Kavitecha Paan | KaavyaShravya Series | Episode 04 | Kusumagraj | Part 01

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • कवितेचं पान । काव्यश्राव्य मालिका । भाग : ०४
    एक संग्रह आणि त्यातील निवडक कविता
    आजचा कवितासंग्रह : रसयात्रा
    कवी : कुसुमाग्रज
    सादरकर्त्या : मधुराणी गोखले - प्रभुलकर
    Concept | Voice Over : Madhurani Gokhale - Prabhulkar
    Graphic Design : Rujuta Kalyankar
    Editing : Deepak Kolekar
    Production : Miracles Academy of Arts & Media Pvt.Ltd.

Komentáře • 159

  • @nandkishorbodhai5015
    @nandkishorbodhai5015 Před 2 lety +5

    अतिशय प्रभावी व नाट्यमय पध्दतीने कवितांचे सादरीकरन किंवा गायन केल्यामुळे कवितांतील प्रतिमा व आशय अधिक चांगल्या प्रकारे समजते कविता ऐकण्याचा आनंद नक्कीच द्विगुणित होतो 💐👍

  • @ashwini1005
    @ashwini1005 Před 4 lety +25

    मधुराणी, तुझं किती कौतुक करू तितके थोडेच आहे. अतिशय स्तुत्य उपक्रम! तुझी कवितांची जान, सादरीकरण सगळे केवळ अप्रतिम. असेच उत्तमोत्तम कवितांचे कार्यक्रम करत रहा आणि आम्हाला आनंद घेऊ दे!!!

  • @nileshsamant81
    @nileshsamant81 Před 4 lety +9

    केवळ निशब्द .... फक्त आभार.... कविता तुमच्या आवाजाने जिवंत केल्याबद्दल

  • @arunpatil1307
    @arunpatil1307 Před 2 lety +2

    खूप स्तुत्य प्रयत्न. सर्वोत्तम कविता एकत्र करून तुम्ही आम्हाला ऐकवताय. खूप धन्यवाद.

  • @vrushalipimpale5887
    @vrushalipimpale5887 Před 2 lety +1

    Madhurani Tai khup khup dhanyawad ki tumhi itkya sundar kavita lokanparyant pohchavat aahat aani tehi itkya khadya aani spasht awajat

  • @madhavipatil5721
    @madhavipatil5721 Před 4 lety +4

    आज शब्द मुके..
    मन सुखद आनंदाने काव्य श्राव्याची अनुभूती घेत आहे....एक नाशिककर म्हणून फक्त मनापासून खूप धन्यवाद....

  • @dipeekarawal5982
    @dipeekarawal5982 Před 4 lety +3

    मधुराणी,खूप आणि मनापासून आभार. कौतुक करावे तितके कमीच.मी भारताबाहेर आहे,त्यामुळे स्मृती कविता दहा एक वेळा तरी एकली. वाह,सध्याच्या दिवसात मनाला उभारी आणल्याबद्दल तुला खूप खूप प्रेम......

  • @sadanandakarandikar6689
    @sadanandakarandikar6689 Před 4 lety +4

    एम .ए .असताना रसयात्रा अभ्यासली
    तेंव्हा पासून ती मनात जोपासली ॥
    आज पुन्हा ऐकून मन त्या काळात गेले .

  • @medhashas
    @medhashas Před rokem +1

    फारच सुंदर अभिवाचन, प्राण ओतले तुम्ही विवांच्या कवितांमधे

  • @surekhadharmadhikari2352
    @surekhadharmadhikari2352 Před 2 lety +1

    दिव्य आशेची वात .... अप्रतिम ... सुरेख सादरीकरण

  • @priyankahingane4694
    @priyankahingane4694 Před 4 lety +2

    कवी कुसुमाग्रज यांच्या बद्दल काय बोलावं,आमच्या मराठी माणसाचं भुषण आहेत ते, नमन त्यांना, काव्य वाचन नेहमी प्रमाणे च अप्रतिम पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत

  • @rekhadesai1417
    @rekhadesai1417 Před 2 lety

    कवी कुसुमाग्रजांना विनम्र अभिवादन🙏🙏 मधुराणी काव्यश्राव्य रसयात्रा छान उपक्रम…रसिकजनांना मेजवानीच….धन्यवाद.

  • @kalyanishindagi1902
    @kalyanishindagi1902 Před 4 lety +1

    खरंच पुनः पुन्हा ऐकाव्यात अशाच कविता आहेत, आणि प्रत्येक कविता किती लयबद्ध आणि गेय आहे, यातल्या काही कवितांवर शर्वरी जमेनिस यांचं सादरीकरण बघायला मिळालं तर खूप आवडेल

  • @shraddhaburle5224
    @shraddhaburle5224 Před 4 lety +2

    खूपच भावस्पर्शी अन तुमच्या आवाजातून अगदीच प्रत्येक कविता जिवंत चित्रण उभारून गेली,, खूप धन्यवाद मॅडम,,,,,

  • @rohinikulkarni7765
    @rohinikulkarni7765 Před 4 lety +2

    सुरेख आणि सुरेल , समंजस वाचन ....एक चांगला अनुभव 👍👍

  • @sandhyaubgade5422
    @sandhyaubgade5422 Před 4 lety +1

    खरच प्रत्येक कविता किती सुंदर सादरीकरण
    याला म्हणतात कविता वाचन
    मी तर वेडी झाले आहे कवितेच्या पानाने मी प्रत्येक एपिसोड आवर्जून ऐकते

  • @sayaliprabhune
    @sayaliprabhune Před 4 lety +2

    एक विनंती - ज्या कविता वाचल्या त्याची list खाली माहिती मध्ये देता आली तर चांगलं होईल! कुसुमाग्रजांच्या कवितांचा हा भाग खूपच सुंदर झाला आणि तुमचं वाचन अप्रतिम!

  • @vaibhavraybhog9829
    @vaibhavraybhog9829 Před rokem

    कोटी कोटी धन्यवाद मधुराणी जी 🙏

  • @VilasSali
    @VilasSali Před 3 lety +1

    अप्रतिम 👌
    कवि, त्यांच्या कविता
    आणि तुमच काव्य वाचन,
    सर्व काही अप्रतिम 👌

  • @babasahebsamudra
    @babasahebsamudra Před 2 lety +1

    खूपच सुंदर....🌷🌷

  • @radhikav2530
    @radhikav2530 Před 4 lety +1

    खूप छान उपक्रम आहे!👌👌
    पृथ्वीचे प्रेमगीत, विराटवड.. इ. खूप चांगल्या रीतीने सादर केलेत.👌

  • @jayubhat3183
    @jayubhat3183 Před 4 lety +1

    स्वप्नांची समाप्ती बेहतरीन...... खूप सुंदर

  • @vijayjog5743
    @vijayjog5743 Před 2 lety

    कवितांची निवड खूपच छान.

  • @dr.vivekbonde479
    @dr.vivekbonde479 Před 4 lety +1

    दैवी कविता...आणि समर्पक वाचन.... आजच्या काळात जिथे पुस्तकं मिळण्याची सोय नाही तिथे एक इतका सुंदर उपक्रम.... खूप खूप आभार.... कवितेच पान ऐकायचोच आणि आता काव्यश्राव्यही....घरकामात बायको मदत करता करता सुंदर सोबत😁😊🙏🙏

  • @vikaspowar7310
    @vikaspowar7310 Před 4 lety +4

    वा, एकदम अनपेक्षित असा सुखद धक्का. आता या क्षणी हा कार्यक्रम अपलोड झाला असेल असं वाटलंही नव्हतं.

  • @shailaparanjape6463
    @shailaparanjape6463 Před 4 lety +3

    थोर कविवर्यांचे शब्द, तुझ्या वाचनातून,तू आमच्या ह्रदयापर्यंत पोचवतेस.तुला खूप धन्यवाद आणि मन:पूर्वक शुभेच्छा !!!!

  • @sanjaysvlog3159
    @sanjaysvlog3159 Před 4 lety +3

    उत्तम कविता......
    उत्तम कविवर्य.....
    उत्तम आवाज......
    उत्तम वाचन......

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 Před 4 lety +1

    फार सुंदर! खूप दिवसांनी कुसुमाग्रज ऐकले. खरोखर खूपच काळाने. असे का व्हावे? जणूकाही आपण विसरलो होतो की काय अशा टोचणीने एक अपराधी भाव दाटून आला आहे. शिवाय आत्ता ऐकलेल्या कवितांनी तर विव्हळ केले आहेच. फार विचित्र मन:स्थिती झाली आहे.

  • @urmilapathak8535
    @urmilapathak8535 Před rokem

    फार फार छान.

  • @satishchaudhari7555
    @satishchaudhari7555 Před 3 lety +3

    Life lies in such wonderful poems & reading is Exllent !!!

  • @rashmidanait2938
    @rashmidanait2938 Před 4 lety +2

    खूप छान

  • @vinaykamble2188
    @vinaykamble2188 Před 3 lety +1

    जबरदस्त👌👌👌👌👌

  • @rajendraborkar3632
    @rajendraborkar3632 Před 4 lety +2

    खूप सुंदर!!!

  • @smitapande9544
    @smitapande9544 Před 3 lety +1

    अप्रतिम सादरीकरण माधुराणी... सुखद अनुभूती👌👌👍👍👍

  • @harshavardhanshinde7725
    @harshavardhanshinde7725 Před 4 lety +2

    Khup chan vachan ani prakatan. Stutya upkaram mam...asach chan episode karat raha ani amchyashi kavitechya madhyamatun savand sadhat raha😍😊

  • @unmeshmore6524
    @unmeshmore6524 Před 4 lety +1

    अप्रतिम काव्य.... तेव्हढेच अप्रतिम श्रवणीय.... धन्यवाद...

  • @fun_with_kaivalyakulkarni
    @fun_with_kaivalyakulkarni Před 2 měsíci

    जरी म्हणशील योगी व्हावे ही कविता

  • @danceforever5940
    @danceforever5940 Před 2 lety

    Kewal Apratim

  • @swaradaranade8713
    @swaradaranade8713 Před 4 lety +3

    मधुराणी,तुझे निवेदन 👌👌❤❤❤

  • @suniljoglekar9318
    @suniljoglekar9318 Před 4 lety +4

    Beyond words ! Splendid !! Speechless !!!

  • @anilkhadse3171
    @anilkhadse3171 Před 4 lety +1

    अप्रतिम.speachless.आणि सुखद धक्का

  • @meenalkuvalekar3568
    @meenalkuvalekar3568 Před 4 lety +1

    खूप छान. ऐकत रहावे असे वाटते. मधुराणी आवाज पण मस्त.

  • @shubhangibhalekar6048

    खूप सुंदर सादरीकरण

  • @factorama90
    @factorama90 Před 3 lety

    खूप छान मधुराणी मॅम कवी च्या कविता तुम्ही आमच्या मनात रुजवत आहे ,खूप सुंदर

  • @makarandagrey6882
    @makarandagrey6882 Před 4 lety +1

    Khupach sunder apratim

  • @AkashRaut-ot5jd
    @AkashRaut-ot5jd Před 6 měsíci

    Khupch Chan ma.am

  • @swaradaranade8713
    @swaradaranade8713 Před 4 lety +5

    ❤❤❤❤शब्द कमी पडत आहेत, केवळ अप्रतिम ❤❤❤❤

  • @nishaadbhushan8689
    @nishaadbhushan8689 Před 4 lety +3

    Thank you madhurani.. thank you so much...♥️

  • @madhurigharpure645
    @madhurigharpure645 Před 4 lety +1

    तुझ्या मुळे कविता ऐकायची गोडी लागली, इतकं सुंदर आणि मुलायम सादरीकरण करतेस तू.👌

  • @galaxycluster7189
    @galaxycluster7189 Před 2 lety

    Kharach tumhi khup chan Kavita ikavta ....khup khup avdle Tai 🙏

  • @poojaraut1436
    @poojaraut1436 Před 3 lety

    खुपचं छान

  • @swaradaranade8713
    @swaradaranade8713 Před 4 lety +2

    "आगगाडी , स्मृती, स्वप्नांची समाप्ती" कविता अप्रतिम👌👌👌

  • @vrushalikale7512
    @vrushalikale7512 Před 4 lety +1

    Apratim sadarikaran..Madhurani taai...tu punha ya madhyamatun aamhala bhetayala aalis yacha khup aanand hotoy..Thank u so much..and please keep it up!

  • @vikaspowar7310
    @vikaspowar7310 Před 4 lety

    कवितांची निवड खरंच कठीण आहे आणि या संग्रहाचा पुढचा भाग लवकरच ऐकायला मिळणार ही आनंदाची गोष्ट आहे.

  • @shrutikakaslikar7685
    @shrutikakaslikar7685 Před rokem

    कविवर्य कुसुमाग्रजांचे शब्द आणि तुमचे सादरीकरण🙏 केवळ अप्रतिम मधुराणी ताई👌

  • @manjushadixit8709
    @manjushadixit8709 Před 4 lety

    कुसुमाग्रांच्या अप्रतिम कविता आणि मधुराणी तुझ सुंदर वाचन.... मजा आली.पुढील भागाची वाट बघते आहे

  • @neetaparameswaran7420
    @neetaparameswaran7420 Před 4 lety +1

    अतिशय सुंदर! धन्यवाद! पृथ्वीच्या या प्रेमगीताला सुर्यानेही तितकेच सुंदर उत्तर दिलेले आहे.कवी अर्थातच कुसुमाग्रजांच्या तोलामोलाचे. बा.भ.बोरकर. जेव्हा बा.भ.बोरकरांवरचा भाग कराल तेव्हा नक्की ऐकवा.

  • @arundhateelaghate8644
    @arundhateelaghate8644 Před 4 lety

    तुमचं कवितेचं पान मी सुरूवातीपासून पाहात,ऐकत आलीये....खूपच सुंदर उपक्रम आहे हा....आणि आज कुसुमाग्रजांच्या कविता....ह्या सर्व कविता मी असंख्य वेळा वाचल्या आहेत. विशाखा कविता संग्रह माझा अत्यंत आवडता....त्याच कविता ऐकून आज पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला....धन्यवाद...

  • @rachanapaskanthi7332
    @rachanapaskanthi7332 Před 2 lety

    Thank you madhurani, amchya paryant evdya Sundar Kavita pohochvlya baddal.

  • @kavitawathare6048
    @kavitawathare6048 Před 4 lety +1

    मधुराणी तुमच्या नावातच मधू आहे त्यामुळे वाचन श्रवणीय खरोखर ़़़़सुंदर🌼🌷👏👏👏

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 Před 3 lety

    काव्य हे मराठी साहित्यातील अविभाज्य घटक.
    काव्य म्हणजे साहित्याच्या शरीरावरील सोनेरी नक्षत्राचा दागिना. काव्य सुंदरता, काव्य विशालता.
    काव्य म्हणजे प्रतिभेच्या पलीकडची प्रतिभासंपन्नता. 🌹
    काव्यश्राव्य: एक कवी, एक कविता संग्रह, आणि त्यातील निवडक कविता ही काव्य श्रवनाची मैफिल, मधुराणी गोखले-प्रभुलकर यांच्या एकदम स्त्युत उपक्रम आहे.
    हा काव्य श्रवनाचा अनुभव आम्हा काव्यप्रेमींसाठी अविस्मरणीय स्वर्गीय असाच आहे. 🌹
    आजचे कवी होते कविवर्य कुसुमाग्रज. कविवर्य कुसुमाग्रज म्हणजे प्रतिभेच्या पलीकडचे प्रतिभासंपन्न, आणि आजचा कविता संग्रह होता "रसयात्रा".
    कविवर्य कुसुमाग्रज यांच्या कविते बदल बोलायचे म्हणजे एक शब्द निःशब्द.
    रसयात्रा या कविता संग्राहमधील "पृथ्वीचे प्रेमगीत" म्हणजे कुसुमाग्रज यांच्या प्रतिभेच्या पलीकडील प्रतिभासंपन्नतेची साक्षच.
    पृथ्वीचे प्रेमगीत हे एक ऐतिहासिक काव्यच आहे. 🌹
    मधुराणी गोखले-प्रभुलकर यांचे एकदम भारदस्त काव्य वाचन. हा निःशब्द होण्याचा अविस्मरणीय स्वर्गीय महान अनुभव दिल्या बदल मधुराणी गोखले-प्रभुलकर यांचे मनःपूर्वक आभार. 🙏🙏🙏
    हा प्रतिभेच्या पलीकडील प्रतिभासंपन्नतेचा स्वर्गीय महा अनुभव अजून संपलेला नाही याचा महानंद आहे. 🌹

  • @user-kd1uy9wt4e
    @user-kd1uy9wt4e Před 4 lety

    धन्यवाद मधुराणी !कुसुमाग्रजांच्या कविता तर अप्रतिम आहेतच, पण तुझे सादरीकरण खूप सुंदर, भावनोत्कट आहे. स्वप्नाची समाप्ती ही माझी खूप लाडकी कविता, पृथ्वी चे प्रेमगीत, आगगाडी आणि जमीन पण माहिती होत्या. पण विराट वडाची कविता ऐकून अंगावर अक्षरशः शहारे आले. निशब्ध केलेस तू अगदी...

  • @seemadeshpande8099
    @seemadeshpande8099 Před 4 lety +1

    सुंदर वाचन

  • @vilaspalande933
    @vilaspalande933 Před 4 lety +1

    सुंदर

  • @ManTarang_C
    @ManTarang_C Před rokem

    खूप कौतुक 👌

  • @dilipkhairnar3839
    @dilipkhairnar3839 Před 4 lety +1

    I most and most like it .....
    I love you poem.....I love you...
    Now...I have now words...

  • @archanamuley5399
    @archanamuley5399 Před 4 lety

    प्रत्येक भाग ऐकते. अगदी आवडीने. आणि पुढील भागाची आतुरतेने वाटही बघते.

  • @rekhasonawane7105
    @rekhasonawane7105 Před 4 lety

    मधुराणी , कुसुमाग्रज कविता जिवंत केल्यास आनंद देणारी काव्य श्राव्य

  • @nehajoshi2496
    @nehajoshi2496 Před 4 lety

    कुसुमाग्रज 🙏 काय बोलू यांच्याबद्दल! ताई, खरंच सुखद धक्का दिलास.

  • @medhapatankar2095
    @medhapatankar2095 Před 4 lety

    Apratim..... locked down madhil evdhe sunder vardaan

  • @user-le2ug1fd6n
    @user-le2ug1fd6n Před 3 lety +1

    Sundar Kavita v Sundar vachan

  • @prabhakarborse4829
    @prabhakarborse4829 Před 3 lety

    अप्रतिम काव्य पुष्प तितकेच अप्रतिम निवेदन..मधुराणी👌👌

  • @sunny57jo
    @sunny57jo Před 2 lety

    कुसुमाग्रजांचे आधी नावच ऐकलेले, नंतर एखादी ‘कणा’ कविता वाचनात आली पण ह्या मधुराणी च्या काव्य वाचनाने संपूर्ण पणे कुसुमाग्रजांसमोर नतमस्तक झालो! 🙏🏿

  • @vishwaasmugalikar9580
    @vishwaasmugalikar9580 Před 4 lety +2

    Amazing collection of poems,unique style of narration,waiting eagerly for next episode....GN.

    • @vibhajoshi223
      @vibhajoshi223 Před rokem

      फारच सुरेख वाटतात ऐकायला तुमचे सादरीकरण अप्रतिम आहे

  • @sanjaydighe5500
    @sanjaydighe5500 Před 4 lety +1

    Very Great 🙏 keep it up 👍 Thanks

  • @vishwaasmugalikar9580
    @vishwaasmugalikar9580 Před 4 lety

    Ekdam chan upkram.lockdown madhe hi parvanich watte.god bless u madhuraniji.

  • @madhuridichwalkar7094
    @madhuridichwalkar7094 Před 4 lety +2

    प्रत्येक भागाची आतुरतेने वाट पहाते आणि मन लावून ऐकते. कवितांची निवड व सादरीकरण अप्रतिम, पुन्हा पुन्हा ऐकावे असे.

  • @abhijittere3693
    @abhijittere3693 Před 4 lety +11

    मधुराणी, "दाद" नेमकी कोणाला द्यावी? कुसुमाग्रजांच्या शब्दांना की ते आमच्या पर्यत पोहचवणार्‍या तुमच्या "उ त्क ट" निवेदनाला??? "मोठा"च प्रश्न पडला आहे..

  • @jaysarode9713
    @jaysarode9713 Před 2 lety

    मॅडम तुम्ही खरच खुपचं श्याण वाचेन करता

  • @nandkumarshendre8625
    @nandkumarshendre8625 Před 3 lety

    सुंदर कविता आणि सुंदर काव्य वाचन

  • @dharmendrakharad5330
    @dharmendrakharad5330 Před 4 lety

    मधुराणी तुच एक गोड, मधुर आणि भावुक कविता आहेस....खरंच 😊

  • @suvarnanigudkar5088
    @suvarnanigudkar5088 Před 3 lety

    मधुराणी...खूपच छान...तुझा आवाज ऐकत च रहावा...आणि कुसुमाग्रज यांच्या कविता ऐकवतेस म्हणजे अगदी मधुर स्वरांतून पाझरणारा झरा च जणू...

  • @harshad24
    @harshad24 Před 4 lety

    खूप छान.कवितांसोबतच तुमचा आवाज ही खूप सुंदर आहे .

  • @shaileshpaithankar2384
    @shaileshpaithankar2384 Před 4 lety +1

    Thank you for selection such lovely poems

  • @sanjaychaudhari8437
    @sanjaychaudhari8437 Před 4 lety

    र स या त्रे त ... न्हाऊन निघालो ... अप्रतिम !

  • @rajendradhokane9239
    @rajendradhokane9239 Před 3 lety

    वाचन कौशल्य खुपच अप्रतीम

  • @roshanmahanama3507
    @roshanmahanama3507 Před 2 lety

    भयानक आहे कविता

  • @sandhyaubgade5422
    @sandhyaubgade5422 Před 4 lety

    कुसुमाग्रज यांच्या कविता मला फार आवडतात

  • @marathisanskar
    @marathisanskar Před 3 lety

    व्वा खुप खुपच छान भाग
    सादरीकरण

  • @anjalitilak3120
    @anjalitilak3120 Před 4 lety

    अप्रतिम अनुभव

  • @Shivraj-Bharat-Patil
    @Shivraj-Bharat-Patil Před 4 lety +1

    खूप छान दीदी ..तुला खूप शुभेच्छा ...नव्या कवींना एक फ्लॅटफॉर्म निर्माण करुन द्यावे ...ई-मेल च्या स्वरूपात असले तरी चालेल..आणि ते ही पुढे येतील

  • @jaysarode9713
    @jaysarode9713 Před 2 lety

    कुसुमाग्रज यांच्या कविता खुपचं श्यान आहे त मला तर वेड करून सोडले त्या कविताने

  • @rajendrapatil5930
    @rajendrapatil5930 Před 4 lety +1

    Outstanding

  • @arunaduddalwar4854
    @arunaduddalwar4854 Před 4 lety

    सुंदर 👌श्रवणाची पर्वणीच तुझ्या। आवाजात!💐

  • @nehajoshi2496
    @nehajoshi2496 Před 4 lety +1

    तू निवेदनही इतकं सुंदर आणि समर्पक करतेस, की कविता कुठली असेल ते चटकन लक्षात येतं!

  • @user-ue7ng6zd1p
    @user-ue7ng6zd1p Před 4 lety

    भव्य भावनांचे तरल वाचन...छान

  • @shitalpisolkar5176
    @shitalpisolkar5176 Před 4 lety

    सगळे भाग अप्रतिम . मधुराणी मी तुझी फॅन आहे😍

  • @annawable7964
    @annawable7964 Před rokem

    So Beautiful❤

  • @krantikamble3139
    @krantikamble3139 Před 4 lety +1

    तुमचा आवाज खूप छान आहे तसेच तुमची आईची मालिका खुप छान आहे

  • @chaitandhutraj1273
    @chaitandhutraj1273 Před 4 lety +1

    ❤️❤️❤️