माझ्या घरी पालखी आली नैवेद्याला..

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • #पालखीसोहळा 🎉🛕🚩
    देवाची रूपे लागल्यानंतर पालखी बाहेर काढली जाते.
    काही गावांमध्ये होळी झाल्यानंतर पालखी गावोगावी फिरते.
    यावेळी ग्रामदेवतेचे मुखवटे पालखीमध्ये स्थापन केले जातात.
    पालखीला छान अशी आरास करून गावातील प्रत्येकाच्या घरी फिरवली जाते.
    ज्यादिवशी पालखी येणार आहे त्या दिवशी अंगणामध्ये सडा सारवण घालून ग्रामदेवतेच्या आगमनाची तयारी केली जाते.
    सुहासिनी ग्रामदेवतेची ओटी भरतात. नवस बोलले जातात. कुटुंबाच्या सुखसमाधानासाठी गाऱ्हाणी घातली जातात.
    यादिवशी घरामध्ये गोडधोड पदार्थ केले जातात.
    पालखी सोहळ्यातील सर्वांत अभूतपूर्व क्षण म्हणजे पालखी नृत्य.
    गावकरी मंडळी ढोल ताशाच्या गजरात आपल्या ग्रामदेवतेच्या पालखीला खांद्यावर घेऊन नाचवतात.
    ढोल ताशांच्या तालावर वेगवेगळ्या पद्धतीने पालखी नाचवण्याची मजा काही वेगळीच असते.
    आपल्या ग्रामदेवतेची पालखी किमान एकदातरी नाचवावी असे प्रत्येक कोकणवासियाचे स्वप्न असते आणि ते आज पूर्ण झाल..🙏☺️
    video edit,shoot, credit -DEV TAMBE
    कोकणातील अधिक video पाहण्यासाठी #DEVTAMBE channel ला नक्की subscribe करा..

Komentáře • 234

  • @ingleranjana5441
    @ingleranjana5441 Před 2 lety +29

    सुशांत तू आपल्या कोकण आणि आपल्या गावाला विसरला नाहीस ही फार अभिमानाची गोष्ट आहे कोकणात प्रत्येक घरी पालखी येते आणि ती नाचवतात हे नेहमी ऐकले होते आज तुला पालखी नाचवताना पाहिले .तू तुझ्या प्रथा परंपरा चांगल्या पद्धतीने सांभाळतोस कौतुक आहे तुझं 🙏👌

  • @deekshakudtarkar5509
    @deekshakudtarkar5509 Před 5 měsíci +1

    सुशांत दादा तुझ्या सारखे कलाकार आपल्या कोकणात आहेत ही आम्हा कोकण वासीयांसाठी खुप अभिमानाची गोष्ट आहे आज तुम्ही अभिनय क्षेत्रात कार्यरत असून देखील कोकणातील रूढी परंपरा जपताय खूप छान दादा

  • @kirantandkar8602
    @kirantandkar8602 Před rokem +10

    दादा तुम्ही एवढे मोठे कलाकार असून सुद्धा आपल्या मातीला, आपल्या गावाला विसरला नाहीत. तुमचा अभिमान वाटतो. ❤️💐💐

  • @kkavita3779
    @kkavita3779 Před 5 měsíci +1

    सुशांत सर - तुम्हाला मी फक्त टिव्ही-मध्ये पाहिले आहे !
    पहिल्यांदा तुम्हाला सर्वसामान्य माणूस असल्यासारखं पाहताना फार फार आनंद होत आहे , तुम्ही शिमगा इतका सुंदर साजरा केलाय हे पाहून अतिशय आनंद झाला ❤
    तुमच्या आयुष्याचा खुप खुप हेवा वाटतो ❤

  • @prakashbhalekar4526
    @prakashbhalekar4526 Před 2 lety +50

    नमस्कार सुशांत कोकणातला माणूस आपल्या लाल मातीशी जुळलेली नाळ कधीच विसरत नाही याचे जिवंत उदाहरण तू आहेस कोकणातला माणूस कितीही उंच पदावर गेला तरी तो आपल्या जन्म भूमीला विसरत नाही .कोकणातील सर्व ग्राम दैवत तुला तुझ्या अभिनय क्षेत्रात तुला खूप उंचीवर ठेवतील तुला खूप खूप शभेच्छा 🙏🙏

  • @kkavita3779
    @kkavita3779 Před 5 měsíci +1

    तुम्ही खुप खुप चित्रपटात काम करावे, तुम्ही एक छान कलाकार आहात , मी तुम्हाला अगदी लहानपणापासून पाहत आले आहे ❤

  • @shilpagandhi4994
    @shilpagandhi4994 Před 5 měsíci +2

    सुशांन तुम्ही एवढे मोठे कलाकार असुनसुद्धा तुम्ही कोकणातील सण आणि तीथली परंपरा जपता ह्याचा आम्हाला अभिमान वाटतो आहे

  • @priyatawde6720
    @priyatawde6720 Před 2 lety +13

    खूपच अप्रतिम विडिओ आहे सुशांत सर तुम्ही पालखी ची रूढी परंपरा उत्तम जपली आहे. खरंच कोकणवासी म्हणून तुमचा खूप अभिमान वाटला. माहेरच्या पालखीची आठवण आली.

  • @mamatatarkar7489
    @mamatatarkar7489 Před 2 lety +6

    आपली परंपरा जपता आहेत,खूप मस्त वाट , देव सगळ्याना चांगला आशिर्वाद देऊ दे.

  • @ashwinimade7335
    @ashwinimade7335 Před 2 lety +14

    छान दाखवले आपल्या प्रथा रूढी परंपरा सर्वांना समजतात ती एक सकारात्मक ऊर्जा मिळते आपल्याला. देवी तुम्हा सर्वांना व तूझ्या यू ट्यूब कुटुंबाला सुखात ठेवो ही प्रार्थना

  • @suvarnabaikar6479
    @suvarnabaikar6479 Před 5 měsíci +1

    खुप छान खुप सुंदर...... आपली माती आपली माणस आपलं कोकण ❤

  • @aditinirmal6965
    @aditinirmal6965 Před 5 měsíci

    Khup mst
    Kokani Manus aahe kashat ch kami nahi🎉🎉🎉🎉

  • @kimayamore9653
    @kimayamore9653 Před 2 lety +7

    🙏हा कोकणातील सण सोहळा पाहुन खुप प्रसन्न वाटले

  • @bharatiprabhu8641
    @bharatiprabhu8641 Před 2 lety +17

    शुभ दुपार सुशांत, एक वेगळाच आविष्कार तुझ्याकडून बघायला मिळाला ,असेच आपल्या संस्कृतीला धरून राहा,खूप आनंददायी क्षण !

  • @aanandmestry1706
    @aanandmestry1706 Před rokem +3

    खूप छान वाटले नाव कमावलेल्या कलाकार असे व्हिडीओ बनवून युट्युबवर आलात त्या मुळे आपली प्रथा परंपरा याविषयी मोठया प्रमाणात नवीन पिढीमध्ये आस्था निर्माण होईल आणि आपले सण पुन्हा नव्या जोमाने साजरे होतील यात तुमचे योगदान पाहिले आहे हे नक्की धन्यवाद आपली कोकणची संस्कृती दाखवली खूप शुभेच्छा

  • @rajuyewankar2738
    @rajuyewankar2738 Před 2 lety +4

    कोकणी माणसाची आपल्या गावाप्रती, सण-वार प्रती असलेली भावना प्रेम,ओढ खुपच सुंदर..

  • @jayabarve686
    @jayabarve686 Před 2 lety +4

    सुशांत पा ल् खी सोहळा खूप छान.प्रसन्न व आनन्द झाला पाहुन .

  • @dattaramgosavi7756
    @dattaramgosavi7756 Před rokem +5

    आपण आपल्या गावातील (कोकणातील)परंपरा जोपासली खरच तुमचे मनापासून अभिनंदन आणि आभार 🙏🙏🙏🙏🙏

  • @sushantjadhav7932
    @sushantjadhav7932 Před rokem +1

    दादा असं कोकणातील एखादी व्यक्ती येवढ्या मोठ्या ठिकाणी जाऊन सुद्धा तो आपल्या कोकणाला विसरला नाही खुप अभिमान.... आणि खुप छान वाटलं तुम्ही कोकणातील आहात,, 🚩🚩❤❤

  • @fireboygaming9603
    @fireboygaming9603 Před rokem +1

    तु खुप साधा आहेस हे ऐकून होते आज पाहिलं.खुप छान भाऊ.

  • @chandrakantshinde1571
    @chandrakantshinde1571 Před 2 lety +2

    खूप छान सुशांतजी !! आमच्या चिपळूण दसपटीतही थोड्या फार फरकानं असाच शिमगोत्सव करतात. पालखी घ्यायला ठरलेल्या दिवशी चाकरमानी पोहोचतात. निवृत्त मंडळी तर पंधरा दिवसाकरता येतात व गुढी पाडव्याची गुढी उभारतात व मग मुंबई पुण्याला परततात.

  • @nikitasalvi74
    @nikitasalvi74 Před rokem +1

    शिमगा हा एक असा सण आहे की देव आपल्या घरी येतात खुप छान वातावरण निर्माण होते घरात सर 🙏🙏🌹🌹🙏🙏👌👌

  • @k.nshingote6635
    @k.nshingote6635 Před 2 lety +3

    खुप छान पालखी सोहळा खूप छान वाटले बघुन 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

  • @surekhajadhav4505
    @surekhajadhav4505 Před rokem +1

    सुशांत अभिमान वाटला तुझा.असाच गावाशी जोडलेला रहा.

  • @diptiambekar9564
    @diptiambekar9564 Před rokem +1

    पालखी सुंदर मानवलीय ..न शेवटी प्रसादाची अंगत पंगत छानच ...तुम्ही एवढे मोठे कलाकार पण स्वतः जातीनीशी पंगत वाढताय ..खूप छान परंपरा जपलीय ...बघून खूप समाधान वाटल 👍👍🙏🙏🙏🙏🙏😊😊😊😊😊

  • @user-pn4po4ot3e
    @user-pn4po4ot3e Před 2 lety +6

    कोकणी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी, आपल्या लाल मातीचा सुगंध त्याला खेचून आणतोच. खूप छान.👌

  • @hiteshdesigns8352
    @hiteshdesigns8352 Před rokem +2

    आज खूप बरं वाटल पाहून की एक आपला माणूस आपली परंपरा जगासमोर मांडत आहे.... कोकणी माणूस लाखात एक

  • @rakeshkalamkar8855
    @rakeshkalamkar8855 Před 2 lety +9

    भाऊ तू एवढा मोठा कलाकार असुन पण तुझी नाळ आपल्या मातीशी किती जोडलीय हे बघुन छान वाटलं....

    • @madhavipawaskar150
      @madhavipawaskar150 Před rokem +1

      खरंच सुशांत छान वाटले तु आपली परंपरा जपत आहेस खुप छान

  • @arunbhosale8716
    @arunbhosale8716 Před 2 lety +9

    सुशांत तुझा हसरा चेहरा ,छान निवेदन आणि एकुण विडीओ मस्तच फार बरे वाटले

  • @vinodparawade9218
    @vinodparawade9218 Před 2 lety +2

    खूप छान सुशांत अस्सल कोकणी संस्कृती जपणारा माणूस 👌

  • @urmilabajare8933
    @urmilabajare8933 Před 5 měsíci +1

    सुशांत छान पालखी नाचवणेसुद्धा👌👌👍मिही चिपळूण ची आहे तू आपली परंपरा विसरला नाहिस कलाकार असुन✌🙏😂😂

  • @surajpadval6823
    @surajpadval6823 Před rokem +2

    खूप कलाकार पाहिले पण हा पहिला मराठी माणूस जो उत्तम कलाकार आणि उत्तम माणूस आहे.. गावाशी नाळ जोडणारा कलाकार

  • @sakshisawant5269
    @sakshisawant5269 Před 5 měsíci

    Khup Chan aapan kokankar lay bhari

  • @pushpadeshpande1573
    @pushpadeshpande1573 Před 2 lety +6

    नमस्कार सुशांत कोकणातला माणूस सिनेमा क्षेत्रात असून आपल्या परंपरा हौशीने सहभागी होऊन आनंदाची करत आहे आपले रितीरिवाज छान पद्धतीनी केल्या खुप छान वाटलं

  • @snehalshinde4810
    @snehalshinde4810 Před 2 lety +4

    सुशांत सर नमस्कार तु एक कलाकार नसुन माणुसकी व सर्व रीती भाती जपणारा असा जातीवंत कलावंत आहेस तुझे पालखीचे व्हिडियो खूप आवडले माझ्या सुनेचा गाव पण देवरूख आहे असेच छान छान व्हिडिओज बनव व आपली मराठी संस्कृती जप श्री स्वामी समर्थ महाराज तुला यश देवो,🙏😊

  • @diptiambekar9564
    @diptiambekar9564 Před rokem +1

    वा...व...हा व्हीडीओ सुध्दा सुंदर ...स्वयंपाकाची तयारी ही परिपूर्ण ..आमटीचा रंग पाहून तोंडाला पाणी सुटल ...😊😊👍👍🙏🙏

  • @mak940
    @mak940 Před 2 lety +3

    Khupach chhan sundar tayari palkhi ghari yenar mhnun
    Shimga che vlogs mastt...❤👌🤟👍

  • @sangeetasawant138
    @sangeetasawant138 Před 2 lety +1

    खुप छान सुशांत सर खुप आवडला विडीयो

  • @shirishkambli242
    @shirishkambli242 Před 2 lety +6

    खुपच सुंदर. पालखी सोहळा आणि महाप्रसाद पाहून छान वाटले.

  • @meghamane7188
    @meghamane7188 Před 2 lety +3

    खूप सुंदर सुशांत,, मी पण सांगावे गावचीच आहे,, तुझा खूप अभिमान वाटतो, असाच यशस्वी हो god bless u, !!

  • @mahendragurav5460
    @mahendragurav5460 Před 2 lety +13

    खूप छान सुंदर मस्त🙏👍👌👌👌👌👌💖💖💕❤️दादा गावची आठवण झाली 💖

  • @bhatumarathe2735
    @bhatumarathe2735 Před 5 měsíci

    सुशांत शेलार जी आपला गावातील संस्कृती बद्दल खूप आपुलकी दिसली खुप छान वाटले .अशेच प्रत्येक माणसाला आपल्या गावातील सन रुढी परंपरा बद्दल आवड पाहिजे . तुमच्या सारख्या मोठ्या कलाकाराला एवढ्या उस्ताह शिमगा मधे भाग घेताना खूप प बरे वाटले . यामुळे आपली संस्कृती टिकून राहील
    आम्ही सूधदा आमचे रितीरिवाज देवदेवतांच्या सनवार करतो नंदुरबार जिल्ह्यातील बांधव .

  • @sameermorye7894
    @sameermorye7894 Před 2 lety +5

    Oho....Super Sushant sir....Vdo graphi Khupach chan...Dev Tambe Khupach sundar Shooting

  • @supriyaparab8788
    @supriyaparab8788 Před 2 lety +5

    Vlog 👌आपली संस्कृती आपण जपली पाहिजे तरच पुढची पिडी जपेल. खूप छान 👍🙏🙏

  • @babajiloke5849
    @babajiloke5849 Před rokem +1

    खुप छान , माऊली 🌹🙏

  • @vibhaschannel316
    @vibhaschannel316 Před 2 lety +2

    मस्त.... फारच छान वाटले. आपल्या चालीरीती, सण उत्सव गावाची ओढ या तुमच्या धावपळ आणि दगदगीच्या जीवनात पण तुम्ही जपून ठेवलेत याबद्दल तुमचे कौतुक वाटते...

  • @priyankasawant816
    @priyankasawant816 Před 5 měsíci

    खुपचं छान 🙏🌷❤️👌👌

  • @niteshshirke7592
    @niteshshirke7592 Před rokem

    Saheb mast

  • @sanjayshinde3719
    @sanjayshinde3719 Před 2 lety +5

    खुप भारी सुशांत सर🙏🙏

  • @shwetagurav2941
    @shwetagurav2941 Před rokem +1

    Ek no Dada 😍

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 Před 2 lety +1

    Khup chhan sir very nice video

  • @sameermorye7894
    @sameermorye7894 Před 2 lety +3

    Bharich Sushant Sir

  • @ashokvahalkar3772
    @ashokvahalkar3772 Před 2 lety +1

    सुशांत दादा,खूप छान,,अभिनंदन

  • @sangeetarane4944
    @sangeetarane4944 Před 2 lety +2

    खूप सुंदर ,👌👌🙏🙏

  • @sgolelove
    @sgolelove Před rokem +1

    खूप छान साहेब 🙏🙏🙏⛳️⛳️⛳️ जय महाराष्ट्र 🙏🙏🙏⛳️⛳️⛳️

  • @aparnachalke1374
    @aparnachalke1374 Před rokem

    Khoop Chan Dada
    Far bhari vatl palakhi baghun
    Jay shree swami samarth

  • @vilasparab2256
    @vilasparab2256 Před 2 lety +1

    मस्त छान झाला समारंभ असेच माती शी जोडून रहा देव तुझे मंगल करो!

    • @vaidehikotasthane5393
      @vaidehikotasthane5393 Před 2 lety

      असंच दरवर्षी जाणं होवू दे.गावची हवा,पाणी आणि माती नवीन उर्जा देत असते आपल्याला.👍🙂🙏👍🏻

  • @Snehalkhandarevlog
    @Snehalkhandarevlog Před 2 lety +15

    खुपच छान दादा गावची आठवण झाली 👌🙏🙏🙏🙏

  • @Kanya56327
    @Kanya56327 Před 2 lety +1

    किती छान वातावरण असते ना !

  • @maibolivlogs355
    @maibolivlogs355 Před 2 lety +4

    Khup Sunder ...Aamchya javlyachya gavat tumhi 🙏😊

  • @sattab9612
    @sattab9612 Před rokem

    सुशांत भावा देवाचे गार्हाणे घालणे...ऐकण्यास खुप छान वाटले...

  • @pranjaltambe6035
    @pranjaltambe6035 Před rokem

    Khup sundar

  • @narendravichare
    @narendravichare Před rokem +1

    मित्रा, खूपच छान वाटले... 😍🎉🚩😊

  • @copscouple598
    @copscouple598 Před 2 lety +1

    Khup chhan dada... Jagat bhari apan kokani

  • @rekhathakur8921
    @rekhathakur8921 Před 2 lety +1

    Khup sundar, chhan,Sushant thanks for video,

  • @user-pq8cx7tp7q
    @user-pq8cx7tp7q Před 5 měsíci

    अभिमान आहे

  • @chhayarane9330
    @chhayarane9330 Před 5 měsíci

    छान दादा नमस्कार

  • @AdySandy
    @AdySandy Před 2 lety +11

    कोणत्या गावाची पालखी आहे?...छान. ... सुंदर...

  • @prachibane1393
    @prachibane1393 Před 2 lety +1

    खुप सुंदर मस्त जालाय वीडियो 👌👌👍

  • @user-pq8cx7tp7q
    @user-pq8cx7tp7q Před 5 měsíci

    खूप छान

  • @shilpagandhi4994
    @shilpagandhi4994 Před 5 měsíci

    खूप छान वाटला हाज्ञभाग

    • @shilpagandhi4994
      @shilpagandhi4994 Před 5 měsíci

      मीपण कोणाचीच आहे रत्नागिरी खेड ची मला‌ कोकणातील शिंमगा खूप आवडतो सर्वात 1 नंबर सण आहे हा कोकणातील आणि सुशान तुझं गाव आणि त्या गावातील शिमंगा खूप च छान आहे

  • @rupeshgurav7630
    @rupeshgurav7630 Před rokem

    Khup chan Sushant sir mast vatla Tumi koknale ahet tyacha abhiman ahe aamla

  • @siddhigovalkar327
    @siddhigovalkar327 Před 2 lety +1

    खूप छान 👌👌👌

  • @sunitakamble2601
    @sunitakamble2601 Před rokem

    Khup chhan video, Anand zala

  • @pratimagaikwad5533
    @pratimagaikwad5533 Před 5 měsíci

    Khup chan.mi pan ratnagiri chi.pune rahte.shimgyat atvan yeti.gavchi.

  • @punamkadam180
    @punamkadam180 Před 2 lety +1

    खूप छान दादा

  • @harsharaut4601
    @harsharaut4601 Před 2 lety +1

    खुपच छान सुशांत आपली संस्कृती विसरला नाही

  • @vidyagawade3347
    @vidyagawade3347 Před rokem

    Like 👍

  • @nishapawar7291
    @nishapawar7291 Před 5 měsíci

    खुप छान पालखी सोहळा झाला.❤❤

  • @mukeshchaudhari7926
    @mukeshchaudhari7926 Před 2 lety +1

    Khup छान...

  • @vinitashelar2993
    @vinitashelar2993 Před 5 měsíci

    मस्त

  • @bhartipanalkar9192
    @bhartipanalkar9192 Před 2 lety +2

    Nice Dada,👌👌👍👍🙏

  • @ameyraut4208
    @ameyraut4208 Před 5 měsíci

    दादा साहेब खूप छान 👌🏻👍🏻❤️🥰

  • @ganeshsawant4926
    @ganeshsawant4926 Před 5 měsíci

    शिमगा आपली संस्कृती

  • @pratikshagujar9922
    @pratikshagujar9922 Před rokem

    शब्दच नाहीत अप्रतिम

  • @anilkalaye7619
    @anilkalaye7619 Před 5 měsíci

    कोकण संस्कृतीच तशी आहे जी आपल्याला आपल्या घरची ओढ लावते.

  • @KokaniBachelorMH08
    @KokaniBachelorMH08 Před 2 lety +1

    छान आहे वीडीओ.. दादांनू..

  • @kavitaekawade1576
    @kavitaekawade1576 Před 2 lety +1

    खुपच छान सुशांत दादा 👌👌🙏🙏💐💐

  • @konkanikhanaval9236
    @konkanikhanaval9236 Před 2 lety +2

    खुप सुंदर पालखी सोहळा साजरा केला.

  • @deepakpagade5812
    @deepakpagade5812 Před rokem

    मस्त सर पाळखी दर्शन

  • @rameshambekar6141
    @rameshambekar6141 Před 5 měsíci

    खूप छान. मस्त.

  • @sangeetapatil886
    @sangeetapatil886 Před rokem

    Ekdum mast 👌👌👌👌

  • @poojakamble9794
    @poojakamble9794 Před 2 lety +1

    Khup chan bhau

  • @rajupatil342
    @rajupatil342 Před 2 lety

    Khup mast vatle

  • @rashmibhosle379
    @rashmibhosle379 Před 2 lety +1

    Khupch 👌👌👌👌

  • @vinitakolte5721
    @vinitakolte5721 Před 5 měsíci

    खुप छान वाटले

  • @vikascharkari3094
    @vikascharkari3094 Před 6 měsíci

    खूप छान सर.

  • @pranaligudekar-su4bu
    @pranaligudekar-su4bu Před rokem

    Khup chan Maza gav tulsani aahe sanvela aamhi chalat jato mamakade

  • @raosahebdesai8313
    @raosahebdesai8313 Před 2 lety +1

    Very nice 👍👍

  • @sandywareshi5487
    @sandywareshi5487 Před rokem

    खुप छान दादा. 🙏