भोकाच्या वड्यांसाठी असे पीठ ठेवाल तर असे कोंबडी वडे तयार होतील | Bhokache Vade (Konkan)

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 07. 2020
  • भोकाच्या वड्यांसाठी असे पीठ ठेवाल तर असे कोंबडी वडे तयार होतील | Bhokache Vade (Konkan) मित्रांनो भोकाचे वडे म्हणजेच कोंबडी वडे कोकणात खूप प्रसिद्ध आहेत. सणासुदीला खास कोकणात प्रत्येकाच्या घरी कोंबडी वडे बनत असतात. भोकाचे वडे आपण हॉटेलमध्ये खातो खरे परंतु बऱ्याच जणांना अजून हे भोकाचे वडे त्याचं पीठ कसं ठेवतात हे जाणून घ्यायचं होतं म्हणून तुम्हाला या व्हिडिओमध्ये भोकाचे वड्यांचे पीठ कसे ठेवतात आणि कोंबडी वडे कसे तयार केले जातात हे दाखवले आहे. कोकणात सागोतीसोबत मटण चिकन सोबत खास हे भोकाचे वडे खाल्ले जातात. मी तर लहानपणासून आईच्या हातचे भोकाचे वडे खात आलो आहे. आईपासून दूर शहरात जरी असलो तरी आईच्या होतचे कोंबडी वडे जसे बनतात तसे आम्ही जरूर बनवतो. कोंबडी वडे तयार करण्यासाठी तांदळाचे पीठ, मैदा, रवा आणि कांद्याचा किस वापरला जातो. काही मंडळी डाळींचे भाजन करून पीठ ठेवत असतात परंतु अतिशय सोपी पद्धत आम्ही तुम्हाला हा व्हिडिओमध्ये सांगितली आहे. भोकाच्या वड्यांचे पीठ भिजवून रात्री 7 ते 8 तास मळून झाकून ठेवावे लागते. असे केल्याने कोंबडी वडे खूप छान मऊ, लुसलुशीत नरम तयार होतात. #BhokacheVadeRecipe #KombadiVadeRecipe #FoodInKonkan #sforsatish
    कोकणातील खाद्य संस्कृतीमध्ये कोंबडी वड्याला मोठा मान आहे. हे कोंबडी वडे ज्याला कोकणात भोकाचे वडे असे सुद्धा बोलतात ते जगप्रसिद्ध आहेत. कोकणातील एका टिपिकल गावात प्रत्येकाच्या घरी बनणारे कोंबडी वडे खाण्याचे सुख मिळणे म्हणजे मोठे भाग्य समजावे लागेल. कोकणी माणसाच्या जेवणात सणासुदीला खास भोकाचे वडे असतात. हे भोकाचे वडे कसे तयार करतात, भोकाच्या वड्यांसाठी पीठ कसे ठेवावे, कोंबडी वडे पीठ कसे ठेवतात हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ तुम्ही पूर्ण पहा. विडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
    Follow me on Facebook and Instagram
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar

Komentáře • 146