तानाजी मालुसरेंच्या आईवडिलांचा आणि शेलारमामांचा तुम्ही आजवर कधीही न ऐकलेला रोमांचकारी ईतिहास

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • दुर्गसेवक श्री. गौरव जाधव सर, संपर्क- ९६८९५९०५८९ _ 9689590589
    लेखक- मी दुर्ग बोलतोय
    प्रस्तावना..
    आमचे सहकारी गौरव संजय जाधव यांना गड फिरण्याचा छंद आहे. गेली अनेक वर्षे त्यांच्या भ्रमंतीने त्यांना जी दृष्टी लाभली त्याची परिणीती म्हणजे सदरचे पुस्तक. त्यांनी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदूस्थान या दुर्गसंवर्धन संस्थेतंर्गत कोल्हापूर विभागातून जिल्ह्यांतील गडांवर आपल्या मित्रांसोबत दुर्गसंवर्धन मोहिमा घेतल्या. यावेळी त्यांनी शिवकालिन व्यक्तींच्या समाधीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. सुरूवातीपासूनच त्यांना वाचनाचा छंद आहे. शिवचरित्रावर लिहिलेली अनेक पुस्तके त्यांनी वाचलीत. त्यातून त्यांनी लिखाण हाती घेतले. त्याची प्रचिती 'मी दुर्ग बोलतोय.... त्यांनी लिहिलेल्या ऐतिहासिक लेखातून काही लेख या पुस्तकामध्ये समाविष्ट केलेले आहेत. त्यांचे हे पहिलेच पुस्तक आहे.
    शिवरायांनी राज्याभिषेकानंतर पुन्हा जो तांत्रिक विधी करून घेतला त्या पाठीमागे महाराजांचा हेतू समाजात कोणत्याही प्रकारचे मतभेद असू नयेत. गागाभट्टांनी केलेला राज्याभिषेक शास्त्रशुध्द होता. तरी समाजातील तांत्रिक विधीवर विश्वास असलेल्या लोकांनी त्रुटी काढल्या. त्यातून समाजात अनिष्ट समज जावू नये म्हणून महाराजांनी निश्चलपुरीचा तांत्रिक विधीही करून घेतला. त्यांच्या मताला वा. सी. बेंद्रे यांच्या ग्रंथाचे पाठबळ मिळते. सदर पुस्तकातील दुसऱ्या एका लेखात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची शिवरायांच्या सामाजिक दृष्टीवर जी श्रध्दा होती तिचा प्रभाव बाबासाहेबांच्या श्रध्देवर व निष्ठेवर झाला. बाबासाहेब आंबेडकरांची शिवरायांवर जी श्रध्दा आणि निष्ठा होती हे लेखकाने दाखवून दिले आहे.
    शिवरायांचे चरित्रच अद्भूत आणि असंख्य घटनांनी ठासून भरलेले आहे. ते सर्वांगीण समृध्द आणि वैभवशाली आहे. त्यातील भव्यता, विलोभनियता अभ्यासकाला आकर्षित करते. त्यातून शिवरायांच्या असंख्य गुणांचे दर्शन घडते. शिवरायांनी जनतेसाठी घेतलेले कष्ट, त्यातून अखंड समाजाची वाढलेली उंची विश्ववंदनीय होय.
    'मी दुर्ग बोलतोय' हा त्यांचा लेख सध्याच्या स्थितीतील गडकोट यांच्यावर विदारक दृष्टीक्षेप टाकणारा
    आहे. सरकार आणि लोकांकडून शिवरायांच्या गडाकडे दुर्लक्ष झाले अन् त्यातून गडांची ही अवस्था झाली
    त्यांनी ती आपल्या खास शैलीतून साहित्यिक भाषेत मांडली आहे. त्यातूनच वाचकांच्या नजरेसमोर न पाहिलेला
    मुडागड उभा राहतो. हे लेखकाच्या लेखन शैलीचे सामर्थ्य.
    या पुस्तकात शिवकाळातील काही व्यक्तीचित्रे लेखकाने आपल्या प्रभावी लेखणीतून उभी केलेली आहे. मग ते देवमहाला असो, जिवामहाला असो, सुभेदार तानाजी मालुसरे वा बाजीप्रभू देशपांडे असोत. शिवकाळातील या भारदस्त व्यक्तीरेखा इतिहासाशी तिळमात्रही प्रतारणा न करता रेखाटलेल्या आहेत. एका लेखात संभाजीराजांची व्यथा आणि त्यांची सुख-दुःखे मांडली आहेत. शिवा काशिद या सामान्य सैनिकाची शिवरायांवरील अलोट श्रध्दा अन् निष्ठा वाचकांना भावते. स्वराजासाठी मरण हे कर्तव्य तर धर्म एवढेच नव्हे तर तो परमधर्म तेच भाग्य नव्हे तर सद्भाग्य मानणाऱ्या शिवा काशिदांची कथा हृदयाला भिडते.
    गडभ्रमंती करणाऱ्या लोकांचे कौतूकही केले आहे. तसेच अनिष्ठ पध्दतीने आचरण करणाऱ्यांवर आसूडही उगारला आहे. सध्या काही विशिष्ट छंदीष्ट लोक गडांचा उपयोग अयोग्यरित्या करतात. हे पाहून लेखक व्यथित झाला आहे. शिवरायांच्या किल्ल्याची व्यथा 'मी दुर्ग' या लेखात कळत नकळत मांडलेली आहे.
    त्यांच्या लेखनातून वाचकांना इतिहास समजावा, त्यांच्या लिखाणाने दुर्गप्रेम, गडकोटावरील भक्ती आणि शिवरायांवरील प्रेम अन् निष्ठा वृध्दींगत होण्यास त्यांचे लिखाण उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा करण्यात काही गैर नाही. त्यांनी घेतलेल्या या कार्यात महाराष्ट्र शारदा त्यांना अपरंपार बुध्दी आणि सामर्थ्य तसेच आरोग्य प्रदान करो अशी आम्ही श्रींच्याचरणी प्रार्थना करतो.
    ।। जय शिवराय.... जय महाराष्ट्र ....//
    - रमेश शांतीनाथ भिवरे,
    तारदाळ,
    Join this channel to support me:
    / @drvijaykolpesmarathic...
    #vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi

Komentáře • 13

  • @dineshpawar9249
    @dineshpawar9249 Před měsícem +1

    खुप छान रंगवुन सागता डाँ.साहेब..जय भवानी जय शिवाजी.......रामराम

  • @BabluBhaiya-dc3yi
    @BabluBhaiya-dc3yi Před 5 měsíci +2

    🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय आम्ही आपल्या पुस्तकाची आतुरतेने वाट पाहत आहोत.🚩🚩

  • @Yalkot_yalkot_jai_malhar
    @Yalkot_yalkot_jai_malhar Před 5 měsíci +3

    तानाजी मालुसरे ह्यांना मानाचा मुजरा🚩🚩

  • @vinayaksalunke9324
    @vinayaksalunke9324 Před 5 měsíci +1

    खुप छान सर

  • @rahulsali4912
    @rahulsali4912 Před 5 měsíci +1

    सुंदर माहिती

  • @drsachinsuryavanshi395
    @drsachinsuryavanshi395 Před 5 měsíci +2

    अप्रतिम , शेलारामा चा त्याग 🙏

  • @shivansh0208
    @shivansh0208 Před 5 měsíci +1

    Mast video

  • @rohanshelar7304
    @rohanshelar7304 Před 4 měsíci +2

    सर सगल बरोबर आहे पण, शेलार मामा यांचे नाव, सरनौबत, कोंडाजी रायाजी शेलार (शेलार मामा) असे आहे,

  • @vinayaksalunke9324
    @vinayaksalunke9324 Před 5 měsíci +3

    सर मुघलांनी हिंदुशी केलेल्या सोयरिकी या वर आपला आपला एक व्हिडिओ आहे कृपया तो पाठवता का त्याची लिंक पाठवा मी खूप शोधला पण मिळाला नाही