नाट्यगीत - शतजन्म शोधितांना । Natyageet-Shatjanma Shodhitana ।पं. तुळशीदास बोरकर।Pt. Tulsidas Borkar

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • पं. तुळशीदास बोरकर गुरुजी यांची आज द्वितीय पुण्यतिथी..
    गुरुजींच्या स्मृतींना सादर वंदन, व त्यानिमित्त त्यांनीच वाजवलेल्या "शतजन्म शोधितांना" या नाट्यगीताचा हा व्हिडीओ सादर करीत आहोत..
    नाट्यगीत म्हंटलं की त्यात शब्द, स्वर, ताल या पलकिडे त्या नाटकाच्या अनुषंगाने असणारा आवेग, लय, त्या आवेगातील शब्दफेक आणि या सगळयाचं अभ्यासपूर्ण वादन म्हणजे गुरुवर्य बोरकर गुरुजींचं वादन..
    ज्या वादनात फक्त स्वर आणि ताल या पलीकडे शब्द आणि भावनांना सुद्धा न्याय मिळतो, नुसताच न्याय मिळत नाही तर ते बहरुन येतात आणि त्यातील गर्भितार्थ, भाव लोकांपर्यंत पोहोचतो, ते गुरुजींचं वादन..
    गुरुजींनी त्यांच्या जीवनात अनेक दिगग्ज कलाकारांना गुरू स्थानी मानलं, व त्यांच्या वादनावर त्याचा प्रभावही दिसून येतो, त्यातील एक नाव म्हणजे मास्टर दीनानाथ मंगेशकर, ज्यांनी हे नाट्यगीत लोकांपर्यंत पोहोचवलं!
    ऐकूया, शतजन्म शोधितांना..
    शतजन्म शोधितांना । शत आर्ति व्यर्थ झाल्या ।
    शत सूर्य मालिकांच्या । दीपावली विझाल्या ।
    तेव्हा पडे प्रियासी । क्षण एक आज गाठी ।
    सुख साधना युगांची । सिद्धीस अंति गाठी ।
    हा हाय जो न जाई । मिठी घालू मी उठोनी ।
    क्षण तो क्षणात गेला । सखी हातचा सुटोनी ।
    नाटक - संन्यस्त खड्ग
    गीत - स्वतंत्र्यवीर सावरकर
    संगीत - रामकृष्णबुवा वझे
    संवादिनी - पं. तुळशीदास बोरकर
    तबला सांगत - श्री. प्रसाद पाध्ये।

Komentáře • 89