सत्यवतीचा जन्म | महाभारत गोष्टी | The Birth of Satyavati | Mahabharata Tales

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 01. 2024
  • "वेद व्यासाची आई सत्यवतीची कथा पहा." द्वापाऱ युगात वसू नावाचा एक राजा राज्य करत होता. वसू अत्यंत धर्मपरायण राजा होता. परंतू त्याला शिकारीचा नाद होता. वसू राजा देवराज इंद्राचा भक्त होता, आणि त्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे राजाने चेदी राज्याची स्थापना केली होती. काही काळानंतर त्याने राजवैभवाचा त्याग केला आणि तो जंगलात जाऊन तपश्चर्येला बसला. राजाची तपश्चर्या थांबवण्यासाठी इंद्रदेवाने त्याला दर्शन दिले आणि इंद्र त्याला म्हणाला, "अरे नर श्रेष्ठा! जसा देवतांमध्ये मी इंद्र तसा तू मानवांमध्ये इंद्र आहेस. तू ही तपश्चर्या थांबवून आपल्या प्रजेचे पालन पोषण कर." "हे राजर्षी, मी तुझ्या तपश्चर्येने प्रसन्न झालो आहे. म्हणूनच मी तुला हा दैवी रथ आणि ही माला भेट देतो. हा दिव्य रथ दुप्पट वेगाने वायुमार्गाने तुला कुठेही घेऊन जाण्यास सक्षम आहे आणि या इंद्रमालेची कमळे कधीही मलूल होणार नाहीत." राजाला रत्नजडीत दैवी रथ आणि माला देत इंद्र म्हणला. त्याच बरोबर देवराज इंद्राने वसू राजाला एक बांबूची छडी सुद्धा दिली आणि सांगितलं, "माझं हे स्वरूप सर्व संकटांपासून तुझ्या राज्याचं रक्षण करेल." अशा प्रकारे देवरज इंद्राकडून वरदान प्राप्त करून राजा वसू आपल्या राज्यात परत आला आणि एका नव्या वर्षाच्या सुरूवातीला समारंभ पूर्वक इंद्राने दिलेली छडी जमिनीत रोवून तिला सुवर्ण वस्त्र, पुष्पमाला आणि आभूषणानी सुसज्जित करून तिचं पूजन केलं. एका हंसाच्या रूपात प्रकट होवून इंद्रदेवांनी पूजेचा स्वीकार केला. आणि म्हणाले, "जो कोणी अशा प्रकारे माझं पूजन करेल त्याला सदैव सुख आणि समृद्धी प्राप्त होईल." काही वर्षानी राजाला पाच पुत्र झाले, त्यापैकी एक जरासंधाचा पिता बृहद्रथ, ज्यानं पुढे जाऊन मगध राज्य स्थापन केलं. दूसरा प्रत्याग्रह जो पुढे चेदी नरेश बनला आणि ज्याच्या वंशात शिशुपालाने जन्म घेतला. तिसरा कुसंव, जो मनिवाहन नावाने प्रसिद्ध झाला. चौथा मवेल आणि पाचवा यदू. राजाने या पाचही पुत्रांना वेगवेगळ्या प्रांतांचं उत्तराधिकारी बनवलं. राजा इंद्राने दिलेल्या दैवी रथातून भ्रमण करायचा तेव्हा हवेत उडणार्‍या त्याच्या या रथामुळे त्याला उपरीचर अर्थात वरून चालणारा असं नाव पडलं. एकदा उपरीचर आपल्या रथातून असाच भ्रमण करत असताना त्याला शुक्तिमती नदीच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. राजाने पाहिलं, की कोलाहल नावाचा पर्वत शुक्तिमती नदीला जबरदस्ती आपल्या बाहुपाशात ओढत होता. ते पाहून वसू ने कोलाहलाला एक लाथ मारली ज्यामुळे पर्वताचे दोन भाग झाले आणि दोघांच्या मधून नदी वाहू लागली. कोलाहलाने शुक्तिमतीला दिलेल्या आलिंगनातून एका युवकाची आणि एका युवतीची उत्पत्ती झाली. राजाने युवकाला आपल्या सेनेचा सेनापती म्हणून नियुक्त केलं आणि त्या गिरिका नावाच्या सुंदर युवतीषी विवाह केला. एके दिवशी गिरिका साज-शृंगार करून राजा जवळ आली परंतू त्यावेळी राजाची पितरं प्रकट झाली आणि त्यांनी राजाला एका हरणाची शिकार करण्यास सांगितलं. पितरांची आज्ञा मानून राजा गिरिकेच्या विचारातच वनात शिकार करण्यासाठी निघून गेला. रस्त्यात आपल्या सुंदर पत्नीविषयी विचार करत असतानाच त्याचं वीर्यपतन झालं जे त्याने एका पानावर ठेऊन एका गरुडामार्फत आपल्या पत्नीकडे पाठवलं. वाटेत एका दुसर्‍याच गरुडाने या गरुडाला हे पान घेऊन उडताना पाहिलं आणि ते मांस आहे असं वाटून त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते पान खालून वाहणार्‍या यमुना नदीत पडलं. त्याच वेळी यमुना नदीत अद्रिका नावाची एक अप्सरा ब्रह्मदेवाच्या शापामुळे माशाच्या रूपात निवास करत होती. त्याच मत्स्यरूपी अप्सरेने वसूचं वीर्य ग्रहण केलं. काही काळाने एका कोळ्याने त्या मासळीला पकडलं. मत्स्य रूपी अद्रिका एका मुलाला आणि मुलीला जन्म देऊन ब्रह्मदेवच्या शापातून मुक्त झाली आणि पुन्हा स्वर्गलोकात निघून गेली. कोळी त्या दोन्ही मुलांना घेऊन चेदीनरेश उपरिचराकडे गेला. राजाने त्या मुलाला दत्तक घेतलं आणि माशाच्या पोटी जन्मल्याने त्याचं नाव मत्स्य ठेवलं. पुढे जाऊन मत्स्यानेच मत्स्य राज्याची स्थापना केली, जिथे पांडवानी आपल्या अज्ञातवासातील काळ व्यतीत केला. राजाने भरपूर भेट वस्तू देऊन मासळीच्या रूपातील अप्सरेच्या पोटी जन्मलेल्या त्या कन्येचे सत्यवती असं नामकरण केले आणि त्या कोळ्याला तिच्या पालनपोषणाची जबाबदारी सोपवली. तिच्या अंगाला मासळीसारखा गंध येत असल्यामुळे तीला मत्स्यगंधा असं नाव प्राप्त झालं. सत्यवती तिच्या मातेसमान अतिशय रूपवती होती. ती यमुना नदीत नाव चालवून आपल्या पित्याला मदत करू लागली. एके दिवशी वसिष्ठ मुनींचे नातू आणि शक्ती महर्षींचे पुत्र पराशार सत्यवतीला भेटले. ऋषी सत्यवतीच्या सुंदरतेवर मोहित झाले आणि म्हणाले, "हे रूपवती माझ्या आलिंगनाचा स्वीकार कर." सत्यवती नदी किनारी उभ्या असलेल्या ऋषींकडे इशारा करत म्हणाली, "ऋषीवर मी या इतर ऋषींच्या समक्ष तुमच्या आलिंगनाचा स्वीकार कसा करू?"
    #marathi #mahabharat #mahabharata #katha #bhakti #itihas #ancienthistory #epic
  • Zábava

Komentáře • 1

  • @sunilnarkhade4253
    @sunilnarkhade4253 Před 3 měsíci +1

    मॅम
    छान माहिती दिली🙏