आरती गंगा मातेची 2023,स्वर - सारिका की. हिकरे, गीतकार - लेखराज लारोकर,नागपूर,9822639533..

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 03. 2023
  • आरती गंगा मातेची..
    स्वर - सारिका की. हीकरे.
    संकल्पना व गीतकार - लेखराज भा. लारोकर.
    कंपोज - दीलीपजी भोयर .
    संगीत - विकास बोरकर .
    व्हिडिओ एडिटिंग - लेखराज लारोकर...
    स्टुडिओ रेकॉर्डिंग - ऑडिओ सिटी ..
    *आरती*
    आरती गंगा बारुला बया ओवाळीतो तुला व माय..2..
    सौसाराच्या रक्षणाला न भक्त विणविती तुला व माय..
    आरती गंगा बारुला.................!! धृ!!
    पाटण गावी माता व माझी एका मुंड्यावर आली..2..
    दर्शनाची झाली घाई न भक्त करी लाई लाई व माय...
    आरती गंगा............................!!१!!
    रंग पंचमीच्या दिनी व बया गर्दी भक्तजन करी...2..
    दर्शनाला येऊनिया न भाव मनामंदी ठेवी व माय.....
    आरती गंगा.............................!!२!!
    महादेवाच्या जटेमधून बया माय गंगा का वाहते...3..
    दरी,डोंगर,खोऱ्यातूनी भक्तांना आशिष का देते व माय...
    आरती गंगा..............!!३!!
    साता दिव्याची आरयेती व बया माझ्या गंगाला पावते....2..
    फुलं, पानं, बेलपत्र न माझ्या गंगेला वाहते व माय.......
    आरती गंगा.........................!!४!!
    माता माय मंदिरात व बया आरती कापुराची घ्यावी....2..
    भक्तजन आरत्या गावी न जागा चरणापाशी द्यावी व माय.....
    आरती गंगा.................................!!५!!
    हर हर गंगे , हर हर महादेव................

Komentáře • 26