टीमला खूप धन्यवाद.
    🙏🙏🙏🙏🙏

  • @revatishinde5400
    @revatishinde5400 Před 2 lety +10

    All episodes just AMAZING... Thank you so much!

  • @neelatare9755
    @neelatare9755 Před 2 lety +1

    मी १-१३ सगळे भाग बघितले. लेखक, दिग्दर्शक , कलाकार , सगळ्या टीमचे मन:पूर्वक अभिनंदन!! पुढच्या पर्वाची वाट बघत आहे.

  • @vrushalikhedkar8348
    @vrushalikhedkar8348 Před 2 lety +1

    मी सर्व एपिसोड बघितले. त्यातून मला माझ्या काही वयक्तिक गोष्टीची उत्तरे पण मिळाली . Thankyou 🙏 & waiting for part 2

  • @rekhapalkar7556
    @rekhapalkar7556 Před 2 lety +2

    अप्रतिम मालिका!विषय,संवाद ,दिग्दर्शन सर्वच उत्तम ! अश्या मालिका अखंड राहो. विशेष म्हणजे नवीन कलाकारांनी पण सुंदर अभिनय केले आहे, आजच्या भागातील राजस सुळे उत्कृष्ट सादरीकरण 👌👌

  • @vkhemant
    @vkhemant Před 2 lety +5

    Thank you very much for such a sensible series of episodes 🙏🙏🙏

  • @swapnaprabhudesai3230
    @swapnaprabhudesai3230 Před 2 lety

    अप्रतिम मालिका
    एक विनंती करावीशी वाटते की पुढील भागात डॉक्टर चे काम श्री स्वप्नील जोशी यांनीच करावे बाकीची ही टीम हीच असावी.
    Dr. मूलमुले यांना ही खूप धन्यवाद!
    पुढील मालिकेची वेळ ही हिच असावी
    आठवड्यात एकदा
    मालिकेची उत्सुकता राहील.

  • @seemajoshi2317
    @seemajoshi2317 Před 17 dny

    अप्रतिम अप्रतिम खरंच सगळ्यांचे अतिशय मनापासून अभिनंदन खूप सुंदर विषय आशय आणि तो तेवढाच कठीण आहे मांडायला पण तो खूप सुंदररित्या मांडलाय आणि कुठेही त्याचा अवडंबर पण केलं नाहीये सगळ्यातबरे वाटले सायंतिफिकली प्रत्येक आजाराचा विश्लेषण केले आहे भारतात तरी त्याच्याबद्दल एवढी सतर्कता नाही कित्येकांना हे कळत पण नाही की आपल्याला काही प्रॉब्लेम आहे मला वाटतं आशा मालिकेमुळे लोकांचे प्रबोधन पण होईल नाही झालंय धन्यवाद

  • @shardagitaye8422
    @shardagitaye8422 Před 2 lety +1

    सर्वच एपिसोड खूप छान... घराघरात घडणारे सर्व विषयांची मांडणी व उपाय मनाला भावले.कुठेतरी स्वतः चे प्रतिबिंब दिसले.सर्वाना salute..

  • @rekhaabhyankar4304
    @rekhaabhyankar4304 Před 2 lety +4

    दुसरं पर्व नक्की होउदे, आतुरतेने वाट पहात आहोत, खूप संवेदनशील मालिका, all the very बेस्ट

  • @kavitadjoshi
    @kavitadjoshi Před 2 lety +2

    फार छान मालिका.
    उत्कृष्ट अभिनय, चांगले लेखन आणि लाजवाब दिग्दर्शन. या भागातील मुलांचे संवाद खूप वेगळे आहेत.
    दुसऱ्या सिझनची वाट पहात आहोत.

  • @prajaktajoshi8937
    @prajaktajoshi8937 Před 2 lety +1

    प्रत्येक एपिसोड अगदी सुंदर मनाला भिडणारा...सर्वांचे अभिनय उत्कृष्ट...उत्तम लिखाण..दुसर्‍या पर्वाची वाट पाहतोय

  • @swatimoharil6899
    @swatimoharil6899 Před 2 dny

    हे पण अगदी बरोबर आहे आणि अजून अशीच मालिका चालू राहू द्या प्रश्न खूप छान घेतले आहे

  • @shrikantdeshpande1284
    @shrikantdeshpande1284 Před 2 lety

    चंद्रकांतजी नमस्कार,
    मी सर्व भाग बघून आज संपवले. तुमचं "निरूपण" ऐकलं. मी सर्वसाधारण प्रेक्षक आहे. मला नेमकं सांगता येणार नाही पण आपल्या दिग्दर्शनाची जाणीव पदोपदी होते. म्हणजे नेमकं कुठे थांबायचं / आशय प्रेक्षकांपर्यंत ठोसपणे कसा पोहोचवायचा वगैरे वगैरे जे कसब आहे ते लाजवाब , आफलातून . आपल्या सर्व चमूचं व एबीपी माझाचं मनःपूर्वक अभिनंदन / शुभेच्छा व पुढील कार्यक्रमाची वाट बघतो...

  • @manjireeranade0707
    @manjireeranade0707 Před 4 dny

    सगळे भाग अप्रतिम!!! पुढील भागांची आतुरतेने वाट बघतोय.

  • @shubhadadivekar927
    @shubhadadivekar927 Před 2 lety +2

    ही मालीका खूपच सुंदर आहे.चालूच रहावी .शुभेच्छा.🙏🙏🙏🙏🙏💐

  • @shubhamshinde555
    @shubhamshinde555 Před 2 lety +1

    सर खूप खूप आभार असे दर्जात्मक कार्यक्रम आणल्याबद्दल .
    काही महिन्यांपूर्वी हा कार्यक्रम झाला असता तर कदाचित माझे वडील वाचले असते 😔

  • @sandhyadeoley2272
    @sandhyadeoley2272 Před 23 dny

    अप्रतिम मालिका !!!...आणि वर्तमान काळात फारच तीव्रतेने जाणवणाऱ्या विषयांवर ही मालिका अगदी उत्तमरित्या विषय लेखन,संवाद लेखन, निर्देशन,शीर्षक गीत, आदरणीय अशोक पत्की जींच अप्रतिम संगीत व अप्रतिम कलाकारांतर्फे अप्रतिम पणें सादर झाली.....ही मालिका तयार करताना अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत ज्या सर्वांचा सहभाग होता त्या सर्वांचे आणि मुख्यत्वेकरून एबीपी माझा या ऐप चे मनःपूर्वक खूप खूप अभिनंदन अभिनंदन अभिनंदन !!!.....सीझन 2 सुरू झालाय याबद्दल ही अभिनंदन !!! ❤💫❤💫❤ 🙌 🙌

  • @drumasonune7002
    @drumasonune7002 Před 2 lety +5

    Viraj character is just 😘 too beautiful serial yaar n dis episode..

  • @vibhanitinjo
    @vibhanitinjo Před 2 lety +1

    खूपच सुरेख मांडणी, ही मालिका चालू ठेवा अतिशय उपयोगी आहे. नक्की पुढे चालू ठेवा

  • @sameerdarekar34
    @sameerdarekar34 Před 2 lety +2

    Wow. Excellent. In 24 minutes so many shades of emotions, mind, human nature, parents- child relationship, husband wife relationship, friendships, philosophy and much more. Thanks so much all team and ABP maza

  • @pallaviphadke9935
    @pallaviphadke9935 Před 2 lety +1

    खूपच सुंदर मालिका. अप्रतिम, अगदी आपलीशी वाटणारी. दुसरे पर्व येण्याची वाट बघतोय. मनापासून सर्वांचे अभिनंदन.

  • @jayashrikhare1738
    @jayashrikhare1738 Před 2 lety +1

    सर्वच कथा अतिशय सुंदर. मनाला भिडणार्‍या होत्या.

  • @varadpande1021
    @varadpande1021 Před 2 lety +10

    Awaiting for season 2

  • @avinashjawalgikar4455
    @avinashjawalgikar4455 Před 2 lety +1

    खुप दिवसांनी टिव्ही पाहावसा वाटलं मनापासून धन्यवाद..आभारी आहोत 😘😘😥

  • @snehaldk6609
    @snehaldk6609 Před 2 lety +1

    खूप सुंदर प्रयत्न साकार केला आहे. टीम मधील सर्वांचे व कलाकारांचे कौतुक. विशेष मार्मिक लिखाण केले आहे.

  • @purushottamapte6768
    @purushottamapte6768 Před 2 lety +2

    उपक्रम फारच छान. पुढील सत्राची आतुरतेने वाट पाहत आहे

  • @avantikapadhye3410
    @avantikapadhye3410 Před 2 lety +1

    खुप छान आहे तुमचा शो. सर्वे कलाकार उत्तम आहेत स्पेशली स्वप्नील जोशी..तुमच्या नेक्स्ट पार्टची अतूर्तेने वाट पाहात आहे. Some episodes are very close to our life..पाहताना अगदी डोळ्यातून पाणी आले..Great job 👍

    • @cndongre2867
      @cndongre2867 Před 28 dny

      मी 2भाग पहिले अप्रतिम

  • @ashwinigaikwad1586
    @ashwinigaikwad1586 Před 2 lety +1

    अप्रतिम! कौतुक करायला शब्द नाहीत..

  • @shwetatawde6496
    @shwetatawde6496 Před 2 lety

    अतिशय सुरेख कार्यक्रम आहे. मला खूपच आवडला. माझ्या घरात मानसिक समस्या आनुवंशिक आहे. बराच अनुभव घेतला आहे. सांगण्यासारखे खूप आहे. पण इथे शक्य नाही.

  • @mohitladole7376
    @mohitladole7376 Před 2 lety

    तुमची मालिका आवडीने मागचं कारण त्या भागाच्या विषयासंदर्भातील मनात येणारे प्रश्न या सर्वांची उत्तरे त्या वीस मिनिटाच्या मालिकेतील दिल्या जातात आणि हा विषय कधीनाकधी कसाना कसाना एक सामान्य माणूस त्या प्रसंगातून गेलेला असतो

  • @SWAMIJAGACHIMAULI
    @SWAMIJAGACHIMAULI Před 2 lety

    खूप खूप सुंदर गोष्टी अगदी थेट मनाला भिडणाऱ्या .
    प्रत्येक गोष्ट काहीतरी नवीन शिकवून गेली आणि ही आपल्यालाच अनुबोधित आहे असे वाटले
    दुसऱ्या पर्वाची आतुरतेने वाट पाहतोय
    आपला चाहता प्रेक्षक
    प्रशांत हटवार
    वर्धा

  • @vrushalihadas6247
    @vrushalihadas6247 Před 2 lety +1

    खूपच सुंदर 13 ही भाग मला खूपउशिरा समजले मग मी हावरट होऊन सगळे,7,8 भाग भरभर बघितले काही तर अत्युत्तम होतें दुसऱ्या पर्वाची अधीरतेने वाट बघतोय

  • @urmilabhalerao6102
    @urmilabhalerao6102 Před 2 lety +1

    मनापासून धन्यवाद 🙏 की तुम्ही प्रेक्षकांच्या भावना जाणल्या

  • @ujwalaprabhu5404
    @ujwalaprabhu5404 Před 2 lety +5

    Thank you for promising us with season two. After ages we got to view something so deep and extremely creatively conjured. You have perfected every area in the making of this series, actors scripting everything is perfect. If any one area was loose it would not have been so effective. And yes, thank you for uploading it on other platforms. In our house we have not subscribed for TV programs for more than 8/9 years now. We don't watch TV. If we get to see meaningful programs as this series, we may start subscription again.

    • @nandumulmulemulmule426
      @nandumulmulemulmule426 Před 2 lety

      प्रतिक्रियेने भरून पावणे म्हणतात त्याचा प्रत्यय आला!

    • @rameshbhutkar4967
      @rameshbhutkar4967 Před 2 lety

      खुपच सुंदर मालिका, पुढील भाग पाहण्यास ऊत्सुख आहोत. धन्यवाद...

  • @kalyanipurandare3231
    @kalyanipurandare3231 Před 2 lety +1

    खुप सुंदर पद्धतीने व हळुवारपणे मनातील कप्पे तुम्ही उघडले आहे.

  • @suvarnaterdalkar6114
    @suvarnaterdalkar6114 Před 2 lety +2

    फारच अप्रतिम .👌👌👌👌

  • @jayantpathak1218
    @jayantpathak1218 Před 2 lety +1

    जय हो ' इतर ' मालिका सादर करणार्‍यांनी , कथानक; सादरीकरण ; दिग्दर्शन आदि बाबींचा आदर्श घ्यावा .
    पुन:पुन्हा धन्यवाद . . . .
    इतकी सर्वांगसुंदर मालिका निर्माण केल्याबद्दल . . .
    वाट पहातोय पुढच्या सिझनची.

  • @santoshimahajan854
    @santoshimahajan854 Před 2 lety +2

    Hoie mann suddha tuze ...kharach aata shabd rahile nahi varnan karayala ...radaval aaj tumhi sarvani ..manje purn team ne ...jevha ..first impression is not last impression sentence ale...wow absolutely..kay bolu .. great..aajparyantchi pahileli ..manala bhidleli ..gosht ..nahi manata yenar ....karan ya sarv janiva jagrut karayche kam hotey aaj samajat ...karan aaj bahutansh lok ..ekate padlet ...koni nahiche tyanchya javal ..eikayala ..kinva samjun ghyayla ...khup aprtim work done by whole team 🙏

  • @punjamuradnarmuradnar3132

    फारच सुंदर मालिका सर्व कलाकारांनी फारच सुंदर काम केलं सर्व मालिका या समाजात घडणाऱ्या वस्तुस्थितीला धरून आहेत कृपया ही मालिका बंद करू नका आम्ही वाट पाहत आहोत.

  • @vedaswarmusic
    @vedaswarmusic Před 2 lety +1

    किती mature लेखन, किती गोड वाटल!!! मुलानी खूपच सुंदर acting केलय !!

  • @snehalkulkarni3053
    @snehalkulkarni3053 Před 2 lety +1

    अतिसुंदर मालिका आहेत ह्या ..एक से बढकर एक .. सगळे कलाकार मस्तच...स्वप्नील जोशी खासच..

  • @sunitanerkar529
    @sunitanerkar529 Před 14 dny

    मालिका मनाला भावली आवडली आणि मनात भिनली. शतश: आभार. मालिका अशीच चालू रहावी, असंख्य भाग व्हावेत ही मनिषा, आणि मनोमन शुभेच्छा.

  • @user-gt3pb9xu6r
    @user-gt3pb9xu6r Před 29 dny

    खूपच छान प्रत्येकाने पहावेत असे कथानक काय सांगु काही प्रश्न आपोआप सुटले फक्त माझेच नाही तरह अनेकांनी कौतुक केले आणि त्यानाही असाच अनुभव आला खूप धन्यवाद

  • @gosavisheela3126
    @gosavisheela3126 Před 2 lety +1

    सर्व भाग केवळ अप्रतिम... 👌👌

  • @jayamalapatil8876
    @jayamalapatil8876 Před 2 lety +2

    अप्रतिम मालिका. मार्गदर्शकाचं काम ही मालिका करत आहे.याचे पुढील भाग लवकरात लवकर पहायला मिळावेत.

  • @snehaldeshmukh1399
    @snehaldeshmukh1399 Před 2 lety +2

    First impression is not necessary for the last impression..आक्रमकता म्हणजे पौरुषत्व नव्हे..पूर्व ग्रहाच्या बाहेर बघत राहिलो तर शुक्र तारा नक्की दिसेलच...
    Nice acting,nice idea& very usefull for the human being...

  • @snigdhapandit2352
    @snigdhapandit2352 Před 2 lety

    अप्रतिम दिग्दर्शन, अप्रतिम अभिनय, अप्रतिम लेखन. फारच सुरेख सीरियल. सध्या तकलादू सीरियल पहायला शिक्षा वाटते. पण एबीपी माझा ने एक छान अनुभव दिला. खूप भावला. अजून अशाच छान एपिसोड च्या प्रतिक्षेत.
    धन्यवाद!

  • @snehamathkar9485
    @snehamathkar9485 Před 2 lety +1

    अतिशय सुंदर लिखाण
    दुसऱ्या पर्वाची वाट बघतो आहोत
    सुंदर मालिका

  • @vrundasoman3640
    @vrundasoman3640 Před 2 lety +1

    अतिशय उत्तम मालिका , Please continue.

  • @namratasawant6789
    @namratasawant6789 Před 25 dny

    मी दोन दिवसात सर्व भाग बघितले. इतकंन त्यात गुंतून गेलं होतं..❤❤❤❤❤

  • @alpanajoshi3180
    @alpanajoshi3180 Před 2 lety +1

    अतिशय सुंदर आणि अतिशय महत्वाचे
    Pls continue

  • @vaishaligandhe5493
    @vaishaligandhe5493 Před 2 lety +1

    फारच छान , दुसर्‍या पर्वाची आतुरतेने वाट बघतोय.

  • @manishadurgale145
    @manishadurgale145 Před 2 lety

    ह्या मालिके ने एक खूप ज्वलंत प्रश्न कसा सोपा करून जीवन सुखकर होईल हे शिकवले. खुप छान सादरीकरण, शब्दच नाहीत कौतुक करण्यासाठी
    .

  • @r.gjoshi5518
    @r.gjoshi5518 Před 2 lety +1

    खूप छान . सगऴ्यावयोगळांंसाठी खूप उपयुत्त.

    • @savitanavare3146
      @savitanavare3146 Před 2 lety

      स्वप्नील j0shi चा मस्त मार्गदर्शन.

  • @ravishukla85
    @ravishukla85 Před 2 lety +1

    सर्वच एपिसोड खूपच सुंदर आहेत ...प्रत्येक भागामधले सर्व कलाकार एक्दम ताकतीचे अभिनेते आहेत च आणि त्यांनी त्यांच्या भूमिकेला उत्तम न्याय दिला आहे ...पण एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते ती म्हणजे या सर्व भागामध्ये ज्यांनी लहान मुलांचा अभिनय केला आहे .... त्याला तोड नाही ....त्यांचा अभिनय वाखाणण्याजोगा आहे ....
    चंद्रकांत कुलकर्णी सरांचे आणि त्यांच्या टीम चे मनापासून खूप आभार आणि आम्ही दुसऱ्या सिझन ची आतुरतेने वाट पाहतोय ....

  • @aparnavishwasrao9643
    @aparnavishwasrao9643 Před 2 lety

    खूप सुंदर व संवेदनशील मालिका. दुसरे पर्व लवकरच सुरू होऊ दे

  • @surekhabhave1920
    @surekhabhave1920 Před měsícem

    खुपच छान मालिका मी आत्ता 2024 मधे बघितली . खुपच छान , विचार करायला लावणारी

  • @sunandachitale9144
    @sunandachitale9144 Před 2 lety +1

    हा एपिसोड शेवटचा आहे हे समजल्यावर खूपच वाईट वाटले... परत नवीन एपिसोड घेऊन यावे अशी आग्रहाची विनंती आहे...

  • @ruchikasindhkar1492
    @ruchikasindhkar1492 Před 2 lety +1

    Every team member you all too deserve a lot of appreciation. Thanks 🙏

  • @mrudulakale4307
    @mrudulakale4307 Před 2 lety

    हा कार्यक्रम मला अतिशय आवडलेला आहे .।अशाच कार्यक्रमांची जगामधे प्रत्येकाला गरज आहे .

  • @ashEpicEats
    @ashEpicEats Před 2 lety

    सर्वच episod भावले, भिडले...खरच शब्दातीत!
    मी Psychology ची विद्यार्थिनी असल्याने खूप शिकण्यासही मिळालं👍💐खूप धन्यवाद,
    अजून शिकण्यास आवडेल👌👍💐

  • @archanaramchandani175
    @archanaramchandani175 Před 2 lety +1

    अप्रतिम . स्वप्नील तर भारी आहेच पण कथा आणि इतर कलाकार हि उत्तम. धन्यवाद . दुसरा सेशन लवकर सुरु करा 🙏🏻

  • @prachiwagh8891
    @prachiwagh8891 Před 2 lety +1

    खूप सुंदर मालिका. पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहे.

  • @user-nu2vq1nc3f
    @user-nu2vq1nc3f Před 27 dny

    सगळेच ऐपिसोड छान आहेत स्वप्नील तर खुपच छान डॉक्टर म्हणून खुप छान काम केलय अभिनंदन ❤

  • @radhikakulkarni7621
    @radhikakulkarni7621 Před 2 lety

    पहिलं पर्व संपलं, हे ऐकताना खूप वाईट वाटतंय...
    'व्यक्ती तितक्या प्रकृती' यानुसार असंख्य भाग होऊ शकतील. सर्व कलाकारांचे, तंत्रज्ञांचे, लेखक, पटकथा लेखक, दिग्दर्शक आदी सर्वांचे मनःपूर्वक आभार! चंद्रकांत कुलकर्णी तुम्ही लवकरच या मालिकेचे दुसरे पर्व आणायचे आश्वासन दिले आहे. लवकरच या, आम्ही वाट पाहत आहोत.

  • @supriyabhagade4145
    @supriyabhagade4145 Před 2 lety

    किती छान पध्दतीने समजावून सांगत आहात. स्वतःकडे त्रयस्थ पणे बघण्याची दृष्टी दिलीत. सर्व कलाकारांचा उत्तम अभिनय आणि समस्येवर समंजसपणे उकल करण्याची समज वाढविली. एक दर्जेदार मालिका बघत आहोत याचे समाधान दिलेत. नव्या भागांची प्रतिक्षा आहे. धन्यवाद

  • @sunitanagapurkar3371
    @sunitanagapurkar3371 Před 2 lety +1

    सेशन टु लवकरच आणा, छान मालिका सादर केली,सर्व टीम चे अभिनंदन, स्वप्नील जोशी चे सादरीकरण खुप आवडले