संत तुकाराम महाराज बीज - नित्यपाठाचे बारा अभंग - विठ्ठलाचे अभंग - Sant Tukaram Maharaj- 12 Abhanga's

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 03. 2023
  • Title - Sant Tukaram Maharaj - 12 Abhanga's
    Singer - Mahesh Hiremath
    Copyrights - Bhakti Vision Entertainment
    00:01 - जन्माचे तें मूळ पाहिलें शोधून । दु:खासी कारण जन्म घ्यावा॥१॥
    पापपुण्य करूनी जन्मा येतो प्राणी । नरदेही येऊनी हानी केली ॥ २ ॥
    रजतमसत्व आहे ज्याचे अंगी । याच गुणॆं जगी वाया गेला ॥ ३॥
    तम म्हणिजे काय नर्कचि केवळ । रज तो सबळ मायाजाळ ॥ ४॥
    तुका म्हणे येथें सत्याचे सामर्थ्य । करावा परमार्थ अहर्निशी ॥ ५॥
    04:01 - अहर्निशी सदा परमार्थ करावा} पाय न ठेवावा आडमार्गी ॥ १॥
    आडमार्गी कोणी जन जे जातील । त्यांतून काढील तोचि ज्ञानी ॥ २॥
    तोचि ज्ञानी खरा दुजीयासी । वेळोवेळां त्यासी शरण जावे ॥ ३ ॥
    आपण तरेल नव्हें ते नवल । कुळॆं उद्धरील सर्वांची ती ॥ ४ ॥
    शरण गेलियानें काय होतें फळ । तुका म्हणें कुळ उद्धरिले ॥ ५ ॥
    08:07 - उद्धरीले कूळ आपण तरला । पूर्ण तोचि झाला त्र्यैलोक्यात ॥ १॥
    त्र्यैलोक्यात झाले द्वैतची निमाले । ऐसे साधियेले साधन बरवें ॥ २॥
    बरवें साधन सुखशांति मना । क्रोध नाही जना तीळभरी ॥ ३॥
    तीळभरी नाही चित्तासी तो मळ । तुका म्हणे जळ गंगेचे ते ॥ ४ ॥
    11:04 - जैसी गंगा वाहे तैसे त्याचे मन । भगवंत जाण त्याचेजवळी ॥ १ ॥
    त्याचे जवळी देव भक्तीभावे उभा । स्वानंदाचा गाभा तया दिसे ॥ २॥
    तया दिसे रूप अंगुष्ठ प्रमाण । अनुभवी खूण जाणती हे ॥ ३॥
    जाणती जे खूण स्वात्मअनुभवी । तुका म्हणे पदवी ज्याची त्याला ॥ ४ ॥
    14:32 - ज्‍याची त्‍याला पदवी इतरां न साजे । संताला उमजे आत्‍मसूख ॥१॥
    आत्‍मसूख घ्‍यारे उघडा ज्ञानदृष्‍टी । याविण चावटी करु नका ॥२॥
    करु नका काही संतसंग धरा । पूर्विचा जो दोहरा उगवेल ॥३॥
    उगवेल प्रारब्‍ध संतसंगे करुनी । प्रत्‍यक्ष पुराणी वर्णियेले ॥४॥
    वर्णियेले एका गुणनामघोषं । जातील रे दोष तुका म्हणे ॥ ५॥
    17:54 - दोष हे जातील अनंत जन्‍मीचे । पाय त्‍या देवाचे न सोडावे ॥१॥
    न सोडावे पाय निश्‍चय तो करा । आळवा शारंगधरा भावबळे ॥२॥
    धरुनि केशव आणा भावबळे । पापियां न कळे काहि केल्‍या ॥३॥
    न कळे तो देव संत संगावाचुणी । वासना जाळोनि शुध्‍द करा ॥४॥
    शुध्‍द करा मन देहातित व्‍हावे । वस्‍तुती ओळखावें तुका म्‍हणे ॥५॥
    21:30 - ओळखारे वस्‍तु सांडारे कल्‍पना । नका आडराना जावूं झणी ॥१॥
    झणी जाल कोठे बुडवाल हीत । विचारी मनांत आपुलिया ॥२॥
    आपुलिया जीवे शिवासी पहावे । आत्‍मसुख घ्‍यावे वेळोवेळा ॥३॥
    घ्‍यावे आत्‍मसुख स्‍वरुपी मिळावे । भूती लीन व्‍हावे तुका म्‍हणे ॥४॥
    24:29 - भूती जीन व्‍हावे सांगावे न लगेचि । आता अहंकाराची शांती करा ॥१॥
    शांती करा तुम्‍ही ममता नसावी । अंतरी वसावी भूतदया ॥२॥
    भूतदया ठेवा मग काय उणे । प्रथम साधन हेचि असे ॥३॥
    असो हे साधन ज्‍यांचे चित्‍ती वसे । मायाजाळ नासे तुका म्‍हणे ॥४॥
    28:10 - मायाजाळ नासे या नामें करुनि । प्रिती चक्रपाणि असो द्यावी ॥१॥
    असो द्यावी प्रिती साधूचे पायंशी । कदा किर्तनासी सोडू नये ॥२॥
    सोडू नये पुराणश्रवण किर्तन । मनन निदिध्‍यास साक्षात्‍कार ॥३॥
    साक्षात्‍कार झालिया सहज समाधि । तुका म्‍हणे उपाधी गेली त्‍याची ॥४॥
    31:26 - गेली त्‍याची जाण ब्रह्म तोचि झाला । अंतरी निवाला पूर्णपणे ॥१॥
    पूर्णपेणे झाला राहतो कैशा रीती । त्‍याचि स्थिती सांगतो मी ॥२॥
    सांगतो मी तुम्‍हा ऐका मनोगत । राहतो मूर्खवत जगामाजी ॥३॥
    जगात पिशाश्‍च अंतरी शहाणा । सदाब्रह्मी जाणा निमग्‍न तो ॥४॥
    निमग्‍न तो सदा जैसा मकरंद । अंतर्बाहय भेद वेगळाले ॥५॥
    वेगळाले भेद किर्ती त्‍या असती । ह्र्यदगत त्‍याची गति न कळे कवणाला ॥६॥
    35:52 - दुकजियाला भ्रांति भाविकाला शांति । साधुची ती वृत्‍ती लिन झाली ॥१॥
    लीन झाली वृत्‍ती ब्रह्माते मिळाले । जळांत आटले लवण जैसे ॥२॥
    लवण जैसे पुन्‍हा जळाचे बाहेरी । येत नाही खरे त्‍यातुनिया ॥३॥
    त्‍या सारिखे तुम्‍ही जाणा साधुवृत्‍ती । पुन्‍हा न मिळती मायाजाळी ॥४॥
    मायाजाळ त्‍यांना पुन्‍हा रे बाधेना । सत्‍य सत्‍य जाणा तुका महणे ॥५॥
    39:22 - सत्य सत्य जाणा त्रिवाचा नेम हा । अनुभव पहा पदोपदी ॥१॥
    पदोपदी पहा श्रीमुख चांगलं । प्रत्यक्ष पाऊली विठोबाची ॥२॥
    विठोबाचे भेंटी हरेल बा चिंता । तुम्हालागी आता सांगितले ॥३॥
    सांगितले खरे विश्वाचिया हीता । अभंग वाचिता जे का नर ॥४॥
    ते नर पठणी जीवन्मुक्त झाले । पुन्हा नाही आले संसारासी ॥५॥
    42:48 - चार कोटी एक लक्षाचा शेवट । चौतीससहस्त्र स्पष्ट सांगितले ॥१॥
    सांगितले हे तुका कथुनियां गेला । बारा अभंगाला सोडू नका ॥२॥
    सोडूं नका तुम्हा सांगितलें वर्म । भवपाशकर्मे चुकतील ॥३॥
    चुकती यातायाती विठोबाची आण । करा हें पठण जीवेभावे ॥४॥
    जीवेभावें करितां होईल दर्शन । प्रत्यक्ष सगुण तुका म्हणे ॥५॥
    Must Watch Videos:
    ►10 Santanche Abhang - • १० संतांचे अभंग : अनंत...
    ►13 Mahadev Bhaktigeete - • टॉप 13 महादेवाची गाणी ...
    ►20 Swami Samarth Aarti • Swaminchi Nitya Seva A...
    ►10 Dattachi Gani - • Top 10 निघालो घेऊन दत्...
    ►10 Vitthal Bhaktigeete - • एकादशी स्पेशल : चंद्रभ...
    ►Kanakdhara Stotram: • Kanakdhara Stotram - 1...
    ►Mahamrityunjaya Mantra: • सम्पूर्ण महामृत्युंजय ...
    ►Sri Vishnu Sahasranama: • Vishnu Sahasranamam Fa...
    ►Shri Mahalaxmi Stotra: • Shri Mahalaxmi Stotra ...
    ►Shiva Sankalpa Suktam: • Shiva Sankalpa Suktam ...
    ►Hanuman Chalisa: • श्री हनुमान चालीसा | N...
    ►Ya Devi Sarva Bhuteshu: • Ya Devi Sarva Bhuteshu...
    ►Shree Mahalakshmi Suprabhatam: • Shree Mahalakshmi Supr...
    नमस्कार,
    भक्ती मराठी - या मराठी चॅनल वर आपले स्वागत आहे.
    या चॅनल वरती श्री गणेशाचे, श्री विठ्ठलाचे, स्वामी समर्थांचे, महादेवाचे, दत्तगुरूंचे, देवीचे, श्री हनुमान व इतर मराठी भक्तिगीते, स्तोत्र, अभंग, कीर्तन, आरती, मंत्र या चॅनेल वरती प्रकाशित होतील..
    भक्ती मराठी.. या चॅनेल ला नक्की subscribe करा🙏ही नम्र विनंती🙏
    LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBE
  • Hudba

Komentáře • 186

  • @mahadevkulye9789
    @mahadevkulye9789 Před rokem +93

    Ase abhang shodhun pn sapdat nahi Atishay Sundar abhang thank you available kelyabaddal 👌🙏

  • @AashrubaSolanke-mj7jf
    @AashrubaSolanke-mj7jf Před 2 měsíci +4

    आपल्या देशाला संतांची भूमी म्हणतात कारण संतांनी लोकांमध्ये जनजागृती केली आहे
    .🚩🚩🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌹🌹🌿🌿🌿🌿🙏🙏🙏🙏🙏संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव संत गोरोबा संत एकनाथ महाराज

  • @pundalikgsavant9419
    @pundalikgsavant9419 Před 11 měsíci +6

    इतकी शांती प्राप्त झाली आहे मला की हे मी शब्दामध्ये सांगू शकत नाही . धन्य झालो हे अभंग ऐकून .

  • @surendrasakore8805
    @surendrasakore8805 Před 11 měsíci +7

    खुप छान आवाज आहे महाराज तुमचा मन प्रसन्न झाले 🙏🏻🚩

  • @prakashkshirsagar5927
    @prakashkshirsagar5927 Před rokem +4

    फारच सुंदर
    बरेच अभंग आज प्रथम ऐकले
    आवाज ,ध्वनिमुद्रण , संगित अप्रतिम
    जय जय राम कृष्ण हरी

  • @rajusapkal5777
    @rajusapkal5777 Před 6 dny +2

    खूप छान अभंग आहेत मन प्रसन्न झाले
    राम कृष्ण हरी

  • @ashokwatekar2888
    @ashokwatekar2888 Před 5 měsíci +1

    राम कृष्ण हरी...पांडुरंग हरी...
    सुंदर अभंग...

  • @shivajimulik9347
    @shivajimulik9347 Před rokem +5

    जगावे कसे या अभंगातून गायिले आहे छान। 🎉राम कृष्णा हरी।

  • @parashrammagar5290
    @parashrammagar5290 Před 9 měsíci +5

    जय जय रामकृष्ण हरी...कलीयुगात संत हेच देव आहेत.. मात्र त्यांचे अभंगानुसारच आचरण, वर्तन असलेले संताचे चरणी नतमस्तक होऊ या.... रामकृष्ण हरी.... परशराम पांडूरंग मगर कोल्ही

  • @shriranggore3409
    @shriranggore3409 Před rokem +2

    🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌च अभंग तुकोबांचे ... जय जय जय तुकामाऊली कीं जय जय जय🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳👏👏👏👏👏👏👏👏👏

  • @madhuhadap7992
    @madhuhadap7992 Před 11 měsíci +2

    ❤🎉खूप बोध मिळतो.

  • @KailasPanchal-ph9cu
    @KailasPanchal-ph9cu Před 6 dny

    Khup dhyanwad abhag takle badl Ashe abhag aiklya ne sharirat urza niraman hote

  • @bhagwandhande4978
    @bhagwandhande4978 Před 5 dny

    जय हरी विठ्ठल.

  • @RP-bk1iy
    @RP-bk1iy Před rokem +10

    देवाचिये द्वारी उभा क्षणभरी
    तेणे मुक्ती चारी साधियेल्या
    जय जय राम कृष्ण हरी

  • @archanashelke719
    @archanashelke719 Před 2 měsíci

    निवडक अभंग खूप सुंदर तुकाराम महाराजांच्या अभंगाचा खजिना सापडल्यासारखेच झाले खूप आभार

  • @hemlatamayekar4699
    @hemlatamayekar4699 Před 10 dny

    खूप छान अभंग झाला होता आता धन्यवाद

  • @pallaviparandekar6001
    @pallaviparandekar6001 Před 22 dny

    सुंदर म्हंटले आहेत हे मोक्षाचे अभंग.

  • @MangeshLaxmanMammoth
    @MangeshLaxmanMammoth Před 15 dny

    ❤❤ नमस्कार ❤❤❤संत तुकाराम महाराज अभंग ऐकण्यालाने मन शांत मिळते आणि भक्ती श्रध्दा ❤❤❤❤❤ जय भारत

  • @sheshraofating4900
    @sheshraofating4900 Před měsícem

    Jay Hari Vital❤ जय हरि विट्ठल 🎉😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vandanabengal7396
    @vandanabengal7396 Před 23 dny

    Ram krushan Hari

  • @vijaypable2716
    @vijaypable2716 Před 11 měsíci +1

    खूप छान आहे आवाज❤❤❤❤

  • @dineshkhandakale333
    @dineshkhandakale333 Před rokem +2

    राम कृष्ण हरी

  • @aakashkale3435
    @aakashkale3435 Před 7 měsíci

    He bhagvanta panduranga
    Saglyanchi chinta harun ghe
    Ani saglyana sukhi thev🙏

  • @ruchiramore5442
    @ruchiramore5442 Před 28 dny +2

    खरा परमार्थ या अभंगात आहे .संसारात राहूनही परमार्थ कसा करता येतो हे श्रीमंत तुकाराम महाराज सांगत आहेत. शतशः प्रणाम

  • @RajaniNareshmokal
    @RajaniNareshmokal Před 2 měsíci

    खूप सुंदर अभंग आहेत. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @harshadbirari8854
    @harshadbirari8854 Před 3 měsíci

    Sundar ati sunar.Ramkrushnahari Mauli.

  • @padmajagandhe5432
    @padmajagandhe5432 Před 8 měsíci

    मस्त मस्त मस्त खूपच सुंदर सादर केला ,सकाळ ची सुरवात उत्तम झाली ,नेहमी स्तोत्रासारखे म्हणतो, आज चाळीत ऐकून छान वाटते ,सर्व चाली मस्त 👍👌🙏🙏

  • @user-fw9vc3mg5u
    @user-fw9vc3mg5u Před 7 měsíci +1

    ❤aatishay.sundhar.ramkrushana

  • @narharideshmukh7411
    @narharideshmukh7411 Před 5 měsíci

    सुंदर आवाज.खुप गोड अभंग

  • @vithalaghan6773
    @vithalaghan6773 Před 6 měsíci

    जय हरि‌ विठ्ठल... विठ्ठल जय जय विठ्ठल....

  • @narayanzori7224
    @narayanzori7224 Před 11 měsíci +1

    गायकांचा आवाज खूप गोड आहे.

  • @devendrajoshi2478
    @devendrajoshi2478 Před 10 měsíci

    Faarach sundar!👌

  • @ranjananath3157
    @ranjananath3157 Před rokem

    👏👏👏🌹🌹राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 👌🏻👌🏻👌🏻🙏🚩🚩💐

  • @angadkotule2586
    @angadkotule2586 Před 11 měsíci

    Dhanya tukoba samarth, jene kela ha purusharth.

  • @vitthalmandage7996
    @vitthalmandage7996 Před 3 měsíci

    😊😊😊😊😊 Ram कृष्ण........

  • @user-hd4wf4re2t
    @user-hd4wf4re2t Před 6 měsíci +1

    जय हरी

  • @panduranggosavi5072
    @panduranggosavi5072 Před měsícem

    Very nice

  • @sanjaybhuvad3198
    @sanjaybhuvad3198 Před 4 měsíci

    माऊली माऊली माऊली
    जगद्गुरू तुकाराम महाराज
    सर्व संतान कि जय

  • @dkgurav7914
    @dkgurav7914 Před 9 měsíci

    मनाला.शांतीमिळते.जय.जयहरिविठल

  • @user-tp4cl8ob3q
    @user-tp4cl8ob3q Před 5 měsíci

    Very good songs singing by you there are about 4500 abhang written by tukaram maharaj likely very meaningful thanks very very

  • @vikasjagdale9291
    @vikasjagdale9291 Před rokem +1

    Ram Krushna Hari.

  • @user-cd1zg3vy6n
    @user-cd1zg3vy6n Před 7 měsíci

    🌺🚩🙏राम कृष्ण हरी खूपछान अभंग गायिले दादा गोड गोड 🌺🚩🙏

  • @panduranggosavi5072
    @panduranggosavi5072 Před 15 dny

    Very nice 👍👍👍👍👍

  • @krishnatambekar6989
    @krishnatambekar6989 Před rokem

    जय हरी.. अमरावती जिल्ह माहुली ज.

  • @user-uf4oy1uy8y
    @user-uf4oy1uy8y Před rokem +1

    रामकृष्ण हरी

  • @shankarrajapkar3064
    @shankarrajapkar3064 Před rokem +2

    जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल .पंढरीनाथ महाराज की
    जय.सद्गुरु तुकाराम महाराजकी जय .

  • @SarikaPawar-nx7lu
    @SarikaPawar-nx7lu Před rokem +3

    तुमच्या आवाजात च तुकाराम महाराजांचा सहवास लाभला

  • @ruchiramore5442
    @ruchiramore5442 Před 28 dny

    धन्यवाद सुंदर आवाज

  • @user-po5yj6do9q
    @user-po5yj6do9q Před měsícem

    धन्य झालो माऊली अभंग ऐकून

  • @rekhabade3051
    @rekhabade3051 Před 3 měsíci

    जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @JyotiVeer-rb3vo
    @JyotiVeer-rb3vo Před měsícem

    राम कृष्ण हरी माऊली

  • @sunilsolat3000
    @sunilsolat3000 Před rokem +4

    जीवनाचे सार्थक अभंग मंगल आहे! ओम् आनंद ओम् शांती... खूप सुंदर रचना गायन🙏🕉️🌷🎹👌

  • @user-vj7xv8bm1l
    @user-vj7xv8bm1l Před 3 měsíci

    राम कृष्ण हरी जय हरि मावली

  • @sonalkesarkar6380
    @sonalkesarkar6380 Před 10 měsíci

    Ram कृष्ण हरी ❤

  • @dr.gajananzadey9160
    @dr.gajananzadey9160 Před 11 měsíci +1

    Very nice thanks

  • @user-rm5zm3bu6w
    @user-rm5zm3bu6w Před 8 měsíci

    अतिशय सुंदर

  • @bhimraopatil7095
    @bhimraopatil7095 Před 9 měsíci

    जय जय राम कृष्ण हरी.

  • @gajananchavan7432
    @gajananchavan7432 Před rokem +1

    तुकाराम महाराजांनी सांगतात जीवनात आनंद कसात आहे तर या अभंगावर अतिशय छान चिंतन केले आहे बांधवडी आहे हा संसार।। सुखाचा विचार नाही कोठे।। पांडुरंग हरी माऊली

  • @yogeshghadigaonkar9511
    @yogeshghadigaonkar9511 Před 5 měsíci

    खूप छान

  • @user-hd4wf4re2t
    @user-hd4wf4re2t Před 3 měsíci

    Jay Jay Ram Krishna Hari

  • @suhasinipatil3505
    @suhasinipatil3505 Před 4 měsíci

    SUNDAR.RAMKRUSHNAHARI.

  • @GopiMachhare-fo8tu
    @GopiMachhare-fo8tu Před 11 měsíci

    Jai Jai Ram krushn Hari

  • @sanjaymane1191
    @sanjaymane1191 Před 2 měsíci

    जय हरी 🙏🙏

  • @shindekrushna3684
    @shindekrushna3684 Před 6 měsíci

    गोड अभंग 🙏 राम कृष्ण हरी

  • @vitthalambhore5317
    @vitthalambhore5317 Před rokem +3

    🙏🙏♥️♥️

  • @kamlakargavali5055
    @kamlakargavali5055 Před 4 měsíci

    खूपच सुमधुर अभंग.

  • @user-nd9ih8jo9x
    @user-nd9ih8jo9x Před 2 měsíci

    सूपर

  • @vishnuippar7792
    @vishnuippar7792 Před rokem

    🎉jai हरी

  • @mahesht0097
    @mahesht0097 Před rokem +3

    जय जय राम कृष्ण हरी...🙏

  • @user-fb9yw9yi9y
    @user-fb9yw9yi9y Před 8 měsíci

    🙏🙏🙏🚩 ॐ महादेव गोविंद जय 🚩🙏🙏🙏

  • @Avinashadhav99
    @Avinashadhav99 Před rokem

    Ram Krishna Hari

  • @ravindramenge3955
    @ravindramenge3955 Před rokem

    Ram krishna hari

  • @uttamtambe9479
    @uttamtambe9479 Před rokem

    🙏रामकृष्ण हरी

  • @dnyaneshwarbiradar8494
    @dnyaneshwarbiradar8494 Před měsícem +1

    😊😊श😊

  • @user-zt5ju4gd3i
    @user-zt5ju4gd3i Před 7 měsíci

    Best on the earth

  • @srikisanpatil8753
    @srikisanpatil8753 Před rokem +2

    होणार000

  • @sonalkesarkar6380
    @sonalkesarkar6380 Před 10 měsíci +4

    खूप छान अभंग❤राम कृष्ण हरी

  • @panduranggosavi5072
    @panduranggosavi5072 Před měsícem

    Very nice 👍👍👍👍

  • @Dilipubale9449
    @Dilipubale9449 Před rokem

    राम कृष्ण हरी विठ्ठला तुझ्या नामात खोडवा

  • @sureshdevagirikar8683
    @sureshdevagirikar8683 Před rokem +1

    Suresh k Devagirikar gadag❤

  • @madhavigaikwad2973
    @madhavigaikwad2973 Před rokem +2

    🌹राम कृष्ण हरी 🌹🙏🙏
    🌹 संत तुकाराम महाराज बीज आहे.ना आज 🌹🌺🙏🙏

  • @ishwarbirari
    @ishwarbirari Před rokem

    Satsaheb

  • @user-qk1hw4ge8x
    @user-qk1hw4ge8x Před rokem +1

  • @krishnadesai2252
    @krishnadesai2252 Před rokem +1

    संत तुकाराम महाराजांच्या चरणी महाराष्ट्र लीन आहे.

  • @Sanatani_power476
    @Sanatani_power476 Před rokem +6

    फार सुंदर जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल रखुमाई

  • @Marathi_Bana_status
    @Marathi_Bana_status Před rokem +2

    जीवनाचे सार सांगणारी अभंग वाणी

  • @laxmanmahadik4224
    @laxmanmahadik4224 Před rokem +3

    राम कृष्ण हरी 🙏🚩

  • @dr.gajananzadey9160
    @dr.gajananzadey9160 Před rokem +2

    Very nice bhaki songs with nice voice.

  • @ushaarjugade2994
    @ushaarjugade2994 Před rokem +2

    खूपच सुंदर अभंग राम कृष्ण हरी जय विठ्ठल रखुमाई ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌼🌼🌻❤️❤️👌👌👌👍

  • @sanjaykadam-on6wx
    @sanjaykadam-on6wx Před rokem +2

    Khup chan

  • @nelsondalimbe369
    @nelsondalimbe369 Před rokem

    Apratim Abhang Rachana Jay Shri Sant Tukobaray ❤

  • @sureshpatekar9150
    @sureshpatekar9150 Před rokem

    Suresh Patekar ✨

  • @savitachavhan6575
    @savitachavhan6575 Před 11 měsíci +1

    🙏🙏 jay tukammauli

  • @rajantawde4511
    @rajantawde4511 Před rokem +1

    Jai Ram Krishna Hari 🙏🙏🙏🙏🙏

  • @jackbhaiya7727
    @jackbhaiya7727 Před 10 měsíci

    Yo what sap bro

  • @sangeetashirsat9685
    @sangeetashirsat9685 Před 3 měsíci

    🙏🙏🌹🌹🌹

  • @sureshbodke3569
    @sureshbodke3569 Před rokem +2

    🙏 जय जय राम कृष्ण हरि 🙏 अप्रतीम गीते आहेत. आभारी आहोत.

  • @jayasutalekar9314
    @jayasutalekar9314 Před rokem +3

    विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल

  • @Jayshreelahare
    @Jayshreelahare Před měsícem

    अप्रतिम आहे आवाज & अभंग ऐकतच रहावे असं आहे खुप खुप धन्यवाद 🙏माऊली

  • @sopanrakate3203
    @sopanrakate3203 Před rokem +36

    जिवनाचं सार हे कशात आहे ते तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात सांगितले आहे.🌹जय हरी विठ्ठल 🌹