पेट्रोल मिळणं बंद झालं तर? | Dilip Kulkarni | EP- 2/2 | BhavishyaVedh

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 02. 2024
  • माणसाच्या अति हव्यासामुळे निसर्गाचा ऱ्हास होतोय? वाहनांसाठी इंधन मिळणं बंद झालं तर? तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतोय का? पर्यावरण वाचवण्यासाठी सामान्य माणसाने काय करायला हवं? पैशांच्या शिवाय जगणं माणसाला शक्य आहे का?
    'थिंकबँक'च्या ५व्या वर्धानपनदिनाच्या निमित्ताने, भविष्यवेध या विशेष मालिकेत ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ दिलीप कुलकर्णी यांची मुलाखत, भाग २...
    #environment #market #nature

Komentáře • 328

  • @hemrajgawali
    @hemrajgawali Před 4 měsíci +11

    माझी आजी 95 वर्षे जगली, डोळ्याच्या ऑपरेशन केलं नाही तिला व्यवस्थित दिसायचे, ऐकू पण व्यवस्थित यायचं, शेवटपर्यंत काठी घेतली नाही, केस कमरेपर्यंत,फक्त दहा टक्के पांढरे झाले होते ते पण शेंड्याचे,साडे आठ वाजता वाजता झोपायची पहाटे पाच वाजताच उठायची, गादीवर कधीही झोपली नाही, भार टेकून कधीही बसली नाही, दात जैसे थे होते, कधी कोणाकडे पाणी मागितलं नाही, कधीही नाकाचा शेंबूड दुसऱ्याला पुसायला लावला नाही, स्मृती ठीकठाक, शेवटपर्यंत गाणी म्हणायची, नेहमी कामात व्यस्त, हातात दोन डझन काचेच्या बांगड्या खळखळ वाजायच्या, शेवटच्या दिवशी सुद्धा घर आणि अंगणाची झाडझुड करून संध्याकाळी देह ठेवला. याला म्हणतात जगणं 🙏

    • @someshmirage4394
      @someshmirage4394 Před 4 měsíci

      हे खेड्यात शक्य आहे

    • @kusumchavan2421
      @kusumchavan2421 Před 4 měsíci

      Khup chan

    • @bodhatman230
      @bodhatman230 Před 3 měsíci

      Very nice

    • @factically4972
      @factically4972 Před 3 dny +1

      Are मित्रा pn he as 95-100 वर्ष शरीर jagvun साध्य काय होणार??
      आपला जन्म का झाला आहे? जगावं ते नेमक का? आपल्या जगण्याने जगात काय फरक पडला? आपल्यामुळे प्रकृतीला काही value addition झालय का? आपल्या शारीरिक व मानसिक बंधनांवर आपण विजय मिळविला का?
      हे बघण जास्त महत्वाच आहे... फ़क्त आजी 100 वर्ष जगली मलापण जगायचंय या गोष्टीला अर्थ नाही...
      एखादा माणूस 100 वर्ष जगला पण आयुष्यात काहीच वेगळ केल नाही नुसत dhakalal आयुष्य असे 100 वर्ष, भगत सिंह, आझाद, छत्रपती महाराज यांसारख्या maha मानवांच्या 40 - 50 वर्ष आयुष्यापेक्षा नेहमी खालीच राहील

    • @hemrajgawali
      @hemrajgawali Před 3 dny

      @@factically4972 मित्रा, आपल्या माणसांची इतर व्यक्तींशी तुलना करणे अत्यंत चुकीचे आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा सत्ता संघर्ष मध्ये ज्या व्यक्ती सहभाग घेतात त्यांचंच नाव इतिहासाच्या पानावर कोरलं जातं आपण त्यांनाच खूप मोठे समजतो. वास्तविक तसं नाही. आपली साधी भोळी माणसं सुद्धा खूप अर्थपूर्ण जीवन जगतात. आणि आपल्या पुढच्या पिढीवर अनन्य उपकार करून जातात. पण ह्या गोष्टी आपण समजून घेत नाही. आपल्या डोक्यामध्ये वेगळीच हवा असते त्यामुळे या व्यक्ती आपल्याला हलक्या वाटतात. सत्ता संघर्षामध्ये बलिदान जाणे म्हणजे अर्थपूर्ण जीवन हा निव्वळ एक गैरसमज आहे. निरोगी आयुष्य जगणे, आणि हे विश्वची माझे घर अशी मानसिकता बाळगणे हेच खरं तर अर्थपूर्ण जीवन. जीवनाबद्दल आपण खूपच संकुचित वृत्ती धारण करतो आणि नेहमी तुलनात्मक दृष्ट्या जीवनाचा अर्थ लावतो. त्यामुळे आपण एक ठराविक मानसिक गुलामगिरी मध्ये आयुष्यभर वावरतो त्यापलीकडे आपण बाकी काहीही नाही करत.

  • @vandanakarambelkar1539
    @vandanakarambelkar1539 Před 4 měsíci +34

    मुलाखत उत्तम.दिलीप स्वतः तसं जगत आहेत त्यामुळे हे सगळे स्वानुभव आहेत.म्हणून ते नेहमीच चांगल्या पद्धतीने,मनापासून समजावून सांगतात.

  • @taal9188
    @taal9188 Před 4 měsíci +37

    मी सतत 23 वर्ष सायकल वापरतोय
    स्वतः आणि घरच्यांच्या कामासाठी आणि सोसायटीत रहाणाऱ्या वृद्ध नागरिकांची सुद्धा काम सायकलवर फिरून करतोय

    • @must604
      @must604 Před 4 měsíci +1

      शाब्बास.

  • @Priyakulkarni285
    @Priyakulkarni285 Před 4 měsíci +11

    निसर्ग आपल्याला भरभरून द्यायला तय्यार आहे पण आपल्याला ते घ्यायचेच नाही आहे आणि वास्तविक तेच आपल्या जीवनासाठी चांगले आहे हेच ढळढळीत सत्य आहे. आपल्या so called अधूनिक विचारसरणी मुळे आपण आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य खुप धोक्यात घालवत आहोत खरंच वेळीच जागे झालो नाही तर खुप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे आणि ती किंमत आपल्याला कधीच फेडता येणार नाही. आपले स्वतचे शरीर सुध्दा निसर्गातून निर्माण झाले आहे हे कित्येक जणांना देखील माहीत नसेल. (आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी) म्हणून माणूस मेल्यावर सुद्धा पंचत्वात विलीन झाला म्हणतात. निसर्ग एवढा मैत्रीचा हात पुढे करतोय तर आपण एवढे का मागे राहतोय. वेळीच सावध नाही राहिलो तर कायमचे कर्मकरांटे राहू. कुलकर्णी sir तुमचे खुप आभार की तुम्ही आम्हाला वेळीच सावध केलेत😊

  • @saksheevasudev7014
    @saksheevasudev7014 Před 4 měsíci +201

    मि पुण्यात राहतो पण माझी टूव्हीलर एक एक महिना वापरत नाही फक्त सायकल वापरतो रोज दहा वीस किलोमीटरवर सगळे काम सायकलवर करतो

    • @prashantkadam1719
      @prashantkadam1719 Před 4 měsíci +3

      माझा पण विचार चालू आहे

    • @anilkulkarni8636
      @anilkulkarni8636 Před 4 měsíci +8

      नुसता विचारच करत बसू नका उठा कामाला लागा.

    • @prathamesh93114
      @prathamesh93114 Před 4 měsíci +2

      Keep up

    • @raeesauxbeat8807
      @raeesauxbeat8807 Před 4 měsíci +3

      Dada tu two wheeler sale ker.....

    • @adityaghoshal3114
      @adityaghoshal3114 Před 4 měsíci +2

      Himachal pradesh che ya pavsalya kay zal irshalwadich kay zale thodech lok ya vicharache ahet spe may marathi maza Maharashtra

  • @Marathi-hindi-Instrumental
    @Marathi-hindi-Instrumental Před 4 měsíci +28

    @38.30 डोकं किडवणारे TV कार्यक्रम पहाणं बंद करणे ही एक सुंदर सुरवात आहे ....आणि Think Bank सारखे कार्यक्रम पहाणे हा पहिला आवश्यक बदल आहे 😇🙏

  • @vaijayantichavan6502
    @vaijayantichavan6502 Před 4 měsíci +16

    सर असं साधं सोपं आयुष्य मी जगत आहे आणि मला त्यात आनंद ही वाटत आहे

  • @1915164
    @1915164 Před 4 měsíci +24

    माझ्या गच्चीत मी बाग केली तर अनेक पक्षी येतात नि सुंदर चिवचिवाट सकाळी येतो ,घरटे सुद्धा बांधले , हे सगळे निसर्गाला जवळ केले म्हणून

  • @sumitgpatil
    @sumitgpatil Před 4 měsíci +17

    मी एकदा म्हणालो, माणसाने आदिवासी जीवन जगायला हवं, त्यावरून आजतागायत माझ्या कामावरील सहकारी, काही मित्र माझी टर खेचतात, बोलतात कधी जाणार जंगलात....?

    • @mkadam9769
      @mkadam9769 Před 4 měsíci +5

      Murkha ahet te,road manje tyana development vatate. Mala hi ascha troll karatat but I know I am correct

    • @sudhirjadhav4705
      @sudhirjadhav4705 Před 4 měsíci +2

      साहेब धोरणी, भविष्यवेधी लोकांना जग पागल बोलते

  • @varshag.8398
    @varshag.8398 Před 4 měsíci +18

    भारतीय तत्वज्ञान महान आहे .पण आपण पाश्चात्य देशांना आपलेच आदर्श मानायला लागलो आणि आपली ओळख विसरून चाललो आहोत.

  • @dr.akshayshewalkar4694
    @dr.akshayshewalkar4694 Před 4 měsíci +24

    दिलीप कुलकर्णी सर आणि अच्युत गोडबोले सर या दोघांची उद्योगजगता बाबत debate ऐकायला आवडेल.

  • @vijaymestry9905
    @vijaymestry9905 Před 4 měsíci +10

    आपण जगतोय कशासाठी. आपला जगण्याचा उदेश्य काय. फायदा तोटा. याचा कोणालाही विचार नाही. फक्त हाताच्या बोटावर मोजकी माणसे आहेत चांगला विचार करणारी. बाकी आताच्या घडीला स्वैराचार निर्माण झाला आहे. यामुळे च मानवी जीवन धोक्यात आली आहे. माझ्या ते खरे. चागल मार्गदर्शन देणारे नाहीत. कोणाच मार्गदर्शन ऐकून घेण्याची इच्छा नाही. अशा मुळे रोगराई. मारामारी. मानसिक रोगी निर्माण झाले आहेत. दुसऱ्या चे बघून पण आपली ऐपत नसतानाही जीवन जगायला लागले आहेत. इथेच जीवनाचा रास झाला. 🙏सुंदर विडीओ. साध जीवन सुखी जीवन. छान.

  • @rupeshnevasr8042
    @rupeshnevasr8042 Před 4 měsíci +3

    अशी सद्बुद्धी तेव्हाच सुचते जेव्हा बँक बॅलन्स चांगला असतो आणि पैसा येण्याचे सोर्स चालू असतात त्यामुळं आधी सर्व बाजूने सक्षम व्हावे मगच आपल्याला जी स्वप्न पूर्ण करायचे आहे त्याकडे वाटचाल करावी.

  • @jeetendra169
    @jeetendra169 Před 4 měsíci +16

    आधुनिकीकरण व पर्यावरण भविष्यात समतोल राखला पाहिजे. आपले विचार चांगलेच आहेत. पण एवढं मात्र खरं कि थिंक बॅंकमुळे आपले विचार पोहचले, या तंत्रज्ञानामुळे...🙏

  • @anil05041973
    @anil05041973 Před 4 měsíci +13

    अतिशय उद्बोधक अशी मुलाखत. ग्राम स्वराज्य ही संकल्पना किती महत्त्वाची आहे हे समजले.

  • @santoshbagate1888
    @santoshbagate1888 Před 3 měsíci +2

    सर तुमची विचारशक्ती आणि तुमचे आताचे या पिढीसाठीचे विचार एवढे स्ट्रॉंग आहेत की शब्दात नाही सांगू शकत पण? But you are greate & bright guide for every human in the our world. Not only india. Your speech & thiking is very best for every world humen. धन्यवाद सर तुमचे विचार सगळ्यांनाच पटतील याची नक्कीच खात्री आहे. तुमचा प्रत्येक व्हिडीओ पाहण्याचा आणि मनोमन समजण्याचा नक्कीच मानस राहील. 🙏🙏🙏

  • @rajendrasawant299
    @rajendrasawant299 Před 4 měsíci +15

    सर्वात एकदम सोपा उपाय माणुस नावाच्या प्राण्याची संख्या कमी करण्यासाठी कठोर उपाय योजना करणे.
    कारण भोगवादी माणसाकडूनच मोठ्या प्रमाणावर निसर्गाचा र्‍हास होत आहे.

    • @i_love_god10
      @i_love_god10 Před 4 měsíci +2

      Exactly. Haach actually root cause ahe ani yavishayi koni bolatach nahi. Dilip siranni yavar thoda prakash takayala hava hota.

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi Před 4 měsíci

      Agadi barobar.

  • @ajitm7
    @ajitm7 Před 4 měsíci +4

    ही पद्धत 70. 80 वर्षापुर्वी 12 बलुतेदार यात होती.कलियुगात सर्वांना पैसे, जमीन कमवायची आहे भले आपल्या कुळाचा नाश होवो की आपल्या जमीनीचा (काळ्या आईचा).आज कोणीही गुरू चे ऐकत नाही ना आई बापाचे.तुमची ही शेवट ची पिढी आहे जो आज कोणीही ऐकत नाही. 😢😢😢😢

  • @prasadpatake4610
    @prasadpatake4610 Před 3 měsíci +1

    सध्या ज्यांची गरज आहे ते काम कुलकर्णी सर तुम्ही करताय तुम्हाला सलाम.. नक्की चं आज मला ही जाणवलं आपण ही काही गोष्टीचं आचरण करणे गरजेचं आहे....

  • @B4CUDAY
    @B4CUDAY Před 4 měsíci +12

    दिलीप कुलकर्णी सरांच्या कार्यशाळेबद्दल/ लेखनसंपदेबद्दल माहिती दिली तर सर्व श्रोत्यांचा आणखी फायदा होईल..

    • @sunildingankar8657
      @sunildingankar8657 Před 4 měsíci

      सम्यक विकास पासून सुरुवात करा.

  • @makarandgolatkar
    @makarandgolatkar Před 4 měsíci +14

    कधीकधी गोष्टी ऐकायला छान वाटतात पण प्रॅक्टिकली फारच कठीण असतात.... पण सरांचा अभ्यास आणि विचार छान आहेत.... अजुन संशोधन करून रोजच जगन कसं शक्य होईल हे पाहावे लागेल... Energy आणि Technology ची सांगड छान घातली आहे.. वाढणारी झाडे आणि कापलेली झाडे ह्यांच उदाहरणं मस्त दिलय... पण ओव्हरऑल बराच theocratical विचार वाटतो जो सगळ्यांना शक्यच नाही..नवीन काहीतरी करत राहणे हा माणसाचा मूळ स्वभाव म्हणून इथपर्यंत प्रगती केली. खरंतर सगळयांचे मूळ हे लोकसंख्येत आहे.... जितकी जातं लोकसंख्या तितका supply आणि तितकीच डिमांड... जो पर्यंत लोकसंख्या कमी होत नाही तो पर्यंत quality of life आणि पर्यावरण ह्या वर परिणाम होणारच त्या साठी तुम्ही कितीही गावाकडे राहिलात तरी.... Energy consumption करतय कोण आणि इतके का वाढले आहे हा मेन मुद्दा आहे.

    • @sonalivishwa
      @sonalivishwa Před 4 měsíci +2

      Te jri asl tri mulat jivan jaganyachi ek paddhat asayla havi

    • @GauravVichare
      @GauravVichare Před 3 měsíci

      लोकसंख्या हि मुख्य समस्या कधीच नाही आहे. माणसाचा हव्यास आणि त्या हव्यासमुळे झालेले लोकसंख्येचे केंद्रीकरण ही मुख्य कारण आहे पर्यावरणाच्या ऱ्हासाच. The Earth has enough resources to meet the needs of all but not enough to satisfy the greed of even one person - Mahatma Gandhi.

  • @Balashaab_1234
    @Balashaab_1234 Před 3 měsíci +1

    गावाकडे सुध्धा आता चांगले आरोग्य नाही राहिले ..लोक वाईट मार्गानं जगतात वय कमी आणि व्याभिचार वाढलाय ...खूपच गंभीर समस्या आहे ...निसर्ग हा छान आहे पण लोक कायमच त्याचा दुरुपयोग करतात आणि ज्यांना अभ्यासच करायचा नाही असल्या लोकांकडून हा प्रकार सुरू आहे.जीवन शैली व जीवन दृष्टी हे दोन मुद्दे आवडले सर...

  • @pravinmore6543
    @pravinmore6543 Před 4 měsíci +2

    प्रथम कुलकर्णी सरांचे मनापासून आभार खूप छान संवाद माणूस पैशाच्या हव्यासा पाई निसर्ग नियमाला पायदळी तुडवीत चालला आहे

  • @kapilmadje2448
    @kapilmadje2448 Před 4 měsíci +9

    मी सेंद्रिय शेती करतो १० वर्ष फक्त विक्री व्यवस्था उभे करु शकलो नाही कारण शेती करत हे करण अवघड आहे

    • @mukundgulawani2330
      @mukundgulawani2330 Před 4 měsíci +2

      तुमचं म्हणणं योग्य आहे. पण तुमच्या शेतीतले प्राॅडक्ट्स विक्रीसाठी समविचारी , विक्रेत्याची निवड तुम्ही करू शकता. शेती पिकवणं हेच खूप श्रमाचं , वेळखाऊ आहे त्यामुळं विक्रीसाठी योग्यव्यवस्था आवश्यकच आहे अन्यथा तोटा सहन करावा लागू शकतो.आणि मुख्यतः , सेंद्रिय प्राॅडक्टस विकणं सहजशक्य होतही नाही.

    • @VJ-ts4wi
      @VJ-ts4wi Před 4 měsíci +2

      तुम्ही कधी लोकांचे फीडबॅक घेतले का... ज्यांनी तुमचा भाजीपाला घेतला त्यांचा

  • @rajendradatar9668
    @rajendradatar9668 Před 4 měsíci +10

    ह्यांच्या सौ.ची मोलाची साथ आहे म्हणूनच जीवनव्रत शक्य झालंय.

    • @nilubhau
      @nilubhau Před 4 měsíci +5

      आपल्या सौ. नी ही कमेंट वाचली तर काय होईल अशी भीती वाटत नाही का? 😂

    • @rushikeshkhatawkar8760
      @rushikeshkhatawkar8760 Před 4 měsíci +1

      😂

    • @kaka-ys9bj
      @kaka-ys9bj Před 4 měsíci +1

      🤣🤣🤣

    • @theticker5014
      @theticker5014 Před 4 měsíci

      😂

    • @Nilesh.k283
      @Nilesh.k283 Před 4 měsíci +1

      होणं नाही तर आजकाल मुली ना खूप पैसेवाले आणि खूप कर्तुत्व वान पाहिजे.... जर नसेल तो माणूस निष्क्रिय....😅

  • @PrakashBhilare-ik3gs
    @PrakashBhilare-ik3gs Před 3 měsíci +2

    अतिशय सुंदर विचार धन्यवाद सर हे बदलायला हवे...

  • @damodarlele4014
    @damodarlele4014 Před 4 měsíci +3

    सर्व ऐकल्यावर वाटून गेले म.गांधी - विनोबा भावे किती मोठी माणसे होऊन गेली आपल्या भारतात व जगावर त्यांचा अजूनही का कायमस्वरूपी प्रभाव टाकून आहेत व अजून हा आनंद घेत जगणारी महनीय व्यक्ति आहेत आपल्यात कुलकर्णीसरांसारखी. चिंतन व विचार करून थोडीसी पुढची पावले टाकायला भाग पाडणारी सुंदर प्रश्नोत्तरे. धन्यवाद विनायक सर.

  • @narendrabhagwat9108
    @narendrabhagwat9108 Před 4 měsíci +12

    निसर्ग आपले बदल माणसाला डोळ्यासमोर ठेवून करत नाही.....माणसाने निसर्गाच्या बदलाबरोबर बदलून हा प्रश्न सोडवता येईल.

  • @borawakeharishnitin2481
    @borawakeharishnitin2481 Před 4 měsíci +5

    याला सर्वात महत्व म्हणजे लोकसंख्या वाढ नियत्रन , उपभोग कमी

  • @vinayakyeole5086
    @vinayakyeole5086 Před 4 měsíci +2

    Modi saheb yanche prabodhan zale tr khup modha badal Honyachi shyakyata ahe... Deelip Sir
    apan khup chan prabodhan kele... Thanks🙏

  • @d14d40
    @d14d40 Před 4 měsíci +5

    माणूसाची मानसिकता इतर प्राण्यांच्या पेक्षा वेगळी आहे हे मान्य केले की ती कोणत्या बाबतीत आहे हे प्रथम समजून घेतले पाहिजे. आदर्श जीवन कसे असू शकेल हा विचार जसा माणसाला करता येतो तसेच मला समाजात प्रतिष्ठा मिळते की नाही हाही विचार न करता माणसाला मुंग्या किंवा मधमाशांसारखे जे काम नैसर्गिकरीत्या आपल्याला करायचे आहे ते समाजाचा एक भाग म्हणून विनातक्रार करीत राहणे माणसाला जमणे का शक्य होत नाही ह्या गोष्टीचा विचार न करता कोणतीही आदर्श समाजव्यवस्थेची कल्पना ही वास्तवात का उतरत नाही हे समजत नाही.
    समाजवास्तवाची गुंतागुंत ही मानवी मनाच्या गुंतागुंतीचाच परिणाम आहे.
    महाभारतातील विनाश का झाला हे सांगणाऱ्या वेदव्यासांना " ऊध्वबाहु विरोम्येष न चि कश्चित् शृणोति माम्" असे शेवटी का म्हणावे लागले?

  • @Marathi-hindi-Instrumental
    @Marathi-hindi-Instrumental Před 4 měsíci +6

    अतिशय सुंदर आणि डोळे उघडणारी मुलाखत !!! जग कोरोनाने शहाणं होणार नसेल तर मग ते कधीच शहाणं होणार नाही ....
    " वरातीमागून घोडं " म्हणतात तसं , सोलर पॅनलचा शोध आणि वापर सगळ्यात आधी लागायला हवा होता ....
    झाडं तोडून झाली , खनिज तेल जाळून झालं ...आता आपण सोलर वापरण्याचा विचार करत आहोत ...😢😢😢 सगळा सिक्वेन्स चुकला .......परीणाम स्वरूप ग्लोबल वाॅर्मिंग अगदी डोक्यावर आलंय ....😢😢😢😢

    • @vasudhadewasthalee3018
      @vasudhadewasthalee3018 Před 4 měsíci

      पैसा हे सर्वनाशाचे मुळ आहे . परत बारटर सिस्टम सुरू झाली पाहिजे.

  • @sanjivanikulkarni9475
    @sanjivanikulkarni9475 Před 4 měsíci +3

    वाढत्या लोकसंख्येला फक्त organic farming करून अन्न पुरले नसते हे पण एक सत्य आहे..😢

  • @nehakulkarni7522
    @nehakulkarni7522 Před 4 měsíci +11

    आपण निसर्गाला इतके ओरबाडत आहोत त्याचा परिणाम हाच होणार आहे की माणसाला या गोष्टी कराव्याच लागतील..निसर्ग आपल्याला धडा शिकवणार आहे....सरांनी सांगितलेल्या गोष्टी करण्याचा नक्की प्रयत्न करू..मी ओल्या कचऱ्याचे त खत तयार करते....आम्ही आमच्या सोसयटीतील सर्वांना प्लॅस्टिक साठवून ठेवायला सांगतो ते आम्ही रिसायकल करायला रुद्र संस्थेला देतो...

  • @amarshinde94Y
    @amarshinde94Y Před 4 měsíci +8

    सर आपल्यासारखा लोकामुळे ही पृथ्वी टिकून आहे.

    • @aniljathar4693
      @aniljathar4693 Před 3 měsíci

      आपणही त्यांच्यासारखे होण्याचा प्रयत्न करूया ना.

  • @kalidasmarathe1897
    @kalidasmarathe1897 Před 4 měsíci +5

    मनोवृत्ती बदलणे हा ऊपाय.आपले विचार त्यासाठी नक्कीच उपयोगी पडतील .

  • @santoshkatavare4162
    @santoshkatavare4162 Před 4 měsíci +2

    सर, आपण खुपच चांगले काम करीत आहात. त्याबद्दल आपले खूप खूप आभार 🙏. आपल्या कार्यातून नवीन पिढीला प्रेरणा मिळत राहो.

  • @paddy4372
    @paddy4372 Před 2 měsíci

    I appreciate the interviewer asking very appropriate questions! And Thankyou Dilip sir for being a driving force to sustainability!

  • @mukesh.bhujbal121
    @mukesh.bhujbal121 Před 4 měsíci +2

    माझे विचार आहेत हे....स्वयंपूर्ण आणि निरोगी जीवन ❤

  • @balkrishna3939
    @balkrishna3939 Před 4 měsíci +2

    एकदम छान मुलाखात... समृद्ध करणारी ❤

  • @1959dilip
    @1959dilip Před 4 dny

    Dilip Kulkarni, Congratulations on your selection of rural life.....community life suggested by you is a good option

  • @kalyanipurandare3231
    @kalyanipurandare3231 Před 4 měsíci +4

    खरं असा विचार सगळ्यांनी केला पाहिजे.

  • @anandgayatripatil3599
    @anandgayatripatil3599 Před 4 měsíci +5

    मला ह्या सगळ्याचा फायदा झाला
    दिलीपजी धन्यवाद

  • @hemantatre7245
    @hemantatre7245 Před 4 měsíci +5

    ऑरगॅनिक उत्पादनाला संख्येची मर्यादा आहे. लोकसंख्यावाढीला पुरेसे उत्पादन करणे हे उर्जेचा अतिवापर होण्याचे कारण असू शकते.

  • @subodhsirsat134
    @subodhsirsat134 Před 4 měsíci +1

    ही मुलाखत मला खूप आवडली.कारण हे विचार लहानपणापासून माझ्या मनात येतात.पण हे समोरच्याला सांगायची सुद्धा भीती वाटते.कारण अशी चर्चा जरी केली तरी वेड्यात काढतील अशी भीती वाटते.कधीकधी अशा चर्चा झाल्या पण ऐकणारा थोड्या वेळाने उठून जायचा.मग मात्र हरल्या सारखं वाटलं.

    • @santoshshendkar8245
      @santoshshendkar8245 Před 4 měsíci

      असे जगावेगळे विचार करताना मन खूप खंबीर असावं लागतं दुसऱ्यांचा विचार करून निर्णय घेतले तर ते शक्य होत नाही आपली आवड म्हणून निवडा

    • @vaishalikadam7946
      @vaishalikadam7946 Před 4 měsíci

      लोक काय म्हणतील हा विचार करायचा नाही. आपण लहानपणापासून असेच वागत असू तर आपण सरांच्या विचारांचे असू तर बिनधास्त बोलावे व वागावे कसलीही भिती न बाळगता आपण आपण योग्य मार्गावर आहोत त्यात आनंद मानावा लोकांचा विचार करणयाची गरज नाही त्याना काय वाटत काय बोलतात हे काही महत्त्वाचे नाही.
      अप्रतीम मुलाखत छान विचार सरांनी दिले आहेत.
      थिंक बॅंक ह्या चॅनलचे धन्यवाद खूप छान विषय चर्चेला घेत असतात.

  • @pkpk5792
    @pkpk5792 Před 4 měsíci +2

    नमस्कार दादा मस्त खूप कमी लोक आहेत आपल्या सारखे विचार करणारे आणि करायला लावणारी.dr Devendra ballara म्हणून वेक्ती आहे ह्यावर खूप deep मधे सांगितले आहे.

  • @deepakkadam4423
    @deepakkadam4423 Před 4 měsíci +1

    मलाही माझ्या गावाकडंच जाऊन जगायचं आहे पण एकट्याला हे शक्य नाही.या करीता समविचारी लोकांनी एकत्र येऊन ही जिवनशैली जगणं गरजेचे आहे.

  • @virensawant1827
    @virensawant1827 Před 4 měsíci +2

    लोकसंख्या हेच कारण....आहे.....जेव्हा या देशाची लोकसंख्या 80cr चा ओलांडली तेव्हाच हा देश हाताबाहेर गेला.....😊😊😊😊😊😊😊😊

  • @poojadhakorkar151
    @poojadhakorkar151 Před 4 měsíci +1

    खरंच विचार करायला लावणारी मुलाखत आहे खूप छान

  • @nitinpitale320
    @nitinpitale320 Před 4 měsíci +2

    आता ईतकी आळशी माणसं आहेत की हे तुम्ही सांगताय ते अगदी खरे आहे पण् ते ऐकून काही ची बुध्दी चालायचं बंद होते हे तितकेच खरे आहे

  • @pramodparanjpe6436
    @pramodparanjpe6436 Před 4 měsíci +1

    Nice thoughts and insights Vinayak....can and should be implemented.

  • @rbh3100
    @rbh3100 Před 4 měsíci +5

    Ekdam masta. Absolutely brilliant aani sustainable timeless thoughts and principles. Thank you very much.

  • @vilassurve5641
    @vilassurve5641 Před 4 měsíci +3

    शेवटी आपण जे पर्याय दीलेत
    ते आपण कृतीत आणले तर नक्कीच फरक पडेल असे वाटते , पण त्यासाठी निर्धार हवा.

  • @laxmanraskar6669
    @laxmanraskar6669 Před 4 měsíci +8

    निसर्गाचा समतोल राखून विकास केला पाहिजे

  • @shirkeshivaji8166
    @shirkeshivaji8166 Před 4 měsíci +2

    It s reality-based explanation .is required in future. New generation should be motivated.

  • @prakashgavhane7339
    @prakashgavhane7339 Před 3 měsíci +1

    खरोखर आज गरज आहे मि आज हे वचन घेतो स्वयं वापरिल साधे

  • @Pran999
    @Pran999 Před 3 měsíci

    नेहमीप्रमाणेच अतिशय महत्वाच्या आणि अतिशय गरजेच्या विषयांवर विडियो think tank ने बनवला.कुलकर्णी सरांनी जे काही सांगितल ते माझ्यासारख्या तरुणाला 100% पटलं.खरोखर अश्या पद्धतिने जगण्याची आता वेळ आलेली आहे,अन्यथा काही वर्षांनी निसर्गच आपल्याला अस जगायला भाग पाडेल.GDP पेक्षा GNH(gross national happiness)हाच महत्वाचा आहे.भरपूर झाली ती technology आणि विकास.Think tank ला विनंती की त्यांनी आता पाणी या विषयावर सुद्धा एक podcast बनवावा,काल मी वाचलं की बंगलोरला पाण्याची अतिशय भयंकर परिस्थिती झालेली आहे.तर यावर podcast बनवला तर लोकांमधे लवकरात लवकर जनजागृती होईल व आपल्या राज्यात तरी पाण्याची गंभीर स्थिती होण्याच्या आत सुधारता येईल.Thanks a lot to think tank again for the eye opening and really value adding videos🙏

  • @laxmanraskar6669
    @laxmanraskar6669 Před 4 měsíci +4

    अतिशय छान मुलाखत

  • @Pankajsangole-lq9xj
    @Pankajsangole-lq9xj Před 4 měsíci

    Khup chan prbhodhan kel Kulkarni sarani......We r implement in our daily routine.... 🙏🙏🙏🙏👍👍👍👍

  • @astroasha180
    @astroasha180 Před 4 měsíci +1

    खूप उपयुक्त विचार खूप सुंदर 🙏

  • @shubhambidave4624
    @shubhambidave4624 Před 4 měsíci +4

    खुप छान मुलाखत 🙏

  • @akashmhetre3842
    @akashmhetre3842 Před 4 měsíci +1

    Agree sir . I am on the same way . Started with a few things already.. this video will speed up things .. Thanks for sharing your thoughts

  • @sagarbobade2331
    @sagarbobade2331 Před 4 měsíci

    Khup chhan, vichar karayala bhag padel as bollet deelip sir.... thanks

  • @kailasmali3839
    @kailasmali3839 Před 4 měsíci +4

    सामान्य निदान विचार करतात ,मान्य करतात,शक्य तेवढे आचरण्यासाठी प्रयत्नशील रहातात पण श्रीमंतीचा गर्व असलेले मात्र हे ऐकून किमान विचार करण्यची पण तोषीस घेत नाही हे वास्तव व वाईट हे की हाच वर्ग सामान्यांवर प्रभाव निर्माण करणारा म्हणून ह्यांच्यावर दबाव येण्याऐवजी हतोत्साहीत करणारा दबाव सामान्यांवर येतो हि वस्तुस्थिती आहे

    • @bhaktikulkarni2005
      @bhaktikulkarni2005 Před 4 měsíci

      agadi barobar aahe.. majha anubhav dekhil hech sangto mala..

    • @umeshtathed1239
      @umeshtathed1239 Před 4 měsíci

      सगळे गाणे होतील...है परिवर्तन निश्चित!

  • @prahappy
    @prahappy Před 3 měsíci

    माझेच प्रश्न, मुलाखतकार विचारात आहे असंच वाटलं बऱ्याच वेळा !
    खूप छान मुलाखत - धन्यवाद

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Před 4 měsíci +1

    समाजाला परत करा खुपच छान विचार

  • @sanban605
    @sanban605 Před 4 měsíci +1

    मी शेती करतो आणि गरजा कमी ठेवल्या आहेत.. भौतिक दुनिये पासून थोडाफार लांब होण्याचा प्रयत्न करतोय कोणत्याही गोष्टीची आसक्ती मानत वाहू देत नाही 🙏🏾

  • @VN7691
    @VN7691 Před 4 měsíci +1

    सरांचे विचार खूप सुंदर आहेत, पण पंतप्रधान मोधी विरोधी विचार करून चालणार नाहीत. हा भारत देश विश्वगुरू कसा होईल.

  • @ganeshkarmarkar4595
    @ganeshkarmarkar4595 Před 4 měsíci +4

    पूर्वी अशीच जीवन पद्धती होती.

  • @deepakbhalerao5809
    @deepakbhalerao5809 Před 4 měsíci +2

    अतिरेकी विचार व व्यवहार यात फरक असतो , ही गोष्ट लक्षात घेतले पाहिजे

  • @beintellectual496
    @beintellectual496 Před 4 měsíci

    Itke sunder vicharvant aplyakade ahet. Ya vicharvantanchi series apan dilyabaddal Think Bank che abhar.

  • @smitak8992
    @smitak8992 Před 4 měsíci +1

    खूप छान मुलाखत.

  • @viveksatishbodkhe9026
    @viveksatishbodkhe9026 Před 4 měsíci +1

    खुप छान मुलाखात

  • @nitinshimpale483
    @nitinshimpale483 Před 4 měsíci +1

    khup khup chhan kulkarni sir

  • @SnehalataDeshpande
    @SnehalataDeshpande Před 4 měsíci

    Itake changale vichar ani badal ajun sarvanparyant pohachale pahijet kiti chan sangital ahe

  • @sureshshiradhonkar3569
    @sureshshiradhonkar3569 Před 4 měsíci +1

    खूपच छान!

  • @mithilarege830
    @mithilarege830 Před 4 měsíci +2

    छान विषय

  • @must604
    @must604 Před 4 měsíci +1

    दिलीप साहेब,माणूस एवढा विचारशील असता तर मानवाचा इतिहास एवढा क्रूर हिंसक नसता.
    काही बदल होणार नाही .सर्व खनिजे संपतील 1630 मध्ये जशी कोट्यवधी लोकं ,दुष्काळ व भुके मुळे ,नष्ट झाली तसे काही घडू शकते.

  • @rbn6063
    @rbn6063 Před 4 měsíci +2

    मी अस जगण्याचा प्रयत्न करेन....❤❤❤

  • @shejouavach
    @shejouavach Před 4 měsíci +3

    दिलीप कुलकर्णी यांचे दैनंदिन पर्यावरण हे पुस्तक वाचले आणि परफ्यूम - सेंट वापरणे मी बंद केले. त्याऐवजी आता अत्तर वापरतो

  • @ravibhogale3851
    @ravibhogale3851 Před 4 měsíci +2

    आपण रोजच्या दैनंदिन जीवनात अनभिज्ञपणे निसर्गाला ओरबाडतो आहे.

  • @shashikantghuge5799
    @shashikantghuge5799 Před 4 měsíci +24

    Please share address of Kulkarni Sir. We want to meet him with our kids for their better future

    • @swatihadkar1118
      @swatihadkar1118 Před 4 měsíci

      Yes...this kind of people need to famous more. Whose views and thought are very clear. Searching his details from two three years on the net but unable to get. It will be great if we get more details about his workshop and awareness program

    • @GauravVichare
      @GauravVichare Před 3 měsíci

      Dilip kulakarni ani pournima Kulkarni yanch "Swapnamdhil Gava" he pustak vacha Ani magach Tyanna bhetayala ja. Pustakamadhe tumhala patta ani kon bhetayala yeu shakat he kalel.

  • @shantilalsonar4371
    @shantilalsonar4371 Před 4 měsíci +1

    अतिशय सुंदर बुद्धिजीवी लोकच जास्त गोंधळ घालतात याला कारण ऋतुबाज पुढारी

  • @suniljokare9958
    @suniljokare9958 Před 4 měsíci +3

    वाढती लोकसंख्या हा एक मोठा कारण आहे.

    • @skg-123
      @skg-123 Před 4 měsíci +2

      एका ठिकाणी जमा झाल्या वर वाटणारच ना. एकदा खेडेगावात या मग कळेल. सगळी म्हातारी आहेत गावात

  • @rahultopale3000
    @rahultopale3000 Před 4 měsíci +3

    Very inspirational... must watch the interview. Thank you, Vinayak ..

    • @rajendrabhat8143
      @rajendrabhat8143 Před 4 měsíci

      कुलकर्णी सारखे जगायला सुरुवात करायला काहीच हरकत नाही. पण मग माझं जीवन हलाखीचं आणि दुसरा सुशेगाद! या तुलनात्मक मनाचं काय करणार? मी वाचवलेला कार्बन दुसरा ओरबाडून वापरतोय. याला कायदा व सरकारच तोड देवू शकेल.

  • @saurabh411038
    @saurabh411038 Před 4 měsíci +2

    Excellent

  • @shrikantdhumal3486
    @shrikantdhumal3486 Před 4 měsíci +1

    गेली ३० वर्ष सरकारी नोकरी करत गावी राहिलो. मुलाचं शिक्षण सरकारी शाळेत खूप आनंदी जीवन मातीशी नातं पाहिजे

  • @amitanaudiophile
    @amitanaudiophile Před 4 měsíci +1

    This talk is really important to understood by every person on earth..

  • @pramilashinde4683
    @pramilashinde4683 Před 4 měsíci +1

    खूप छान Sir

  • @nileshjadhav2787
    @nileshjadhav2787 Před 4 měsíci +2

    Khup chan

  • @rameshwagh7862
    @rameshwagh7862 Před 4 měsíci +1

    Great

  • @RAJ125rv
    @RAJ125rv Před 4 měsíci +3

    भारतीयांच्या प्राचीन जीवनशैलीत भेदाभेद, अस्पृश्यता पाळणे व शूद्र,अति शुद्रांना अनेक अधिकार नाकारणे हा जी भाग होता. आधुनिक विचार व औद्योगिक क्रांतीने हा भेदाभेद, अस्पृश्यता कमी झाली. हा झालेला मोठा बदल आहे. अर्थात भारतातील जनावरे ही थोडीतरी माणसात आली. यावर सांगना...

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 Před 4 měsíci

    Dhanyawad Saheb 🌹🙏

  • @dilipkumarkulkarni6173
    @dilipkumarkulkarni6173 Před 3 měsíci +1

    Minimizing the needs and satisfaction is very important.

  • @balirajekalyane3426
    @balirajekalyane3426 Před 4 měsíci +3

    dilip kulkarni sir kupch great aahet. mi ya video ek. prakalp dhetala ahe ki , jastit jast mi local bus aaya upyog karen. techonology ch kami use karel, 3 km ch aat je pn place aahe tya tikani mi payi chalat jain.

  • @1959dilip
    @1959dilip Před 4 dny

    Dilip Kulkarni, please suggest more actionable points for the community...

  • @narendrabhagwat9108
    @narendrabhagwat9108 Před 4 měsíci +3

    वस्तू विनिमय ही व्यवस्था चांगली असून शकते.
    पण जेव्हा माझ्या कडे असलेली वस्तू आणि मला हवी असलेली वस्तू ही एकाच व्यक्तीकडे नसेल तेव्हा काय करायचे?

    • @umeshtathed1239
      @umeshtathed1239 Před 4 měsíci

      सध्याच्या परिस्थिती नुसार योग्य मार्ग काढला जाईल.सध्या वैचारिक मंथन चालू आहे.सर्वांची मानसिकता तयार करत आहोत.कारण होणार असलेले बदल सामान्यांना सहज सहन होणार नाहीत. मनशक्ती असेल तर त्रास कमी होईल.
      प्रत्येकाला थोडा थोडा त्याग नक्कीच करावा लागणार, पण अंतिम विजय मानवतेचा च होणार!

  • @rameshwarrathore3645
    @rameshwarrathore3645 Před 4 měsíci +1

    Materialistic life and facilities नसेल तर sir तरुणांचा लग्नच नाहि होणार ... है पण एक फार मोठं कारण आहे

  • @laxmanraskar6669
    @laxmanraskar6669 Před 4 měsíci +3

    वस्तू विनिमय फार गरजेचं

  • @rajsolanki8459
    @rajsolanki8459 Před 4 měsíci +1

    Kadachit tyamulech uttam sheti,madhyam vapar, kanishtha chakari ase mhant asavet.