कडाकणी/ नवरात्री स्पेशल रेसिपी/kadakni karnyachi agdi sopi padhat

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • कडाकणी/ नवरात्री स्पेशल रेसिपी/kadakni karnyachi agdi sopi padhat कुरकुरीत अशी कडाकणी......
    कडाकणी करण्यासाठी लागणारे साहित्य :-
    दोन वाटी मैदा
    अर्धा वाटी रवा
    चवीपुरतं मीठ
    दोन चमचे तेल
    पाऊण वाटी पिठीसाखर
    पाऊण वाटी दूध.
    कडाकणी करण्याची पद्धत
    दोन वाटी मैदा घ्यायचा त्यामध्ये अर्धी वाटी रवा टाकायचा चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं दोन चमचे तेल गरम करून त्यामध्ये ओतायचं हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं नंतर त्यामध्ये पाऊण वाटी दूध व पाऊण वाटी पिठीसाखर टाकू नंतर छान पैकी हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं पीठ छान मळून घ्यायचं नंतर त्यावरती कॉटन चा रुमाल ठेवायचा एक तास हे मिश्रण भिजून द्यावा मग कडाकणी करण्यास सुरुवात करावी.
    कढईमध्ये छान गरम तेल करून घ्यावं मंद आचेवरती कडाकणी तळून घ्यावीत अशी छान पद्धतीने आपली कडाकणी तयार झालेली आहेत ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करायला विसरु नका धन्यवाद.
    #viral #food #maharashtrian #gavranrecipe #kadakni
    #कडाकणी रेसिपी #recipe #kadakani kashi karaychi

Komentáře • 2