EP 05 बाळक्रीडेचे अभंग ०९ | भाग ०५ देवा आदिदेवा जगत्रयाजीवा | YOGIRAJ BHAKTI

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • EP 05 बाळक्रीडेचे अभंग ०९ | भाग ०५ देवा आदिदेवा जगत्रयाजीवा | YOGIRAJ BHAKTI
    वाचन आणि संकलन - Yogesh Baban Gadage
    Facebook : / yogeshbabangadage
    ध्वनी मुद्रण स्टुडिओ - YFC Studio's Narayangaon ( +91 9665373739 )
    ध्वनी मुद्रक आणि संगीत - Shashank Gunjal
    LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBE
    All Rights to Music Label Co. & No Copyright infringement intended.
    बाळक्रीडेचे अभंग
    देवा आदिदेवा जगत्रयाजीवा । परियेसी केशवा विनंति माझी ॥ १ ॥ माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम। ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ॥ २ ॥ कळा तुजपाशीं आमुचें जीवन । उचित करून देईं आम्हां ॥ ३ ॥ आम्हां शरणांगतां तुझाचि आधार । तूं तंव सागर कृपासिंधु ॥ ४ ॥ सिंधु पायवाट होय तुझ्या नामें । जळतील कर्मै दुस्तरें तीं ॥ ५ ॥ तें फळ उत्तम तुझा निजध्यास । नाहीं गर्भवास सेविलिया ॥ ६ ॥ सेविलिया रामकृष्ण नारायण । नाहीं त्या बंधन संसाराचें ॥ ७ ॥
    संसार तो काय तृणवतमय। अग्नि त्यासी खाय क्षणमात्रे ॥ ८ ॥ क्षणमात्रे जाळी दोषांन्विया रासी। निंद्य उत्तमासी वंद्य करी ॥ ९ ॥ करी ब्रीद साचें आपलें आपण । पतितपावन दीनानाथ ॥ १० ॥ नाथ अनाथांचा पति गोपिकांचा । पुरवी चित्तींचा मनोरथ ॥ ११ ॥ चित्तीं जें धरावें तुका म्हणे दासीं । पुरविता होशी मनोरथ ॥ १२ ॥

    अर्थ :- हे केशया । तूं सर्व देवांचा मूळ देव असून त्रैलोक्याचा जीव आहेस. (तूं) माझी विनंति ऐक. ॥ १ ॥ माझ्या बाणीनें तुझे गुणानुबाद व नामवर्णन करावें अशाप्रकारचें प्रेम व युक्ति दें. ॥ २ ॥ आमची जीवनकळा तुझ्या हातीं आहे. ती आम्हांस योग्य करून दे. ॥ ३ ॥ तूं तर कृपेचा अथांग समुद्र आहेस. म्हणून आम्ही तुला शरण आलो आहोंत. ह्याकरितां आम्हाला तूंच एक आधार आहेस. ॥ ४ ॥ तुझ्या नामस्मरणानें भयंकर कर्माचे दहन होऊन भवसमुद्रावर पायरस्ता होतो. ॥ ५ ॥ तुझ्या स्वरूपाचें ध्यान सतत करणें हेंच उत्तम फळ आहे व त्यायोगानें गर्भवासादि दुःखें निवारण होतात. ॥ ६ ॥ रामकृष्ण, नारायण हीं तुझीं नामें सर्वकाळ जपली असतां त्यांस संसाराची बाधा होत नाहीं. ॥ ७ ॥ संसार हा केवळ वाळलेल्या गवताप्रमाणें आहे. त्यास जसा अग्नि लागला असतां एका क्षणांत भक्षण करतो. ॥ ८ ॥ त्याप्रमाणें पातकांच्या राशीं नामस्मरणानें एका क्षणांत दहन होऊन अति निंय लोकसुद्धां श्रेष्ठ बंद्य होतात. ॥ ९॥ पतितपावन, दीनानाथ हें तुमचे ब्रीद (ही प्रतिज्ञा) तुम्हीं खरें करितां ॥ १० ॥ देवा, तूं अनाथांचा नाथ आणि गोपिकांचा पति आहेस. त्यामुळे माझी एकच विनंती आहे की, माझ्या मनांतील इच्छा पूर्ण कर. ॥ ११ ॥ तुकाराम महाराज म्हणतात, तुमच्या सेवकांनीं जें कांहीं मनांत धरावें तें तूं मनोरथ पूर्ण करणारा होतोस. ॥ १२ ॥
    Note : पुणे जिल्ह्यातील सर्व भजनी मंडळाला आमच्या चॅनेल वर भजन गाण्या ची सुवर्ण संधी आम्ही देत आहोत तुमच्या भजनी मंडळाचे शूटिंग करण्यासाठी संपर्क करा : +91 9665373739
    LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBE
    All Rights to Music Label Co. & No Copyright infringement intended.
    कृपया व्हिडीओ बद्दल काही तक्रार असल्यास +91 9665373739 या नंबर वर संपर्क करावा,Copyright owner हा व्हिडीओ त्यांच्या च्यानेल वर अपलोड करण्यास आमची काहीही हरकत नाही याची नोंद घ्यावी परंतु Copyright Strike मारू नये हि कळ कळीची विनंती. आम्ही सर्व खूप मेहनत घेत आहोत आणि सर्वांचे मनोरंजण करत आहोत आपलेही सहकार्य लाभावे हि विनंती.
    If you like the video Please don't forget to share with friends.
    Please share your views.
    Rerecorded & video Copyrights Reserved @www.yogirajfilmcreations.com
    जर तुमच्या कडे गौळणी,भजन ,भारुड असे व्हिडीओ असतील,लोक गीत असतील किंवा शुटींग करायचे असल्यास संपर्क करा आम्ही ते आपल्या च्यानेल वर प्रदर्शित करू.
    @Contact event managements : +91 9665373739
    Book Your Wedding/Prewedding/Postwedding/Reception/ Birthday Events.
    Whats app : +91 9665373739
    @Yogiraj Film Creations Facebook Page:
    / yogirajfilmcreations
    @Instagram Page:
    / yogirajfilmcreations

Komentáře • 1

  • @panditautade9487
    @panditautade9487 Před měsícem

    राम कृष्ण हरी माऊली