Share Markets Marathi मध्ये शिकवणाऱ्या जिगरबाज Youtuber Aajiची गोष्ट, @Market aani Me | BSE, NSE

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 12. 2020
  • कोणीही शेअर मार्केट शिकू शकतं असं अगदी रेटून म्हणणा-या या आजी आहेत ठाण्याच्या भाग्यश्री फाटक. शेअर मार्केटसारखा किचकट विषय अगदी सोप्या भाषेत मराठीत शिकवणा-या एकदम यंग युट्यूबर. आजी शेअर मार्केटची दुनिया कशी समजून घ्यावी, ट्रेडिंग कसं करावं, शेअर कसे विकत घ्यावेत, असं सगळं अगदी नीट शिकवतात. पण कुठला शेअर विकत घेऊ असं विचारणा-यांना मात्र त्या खडसावून सांगतात, मी अगदी माझ्या मुलालाही या प्रश्नाचं उत्तर देणार नाही.
    भाग्यश्री फाटक या खरंतर मुळच्या मिरजेच्या लग्नानंतर ठाण्यात आल्या. गाण्यात, तबल्यात विशारद पूर्ण केलं, एलएलबीचं शिक्षण पूर्ण केलं. पण मुलं झाली आणि पुढे सगळंच थांबलं. म्हणून मग मुलं मोठी झाल्यावर म्हणजे 20 वर्षापूर्वी त्यांनी पुन्हा एकदा स्वतःचं असं काहीतरी करायचं ठरवलं आणि शेअर मार्केटच्या अभ्यासाला सुरूवात झाली. नंतर शेअर मार्केटच्या अभ्यासाठी त्यांनी ब्रोकरच्या ऑफिसमध्ये जायला सुरुवात केली, तिथे त्यांची एन्ट्री झाली खरी पण शेअर मार्केटचं काम म्हणजे काय वरण भाताचा कुकर लावणं नाही, यासारखे टोमणे ऐकावे लागले. पण आजी थांबल्या नाहीत. कसा होता या आजींचा प्रवास? त्याबद्दलचा हा खास रिपोर्ट..
    #RPT0202
    ---------
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi CZcams channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak

Komentáře • 543

  • @jyotsnahupare2782
    @jyotsnahupare2782 Před 3 lety +24

    हो आजी मीही trading चालू केल्या पासून इतरांचे gossip करण्याची सवय मोडली आता कुणाकडे पहायला वेळच नसतो 👍आता आपलं जीवन जगण्याचा आनंद होत आहे 😊

  • @rtech1292
    @rtech1292 Před 3 lety +80

    आज्जी खरचं ग्रेट .अहो अजूनही मराठी माणूस शेअर मार्केटला सट्टा ,जुगार म्हणून नाक मुरडतात आणि तुम्ही आजी 20 वर्षापूर्वीच शेअर मार्केट मध्ये पतींच्या आयपीओ घेण्याच्या सवयीने का होईना मार्केट मध्ये जिद्दीने आला .सलाम कारण मीही मार्केटमध्ये ट्रेडिंग करतो.

  • @Isatru-u5z
    @Isatru-u5z Před 3 lety +64

    मी आज्जींची खूप मोठी फैन आहे...🙏

  • @manojjadhav8361
    @manojjadhav8361 Před 2 lety

    १०वी१२वी झालेल्या बॅगा घेऊन मुंबईला जाणारे मुलांनी एकाव

  • @manojjadhav8361
    @manojjadhav8361 Před 2 lety

    १०वी झालेल्या बॅगा घेऊन मुंबईला जाणारे मुलांनी एकाव

  • @supriyabapat139
    @supriyabapat139 Před 3 lety +26

    तुमचे व्हिडिओ बघीतले आणी त्यात इंटरेस्ट वाढला.आणी मराठीतून असल्यामुळे खुप बरं वाटलं. प्रेरणादायी

  • @chaitanyatambolkar5676
    @chaitanyatambolkar5676 Před 3 lety +18

    फाटक आजींनी मिरजेचे व मिरजकरांचे नाव जगात चमकवले. फाटक आजी तुम्हाला दीर्घायुष्य लाभो. हि परमेश्वराला प्रार्थना.

  • @madhurigodse8980

    आजी मला हि शेअर मार्केट शिकायचं आहे.. खूप आधी पासून माझी ईच्छा आहे..

  • @bkravinashik4587
    @bkravinashik4587 Před 3 lety +39

    छान आज्जी आहेत मी रोज ब्लाॅग वाचतो आणि यु टुब ला व्हिडिओ पण पाहतो त्यांचे

  • @vikaspatil123
    @vikaspatil123 Před 3 lety +17

    आजि तुमी आपल्या सांगली ज़िल्हा चे नाव रोशन केले तुमाला मानाचा मुजरा

  • @AmirShaikh-nu6ci
    @AmirShaikh-nu6ci Před 3 lety +107

    खरचं....गंमत नाही

  • @shivdaspatil8853
    @shivdaspatil8853 Před 3 lety +61

    मावशी आपली जिद्द मेहनत आणि चिकाटी याला माझा सलाम

  • @pushpalatajagtap9638
    @pushpalatajagtap9638 Před 3 lety +7

    नमस्कार मॅडम 🙏 आपणांस मनःपूर्वक शुभेच्छा! खूप आनंद वाटला हा व्हिडिओ पाहताना। 💐

  • @rohitSoni-bh3lo
    @rohitSoni-bh3lo Před 3 lety +11

    Great Aaji, salutes to you aaji,

  • @pankajkarajkar7393
    @pankajkarajkar7393 Před 3 lety +3

    शिकायची जिद्द आणि आजच्या technology चा सुरेख वापर ... great inspiration 👌

  • @vandanadeshmukh5121
    @vandanadeshmukh5121 Před 3 lety +3

    Khup chan knowledge. Malapan inspiration milate aajin kadun. Thanks aaji

  • @formomseverywhere7845
    @formomseverywhere7845 Před 3 lety +5

    You are awesome... एवढे सगळे करता घर् सांभाळून... Hat's off to you💐💐💐

  • @shilpabhaturkar5042
    @shilpabhaturkar5042 Před 3 lety +4

    Kharach khup kahi shiknyasarkhe ahe aaji n kadun great 👍👍🙏🙏

  • @chandrakantkhandagale1086

    नमस्कार मी श्रीमती विजया गृहिणी, शेयर्स म्हणजे जीवाची हृदया ची धडधड च कि पण भाग्यश्री म्याडम तुमच्या मुळे हे टोके साथ पणे ऐकू यातील. तुम्ही छान पद्धतीने विषय मांडला त्या बद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.

  • @Innocent_Buds
    @Innocent_Buds Před 3 lety +2

    Waaaaa kya baat hai phatak aaji 👌👌👍 aaj mazya aaji chi athavan zhali🙏