Mandirat Antarat Toch Nandat Aahe

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 08. 2024
  • Mandirat Antarat Toch Nandat Aahe

Komentáře • 850

  • @popatkumbhar6555
    @popatkumbhar6555 Před 7 lety +675

    अशी भक्तीगीत देणारे भाग्यवंत असतात

    • @rohiniinamdar8478
      @rohiniinamdar8478 Před 5 lety +14

      Mast gane

    • @sumitramungekar4302
      @sumitramungekar4302 Před 5 lety +14

      अप्रतिम भक्तिगीते गुरुदेव दत्त। स्वामी समर्थ।

    • @Rahultabla
      @Rahultabla Před 4 lety +21

      अन् भक्तिगीते ऐकणारे पुण्यवंत असतात बरं का !

    • @vijaykumarbiradar684
      @vijaykumarbiradar684 Před 4 lety +5

      Movie name

    • @Rahultabla
      @Rahultabla Před 4 lety +8

      @@vijaykumarbiradar684 धाकटी सून

  • @narendrakumartalwalkar597
    @narendrakumartalwalkar597 Před 8 měsíci +109

    कै.शरद तळवलकर माझे काका , अतिशय साधे सरळ ....त्यांच्या मुळे आम्हाला कै.राजा गोसावी, आपले बाबुजी , पु..ल. देशपांडे यांच्या भेटीचा योग आला होता ....!! ही सगळी माणसे जरी सिनेमाशी संबंधीत असली तरी एकत्र असली की छान घरगुती वातावरण असे .....!!

    • @jivankudache364
      @jivankudache364 Před 4 měsíci +4

      माझे फेवरेट मुलीच्या साध्या भोळ्या वडिलांची डोळ्यात पाणी येई पर्यंत भुमिका वटविणारे तितक्याच सहजतेने विनोदी भुमिका साकारणारे एकमेव कलाकार

    • @sunildemllo39
      @sunildemllo39 Před 3 měsíci

      भाग्यवान आहात 🙏🏻

    • @pushprajrajguru6891
      @pushprajrajguru6891 Před 3 měsíci

      खरच खूप भाग्यवान आहात

    • @vinayakbagwe8664
      @vinayakbagwe8664 Před 2 měsíci +1

      भाग्यवान आहात तुम्ही

    • @vijaykamble3464
      @vijaykamble3464 Před 2 měsíci +3

      शरद तळवलकर यांची अष्टविनायक चित्रपटातील भूमिका मला खूप आवडते.

  • @Ajaykamble-bj1ji
    @Ajaykamble-bj1ji Před 4 lety +945

    खुपच वाईट वाटते हे गीत बघताना कारण यातील शरद जी , वसंत शिंदे जी, मधु आपटेजी लक्ष्मीकांत बेर्डे जी , स्मिता जी, सुधीर फडकेजी आज आपल्यात नाहीत.पण त्यांच्या कलाकृती कायम हृदयात राहतील.

  • @nageshpadman
    @nageshpadman Před 2 lety +123

    सुधीर फडके हे संगीत विश्वाला पडलेलं सुमधुर स्वप्न आहे.
    या व्यक्तीचे उच्चार, आवाज, सातही सुरात लीलया फिरणारा स्वर... सगळच दैवी आणि अद्भूत...
    मराठी "श" आणि "ष" हे उच्चाराने वेगळे दाखवणारे अद्भूत गायक.
    सुधीरजी विनम्र अभिवादन...
    🙏🙏🙏

  • @rameshsomavanshi3190
    @rameshsomavanshi3190 Před 2 lety +56

    बाबूजींचे स्वर आणि त्या स्वरांना साकारणारा शरद तळवळकरांचा अभिनय म्हणजे दुग्धशर्करा योग.

  • @vasu-tj5em
    @vasu-tj5em Před 4 lety +68

    आशी गाने एकताना मरन जरी आले तरी ही भाग्य धन्य धन्य ते गुरू

  • @kspksp5593
    @kspksp5593 Před 5 lety +404

    जेव्हा कधी संकटात धीर खचतो तेव्हा हे भक्तिगीत क्षणात दहा हत्तींचे बळ देते आणि परमेश्वर खंबीरपणे पाठीशी असल्याचा विश्वास देते

  • @pritishinde7633
    @pritishinde7633 Před 2 lety +75

    शरद तळवलकरांचा निष्पाप चेहरा पाहूनच मनात शांत भाव निर्माण होतात

  • @Neha-qf4id
    @Neha-qf4id Před 4 lety +186

    हे गीत ऐकल की सकाळ खूपच सुंदर जाते , किती ते सुंदर वर्णन ,किती सुंदर ताल ,वाद्यांचा ताळमेळ सर्व देवाचे सुंदर रूप डोळ्या समोर निर्माण करते.. अशी भक्तीगीत आता नाहीतच..

    • @shobhadeshpande3992
      @shobhadeshpande3992 Před 2 lety +3

      अगदी खरं आहे, आताची भक्तीगीते ऐकाविशी वाटत नाही. पुर्वीची प्रल्हाद शिंदे, सुधीर फडके, आर एन पराडकर, दशरथ पुजारी यांची भक्तीगीते अजुनही ऐकाविशी आणि गावीशी वाटतात.

    • @g.p.patkaragrifarm3410
      @g.p.patkaragrifarm3410 Před 2 lety +3

      देवाचे खरे स्वरुप पहाण्यासाठी पूर्ण satguru chi garaj आहे. कारण गुरू चरणी ठेवता भाव भेटे आपोआप देव.

    • @vijaykhot6954
      @vijaykhot6954 Před 2 lety

      yes

  • @sarikarenuse.
    @sarikarenuse. Před 5 měsíci +26

    मी दररोज ऐकते हे गाण.तरिही पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते.धन्यवाद.अशी अप्रतीम रचना आम्हाला ऐकायला मिळत आहे.कितीही काळ लोटला तरी या गाण्यातून जो अर्थ सांगितला आहे तो जन्मोजन्मी सत्यच असणार आहे.खरच अजरामर गाणं आहे.

    • @vaibhavhorambe9979
      @vaibhavhorambe9979 Před 15 dny

      मन एकाग्र आणि तल्लीन होऊन जात...खरच खुप सुंदर

  • @a.k.6015
    @a.k.6015 Před 2 lety +65

    मनात चाललेल्या वादळाला शांत करतात हे अभंग....
    सध्याच्या मुलांना आध्यात्म वाचायची खूप गरज आहे

  • @sangeetap3130
    @sangeetap3130 Před 4 lety +109

    ही गाणी काल होती , आज आहेत आणि यापुढे ही राहतील ... उदास मनाला प्रसन्न करायला आणि खचलेल्याला धीर द्यायला

    • @vijaymane1363
      @vijaymane1363 Před 3 lety

      Ekdam barobar

    • @santoshjaybhaye8146
      @santoshjaybhaye8146 Před 3 lety

      सत्य, कि हे गाणे काल होती आजही आहेत आणि उद्या पण राहतील अजरामर

    • @vilasbhosale4459
      @vilasbhosale4459 Před 2 lety

      Ekte panaat aasi gani sobtila aasaweet

  • @hemangifirake2420
    @hemangifirake2420 Před 3 lety +86

    प्रचंड सकारात्मक उर्जा निर्माण करणा-या मराठी भक्तिगीतांमधील हे एक गीत आहे. 🙏

  • @shubhadagodse4703
    @shubhadagodse4703 Před 3 lety +45

    फारच सुंदर अभंग आहे .हल्लीची गाणी ओवाळून टाकावा . गुरुदेव दत्त.

  • @yogeshs._7794
    @yogeshs._7794 Před 3 lety +89

    अशी जुणी माणसं आता खुपच कमी पहावयास मिळतात...खरच जुनी माणस,ते दिवस खुपच छान होतं सगळ..👌🏻👌🏻👌🏻

    • @vilasbhosale4459
      @vilasbhosale4459 Před 2 lety +1

      Khoop chaan aasech lihit jaa

    • @girnaridatta273
      @girnaridatta273 Před 2 lety +1

      @Yogesh Shinde.🌠 खर आहे तुमचे ...गेले ते जुने दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी 😔

    • @TuljabhavaniTuljapur
      @TuljabhavaniTuljapur Před 9 měsíci

      आपण खुपच सुंदर लिहिता योगेश शिंदे 👌🏻👌🏻💯💯

    • @TuljabhavaniTuljapur
      @TuljabhavaniTuljapur Před 9 měsíci

      जुने दिवस सुंदर होते

    • @yogeshs._7794
      @yogeshs._7794 Před 5 měsíci

      ​@@vilasbhosale4459Thank you sir ...🙏🏻

  • @seemamali5395
    @seemamali5395 Před rokem +18

    ❤असा अभंग ऐकायला ही सदगुरू कृपा लागते ❤

  • @sudeshkulkarni5602
    @sudeshkulkarni5602 Před 3 lety +51

    किती सुंदर गीत आहे. बापूजी तुम्हाला त्रिवार वंदन

  • @shubhamkhole2807
    @shubhamkhole2807 Před 4 lety +24

    गीतरामायण ज्यांच्या कल्पनेतून साकार झाले अशा बाबुजींची म्हणजेच सुधिर फडके यांची आज जयंती 🙏🏻🙏🏻

    • @g.p.patkaragrifarm3410
      @g.p.patkaragrifarm3410 Před 2 lety

      Babuji were ग्रेट l ते savRkR भक्त हॉटेल सावरकरांना त्यांनी न्याय दिला hotal

  • @sunilkad7807
    @sunilkad7807 Před 2 lety +46

    किती सुंदर ,मनाला भिडणारे ,मन हरपणारे,तल्लीन होणारे,भक्ती रसात डुबणारे, प्रपंचाचे क्षणभर विसर पाडणारे, भक्तीची आपोआप ओढ लावणारे भजन .शतशः प्रणाम,

    • @sagarvarpe2749
      @sagarvarpe2749 Před rokem

      अतिशय सुंदर भजन,, सर्वांचे मनापासून आभार

    • @Rani-zg1yi
      @Rani-zg1yi Před 8 měsíci

      Prapanch visraycha nahi... Prapanch sukhi karne mhnje khara parmaarth.... Gaanyacha ghuiya sampoorna gaanyatach aahe... Naana dehi naana rupe...

  • @love-gx1mf
    @love-gx1mf Před 3 lety +43

    अंतरीच्या देवाची जाणीव करून देणारे हे गीत आहे, असे गीतकार पुन्हा आमच्या काळात हि घडावेत अशी या कलेच्या देवतेकडे प्रार्थना ।🙏

  • @MallannaGangaiwarVaastudosh

    बाबूजी तोच गोडवा, तेच माधुर्य कितीदा ऐकले तरी पुन्हा ऐकावे अशी अप्रतिम रचना
    हात जोडून दंडवत बाबूजी

  • @amolmali3583
    @amolmali3583 Před 3 lety +22

    अप्रतिम गीत, आणि गीताचे बोल निशब्द करणारे. असे गीतकार आता नाहीत ह्याचीच अधिक खंत वाटते

  • @shivajinikumbha2908
    @shivajinikumbha2908 Před 2 lety +4

    पस्तीस चाळीस वर्षांपूर्वीचे महाराष्ट्राचे हे देवभोळे सुपुत्र (अभिनेता, अभिनेत्री)असले तरी किती खरे वाटतात. आणि आज प्रत्येकाने चेहरा कसा कमावलेला वाटतो. राजकारणाने या महाराष्ट्राची पुरती वाट लावली आहे.

  • @ujjwaldanekar1398
    @ujjwaldanekar1398 Před 2 lety +21

    आपल्या मराठी चे वैभव असणारे सर्व कलाकार आहेत, ते आपल्या कलेच्या रूपाने अमर आहेतः,शतश: प्रणाम त्यांना

  • @madhavisuryawanshi5597
    @madhavisuryawanshi5597 Před 2 lety +17

    कुठे सुखाचा वर्षाव कुठे घावा वरती घाव तारणारा मारणारा तोचि एक आहे 🙏🏼🙏🏼🙏🏼😇😇😇अंतिम सत्य 😇😇😇

  • @vikrantdesai4715
    @vikrantdesai4715 Před 3 lety +21

    अशी गाणी ऐकायला पण भाग्य लागते

  • @VitthalDahiwal-fl1wn
    @VitthalDahiwal-fl1wn Před měsícem +1

    मंदिरात अंतरात तोच नांदत आहे, नाना देही नाना रुपी तुझा देव आहे.... व्वा फारच छान... मन कुठेच लागत नसेल, अन् दुख असेल तर, मी हे भावगीत ऐकतो मन प्रसन्न होतेच...... जय गुरूदेव🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sandipgharat5033
    @sandipgharat5033 Před 5 lety +110

    अतिशय सुंदर. अश्या भक्ती गीतास डीसलाईक देणाऱ्याची कीव करावीशी वाटते.

  • @nitinmore8092
    @nitinmore8092 Před 3 lety +40

    आम्ही साधीसुधी मराठी मातीत जन्माला आलेल्या पैकी? पण तुम्ही आम्हाला संगिताच्या माध्यमातून असं काही देणे दिले आहे ते आम्ही फेडू शकत नाही तुम्हाला सर्वांना 🙏🙏🙏 दंडवत

    • @g.p.patkaragrifarm3410
      @g.p.patkaragrifarm3410 Před 2 lety

      Babujini सावरकरांना सिनेमातun nyay dila hota l

  • @tusharnaik3206
    @tusharnaik3206 Před 2 lety +5

    मी माझ्या बालपणी रेडिओ वरुन हे गीत ऐकायचो कितीही ऐकल तरी पुन्हा ऐकावस वाटत खूप सुंदर ।।श्री गुरुदेव दत्त।।

  • @chavanparag2008
    @chavanparag2008 Před 5 lety +82

    मंदिरात अंतरात तोच नांदताहे || २ ||
    नाना देही, नाना रूपी तुझा देव आहे || १||
    कोरस
    मंदिरात अंतरात तोच नांदताहे
    नाना देही नाना रूपी तुझा देव आहे
    मंदिरात अंतरात
    तोच मंगलाची मूर्ती तोच विठ्ठलाची कीर्ती ३
    तोच श्याम, तोच राम, दत्तधाम आहे
    कोरस
    मंदिरात अंतरात तोच नांदताहे
    नाना देही नाना रूपी तुझा देव आहे
    मंदिरात अंतरात
    संतांचिया किर्तनात साधकांच्या चिंतनात ३
    तोच ध्यास, तोच आस, तोच श्वास आहे
    कोरस
    मंदिरात अंतरात तोच नांदताहे
    नाना देही नाना रूपी तुझा देव आहे
    मंदिरात अंतरात
    तोच बाल्य, तारुण्यही वार्ध्यक्याचा विश्रामही ३
    तोच ऐल, तोच पैल, आदि अंत आहे
    कोरस
    मंदिरात अंतरात तोच नांदताहे
    नाना देही नाना रूपी तुझा देव आहे
    मंदिरात अंतरात ..........................................................................२
    तोच उन्हाची काहिली, तोच शीतल सावली २
    आनंदात वेदनात अंती तोच आहे
    कोरस
    मंदिरात अंतरात तोच नांदताहे
    नाना देही नाना रूपी तुझा देव आहे
    मंदिरात अंतरात
    कुठे सुखाचा वर्षाव, कुठे घावावरति घाव २
    तारणारा मारणारा एक तोच आहे
    कोरस
    मंदिरात अंतरात तोच नांदताहे
    नाना देही नाना रूपी तुझा देव आहे
    मंदिरात अंतरात............................................................................................................२

    • @kanchanmanjrekar8907
      @kanchanmanjrekar8907 Před 3 lety

      czcams.com/play/RDjjWKqjK49ek.html&feature=share&playnext=1

    • @prasannaiyer4030
      @prasannaiyer4030 Před 3 lety +1

      🙏🙏🙏

    • @ushapawar9256
      @ushapawar9256 Před 3 lety +2

      खरंच खूप सुंदर अभंग आहे परत परत एकाव वाटत 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

    • @maheshparulekar5562
      @maheshparulekar5562 Před 3 lety

      Ii III oo oo oo oo oo oo oo oo oo oo oo oo oo oo oo oo oo oo oo oo oo oo oo uu oo oo III oo oo oo oo

    • @abhaybapat431
      @abhaybapat431 Před 2 lety +1

      👌

  • @ajaynikam9067
    @ajaynikam9067 Před rokem +9

    खरच काय आवाज आहे
    देवाची च देणगी.. ऐकूशी च राहो असा आवाज 🌺🌺👏🏻👏🏻

  • @rajendrmokal3867
    @rajendrmokal3867 Před 3 lety +6

    असा मौल्यवान ठेवा आपणास सुरांच्या रुपाने लाभला आहे त्याची जपणुक केली पाहिजे .

  • @sangitabhujbal4379
    @sangitabhujbal4379 Před 2 měsíci +1

    गाण्यातील गोडवा आज ही समाधान देतो ऐकताना😇🙏😍⭐ अंतःकरणातील शुध्द भक्तीचा ठेवा आहे हे गाणं 😇जय गुरुदेव दत्त🙏💖

  • @nishadwakurdekar
    @nishadwakurdekar Před 3 lety +8

    अशी भक्तिगीते ही लोकांना आवडत नाहीत?कमाल आहे!!की त्यांना अक्कलच नाही देवजाणे!!

  • @evamukherjee7941
    @evamukherjee7941 Před 5 lety +136

    even though I am not a Marathi person, I love this song. Literally man bhakti se bhar gaya

  • @shillpavegulekar4825
    @shillpavegulekar4825 Před 3 lety +7

    मन प्रसन्न झाले बाबुजी चा सुमधुर आवाजात आहे कलाकार गायक गीतकार संगीतकार ही निसर्गाची किमया आहे शतशः प्रणाम

  • @rameshmhatre406
    @rameshmhatre406 Před 4 lety +37

    किती गोडवा आहे ह्या गाण्यात मनाला ऐकल्यावर प्रसन्नता वाटते

  • @vithaldahiwaljaysrisai6512
    @vithaldahiwaljaysrisai6512 Před 3 lety +177

    डिसलाईक करणार्यांना, भावपूर्ण श्रध्दांजली....
    🙏🏻गुरुदेव दत्त🙏🏻

  • @manojkule4010
    @manojkule4010 Před 6 lety +60

    लय भारी, अशी गाणी कितीवेळा ऐकली तरी परत परत ऐकावी वाटतात👌👌👍

  • @dipaksalokar7599
    @dipaksalokar7599 Před 3 lety +19

    सत्याची जाणिव करुन देणारं भक्तिगीत.

    • @rupeshshindeofficial7180
      @rupeshshindeofficial7180 Před 2 lety +1

      एकदम सटीक कमेंट ते प्रत्येकाला कळत नाही. फक्त काहीच जणांना

  • @marathiManus10
    @marathiManus10 Před 3 lety +34

    Lakshmikant Berde remains most unlucky actor in Marathi industry. Even today, his energy flows around us. So refreshing to watch Laksha mama, Uday Tikekar and Sharad Talwalkar in a frame.

  • @_gayatri1447
    @_gayatri1447 Před 5 lety +41

    वारंवार एैकावस वटतं...मन प्रसन्न झाले..!🙏🙏🙏🙏

  • @dipakvanikar6254
    @dipakvanikar6254 Před rokem +4

    अतिशय दुर्मिळ भक्ती गीत एकूण मन प्रसन्न झालं.सर्व जुने कला कर वसंत शिंदे ,शरद तळवलकर, लक्ष्या,यांचे परत दर्शन झाले संगीत कर सुधीर फडके यांना नमन.

  • @guardian_angel108
    @guardian_angel108 Před 3 měsíci +1

    साधी आणी सरळ स्वभावाची माणसं ईश्वराला अतिशय प्रिय असतात..❤❤

  • @PATIL_MH09
    @PATIL_MH09 Před 3 lety +6

    अंतरातल्या परमात्मा ला अंतर्मनाने हाक दिली तर तो नक्कीच आपल्याला कोणाच्या ना कोणाच्या रुपात मार्ग दाखवतो हे अनुभवलंय मी मे 2020 मध्ये ..
    || श्री गुरुदेव दत्त ||

    • @g.p.patkaragrifarm3410
      @g.p.patkaragrifarm3410 Před 2 lety

      Right sir l he गाणे मन मंदिरातील atmya vishayi आहे त्याचे दर्शन होण्यासाठी true satguru पाहिजे फ़ळ तुका म्हणे गुरू भजनी देव भेटे tadkshani

    • @amoladsule2258
      @amoladsule2258 Před 2 měsíci

      अगदी बरोबर हे अंतरआत्म्या साठी लिहलय...आपला अंतरआत्मा हाच परमेश्वर आहे...

  • @vinodsomankar5508
    @vinodsomankar5508 Před 3 lety +5

    खूप सुंदर भक्तीगीत. वारंवार ऐकणूही मनं भरत नाही. अप्रतिम शब्दरचना केली आहे.

  • @deepakchettiar
    @deepakchettiar Před 3 lety +8

    मी स्वतःला नसीबवाण समजतो आहे, की मी महाराष्ट्रात जनम लो आणी हाया मराठी संगीत दिग्गज कलाकार च्या संगीत अनुभव घेन्याची संधी मिळाली.

  • @anujabhagde4849
    @anujabhagde4849 Před 18 hodinami

    मला तर हे भजन आईकुन खूप positive वाटते
    खूप छान वाटते. मन भरून येते
    खूप छान 😊

  • @akshayshukla343
    @akshayshukla343 Před 10 měsíci +3

    छान आहे हे गाणं मला खूप खूप आनंद झाला आहे मनापासून आभार आणि धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद

  • @santoshdeshpande6771
    @santoshdeshpande6771 Před 9 dny

    खरंच he गाणं ऐकलं कि ताण तणाव मुक्ता hoto आणि थोडक्यात ह्या गाण्यामध्ये सर्व आयुष्याच सार सांगितलं आहे खरंच खुपच मनाला प्रसन्न करणारे गाने आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @satishkamble3122
    @satishkamble3122 Před 5 lety +28

    अप्रतिम भक्तिगीत, अविस्मरणीय, मन प्रसन्न झाले.

  • @yuvrajpradipkumarjadhav8001
    @yuvrajpradipkumarjadhav8001 Před 9 měsíci +5

    अशी ही जुनी गणी ऐकताना का कुणास ठाउक पण भावनिक होत जाते आनी अजाणतेपणाने आश्रु यायला सुरु होत.

  • @sachinyewale0yewale17
    @sachinyewale0yewale17 Před 5 měsíci +1

    मी खरंच भाग्यवान आहे माझे लहानपण अशा भक्ती संगीत मध्ये गेले अजून मी कुठेही अडचणी तर असेल तर मला हे भक्तीगीत ऐकुन परत प्रयत्न करण्यासाठी तयार राहतो आज ह्यातील बरीज मंडळी आज आपल्यात नाही ह्यांचीत खंत पण माझ्या स्मरणात हे मंडळी जो पर्यंत आयुष्य आहे तो पर्यंत ते स्मरणात राहतील

  • @marotigudekar2096
    @marotigudekar2096 Před 26 dny

    खुपच छान अंभग आहे आता असे कलाकार, अंभग,कधी असे होणार नाही आणि अंभग गात आहेत ते कधी दिसणार नाहीत आणि तसे होनार नाहीत हे सत्य आहे 🌹🙏🌹👌👌👍👍

  • @DattatrayPoundkar
    @DattatrayPoundkar Před 3 měsíci +1

    छान आहे हे गाणं मी मनापासून आभार मानतो धन्यवाद धन्यवाद श्री गुरुदेव दत्त

  • @user-me9ct4ir7z
    @user-me9ct4ir7z Před 11 měsíci +3

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त संपूर्ण जीवनाचा सार या अभंगांमध्ये आहे अप्रतिम मनाला भारावून टाकणारे हे गीत अतिशय सुंदर

  • @bhaveshdalavi9863
    @bhaveshdalavi9863 Před 4 lety +8

    🌷🌺 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🌷

  • @vinugamer2780
    @vinugamer2780 Před 9 měsíci +2

    सर्व अभिनेते अभिनेत्री अभिनय गायक वाद्यवृंद नैसर्गिक प्रेक्षक
    शब्दच नाही प्रशंसा साठी अर्थपूर्ण देवाची महती

  • @parimalbhange5897
    @parimalbhange5897 Před měsícem

    सकाळी सकाळी ऑफिस ला निघताना हे भक्तिगीत कानावर पडले की मन प्रसन्न तर होतेच पण कामासाठी ऊर्जा पण मिळते, छान भक्तिगीत

  • @ravirajsarode6930
    @ravirajsarode6930 Před 8 měsíci +1

    हे भक्तिगीत माझं हृदयस्पर्शी आहे ग्रेट बापूजी आणि आपल्या मायबोलीचे रफी साहेब आहेत🙏❤

  • @dr.prabhakarmokal5492
    @dr.prabhakarmokal5492 Před měsícem

    अजरामर गीत आहे सुधीर फडके यांना कोटी कोटी प्रणाम.

  • @kirandate8760
    @kirandate8760 Před 4 lety +26

    One of the heart/soul touching Marathi bhakti geet , Simple music and what a great meaning of each word.Everyday listening this song. and every time getting different feel.

  • @shivajikarande9283
    @shivajikarande9283 Před 7 měsíci

    सुखाचा प्रत्येक क्षण माणसाला हवा हवासा वाटतो पण दुःखाने व्याकूळ झाले की आर्त मनाला म्हणावेसे वाटते तोच उन्हाची काहीली तोच शीतल साऊली आनंदात वेदनात अंती तोच आहे.खरंच आहे.या गाण्यात असणाऱ्या परंतु आता हयात नाहीत त्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @PROWORLDPUNE
    @PROWORLDPUNE Před 4 měsíci +1

    गीत चे बोल मनाला भक्तीचा गोडवा अनुभवून देतात...🎉🎉🎉😊😊😊

  • @SwaminiGold
    @SwaminiGold Před 9 měsíci +2

    श्री गुरूदेव दत्त 🙏 तोच नांदत आहे..सगळीकडे! खूपच सुदंर गीत❤

  • @prasadrajapurkar2166
    @prasadrajapurkar2166 Před 2 lety +1

    झरा वाहिलाय निर्मळ भक्तीचा सोपे सरळ शब्द आणि तितकीच सुगम चाल...
    अप्रतिम सकाळ सुरू होण्यास गोड कारण🙏🙏

  • @santoshanjarlekar9485
    @santoshanjarlekar9485 Před 2 lety +2

    अतिसुंदर गाणे... अशी गाणी फक्त मराठीत बनतात. याचा अभिमान आहे.

  • @ashutoshab
    @ashutoshab Před 4 měsíci +1

    कित्येक वर्षानंतर हे गाणे कानावर पडले आणि मन प्रसन्न झाले

  • @shreepriyashreehri9987
    @shreepriyashreehri9987 Před 5 lety +7

    Old is gold.जुनी मराठी गाणी म्हणजे मराठी भाषेची शान

  • @kkallrounder1.244
    @kkallrounder1.244 Před rokem +1

    Jivan धन्य झाले माझे मी मराठी त जन्म घेतला हे प्रभू अखंड मला मराठी भाषेत जन्म दी . शिव हरी शंकर.

  • @narayanitkari
    @narayanitkari Před 3 lety +3

    फारच छान!! खूप सुंदर शब्द न गायन आणि संगीत अफाट मनाला आनंद देणारे सर्व काही गोडच!!

  • @sachinbaradkar2663
    @sachinbaradkar2663 Před 3 lety +15

    Heavenly words,music and voices....
    I love this song.

  • @ShadowGaming_7800
    @ShadowGaming_7800 Před 3 měsíci +1

    अशी गाणी असे कलाकार असे गायक संगीतकार गीतकार मिळणार नाहीत

  • @aniruddhadeshmukh6718
    @aniruddhadeshmukh6718 Před 4 lety +11

    एकच ओळ,,, उत्तरा केळकर ची भाव खाऊन जाते,,,, सुंदर
    बाबूजी ना पर्याय नाहीच,,,, दैवी देणगी,,,,,

  • @user-sv4kh9od2w
    @user-sv4kh9od2w Před měsícem +1

    अविस्मरणीय अनुभव आणि सर्व अप्रतिम आहे.

  • @vikaspartole9452
    @vikaspartole9452 Před rokem +9

    उत्तम भजन❤

  • @siddeshgadakh5118
    @siddeshgadakh5118 Před rokem

    काय वर्णन केलयं खरचं भगवंताचे...
    जो मंदिरात आहे..तोच आपल्या अंतरात आहेत, तरी आपण माणसं ऐकण्याची मनं दाखवतो...म्हणजे परमेश्वराला दुखवण्यासारखेचं...!

  • @prakashkasar5246
    @prakashkasar5246 Před 6 dny

    आजच्या धकाधकीच्या जीवनात हे भक्तीगीत खरच अमृता समान आहे..

  • @1tapgamer26
    @1tapgamer26 Před měsícem

    आवजात आणि अभिनयात परमेश्वराचे दर्शन व्हते ....🙏

  • @amittamhanekar15
    @amittamhanekar15 Před rokem

    तोच श्याम तोच राम दत्त धाम आहे वा काय अप्रतिम रचना आहे बाबुजी हे खरंच आपल्या मराठी संगीताला पडलेलं गोड स्वप्न आणि त्या सोबत शरद तळवलकर आणि मधू आपटे लक्ष्मीकांत बेर्डे वा

  • @mahendrawahulkar2562
    @mahendrawahulkar2562 Před 5 lety +11

    धन्यवाद हे गाणे अपलोड केल्याबद्दल.! अप्रतिम गाणे आहे हे.

  • @ravikantmoraye8839
    @ravikantmoraye8839 Před 5 lety +22

    thnxxx youtube...i had seen this movie in my childhood..memories remains unforgotable..

  • @GG-561
    @GG-561 Před 8 měsíci

    अगदी आत्म्याला भिडणारा आवाज आणि रचना ही तशीच
    माझ्या मराठीची बोलू कौतुके।
    परी अमृतातेही पैंजसी जिंके।।
    संत ज्ञानेश्वर यांची ओवी अगदी बरोबर आहे मराठी भाषा किती गोड आहे ❤ सार्थ अभिमान बाळगा आपल्या मराठीचा भावांनो

  • @manishatavare9818
    @manishatavare9818 Před 5 lety +30

    अप्रतिम.गाणे्ऐकुन. पण मनात शांत होते

    • @dattatrayjagtap884
      @dattatrayjagtap884 Před 5 lety +1

      Hae bhjan aikliawar man khup prsann hot June divas aci attwan hotel Farah sundar

  • @infiniteoptraders3493
    @infiniteoptraders3493 Před 3 lety +3

    अप्रतिम अनुभव..💐💐💐
    💐श्री दत्तमहाराज जयंती 29 डिसेंबर 2020💐

  • @akshayshukla343
    @akshayshukla343 Před rokem +1

    छान आहे हे भजन मला खूप खूप आनंद झाला आहे मनापासून आभारी आहोत धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

  • @ujwalkumarbhatkar7233
    @ujwalkumarbhatkar7233 Před 9 měsíci

    गीत संगीत गायन.... 🙏🏼🙏🏼अप्रतिम थेट हृदयातुन आवाज येतो व हृदयात पोहोचतो

  • @savitrinagtialk2174
    @savitrinagtialk2174 Před 7 měsíci

    अनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹 अशक्य ही शक्य करतील स्वामी 🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺

  • @rajashreekulkarni3749
    @rajashreekulkarni3749 Před 4 lety

    खूपच सुंदर भक्तीगीत आहे...आमच्या घराची पूर्वी पासून दत्त गुरूंवर अपार श्रद्धा आहे...हे गाणं खूप लहान पणी ऐकायची...तेव्हा माझे आजोबा होते...हे गाणं ऐकलं की आजोबांची आठवण येते...

  • @bhooshaninamdar6288
    @bhooshaninamdar6288 Před rokem +1

    रोहित जी, खुप छान काम केले तुम्ही. आपल्यावर भगवान गुरूदेव दत्तात्रेयांची कृपा व्हावी अशी प्रार्थना करतो.
    बोला" ।। अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त ।।"

  • @shashankkulkarni993
    @shashankkulkarni993 Před 2 lety +3

    Ever green refreshing Marathi Song
    everything is pefect.
    musicians singers composer lyric pictures actors
    this is called everything perfect for lifetime...

  • @ashoksakpal4759
    @ashoksakpal4759 Před 4 lety +4

    मनात वसलेले ईश्वर अस्तित्व दाखविल्याबद्दल धन्यवाद🙏🏻

  • @ajitchavan7765
    @ajitchavan7765 Před rokem

    अशी भावगीते ऐकताना मन प्रसन्न होते. आणि जुन्या कलाकारांसाठी नकळत डोळ्यात अश्रू उभे रहाते.

  • @_gayatri1447
    @_gayatri1447 Před 5 lety +6

    वारंवार एैकावस वाटतं....मन प्रसन्न झालं...!💯🙏

  • @manjushamagadum6074
    @manjushamagadum6074 Před rokem

    हे गाणं ऐकलं की त्यातली आर्तता काळजाला चिरत जाते , हे सर्व कलाकर मनस्वी नि कलाकृती जीवन्त करणारे सच्चे होते त्यांना माझा प्रणाम

  • @jeeteshd9819
    @jeeteshd9819 Před 4 lety +9

    Jai gurudeva ..very peaceful one full of devotional 🙏

  • @suryavanshishreyasunil5016
    @suryavanshishreyasunil5016 Před 4 lety +14

    I listen this song everyday at morning and at night.this song is really magic.the meaning and voice is excellent.

  • @renukadeogaonkar7089
    @renukadeogaonkar7089 Před 3 lety +2

    खुप छान आहे मनाला प्रसन्न करणारे गीत आहे 👌👌

  • @namratabhatt1864
    @namratabhatt1864 Před 3 lety +6

    Most beautiful composition I have heard...music, lyrics and Sudhir Phadke's voice soothes our soul