पावसात भिजत मजल केली पूर्ण, भूक लागल्यावर गरमागरम वडापाव वर मारला ताव | dhangari jivan | sidu hake

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • पावसात भिजत मजल केली पूर्ण, भूक लागल्यावर गरमागरम वडापाव वर मारला ताव | dhangari jivan | sidu hake
    #वडापाव
    #vadapavparty
    #dhangarijivan #siduhake
    #banai

Komentáře • 306

  • @user-hk3wb3vc7d
    @user-hk3wb3vc7d Před rokem +483

    कुणा कुणाला वाटते की हा एक मेव चैनल आहे की वाईट कमेंट येत नाही किती कष्टमय जीवन आहे हाके दादा बाकी जय शिव मल्हार❤❤❤❤

  • @nishawaghmarevlogs6159
    @nishawaghmarevlogs6159 Před rokem +13

    हा एकमेव असा youtube channel आहे ज्याला निगेटिव्ह कमेंट येत नाही एवढंच काय बरेच youtuber ne यांच्या कडून व्हीडिओ कसे असावे आन कसे असायला हवेत,हे शिकायला पाहिजे.

  • @vaishalikumbhar5650
    @vaishalikumbhar5650 Před rokem +113

    इतका त्रास होऊन सुधा चेहर्यावर किती आनंद आहे ताई खरच तुम्ही खूप छान आहेत

  • @manishapatil9813
    @manishapatil9813 Před rokem +55

    शरीराचे अज्जिबात लाड नाही त्यामुळे खरी भूक खरी तहान काय असते ते तुमच्या कडे पाहून समजत सलाम तुम्हाला. आनंदी कस रहावे तुम्ही आम्हाला धडे देत आहात.

  • @sunitasvlogsandstories429

    तुमच्या दोघांचा हसरा चेहरा आणि सकारात्मक जीवन जगण्याची पद्धत या मुळे मला नेहमीच प्रेरणा मिळते 🙏🙏

  • @sangeetaraut5830
    @sangeetaraut5830 Před rokem +35

    मी नगरसेविका संगीता राऊत ,,मी तुमचे व्हिडिओ रोज बघते ते पहिल्या सीवाय झोप येत नाही ,,माझ्या जीवनात खूप अडचणी आहेत पण , खर सांगू का ,, तुमचे व्हिडिओ पाहिले की वाटते मी खूप सुखी बाई आहे
    तुम्हाला खूप खूप धन्यवाद 🙏🙏 पुढल्या वाटचालीस शुभेच्छा 🙏🙏

  • @heeragangurde7606
    @heeragangurde7606 Před rokem +47

    सागर हा खरा हिरो आहे त्या लेकराची काही तक्रार नसते हसत खेळत प्रवास करतो लेकरू❤

  • @user-ny1ob4kc3y
    @user-ny1ob4kc3y Před 10 měsíci +3

    बाणाई तू खरी गृहलक्ष्मी आहेस. खूपच सुगरण आहेस. इतक्या प्रतिकूल स्थितीत तू सुंदर पुरणपोळी केलीस पोटभरून खा. मस्तपैकी. खूप खूप शुभेच्छा.

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 Před měsícem +1

    सिद्धू बाळा तुला बाणाची साथ खूप चांगली आहे तुमचा संघर्ष कायमच चालू असतो तुमची सकारात्मक वृत्ती सगळ्यांना खूप प्रेरणा देते तुमचे व्हिडिओ पाहून आम्हाला पण खूप एनर्जी येते आणि तुम्ही केलेला अनुभव पाहून आम्हाला पण तो अनुभव आम्हाला पण अनुभवल्या सारखं वाटतं धन्यवाद सिद्धू बाळा काळजी घ्या पावसा पाण्याची दिवस आहेत रेनकोट वगैरे घेत जा

  • @gauriarts7327
    @gauriarts7327 Před rokem +30

    रेनकोट घा दादा तुमला उपायगी आहे सागर लां पण घा आता पाऊसाचे दिवस आहे आणि आमला असेच व्हिडीओ बनवत जावा खूप बरी वाटलं तुमचा व्हिडीओ बगून माणसाला कळत तुमचा व्हिडीओ तून की किती तरी शिकायला मिळत बाणाई वयनीला पण घा दादा रेनकोट खूप कष्ट करता ते आमला येवढं सुखं असुन पण आमला कमी वाटत आणि तुम्हाला सुविधा नसून पण तुम्ही आनंदी हात हे एक गोष्ट आहे तुमचात खूप छान आहे सागर ची काळजी घा 😘😘😘

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 Před rokem +6

    बानाई,तू साक्षात बाना आईच आहेस,सलाम तुझ्या जिद्दीला!!!
    तुम्हा सर्वांनाच भेटायला आम्ही सर्वजण उत्सुक आहोत.
    बिचारे सर्व जण निरक्षर आहेत,पण विचारांची श्रीमंती कमालीची आहे.

  • @vrushalipatole2983
    @vrushalipatole2983 Před rokem +11

    तुमच्यासाठी माझ्याकडे शब्दच अपुर पडतात किती ते कष्ट आणि चेहरा नेहमी हसरा सलाम तुम्हाला .

  • @vishwamyeragi6660
    @vishwamyeragi6660 Před rokem +2

    नमस्कार दादा आणि वहिनी. मी गोव्याची आहे. तुम्ही एवढ्या उघड्यावर कष्ट करून आनंदीत असतात आणि आम्ही मोठ्या घरात राहुनही सतत कमतरतेचा पाठीमागे असतो. पण तुमच्या विडियो बघून काहीतरी शिकण्यासारखं आहे. देव तुम्हाला सुखी ठेवो.

  • @anitakaludonkar2086
    @anitakaludonkar2086 Před 6 měsíci +2

    तुमचे हाल पण तेवढीच आहे जेवढी मज्जा पण आहे मला खुपच आवडतात तुमचे व्हिडिओ

  • @PramodBavache-tc3zz
    @PramodBavache-tc3zz Před rokem +5

    किती आवघड प्रवास आहे

  • @akashkulal1284
    @akashkulal1284 Před rokem +34

    बाकीच्या काही यूट्यूबर्स ने व्हिडिओ कसे बनवावे.हे हाक्के पाहुण्याचे व्हिडिओ पाहून शिकावे👍👏🙏

  • @vandanamore2009
    @vandanamore2009 Před 8 měsíci +3

    मी पण तुमचे व्हिडिओ पाहते खूप आवडतात मला बाणाई ताई तुम्ही ग्रेट आहात

  • @rajshreeshirke1404
    @rajshreeshirke1404 Před rokem +31

    इतका त्रास होऊन देखील चेहऱ्यावर हसू सलाम तुम्हांला धनगरी जीवन खूप संघर्षमय

  • @kavitashelar9032
    @kavitashelar9032 Před rokem +7

    केवढी जीवाची तगमग होते दादा तुमची पण तुम्ही किती हसत त्याला सामोरे जाता तुमचं जीवन जगणं सोपं नाही एकमेकांना साथ पण तेवढीच देतात .. Great ahet sagle tumhi🙏🙏

  • @vasantingale1403
    @vasantingale1403 Před rokem +39

    तुमच्याकडे पाहून अनेक लोकांना प्रेरणा मिळेल किती खडतर जीवन जगता तरी कसली तक्रार नाही आनंदी जीवन जगता तुम्ही हे खूप सकारात्मक आहे.

  • @durga6835
    @durga6835 Před rokem +10

    खूप वाईट वाटते हो तुमचं किती कठीण संघर्ष करत आहेत गरिबांकडे कोणी लक्ष देत नाही सरकार लोकं सुद्धा एखाद्या श्रीमंताला मदत करतील पण गरिबाला नाही करणार 26 जानेवारी वडापाव खातात पाण्यात पावसात कठीण आहे तर घरात बसून आयुष्यामध्ये जेवतो तरी पण आम्हाला थकल्यासारखं होतं कधी तुम्हाला कोणाची मदत वगैरे असते का मिळते का कोणाकडून सरकारकडून वगैरे काय

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 Před rokem +41

    खुपच खडतर जीवन आहे. तरी हसत हसत बोलतात दादा व बाणाईस. सल्युट. ❤❤❤❤❤❤❤

  • @santoshnighot5129
    @santoshnighot5129 Před rokem +38

    दादा आणि वहिनी खूप खूप शुभेच्छा पुढील प्रवासासाठी लईच त्रास घ्यायला लागतो संसारात सुखी राहुदे दे देवा 🙏🙏

  • @nandapulawale1230
    @nandapulawale1230 Před rokem +21

    खरंच तुमचे व्हिडिओ बघताना खुप वाईट वाटतंय. किती अवघड आहे येवड असुन सुद्धा किती आनंदी असतात हे खुप महत्वाचे आहे

  • @nirmalagore3637
    @nirmalagore3637 Před rokem +2

    जीवन प्रवास खरंच खुप अवघड आहे तुमचा पण त्यातही तूम्ही आनंदी असता दादा आणि वहिनी.कितीही संकटमय जीवन असले तरी ते आनंदी च जगावे हे तुमच्याकडुन शिकण्यासारखे आहे.

  • @ushashinde4040
    @ushashinde4040 Před rokem +6

    बघून वाईट वाटतंय आम्ही तूमची काही मदत करू शकत नाही म्हणून खूप खडतर प्रवास आहे तूमचा दादा ताई बाळू मामा आहेत तूमच्या पाठीशी 🌹🙏🌹

  • @vandanamore2009
    @vandanamore2009 Před 8 měsíci +3

    मी पिंपरी-चिंचवड मध्ये राहते पुण्यामध्ये तिथनं पाहते तुमचे व्हिडिओ रोज

  • @aminakazi4770
    @aminakazi4770 Před rokem +11

    खरच प्रत्येकाने तुमच्याकडून आदर्श घ्यावा असे तुमचे जीवन आहे . 👌👌🙏🏼

  • @maheshdeshpande7329
    @maheshdeshpande7329 Před rokem +3

    Khup chan aai

  • @vilasgeete4738
    @vilasgeete4738 Před rokem +10

    हाके दादा तुमचे जिवंण फार कष्टमय आहे ऊन वारा पाऊस याला सामोरे जाऊन मजल दर मजल करत असता तरी तुम्ही सतत हासतमुख असता सलाम तुमच्या मेहनतीला

  • @shakuntalaambhore2468
    @shakuntalaambhore2468 Před 10 měsíci +3

    खरच खरी भुक काय असते ते दादा व बाणाई,किसन व अर्चना आणि गोड असा सागर यांच जीवन पाहुन आपण अंदाज करु शकतो, खुप कष्टाचे जीवन पण चेहरा किती हसमुख आहे खुप शिकण्या सारखे आहे आपल्याकडुन ❤❤

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Před rokem +53

    दादा, वहिनी तुम्हाला सर्वांना किती त्रास सण करावा लागतो 🙏🙏 एवढ्या पावसात 🌧️🌧️🌧️🌧️ उभ राहून किती त्रास सण करावा लागतो 🙏🙏

  • @babyshirsath8660
    @babyshirsath8660 Před rokem +4

    किती कष्टमय जीवन सलाम तुमच्या संघार्शानाला

  • @priyankajadhav4712
    @priyankajadhav4712 Před rokem +30

    दादा आणि वहिनी तुमच्याकडे बघून आम्हाला खूप बळ येते, परिस्थितीवर मात करण्यासाठी.
    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 Před rokem +16

    दादा या पावसात तुमचे किती हाल होतात तरीसुद्धा तुम्ही किती आनंदी असतात एकदम छान व्हिडिओ व्हिडिओ लवकर टाकत जा आणि मी औरंगाबाद रोज तुमचे व्हिडिओ बघते

  • @rupalikatkar
    @rupalikatkar Před rokem +7

    हो खरच हाके दादा आणि परिवार यांचं जिवन संघर्षमय आहे, ऊन, वारा,पाऊस कशाचीही पर्वा न करता केवळ आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाह करण्यासाठी भटकावे लागत आहे ❤❤

  • @Pratibha_Biraris
    @Pratibha_Biraris Před 8 měsíci +3

    देव मल्हारी मार्तंड आपल्या पाठीशी आहेत , बानाई चिंता नसावी ❤🙏

  • @maliniwani207
    @maliniwani207 Před rokem +6

    पावसा पाण्याचा खुप त्रास आहे दादा व बानाई तुमच्या सगळ्या कुंटुबाला तरी चेहरा कीती हसतमुख आणि आनंदी दिसतो तुमचा, खुप छान वडापाव

  • @bhagwanrane841
    @bhagwanrane841 Před 11 měsíci +2

    Amhi tumache video darroj baghato baghalay shivay amhi zopatah nahi kupach mast orijanal video tumache dada

  • @jaylaxmimunjal560
    @jaylaxmimunjal560 Před rokem +21

    जीवन कसं जगावं हे तुमच्या कडून शिकावं खूप छान एपिसोड 🖕👍👍👌👌🙏

  • @vilasautadeoksrji5755
    @vilasautadeoksrji5755 Před rokem +7

    खडतर जिवन..आणि...प्रतिकुल...परिस्थितीत..जिवन कसे जगावे..हे खरच..तुमच्या कडून शिकन्यासारखे....आहे...तुमचा..प्रवास ..सुखाचा ..होवो...!

  • @sampatwakade6372
    @sampatwakade6372 Před rokem +2

    Kupch chan ek navin energy milate

  • @shridharsankpal2023
    @shridharsankpal2023 Před rokem +2

    लई भारी व्हिडिओ आहेत तुमचे मस्त पैकी

  • @sushmasapkal8003
    @sushmasapkal8003 Před rokem +8

    एवढ्या बिकट परिस्थिती मध्ये सुद्धा तुम्ही आनंदी राहता खुप छान व्हिडिओ दादा आणि वैनी ❤😊

  • @anilvirkar3421
    @anilvirkar3421 Před rokem +4

    Jay malhar khush rha Dev tumchi sarv echa purn kro

  • @nitinkavankar3045
    @nitinkavankar3045 Před rokem +3

    छान व्हिडिओ

  • @bapuraomadane9941
    @bapuraomadane9941 Před rokem +5

    हाके पाव्हने लयी भारी.
    तुम्हाला भेटण्याची ईच्छा आहे
    योग कधी यतो ते पाहू.
    बी. मदने

  • @sangeetagurav1170
    @sangeetagurav1170 Před rokem +6

    खूप कौतुक तुमचे.. अशा परिस्थितीत हसतमुख आहात

  • @dhanuom7943
    @dhanuom7943 Před rokem +4

    सागरची खरंच लई कमाल आहे.काका तुम्ही एव्हढी मेहनत करतात.जीवन कसं जगायला पाहिजे खरंच तुमच्याकडून शिकलं पाहिजे.🥰🥰जय महाराष्ट्र 🥰🥰

  • @rakhikayasth
    @rakhikayasth Před rokem +3

    Maza mendhpal lokankde bghnyacha drushtikon badlun gela khrch khup ksht krtat tumhi 🙏🙏🙏🙏

  • @arunrathod3704
    @arunrathod3704 Před rokem +2

    दादा तुम्ही जेव्हा म्हणता कसे काय वाटतय मग हे ऐकून खूप भारी वाटतं... आणि नंतरचा तुम्हचा हसरा चेहरा पाहण्यासारखा असतो

  • @SRD_TipsXD
    @SRD_TipsXD Před rokem +8

    देव करो तुमचा सर्व इच्छा पूर्ण हो जय मल्हार

  • @kavitayadav2051
    @kavitayadav2051 Před 11 měsíci +1

    दादा तुमचं खूप कष्टमय जीवन आहे .तरीही हसतमुखाने सकारात्मक रीतीने तुम्ही सर्वजण राहतात हे कौतुकास्पद आहे .

  • @vishakhamane1178
    @vishakhamane1178 Před rokem +5

    दादा तूमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे कारण तूम्ही खूप कठीण परिस्थितीत दिवस करतात तरी समाधानी राहता बानाई तर नेहमी आनंदी असते तिला माझा सलाम

  • @DnyaneshwarBendkule-pd5ko
    @DnyaneshwarBendkule-pd5ko Před 11 měsíci +2

    खुप छान वाटत

  • @deepagirolla3234
    @deepagirolla3234 Před rokem +12

    बाळू मामाच्या नावे चांगभलं खूप कष्ट देवा सुखरूपपणे घरी पोचले काळजी घ्यावी

  • @sunandaalhat237
    @sunandaalhat237 Před rokem +5

    तुम्हाला बाळूमामा बळ देवो, आणि तुमच्या मागे असेच उभे राहावे .अशी इच्छा आहे

  • @jyotibirhade8287
    @jyotibirhade8287 Před rokem +6

    देव तुमच्या आयुष्यात खूप खूप खुशी देओ तुम्ही हमेशा निरोगी आणि आनंदी राओ

  • @user-ly6sc3qf4m
    @user-ly6sc3qf4m Před 2 měsíci +1

    माझे माहेर सातारा जिल्ह्यात खटाव तालुक्यात म्हसुर्णे नावाचे गाव आहे
    तिथे लहान पणी मी हे धनगरी जीवन प्रत्यक्ष पहिले आहे आमच्या शेजारी एक धनगर कुटुंब राहायचे त्याचा कडच्या शेळी चे दूध प्यायला खूप आवडायचे
    हे video पाहून खूप छान वाटते बाणाई ची भाषा आणि सुगरण पण सगळे खमंग वाटते
    मला एकदा तुम्हाला भेटायचं आहे 🙏🏻🙏🏻
    तुमचं गाव कुठलं ते सांगा 🙏🏻🙏🏻

  • @karandeshahaji007
    @karandeshahaji007 Před rokem +2

    महाराष्ट्र सरकारने १०,०००कोटी जाहीर केले आहेत त्यासंदर्भात... *मेंढपाळांच्या योजनेसंदर्भात अभ्यास दौरा...* #तेलंगाणा
    नेता नाही आमचं दैवतच...💛💯
    Gopichand Padalkar - गोपीचंद पडळकर

  • @sandhyashrikhande-bb5gy
    @sandhyashrikhande-bb5gy Před 2 měsíci +1

    ऐवढे कष्ट असतांना शिवाय तुम्ही हसत खेळत जिवण जगता खरच तुमच कौतुक करण्यासारख च आहे. पाणी पाऊस काही बघायच नाही काम करत राहायच.

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 Před rokem +3

    खूप खडतर प्रवास आहे दादा तुमचा येवढ्या पावसात कष्ट करून हासत खेळत व्हिडिओ बनवतात सागर बाळ खूप खुश आहे गडी

  • @sarikatharkude179
    @sarikatharkude179 Před rokem +2

    खरच दादा वहिनी तुम्ही खूप ग्रेट आहात सलाम तुमच्या कष्टाला ❤❤❤❤❤

  • @user-tx1ni6zp2s
    @user-tx1ni6zp2s Před rokem +2

    Khupch mst astat dada cheye viedo

  • @pavanrajkashid9118
    @pavanrajkashid9118 Před rokem +5

    जीवन कसे.जगावे.हे.तुमचयाकडून.शिकावे.ऊन.वारा.पाऊस..व.इतर.संकटाशी.लढा.देत.जीवन.जगने.

  • @ajitmahadik4236
    @ajitmahadik4236 Před rokem +2

    खूप कष्ट आहेत भावा सलाम आहे तूमाला

  • @swarasvoice9071
    @swarasvoice9071 Před rokem +2

    Khup chan video astat tumche,pan ek prashn aahe ,Dhangar he ase Mendhrana gheun ekach thikani ka nahi rahat,tyanchya gavich ka nahi rahat.

  • @lalitgksingh8489
    @lalitgksingh8489 Před rokem +1

    सिदु भाऊ मी व कुटूम्बिय तुमच्या गोड जोडीचे फॅन.आवर्जून पाहतो लाईक करतो व कधी-कधी अधून मधून कमेंट पण.एक विनंती तुम्ही फोन नंबर दाखवा.कुठून निघाला व कुठे पोहचला सांगत चला.आज जसे वडा पाव खाल्लेतसे आम्ही जमले तर तुम्हाला वाटेत भेटू.खडतर जिवन प्रवासात आमचा हातभार लागेल हो.बाकी तुमची इच्छा. ईश्वर आपणास नेहमी सुखी व आनंदी ठेवो🙏

  • @reshmabagwan8621
    @reshmabagwan8621 Před 11 měsíci +1

    तुमच्याकडे बघून आम्हाला हिंमत येते. सलाम तुम्हाला.

  • @manishayelve3504
    @manishayelve3504 Před rokem +6

    दादा तुम्हाला माझ्या मनापासून शुभेचछा, सुरक्षित राहा, सुखी रहा देवाकडे प्रार्थना 😊😊

  • @rajendramahajan6583
    @rajendramahajan6583 Před rokem +1

    Hard work

  • @rajmore3199
    @rajmore3199 Před 2 měsíci +1

    Bhau ani Tai khup Chan awaaz ahe tumcha ❤❤

  • @anitababar9877
    @anitababar9877 Před rokem +2

    Dada , vahini salam tumhala.
    Tumchya sarkhe video banvaila dairector la suddha jamnar nahi dada, vahini tumhi doghe khup great aahat. Swami aai always with you.

  • @sumankamble3244
    @sumankamble3244 Před rokem +2

    धन्य आहे तुमची येवढ्या पावसापान्यात पण चेहर्यावर टेन्शन नाही सगळं कसं शिस्तबद्ध

  • @ShailaNikam
    @ShailaNikam Před rokem +5

    याला म्हणतात कष्टाळू जीवन ❤🙏

  • @punamgore8197
    @punamgore8197 Před rokem +2

    Khup ch kastmay jivan ahe kal mala te jatane bhetale te Punyat mala

  • @dhanshrithorat6712
    @dhanshrithorat6712 Před rokem +1

    कष्टमय जीवन. सलाम तुम्हाला

  • @laxmikenjale2629
    @laxmikenjale2629 Před rokem +8

    मी एक video खुपदा बघते खूप छान वाटतात

    • @priyamithbavkar2381
      @priyamithbavkar2381 Před rokem +1

      श्री स्वामी समर्थ महाराज

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 Před rokem +1

    🙏🙏🙏🙏

  • @harshawarade5565
    @harshawarade5565 Před rokem +1

    खूपच कष्ट आहे तुमच्या जीवनामध्ये...रेन कोट घ्या आता ...🙏🙏

  • @tejulokhande1752
    @tejulokhande1752 Před rokem +9

    दादा एखादे शॉर्ट vedio पण करत जावा की असे पावसात तुम्ही दोघं छान वाटेल बघायला😊

  • @sunitanirmal3759
    @sunitanirmal3759 Před 2 měsíci

    दादा तुमचे वीडियो इतके सुंदर असतात की ते सगळया नाच आवडतात तुमच खडतर जिवन

  • @jyotivora9952
    @jyotivora9952 Před rokem +2

    Yahaa channel madhe ek praamanik panaa ahe.....khoop heva ahe...Sidu Dada ani Banaitaiche kutumb

  • @misalshrikant2172
    @misalshrikant2172 Před rokem +2

    खुपच आबदा होती या जीवनात पन तरीपण तुमच्या कड पाहुन खुप काही शिकवून जात जिवन 😢😢😢😢🎉🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊

  • @ashascookingnvlog6114
    @ashascookingnvlog6114 Před rokem +1

    खरंच खुप कष्ट करता तुम्ही तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात

  • @Mpbrother2023
    @Mpbrother2023 Před rokem +12

    मस्तपैकी वडापाव 😊

  • @smb6194
    @smb6194 Před rokem +6

    Avghad ahe khup dada tumche

  • @bhartimahajan3081
    @bhartimahajan3081 Před rokem +2

    दादांचे video real(खरे आहे) बाकी U-Tuber सारखे नाही ,

  • @suvarnakhandagale9145
    @suvarnakhandagale9145 Před rokem +6

    दादा वहिनी आता सगळीकडे पाऊस पडतो आहे लवकर लवकर घर जवळ करा 🙏🙏🙏

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Před rokem +13

    बाळूमामा की जय हो

  • @manoj5927
    @manoj5927 Před rokem

    दररोज सकाळी जेवण करीत असताना तुमचा विडियो बघतोच खूप मजा येते मस्त विडियो आहे जणू काही वाटते तुमच्या सोबतच सहवास आहे दररोज

  • @santoshghate6727
    @santoshghate6727 Před rokem +1

    ❤❤

  • @rb6733
    @rb6733 Před rokem +1

    हो खरच

  • @minalbhole9156
    @minalbhole9156 Před rokem +3

    Paussapanyat kase divas kadhata tumhi. Kamal aahe tumachi. Etake chalat rahata pan tumacha madhe khup urjja yete. Dusatya divashi parat navya umedine pravas suru khup chan ghenyasarakhe aahe tumacha video madhun 👌👌🙏

  • @ramgavali6886
    @ramgavali6886 Před rokem

    खूप छान आपल्या कडे बघून आजून लढण्यासाठी बळ येते

  • @sureshpawar2861
    @sureshpawar2861 Před rokem +3

    Salam tumhchya parivaars khup chhan video Jay malhar

  • @jaideepsahajrao2161
    @jaideepsahajrao2161 Před rokem +8

    दादा 🙏 हीच खरी जीवनाची परीक्षा 🎉🎉

  • @kaluramgargote2194
    @kaluramgargote2194 Před rokem +2

    👌👌👌

  • @kiranmore6184
    @kiranmore6184 Před rokem +6

    दादा तुम्ही लवकर तुमचें गावा कडे जा तुम्हाला पण तत्रास आणि मेंढ्या ना पण😢

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 Před 2 měsíci

    Khuapch Chan Sundar Aahe Video Banayi❤😂🎉❤