गारद | शिवजयंती | शिवगर्जना | शिवाजी महाराजांची शिवगर्जना | संभाजी महाराज Jijau mata garjana | Garad

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2024
  • गारद | Garad | शिवगर्जना | शिवाजी महाराजांची शिवगर्जना|संभाजी महाराज|Shivgarjana by Odd Engineer
    गारद म्हणजे काय ?
    महाराज दरबारात प्रवेश करत असताना जी घोषणा किंवा ललकारी दिली जात होती तिला मराठीत “गारद” असे म्हटले जाते. गारदेला संस्कृतमध्ये "बिरुद" किंवा बिरुदावली तर ऊर्दु भाषेत "अल्काब "असे म्हणतात.
    या घोषणेचा नाद आसमंतात पसरतो तेव्हा आपल्या अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय रहात नाही. आणि हाच अनुभव तुम्हाला या व्हिडीओमध्ये अनुभवायला मिळेल.
    ...........................................................................................................
    Team-
    Directed and Edited by-
    @og_cinematics
    @shree_gulig
    @onkar_ghume_22
    @vicky_pawar18
    @tejas_bomble
    @shubhu_01_03
    Thumbnail by-
    @vighnaharta_graphics_design
    Recorded by- Inbetwin Studios
    @0nce.upon.an.artist
    @dhurandhar_raps
    Makeup by-@mulaniaasma
    ......................................................................................................
    गारद-
    "आस्ते कदम
    आस्ते कदम
    आस्ते कदम
    महाराज....!
    गडपती
    गजअश्वपती
    भूपती
    प्रजापती
    सुवर्णरत्नश्रीपती
    अष्टवधानजागृत
    अष्टप्रधानवेष्टित
    न्यायालंकारमंडित
    शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत
    राजनितिधुरंधर
    प्रौढप्रतापपुरंदर
    क्षत्रियकुलावतंस
    सिंहासनाधिश्वर
    महाराजाधिराज
    राजाशिवछत्रपती
    महाराजांचा विजय असो!!!! विजय असो!!!!!!!!!!
    छत्रपती शिवरायांची गारद आणि तिच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ
    गडपती - गडकोटांचे अधिपती, राज्यातील गडकोटांवर ज्यांचे आधिपत्य (राज्य) आहे असे महाराज.
    गजअश्वपती - ज्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे हत्ती व घोड्यांचे दल आहे असे महाराज. (त्याकाळी हत्ती हे वैभवाचं प्रतिक समजलं जायचं. म्हणुन गजअश्वपती हा शब्द आपण वैभवसंपन्नतेचे प्रतीक होता असे म्हणता येईल.)
    भूपती प्रजापती - वास्तविक राज्याभिषेक म्हणजे राज्यकर्त्याचा भुमीशी झालेला विवाह आहे. म्हणजेच ज्यांनी राज्यातील भुमीचे व प्रजेचा पती हे पद स्विकारले आहे आणि त्यांचे सर्वथा रक्षण करणे हे ज्या राज्यकर्त्यांचे प्रथम कर्तव्य आहे असे महाराज.
    सुवर्णरत्नश्रीपती - राज्याच्या खजिन्यातील वेगवेगळे हिरे, माणिक, मोती आणि सुवर्ण (सोने) यावर ज्यांचे आधिपत्य (मालकी) आहे असे महाराज. (शिवरायांच्या बाबतीत ३२ मण सुवर्णसिंहासनाचे अधिपती.)
    अष्टावधानजागृत - आठही प्रहर जागृत राहुन राज्याच्या आठही दिशांवर लक्ष असणारे महाराज.
    अष्टप्रधानवेष्टीत - ज्यांच्या पदरी प्रत्येक शास्त्रात निपुण असलेले आठ प्रधान आहेत आणि राज्यकारभारात जे त्यांचा सल्ला घेणात असे महाराज.
    न्यायालंकारमंडीत - कर्तव्यकठोर आणि न्यायकठोर राहुन सत्याच्या व न्यायाच्या बाजुने निकाल देणारे महाराज.
    शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत - सर्व प्रकारच्या शस्त्रविद्या व शास्त्रात पारंगत (निपुण) असलेले महाराज.
    राजनितीधुरंधर - आदर्श राज्यकर्त्याप्रमाणे राजकारणाच्या डावपेचांमध्ये (राजनितीमध्ये) तरबेज असलेले महाराज.
    प्रौढप्रतापपुरंदर - मोठे शौर्य गाजवुन ज्यांनी आपल्या पराक्रमाचा ठसा उमटवला असे महाराज.
    क्षत्रियकुलावतंस - क्षत्रिय कुळात जन्म घेऊन त्या कुळातील सर्वात मोठा (अवतंस) पराक्रम गाजवलेले महाराज.
    सिंहासनाधिश्वर - जसा देव्हाऱ्यातील देव (अधिश्वर) असतो तसेच ३२ मण सुवर्णसिंहासनावर शोभुन दिसणारे सिंहासनाचे अधिश्वर असे महाराज.
    महाराजाधिराज - विद्यमान सर्व राजांमध्ये जो सर्वात मोठा आहे आणि साऱ्या राजांनी ज्यांच्या अधिपत्याखाली राहण्याचे स्विकारायला हवे असे महाराज.
    राजाशिवछत्रपती - ज्यांच्यावर सुवर्णाची छत्रचाम रे ढळत आहेत किंवा प्रजेने छत्र धरुन ज्यांना आपला अधिपती म्हणुन स्विकारले आहे किंवा ज्यांच्यावर प्रत्यक्षात नभानेच छत्र धरले आहे असे छत्रपती शिवाजी महाराज
    शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ६ जुन १६७४ रोजी झाला. शिवराय “छत्रपती” झाले. रयतेला आनंद झाला. महाराजांची स्वारी दरबाराकडे निघाली. द्वारपालांचे इशारे झाले. गारदी ( एक वक्ती असते) पुढे सरसावले आणि महाराजांची गारद देण्यात आली.
    विषय काळजाचा आहे 🙏
    ..................................................................................................
    follow me on-
    Instagram- / that_odd_en...​
    facebook- / raj.chavan.146​
    .....................................................................
    Thanks for Watching
    THAT ODD ENGINEER
    ..................................................................................................
    Tags-
    #मावळा #शिवाजीमहाराज #Sambhajimaharaj

Komentáře • 166