Carvaan Classic Radio Show | Jagdish Khebudkar Marathi Songs Special | महान गीतकार | मराठी गाणी

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 07. 2022
  • ‪@saregamamarathi‬ पुन्हा एकदा महान गीतकार जगदीश खेबुडकर आणि त्यांच्या प्रसिद्ध गाण्यांवरील नवीन भाग घेऊन आले आहे.
    Click below to listen to your favorite song.
    0:01:35 Bai Bai Manmoracha
    0:04:54 Ek Lajara Na Sajara Mukhda
    0:10:21 Airaneechya Deva Tula [1965]
    0:13:52 Dhundi Kalyana
    0:17:35 Chandra Aahe Sakshiila
    0:22:33 Ashtavinayak Tuza Mahima Kasa
    0:41:35 Dehachi Tijori
    0:44:38 Vithoo Mauli Tu
    0:52:35 Tumhavar Keli Mee Marji Bahaal
    0:56:00 Aali Naar Thumkat Murdat
    1:00:36 Raja Lalkari Ashi De
    1:06:42 Ya Ravji Basa Bhavji
    1:14:20 Disla Ga Bai Disla (Mala Baghun Galat Haslaa)
    1:19:57 Mala Lagali Kunachi Uchaki
    1:24:45 Akashi Zep Ghe Re Pakhara
    Credits:
    TRACK TITLE: Bai Bai Manmoracha
    ALBUM/FILM TITLE: Mohityanchi Manjula
    ORIGINAL ARTIST: Lata Mangeshkar
    MUSIC DIRECTOR: Anandghan
    LYRICIST: Jagdish Khebudkar

    TRACK TITLE: Ek Lajara Na Sajara Mukhda
    ALBUM/FILM TITLE: Chandnachi Choli Ang Ang Jaali
    ORIGINAL ARTIST: Usha Mangeshkar, Arun Sarnaik
    MUSIC DIRECTOR: Ram Kadam
    LYRICIST: Jagdish Khebudkar

    TRACK TITLE: Airaneechya Deva Tula [1965]
    ALBUM/FILM TITLE: Sadhi Mansa
    ORIGINAL ARTIST: Lata Mangeshkar
    MUSIC DIRECTOR: Anandghan
    LYRICIST: Jagdish Khebudkar

    TRACK TITLE: Dhundi Kalyana
    ALBUM/FILM TITLE: Dhakti Bahin
    ORIGINAL ARTIST: Sudhir Phadke, Asha Bhosle
    MUSIC DIRECTOR: Sudhir Phadke
    LYRICIST: Jagdish Khebudkar
    TRACK TITLE: Chandra Aahe Sakshiila
    ALBUM/FILM TITLE: Chandra Hota Sakshila
    ORIGINAL ARTIST: Asha Bhosle, Sudhir Phadke
    MUSIC DIRECTOR: Sudhir Phadke
    LYRICIST: Jagdish Khebudkar

    TRACK TITLE: Ashtavinayak Tuza Mahima Kasa
    ALBUM/FILM TITLE: Ashtavinayak
    ORIGINAL ARTIST: Anuradha, Jaywant Kulkarni, Chanda Shekhar Gadgil, Pt. Sharad Jambhekar, Chorus, Mallesh
    MUSIC DIRECTOR: Anil-Arun
    LYRICIST: Jagdish Khebudkar

    TRACK TITLE: Dehachi Tijori
    ALBUM/FILM TITLE: Amhi Jato Amuchya Gava
    ORIGINAL ARTIST: Sudhir Phadke
    MUSIC DIRECTOR: Sudhir Phadke
    LYRICIST: Jagdish Khebudkar

    TRACK TITLE: Vithoo Mauli Tu
    ALBUM/FILM TITLE: Are Sansar Sansar
    ORIGINAL ARTIST: Sudhir Phadke, Suresh Wadkar, Jaywant Kulkarni
    MUSIC DIRECTOR: Anil-Arun
    LYRICIST: Jagdish Khebudkar

    TRACK TITLE: Tumhavar Keli Mee Marji Bahaal
    ALBUM/FILM TITLE: Pinjara
    ORIGINAL ARTIST: Usha Mangeshkar, Chorus
    MUSIC DIRECTOR: Ram Kadam
    LYRICIST: Jagdish Khebudkar

    TRACK TITLE: Aali Naar Thumkat Murdat
    ALBUM/FILM TITLE: Pinjara
    ORIGINAL ARTIST: Wagya, Chorus
    MUSIC DIRECTOR: Ram Kadam
    LYRICIST: Jagdish Khebudkar
    TRACK TITLE: Raja Lalkari Ashi De
    ALBUM/FILM TITLE: Are Sansar Sansar
    ORIGINAL ARTIST: Anuradha, Suresh Wadkar
    MUSIC DIRECTOR: Anil-Arun
    LYRICIST: Jagdish Khebudkar

    TRACK TITLE: Ya Ravji Basa Bhavji
    ALBUM/FILM TITLE: Naav Motha Lakshan Khota
    ORIGINAL ARTIST: Asha Bhosle
    MUSIC DIRECTOR: Anil-Arun
    LYRICIST: Jagdish Khebudkar

    TRACK TITLE: Disla Ga Bai Disla (Mala Baghun Galat Haslaa)
    ALBUM/FILM TITLE: Pinjara
    ORIGINAL ARTIST: Usha Mangeshkar
    MUSIC DIRECTOR: Ram Kadam
    LYRICIST: Jagdish Khebudkar

    TRACK TITLE: Mala Lagali Kunachi Uchaki
    ALBUM/FILM TITLE: Pinjara
    ORIGINAL ARTIST: Usha Mangeshkar, Chorus
    MUSIC DIRECTOR: Ram Kadam
    LYRICIST: Jagdish Khebudkar

    TRACK TITLE: Akashi Zep Ghe Re Pakhara
    ALBUM/FILM TITLE: Aram Haram Aahe
    ORIGINAL ARTIST: Sudhir Phadke
    MUSIC DIRECTOR: Sudhir Phadke
    LYRICIST: Jagdish Khebudkar
    #saregamamarathi
    #jagdishkhebudkar
    #latamangeshkar
    #marathisongs
    #मराठीगाणी
    #carvaanclassicradioshow
    Follow RJ Sanika on:
    Instagram - / saregama_sanika
    Facebook - / rjsanika
    Label- Saregama India Limited, A RPSG Group Company
    For more videos log on & subscribe to our channel :
    / saregamamarathi
    To buy the original and virus free track, visit www.saregama.com
    Follow us on -
    Facebook: / saregama
    Twitter: / saregamaglobal
  • Hudba

Komentáře • 377

  • @gautamthakare6614
    @gautamthakare6614 Před rokem +20

    विठू माऊली तू माऊली जगाची या गीताने तर अवघा भारतवर्ष भक्तिमय झाला

  • @SunilPatil-eh8on
    @SunilPatil-eh8on Před rokem +14

    मी भुसावळला कॉलेज मध्ये असताना त्यांचा गावरान मेवा कार्यक्रम बघितला होता . खेबुडकरांना प्रत्यक्ष कार्यक्रम सादर करतांना पाहणे हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग होता.

  • @vikramkhilari5959
    @vikramkhilari5959 Před měsícem +4

    अशा व्यक्तीला खरं तर भारतरत्न पुरस्कार भेटायला हवा.
    मराठी राजकारणी लाज वाटली पाहिजे तुम्हाला, असे रत्न राज्यात जन्मले , संपलं इथंच.
    पण तुम्ही राजकारणात इतकं दंग झाले की, तुम्हाला अशी लोक संपलेली पण कळलं नाही.
    तुम्हाला उरावर घ्यायला बॉलिवूड लागतं.😢😢😢😢😢

  • @omkarbhat8605
    @omkarbhat8605 Před rokem +44

    नमस्कार मी खेबवडे गावचा आहे आम्हाला खुप अभिमान आहे की असा गीतकार आमच्या गावात जन्माला येऊन त्यांनी आपले आडनाव खेबुडकर लावून प्रसिद्ध केल .. त्यांच्या साहित्याला तोडच नाही. महान अश्या वेक्तीला कोटी कोटी प्रणाम 🙏

    • @vishnukhule3596
      @vishnukhule3596 Před 4 měsíci

      😮

    • @raviwaghmare2581
      @raviwaghmare2581 Před 3 měsíci

      त्यांच खर आडनाव सांगाल का दादा

    • @umeshpatil9986
      @umeshpatil9986 Před 2 měsíci +1

      सर नमस्कार फ्रॉम खानापूर belgav

  • @sanjayjoshi7214
    @sanjayjoshi7214 Před rokem +32

    जगदीश खेबुडकर सर 1975 साली मला मराठी विषयाला होते, जेवढी त्यांची गाणी अप्रतिम तेवढी त्यांची persanyality होती. त्यांचा ड्रेस कोडे white paint, white shirt, black belt व kolhapuri चप्पल.

    • @lokhadevijayb.3535
      @lokhadevijayb.3535 Před rokem +4

      आपले भाग्य आहे अश्या थोर व्यक्तीच्या सानिध्यात आपण वावरलात 🙏🙏

  • @rajaramarde6858
    @rajaramarde6858 Před rokem +24

    1976 साली मी प्रायव्हेट हायस्कूलला ११ वी ल होतो , त्यावेळी खेबुडकर सर हे मराठी शिकवायला होते. सरांचं कोणतही गाणं ऐकलं कि ११ वीचे दिवस आठवतात. सरांची सर्वच गाणी ही वारंवार ऐकावीशी वाटतात.

    • @bhushangosavi2445
      @bhushangosavi2445 Před 2 měsíci

      You are lucky..Ki tumhi khebudkar yancha kadun marathi shikala

    • @NarayanKarande-yf8uo
      @NarayanKarande-yf8uo Před 2 měsíci

      ​@@bhushangosavi2445❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ranjana.mhatre2408
    @ranjana.mhatre2408 Před 10 měsíci +13

    जगदीश खेबुडकर, अत्युच्च प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्व, त्यांच्या सर्वच कविता तसेच सर्व अजरामर झाली आहेत, त्यांच्या काळात तेवढ्याच ताकदीचे संगीतकार गायक गायिका होत्या, म्हणून ही गाणी अविट गोडीची झाली आहेत, त्यांच्या प्रतिभेला साष्टांग दंडवत.

  • @KhatuYogesh
    @KhatuYogesh Před rokem +28

    आम्हाला Khebudkar Sir Private Highschool कोल्हापूर येथे मराठी विषय शिकवायला होते... 1985-1990 दरम्यान.. तेव्हा नेहमी आम्ही त्यांच्या संपर्कात असायचो..रोज बघायचो ..बोलायाचे... पण सर सिनेमा क्षेत्रात आहेत हे बिलकुल माहीत न्हवते.. त्यांनी पण कधी याची पुसटशीही कल्पना दिली नाही.. चालत घरी जायचे..हातात पिशवी घेवून कपिलतीर्थ मार्केट मध्ये भाजी घेताना दिसायचे...सायकल ने फिरायचे...सिने अभिनेते भालचंद्र कुलकर्णी इंग्लिश शिकवायचे..आम्ही त्यांना म्हणायचो सर तुम्हाला कुठेतरी बघितल्या सारखं वाटतय (पोस्टर वर)..ते पण फक्त स्मायल देवून विषय बदलायचे..😊

    • @chitramujumdar2008
      @chitramujumdar2008 Před 8 měsíci

      Samgra Jagdish Khebudkar ase sarve vachayla Aikanyasathi khuthe milel

    • @rahulmaindarge2097
      @rahulmaindarge2097 Před 3 měsíci

      महान लोकं असेच असतात
      आपल्याला त्यांचे वास्तव्य मिळाले
      आपण भाग्यवान आहात

  • @ajitm7
    @ajitm7 Před rokem +5

    जगदीश खेबुडकर, काय बोलू यांच्या कवितेला व काव्य रचनेला,आज यांचा या मराठी पिढीला कोणताही अभिमान नाही याची खंत वाटते. कोल्हापूर ने अनेक महान कलावंत दिले आज त्या जिल्ह्यातील लोकांनी यांची नावे सांगावीत.

  • @rajanjadhav3258
    @rajanjadhav3258 Před rokem +37

    विशेष बाबा म्हणजे सरांनी लिहलेली २५०० गीत आणि ३५०० कविता , ह्या सर्वच्या सर्व अप्रतिम आणि तेवढ्याच लोकप्रिय ठरल्या.. मानाचा मुजरा..

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Před 3 měsíci +3

    🌹👌🌹🙏इतका मुक्त “पिंजरा”परत होणे नाही👌❤️⭐️👌❤️⭐️🙏⭐️❤️⭐️❤️⭐️⭐️❤️🙏👌❤️👌⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️🙏

  • @Yogiji73
    @Yogiji73 Před 2 lety +28

    बापरे काय ही माणसं. किती मोठी माणसं.

  • @raginisalampure5574
    @raginisalampure5574 Před 10 měsíci +9

    सरांना मनापासून वंदन अगदी साध्या भाषेत लिहिलेली गाणी अविस्मरणीय आहे

  • @vikramkadam8689
    @vikramkadam8689 Před rokem +11

    अगदी बालपणापासूनच खेबूडकर सरांची गाणी ऐकत आम्ही लहानाचे मोठे झालो..नांदेडचे तत्कालीन आमदार हेमंत पाटील यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात जगदीश खेबूडकर सरांची प्रत्यक्ष भेट झाली होती..माझ्या आयुष्यातील तो अविस्मरणीय क्षण..असा गीतकार पुन्हा होणे नाही...

  • @rajeevrane3242
    @rajeevrane3242 Před rokem +26

    खुपच अजरामर गाणी लिहिली आहेत स्व. जगदीश खेबुडकर साहेब यांनी. आम्ही आपणास वंदन करतो. स्वर्गातील देव देवता हि आपल्या गीतात न्हाऊन जातील.

  • @nileshjoshi2468
    @nileshjoshi2468 Před rokem +22

    सर्वच गाणी ऐकून मन अतिशय प्रसन्न झाले जगदीश खेबुडकर यांना शतशः नमन.सर्वच संगीतकार आणि निर्माते यांना पण वंदन.

  • @dattatraykodle5943
    @dattatraykodle5943 Před rokem +13

    जगदिश खेबुडकर म्हणजे साक्षात कोल्हापूरकर लोकांचा अभिमान, शान,

  • @ratangosavishivgir8326
    @ratangosavishivgir8326 Před rokem +18

    जगदीश खेबुडकर जी म्हणजे अप्रतिम बुद्धिमत्तेचे मूर्तिमंत उदाहरण ! इतक्या उच्च कोटीची मधुर गाणी सामान्य बुद्धिमत्तेच्या कवीला स्फुरणे शक्य नाही ! त्यांचे प्रत्येक गाणे ऐकताना नवीन वाटते ! त्रिवार मुजरा या असामान्य बुद्धीच्या कवीला !

  • @vajeer-lh9et
    @vajeer-lh9et Před rokem +10

    जगदीश सर मी आणि माझा मित्र ऐकत्र आमच्या कोल्हापुर मधील मंगळवार पेठेत डिनर केल होत . आम्ही आमच भागय समजतो .

  • @KantChendkale-ob5sr
    @KantChendkale-ob5sr Před 9 měsíci +4

    हर हुंनर व प्रतिभासपन्न कवी, गीतकार भाषा पंडित या वा आशा अनेक उपाधी नी समृद्ध ते होते.

  • @vijayrane8141
    @vijayrane8141 Před rokem +8

    असे गीतकार या जमान्यात बघायला मिळाले असते बर झाले असते. असे सुंदर गीतकार आपल्याला लाभले हेच आम्हचे भाग्य आहे.

  • @anilghule890
    @anilghule890 Před 4 hodinami

    सलाम.... सलाम Jagdish सर जी नां... 🙏🏻🎉

  • @santoshkadam2697
    @santoshkadam2697 Před 11 měsíci +2

    अशी माणसं पुन्हा होणे नाही थँक्स सानिका

  • @deepakbhosale8309
    @deepakbhosale8309 Před 2 lety +26

    किती किती सुंदर ही गाणी. नाहीतर आजची गाणी ताल नाही सूर नाही. अप्रतिम. किती सुंदर भावार्थ या गाण्यांना.

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Před 3 měsíci +2

    ❤️🙏❤️आज पौर्णिमा,अमावस्या यांचे अनोखे मीलन!! वा!वा! कम्माल मशाल,जीवलग❤⭐️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️🙏

  • @ramjiawatade841
    @ramjiawatade841 Před rokem +11

    कॉलेज मध्ये असताना १९९५ साली आमच्या स्नेहसंमेलनात चिफ गेस्ट म्हणून आले होते तेव्हापासून मी त्यांचा फॅन आहे

  • @mohankamate6668
    @mohankamate6668 Před rokem +14

    जगदिश खेबूडकरांबद्दल माझ्यासारख्या कोल्हापूरकराने लिहिणे म्हणजे सुर्याबद्दल लिहीणे.कवी म्हणून ग.दि.माडगुळकरांचे शिषत्व पत्करलेले महान गीतकार.प्रत्येक गीतात जीवनाचे तत्व मांडणारा अद्वितीय कवी.मला त्याचा विशेष अभिमान आहे.त्रिवार मानाचा मुजरा.

  • @dattashinde5613
    @dattashinde5613 Před rokem +5

    असा सरस्वतीचा वरदहस्त आणि असामान्य प्रतिभाशक्ती असणारा रचनाकार आता शतकात तरी होणे अशक्यच !

  • @chandrakantughade319
    @chandrakantughade319 Před rokem +2

    खरेच अशी मानस परत होणे नाही विश्वास बसत नाही खरेच आम्ही नशीबवान आहोत हे ऐकायला आम्हाला मिळालाय ही मानस देवांनी पाठवली होती

  • @subhashborchate29
    @subhashborchate29 Před rokem +13

    निसर्गदत्त देणगी लाभलेला प्रतिभावंत कलाकार. खरतर आपण नशिबवान आहोत यांच्या तृप्त करणाऱ्या गाण्यांबरोबर आयुष्य आनंदात जगतोय. 👏👏

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Před 19 dny

    🌹👌शब्द,भाव,लय,नाद,ताल,आविष्कार एकमेकांचे हात घट्ट धरून❤️कम्माल,जबरदस्त,प्रतिभेची यशस्वी वर्तूळं ,मा. खेबुडकरांना मानाचा ,अभिमानास्पद मुजरा❤️🙏👌❤️🙏❤️⭐️🙏👌❤️⭐️🌹👌❤️

  • @sanjayanandraomandharepune5230

    कोल्हापुर ला आमच्या शालेत यायचे खेबुडकर सर

  • @sunildemllo39
    @sunildemllo39 Před rokem +25

    सानिका तूझ्या गोड सुरेल आवाजातले माहितीपूर्ण निवेदनच इतकं छान असतें 👌🏻👌🏻 मी आणि माझी पत्नी तूझ्या आवाजचे "फॅन " आहोत. खेबूडकरासारख्या दिग्गज कविबद्दल काय बोलावे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Před 3 měsíci +1

    🌹👌🌹🙏जगदिशा कम्माल!!🙏❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️❤️⭐️❤️⭐️🌺👌

  • @abhijeetborse
    @abhijeetborse Před rokem +8

    महान माणसे महाराष्ट्राला परिचित असले पाहिजे अशी लोककलेचा येणाऱ्या पिढीला ओळख करून द्यायची कारेक्रम राबवा सरकारने🙏

  • @mohanshrikhande403
    @mohanshrikhande403 Před 2 lety +7

    कै. जगदीश खेबुडकर म्हणजे मराठी गीतांचा आत्माच. 🌹🙏🏻 त्यानी " पिंजरा " चित्रपटासाठी लिहीलेली सर्वच गाणी अर्थपूर्ण, सहजसुलभ होती. त्यांच्यासारखा मराठी गीतकार भविष्यात होणे नाही. त्याना नम्र अभिवादन 🌹🙏🏻
    २०.०७.२०२२.

  • @marutihake4569
    @marutihake4569 Před 9 měsíci +2

    अप्रतिम मराठी भाषेचा शब्दात किती किमया आहे हे दाखवून देणारे महान लेखक.कवी खेबुडकर सर

  • @jayshreekhude3324
    @jayshreekhude3324 Před 2 lety +14

    महाराष्ट्रातील अनमोल रत्न नाना

  • @santoshjagtap6593
    @santoshjagtap6593 Před rokem +4

    ह्या गाण्यांचे रसाळ,माहितीपूर्ण विवेचन ज्यांनी केले आहे,त्या सानिका मुतालिक या निवेदिकाताईंचा आवाज खूप छान आहे.त्यांचा आवाज सह्याद्री वाहिनीवर पूर्वी असणाऱ्या वृत्तनिवेदिका समीरा गुजर यांच्या आवाजाशी अगदी साधर्म्य दाखविणारा व मिळताजुळता आहे.

  • @swapnarane8050
    @swapnarane8050 Před 4 měsíci +1

    अप्रतिम👌 जगदीश खेबुडकर सर आमच्या कॉलेजमध्ये आलेले. त्यांना प्रत्यक्ष ऐकण हे आमच अहोभाग्य🙏

  • @ashabhandari603
    @ashabhandari603 Před 2 lety +8

    माझ्या बालपणात रेडिओ वर ऐकलेली गाणी आणि शनिवारी डीडी वन वर पाहिलेला सिनेमा ❤खुपच सुदंर आठवण❤ 🙏

  • @sushilamohite4005
    @sushilamohite4005 Před rokem +11

    मन मोहरून टाकणारी अवीट गाणी ऐक त रहावे वाटते सर त्री वार अभिवादन. 👌👌👍👍🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @purnimashrivastava2942
    @purnimashrivastava2942 Před rokem +1

    Khoob chhana geet sangeet aur kavita.

  • @ashokchabukswar886
    @ashokchabukswar886 Před 3 měsíci +1

    ज्याच्या त्याच्या कर्म गीत प्रेमाच प्रतिकच असत!

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Před 3 měsíci +1

    🌹🙏🌹शब्दातच चित्र दृष्टी समोर आणणारी शब्द प्रगलभता❤ 👌❤️👌❤️👌❤️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️🙏

  • @vishhal3992
    @vishhal3992 Před rokem +35

    अष्टविनायक हे गाणं एका रात्रीत लिहिणे म्हणजे खरंच श्री गणेशाचा आशीर्वाद... खूप खूप धन्यवाद सानिका, गाण्या पाठची गोष्ट ही सांगितल्या बद्दल....

    • @pallavishirke4261
      @pallavishirke4261 Před rokem +1

      गट।।।। ॰।।।
      ।।।।।

      ।।।
      ।।।।

      ।।।
      ।।
      ।।।।
      ।।।
      ।।।।।

    • @anilshambharkar5541
      @anilshambharkar5541 Před rokem

      @@pallavishirke4261 qq1ppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppp

    • @anilshambharkar5541
      @anilshambharkar5541 Před rokem

      @@pallavishirke4261 //////////////////////////l//@

    • @mahadevchougulechanduricha6834
      @mahadevchougulechanduricha6834 Před 8 měsíci

      आपण मराठी गाण्यांचा खजीना या चॅनल वरून लोकांना खुला ठेऊन आजही मराठीच वैभवशाली इतिहास नवीन पिढीला दिला त्याबद्दल मी ऋणी आहे 🚩 जय जगदंब 🙏🚩🙏💐

  • @ranjitraskar9592
    @ranjitraskar9592 Před rokem +5

    गाणी ऐकताना पुन्हा त्या जुन्या काळात गेल्यासारखं वाटतं.....

  • @businesbook
    @businesbook Před rokem +5

    किती सुदंर आणि मनमोहक गाणी ,कितीही टेन्शन असुद्या मनाला हलके करणारे
    आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हि तुमची ,आमची कथा ,व्यता मांडतात ,

  • @anitashinde924
    @anitashinde924 Před 9 měsíci +2

    खुप छान
    मला मराठी जुनी गाणी प्रचंड आवडतात

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Před 3 měsíci +1

    ❤🙏❤गं गणपतये नमो नमः🙏🕉️🙏🕉️🙏🕉️🙏🕉️🙏🕉️🙏🕉️🙏🕉️🙏🕉️🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼⭐️🌼❤️👌❤️🙏❤️

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Před 3 měsíci +1

    🌹🙏🌹👌लोकसंगीतात शब्दगुंफण⭐️👌अहा!अहा!!❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏⭐️🌸🌺🌼🌸🌺🌼🌸🌺🌼🙏

  • @user-ng8en2uv7p
    @user-ng8en2uv7p Před dnem

    मराठी साहित्याचा शिल्पकार

  • @vitthalmahalle988
    @vitthalmahalle988 Před rokem +4

    अशी गाणी , असा गीतकार पुन्हा होणे नाही .

  • @narahrigodse5195
    @narahrigodse5195 Před 4 měsíci +1

    यांच्या ७५ वर्षाला त्यांनी सादर केलेला गावरान मेवा चा जगदीश खेबूडकर नाबाद ७५ कार्यक्रम केशवराव भोसले नाट्यगृहात पाहिला. अप्रतिम.
    30:00

  • @manoharkulkarni1690
    @manoharkulkarni1690 Před rokem +3

    जगदीश खेबुडकर हे विविध प्रकारच्या गीतांनी बहरलेला गीतव्रुक्ष.

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 Před 11 měsíci +1

    अजरामर गाणी धन्यवाद.

  • @nalishabankar5288
    @nalishabankar5288 Před 2 lety +18

    अप्रतिम गाणी !!अवीट गोडीची ,अगदी एकापेक्षा एक. आणि सानिका तुझं निवेदन तर खूपच छान, लाघवी आणि मधाळ आहे. खूप खूप धन्यवाद!!

    • @adhikraojadhav4877
      @adhikraojadhav4877 Před 2 lety

      आठवण आली एकदा यशवंत
      हायस्कूल इस्लामपूर ला खेबुडकर आले होते एकदा त्यांनी एक गाणं म्हटलं हितं नको तिथ जावो आडोशाला उभा राहू एवढेच ते म्हणाल्याने गप्प बसले आणि एक मुलगी म्हणाली का बघतात आणि सगळं हास्य तयार झालाही माझी जुनी आठवण

    • @gangadharumarye8207
      @gangadharumarye8207 Před 2 lety

      676

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Před rokem +2

    🌹🙏🌹🕉️अष्टविनायक नमो नमः🌹🙏🌹❤👌❤👌❤👌❤🙏❤👌❤👌❤👌❤🌺💚🌺💚🌺💚🌺💚🌺💚🌺💚🌺💚🌺💚🌺💫💜💫💜💫💜💫💜💚💜💫🌸🧡🌸🧡🌸🌸🧡🌸🧡🌸🧡🌸🧡🌸

  • @vishnupatil3649
    @vishnupatil3649 Před rokem +1

    असा गीतकार व त्यांची गाणी ऐकने भाग्यच म्हणाच अजरामर गीतकार

  • @arunshinde9009
    @arunshinde9009 Před rokem +2

    जगदीश खेबुडकर अत्यंत प्रतिभावंत गीतकार परंतु सध्या असे प्रतिभावंत कवी गीतकार हल्ली दुर्मिळ होत चालले आहेत.

    • @vaishalidesai-tm5pd
      @vaishalidesai-tm5pd Před rokem +1

      मी फक्त नावालाच प्रतिभा, पण लकी कारण जगदीश kheboodkar सर म्हणून आम्हाला लाभले त्याच्याकडून मराठी शिकणे म्हणजे केवळ अप्रतिम त्याच्याकडून आणखी एक खूप सुंदर संस्कार आम्ही शिकलो तो म्हणजे वर्गात आल्याबरोबर ते सर्व मुलीच्या कपाळावर कुंकू व हातात बांगड्या आहेत का नाही ते पाहत कुंकू नसेल तर शेजारच्या मुलीला लाल refeelne मोठा tila तीच्या कपाळावर काढायला सांगत आणि बांगड्या नसतील तर आहेच रिकाम्या हातावर पट्टी पण याच संस्कार a मुळे आजही आमचे कपाळ व हात कधी रिकामे रहात नाहीत अशा परंपरा केवळ गीतात न mandata आचरणात आणणाऱ्या या थोर गुरूला माझे अनंत प्रणाम

  • @vishwaspatil8665
    @vishwaspatil8665 Před měsícem +1

    Thanks for sharing 🎉❤

  • @achalakelkar2548
    @achalakelkar2548 Před 10 měsíci +3

    हम भारतीय है।भारत हमारा महान। 🌺🌺

  • @sunilgharkar534
    @sunilgharkar534 Před rokem +6

    सदा अजरामर गाणी, आवाज सर्वच .या महान कलाकारा बद्दल मी काय बोलणार.फक्त यांना एकायला मिळते हेच आमचे नशीब

  • @nirajbahekar
    @nirajbahekar Před 11 měsíci +1

    अप्रतिम हा गावरान मेवा लालित्यपूर्ण रसग्रहण सानिका.नानच्या गीतात शब्द सौंदर्य, चित्रपटाला प्रसंगानुसार घटनेतील गाण्यात
    भावव्यक्त करायला परकायाप्रवेश करणे सुलभ नसते. ती‌ भावस्थिती अनुभवून गीताला सरस्वतीचे अधिष्ठान प्राप्त होते अशा ह्या व्यक्ती आहेत.

  • @sharadkhebade988
    @sharadkhebade988 Před 6 měsíci +1

    फार सुंदर कार्यक्रम सदर केलात धन्यवाद

  • @shashidasurkar1977
    @shashidasurkar1977 Před 5 měsíci +1

    प्रतिभावंताचा अविनाशी दरवळ

  • @ashwinipingle8832
    @ashwinipingle8832 Před 2 lety +3

    खेबुडकर यांना कोटी कोटी नमस्कार 🙏🙏🙏

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Před rokem +2

    🌹🙏🌹गणपताी,गणपती या द्विरोक्तीने मजा आली❤❤❤❤❤💫❤❤❤❤💫🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌸🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹🌈🌿🌈🌿🌈🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌿🌺✨🌺✨🌺✨🌺✨🌺✨👌⚡️⚡️⚡️⚡️💫✨💫✨💫✨💫⚡️✨💫✨💫

  • @chandrakanterankardhayripu9417
    @chandrakanterankardhayripu9417 Před 8 měsíci +1

    दैवी देणगी लाभलेला एक प्रतिभावंत व्यक्ति

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Před rokem +3

    🌹🙏🌹”पिंजर्यानेच आकाशी झेप घेतली,अजराअमर झाला❤🌺❤💫❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺😇🌺🌿🌺👌🙏👌🙏👌🙏👌🙏👌🙏👌🙏👌🙏🌹🌹🌹🙏🙏🌹🌈🌹🌹🌹🌹🌹🙏🙏

  • @satishgaikwad4538
    @satishgaikwad4538 Před rokem +3

    खरोखर लहान पणाची आठवण झाली

  • @dilipkhude9911
    @dilipkhude9911 Před rokem +2

    नत मस्तक .❤

  • @latabaishankhapal872
    @latabaishankhapal872 Před 8 měsíci +1

    🎉 मि कलिदासला गवरानमेवा pahila आहे

  • @swardhara25
    @swardhara25 Před 2 lety +10

    अप्रतिम यना तोडच नाही ऐकत असताना मन अभिमानाने भरून येते👌👌🙏🙏🙏🌹🌹

  • @jagdishpatil1398
    @jagdishpatil1398 Před 9 měsíci +1

    महान गीतकार आणि कवी पण हवी तशी प्रसिध्दी ह्या व्यक्ती ला लाभली नाही . अलोकिक अशी प्रतिभा जगदीश खेबुडकर यांच्या कडे होती ,त्यांची गाणी ऐकताना लक्षात येते की ते किती महान होते त्यांना मानाचा मुजरा.

  • @trymbakgosavi7669
    @trymbakgosavi7669 Před 2 lety +9

    खुप सुंदर आहे. मराठीतील ध्रुव आहेत याचा आपणाला अभिमान वाटतो.

  • @babubhujbal6369
    @babubhujbal6369 Před rokem +2

    Bhujbal B.M
    Super song Sir,
    Thanks

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Před rokem +1

    🌹🙏🌹श्री अष्टविनायक नमो नमः❤🌹🙏🌹🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌿❤🌸❤🌸❤💫🌺💫🌺💫🌺💫🌺💫🌺💫🌺💫🌈✨🌈✨🌈✨🌈✨🌈✨✨✨✨🌈🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

  • @avanibamne7293
    @avanibamne7293 Před 2 měsíci +1

    छान गाणी अप्रतिम

  • @sushils.p..6575
    @sushils.p..6575 Před 2 lety +8

    खूप छान गाणे ..आहेत..माणूस अगदी रमून जाते....

  • @anaghajoshi3083
    @anaghajoshi3083 Před rokem +180

    जगदीश खेबुडकर सर आम्हाला कोल्हापूरला मराठी विषय शिकवायला होते. पण त्यावेळी त्यांचे मोठेपण माहित नव्हते, धुंदी कळ्यांना पासून ते लावणी पर्यंत त्यांच्या गाण्यांमध्ये मध्ये खूपच विविधता आहे .खरंच खूप महान व्यक्तिमत्व, त्यांच्याविषयी खूपच अभिमान व आदर आहे

    • @affanshaikh1238
      @affanshaikh1238 Před rokem +2

      Salute

    • @anuradhalohogaonkar3893
      @anuradhalohogaonkar3893 Před rokem +6

      खेबुडकर यांची गाणी म्हणजे चाल व अर्थपूर्ण संगम

    • @ranjitkuwar5215
      @ranjitkuwar5215 Před rokem +2

      Super singer 👏👏👏🎉🎉

    • @pratibhabadgujar2094
      @pratibhabadgujar2094 Před rokem +3

      तुम्ही खूपच भाग्यवान आहात. ☺️👍🏻🙏🏻

    • @balajiekbote7442
      @balajiekbote7442 Před rokem +3

      ताई आपण खुपच भाग्यवान आहात,
      तो साल कोणता होता

  • @ravikantdani3267
    @ravikantdani3267 Před 2 lety +10

    खेबुडकर सरांचा गावरान मेवा कार्यक्रम मी पाहिलाय ,त्यांचं वक्तव्य ही ऐकलंय

  • @tanajighumare929
    @tanajighumare929 Před rokem +3

    वर्ष आठवत नाही पण गावरान मेवा हा ऑर्केस्ट्रा घेऊन दारफळ तालुका माढा येथे
    येथे आले होते.

  • @yusubsayyad6966
    @yusubsayyad6966 Před rokem +1

    Very Very very very very very nice

  • @keshrajbhojne4930
    @keshrajbhojne4930 Před 2 lety +4

    मराठी साहित्यातील एक नामवंत कवि .👌

  • @kavyanjalipawar655
    @kavyanjalipawar655 Před rokem +1

    नाना माझे आवडते गीतकार

  • @sidduholal748
    @sidduholal748 Před rokem +4

    my language kannada...marati my fevirete song laavani thamaasha abhang..natygeet....love you marathi....jai shivaji

  • @sumanmahamuni1894
    @sumanmahamuni1894 Před 9 měsíci +1

    मानाचा मुजरा !

  • @shivajiraopatil699
    @shivajiraopatil699 Před rokem +1

    नमन नमन नमन सर...‌

  • @nitinbargat8918
    @nitinbargat8918 Před rokem +2

    for him no word with mi he is great person

  • @dashrathgadhave5331
    @dashrathgadhave5331 Před 10 měsíci +1

    खरंच खूप अप्रतिम गाणी

  • @tukaramnarsale8426
    @tukaramnarsale8426 Před rokem +1

    खुप सुंदर व श्रवनीय

  • @chandrashekhardeshmukh1579

    🌹खूप प्रतिभावान🌹🙏

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Před rokem +1

    🌹🙏🌹पिसार्यातील एकेक पीस शब्दभाव फुलवतो👌👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤⚡️❤🌿🌈🌿🌈✨🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈✨🌈🌺💫💫💫🌺💫🌺💫🌺💫🌺🌺💫✨🌸✨🌸✨🌸✨🌸✨🌸✨🌸✨🌸

  • @ratangosavi5400
    @ratangosavi5400 Před rokem +12

    अप्रतिम! लाजवाब!गीतकार, संगीतकार, अणि दिग्दर्शक यांच्या प्रतिभेचा संगम आता पुन्हा कधीही अनुभवण्यास मिळणार नाही,

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Před rokem +2

    🌹🙏🌹मनाच्या गाभार्यातील आत्मज्योत-शब्द”❤👌💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫🙏🙏🌿🌿🌿❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🌿🌹🌹🌹🌹🌿🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌸🌈🌸🌺⚡️🌺⚡️🌺🌺🌺⚡️🌺⚡️🌺⚡️🌺

  • @deepakamrale5633
    @deepakamrale5633 Před rokem +1

    Jagdish sir tumhala manacha mujara

  • @ushakhairnar8087
    @ushakhairnar8087 Před rokem +1

    All songs is favourite of Jagdish खेबुडकर

  • @vibhavareelele7829
    @vibhavareelele7829 Před 9 měsíci

    हा एपिसोड पूर्ण नाही अर्धा बघितल्या सारखं वाटला.👌👍💐❤

  • @premakulkarnikulkarni1909

    खुप छान गाणी