Majhi Pandharichi Maay - FULL SONG | Mauli | Riteish Deshmukh | Saiyami Kher | Ajay-Atul | 14 Dec

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 11. 2018

  • पृथ्वी जल ब्रम्हाण्ड विठ्ठल
    जगतासी आधार विठ्ठल
    अवघाची साकार विठ्ठल
    हरीनामे झंकार विठ्ठल
    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
    तू बाप तूच बंधू
    तू सखा रे तुच त्राता रे
    भूतली या पाठीराखा
    तूच आता
    अंधार यातनेचा
    भोवती हा दाटलेला रे
    संकटी या धावूनी ये
    तूच आता
    होऊन सावली हाकेस धावली
    तुजवीण माऊली जगू कैसे
    चुकलो जरी कधी तू वाट दावली
    तुजवीण माऊली जगू कैसे
    करकटावरी ठेवोनी
    ठाकले विटेवर काय
    माझी पंढरीची माय , माझी पंढरीची माय
    साजिरे स्वरूप सुंदर
    तानभूक हारपून जाय
    माझी पंढरीची माय , माझी पंढरीची माय
    ना उरली भवभयचिंता
    रज तमही सुटले आता
    भेदभाव कातरला रे तनमनात झरली गाथा
    तू कळस तूच रे पाया
    मज इतुके उमजुन जाता
    राऊळात या देहाच्या मी तुलाच मिरविन आता
    लोचनात त्रिभूवन आवघे
    लेकरांस गवसुन जाय
    माझी पंढरीची माय ,माझी पंढरीची माय
    अंतरा -
    संपू दे गा मोह मनीचा वासना सुटावी हो
    जन्म उभा चरणीची त्या वीट देवा व्हावी हो
    कळस नको सोनियाचा पायरी मिळावी हो
    सावळ्या सुखात इतुकी अोंजळी भरावी हो
    भाबडा भाव अर्पिला
    उधळली चिंता सारी हो
    शरण गे माय आता लागले
    चित्त हे तुझीया दारी हो
    विझल्या मनातली दिपमाळ चेतली
    बळ आज माऊली तुझे दे
    'मी' तुज्यात विरता माझी राहीलीच अोळख काय
    माझी पंढरीची माय , माझी पंढरीची माय
    मी पणाच सोडून जाता या कुडीत उरले काय
    माझी पंढरीची माय माझी पंढरीची माय
    पृथ्वी जल ब्रम्हाण्ड विठ्ठल
    जगतासी आधार विठ्ठल
    अवघाची साकार विठ्ठल
    भक्तीचा उद्गार विठ्ठल
    अंतरा २
    अंतरी मिळे पंढरी ..सावळा हरी ..भेटला तेथ
    बोलला कुठे शोधीशी.. मला दशदिशी ..तुझ्या मी आत
    जाहलो धन्य ..ना कुणी अन्य .. सांगतो स्वये जगजेठी
    तेजात माखले प्राण ..लागले ध्यान.. उघडली ताटी
    ना उरली भवभयिंचता
    रज तमही सुटले आता
    भेदभाव कातरला रे तनमनात झरली गाथा
    हेऽऽऽऽऽऽ 'मी' तुज्यात विरता माझी राहीलीच अोळख काय
    माझी पंढरीची माय माझी पंढरीची माय
    मी पणाच सोडून जाता या कुडीत उरले काय
    माझी पंढरीची माय माझी पंढरीची माय
    माऊली माऊली माऊली माऊली माऊली
    माऊली माऊली माऊली माऊली माऊली
    माऊली माऊली माऊली माऊली
    माऊली माऊली रुप तुझे
    Here's the first song from Mauli, Sung By Ajay Gogavale,
    Starring :
    Riteish Deshmukh, Saiyami Kher and Siddharth Jadhav -
    Majhi Pandharichi Maay
    Mauli Releasing On 14th December 2018 !!!
    Presented By - JIO Studios
    Produced By - Genelia Deshmukh
    Co-Produced By - Hindustan Talkies
    Directed By - Aditya Sarpotdar
    Music - Ajay-Atul
    Lyrics : Ajay - Atul & Guru Thaakur
    Written By - Kshitij Patwardhan
    Singer : Ajay Gogavale
    Recorded & mixed by : Vijay Dayal @ YRF studios
    Assisted by : Chinmay Mestry
    Music composed ,arranged and produced by - Ajay- Atul
    Music and Rhythm conducted by - Ajay-Atul
    Mastered by Donal Whelan at Hafod Mastering (Wales )
    Indian percussion :
    Satyajit Jamsandekar
    Krishna Musle
    Jagdhis Mayekar
    Shridhar Parthsarthi
    Pratap Rath
    Raju Kulkarni
    Backing vocals Male :
    Umesh Joshi ,
    Swapnil Godbole ,
    Vijay Dhuri ,
    Jitendra Tupe ,
    Janardan Dhatrak ,
    Mayur Sukale ,
    Padmanabh Gaikwad ,
    Abhishek Marotkar ,
    Dhaval Chandvadkar ,
    Prasenjeet Kosambi ,
    Backing vocals female :
    Priyanka Barve ,
    Saee Tembhekar ,
    Sharayu Date ,
    Shamika Bhide,
    Swapnaja Lele ,
    Yogieeta Godboley ,
    Saily Panse ,
    Aanandi Joshi ,
    Anagha Palsule ,
    Sonali Karnik
    | A Mumbai Film Company Production |
    Waari Footage Courtesy : टीम फेसबुक दिंडी - A Virtual Dindi
    Video Director : Aditya Sarpotdar
    #MajhiPandharichiMaay #Mauli #RiteishDeshmukh
  • Krátké a kreslené filmy

Komentáře • 8K

  • @veerpaintingworks4674
    @veerpaintingworks4674 Před 3 lety +8587

    त्या 7700 लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली... ज्यांनी हे गाणं डीसलाईक केलं!!

  • @PriyaEditingyt
    @PriyaEditingyt Před 2 lety +1552

    कोणा कोणाला हिंदी आणि इंग्लिश गाण्यापेक्षा मराठी गाणी जास्त आवडतात.😍❤️

  • @_MUSICALLY
    @_MUSICALLY Před rokem +1103

    मी मुस्लिम आहे, पण ही अशी गाणी ऐकली की डोळ्यात पाणी आल्याशिवाय नाही रहात 🥺🙏❤️जय महाराष्ट्र ....वंदे मातरम ....जय भारत... इन्कलाब झिंदाबाद 💪 I m not hindu/muslim,I am indian🇮🇳❤️

    • @seemajagdale5938
      @seemajagdale5938 Před rokem +8

      Very nice brother

    • @ajinkyashinde6544
      @ajinkyashinde6544 Před rokem +33

      आम्ही कट्टर हिंदू आहोत 💪

    • @saurav1772
      @saurav1772 Před rokem +14

      We are indians....❤️🇮🇳❤️

    • @yvishe1997
      @yvishe1997 Před rokem +39

      भावा कुठे ही जा पण महाराष्ट्राचे , शिवरायांचे संस्कार विसरू नको , आणि पाकिस्तान वाल्यांचे संस्कार घेऊ नको .

    • @shekhargode5867
      @shekhargode5867 Před rokem +4

      😍❣️🚩

  • @santoshjorvekar2879
    @santoshjorvekar2879 Před 2 lety +169

    जगात कुठेही जा पण मराठी मातीचा सुगंध विसरणे शक्य नाही... डोळ्यात अश्रू अनावर झाले 😭😭😭😭😭

  • @shahnawazshaikh1907
    @shahnawazshaikh1907 Před 3 lety +1879

    मी पंढरपूरचा आहे मी नशीबवान...नवाज शेख 🌹🌹🌹🇮🇳 🇮🇳 🇮🇳

  • @mandar9121
    @mandar9121 Před 3 lety +1107

    "कळस नको सोनियाचा, पायरी मिळावी हो, सावळ्या सुखात इतुकी ओंजळी भरावी हो.."
    दर वेळी रडतो मी ही ओळ ऐकताना...
    गुरू ठाकूर आपणास शत शत नमन 🙏🏻🙏🏻

  • @amitlonkar7569
    @amitlonkar7569 Před rokem +591

    मी हे गाणं रात्री 2 वाजता माझ्या घरात लावलं. शेजारच्याने माझ्या घराची काच फोडली आणी ओरडला भावा आवाज वाढव 🙏

  • @laxmansinghbhati8261
    @laxmansinghbhati8261 Před rokem +68

    में मारवाड़ी हूँ मुझे मराठी की abc नहीं आती लेकिन अजय अतुल के सारे गाने दिल को छु जाते है

    • @pcmckar
      @pcmckar Před 10 měsíci +2

      Marathi me me ABC nahi अ आ इ raheta hai. Same to same as Hindi/Sanskrit. Devnaagari lipi !

  • @lms1008
    @lms1008 Před 2 lety +741

    मैं मराठी तो नहीं न ही मुझे मराठी भाषा आती है, परन्तु ये भजन मुझे दिल से बहुत अच्छा लगा। जय विट्ठल भगवान🙏🏻 माझा विट्ठल पांडुरंग

    • @Kamlesh_01
      @Kamlesh_01 Před 2 lety +9

      माझी पंढरीची माय
      माय का अर्थ माता या माँ है.

    • @lms1008
      @lms1008 Před 2 lety +4

      @@Kamlesh_01 🙏🏻🙂 धन्यवाद

    • @siddh3921
      @siddh3921 Před rokem +11

      INDIAN toh Ho na?? We are Equal and God too!

    • @chetanadinde9466
      @chetanadinde9466 Před rokem +7

      Jay Maharashtra

    • @shravanpadalkar1268
      @shravanpadalkar1268 Před rokem +10

      मराठी नाही तो क्या हुवा भगवान सबको अपना भक्त ही मानता है तुम सचे भाव से उसको देखो बस.... राम कृष्ण हरी 🙏

  • @beyond658
    @beyond658 Před 3 lety +1267

    I'm from Canada I love indian culture..... Peace and love vithhlla....

    • @NoobGamer-ki9pz
      @NoobGamer-ki9pz Před 3 lety +39

      Lots of love from india (Maharashtra) ,may lord vitthal bless you

    • @tushardhumal8056
      @tushardhumal8056 Před 3 lety +17

      Vitthal vitthal

    • @calvinstephen5528
      @calvinstephen5528 Před 3 lety +13

      Listen to ek tara marathi movie vithal song once 👍

    • @devendrapatil2101
      @devendrapatil2101 Před 3 lety +11

      It's vitthal may vitthal blessed u dear

    • @bhannat_bhatkanti
      @bhannat_bhatkanti Před 3 lety +6

      Thanks a lot n god bless u from Maharashtrian people.
      U can listen Ajay Atul other song mauli from film lai bhari as well.

  • @santoshbairagi9678
    @santoshbairagi9678 Před 11 měsíci +50

    हजारो वर्षांपूर्वीची आलेली वारकरी संप्रदायाची परंपरा माऊली ज्ञानेश्वर आणि पांडुरंगाचा सोहळा यात पांडुरंगाचा दर्शन घडते

  • @ganeshhingane3688
    @ganeshhingane3688 Před 2 měsíci +48

    अजून पण कोण कोण हे गाण ऐकत आहे ❤

  • @Lalit_Narkhede
    @Lalit_Narkhede Před 2 lety +1523

    गर्व आहे मला माझ्या मराठी संस्कृतीचा ❤️
    गाणं 🥺❤️
    Proud to be Maharashtrian ❤️
    #alwayslove_ajay_atul_sir
    #respect

    • @historyadventurewithrj8140
      @historyadventurewithrj8140 Před 2 lety +5

      ही तीच लोकं आहेत.... ज्यांनी पहिल्यापासूनच हिंदू धर्माचा तिरस्कार केलाय.... साले सेक्युलर.....librandu...

    • @historyadventurewithrj8140
      @historyadventurewithrj8140 Před 2 lety +8

      @@Lalit_Narkhede dislike करणारे....👍

    • @xcyberscar4992
      @xcyberscar4992 Před 2 lety +3

      @@historyadventurewithrj8140 मी हि धर्मनिरपेक्ष तेवर च believe करतो...
      Secular चा अर्थ माहीत नसेल तर उगाच जीभ चालवू नका..

    • @historyadventurewithrj8140
      @historyadventurewithrj8140 Před 2 lety +4

      @@xcyberscar4992 तुमची जीभ चालवून सांगा की सेक्युलर म्हणजे काय?
      आणि सर्व धर्म समभाव ही एक अंधश्रद्धा आहे...

    • @xcyberscar4992
      @xcyberscar4992 Před 2 lety

      @@historyadventurewithrj8140 तुला अस का वाटलं secular आहे तर dislike करेल? म्हणजे देवाने जीभ दिली आहे तर काहीही बडबडत राहायचं??

  • @toufikshaikh3805
    @toufikshaikh3805 Před 2 lety +2944

    I am Muslim... मला अभिमान आहे की मी महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेतला..i like this song..ajay atul big fan

    • @avinashcreation4854
      @avinashcreation4854 Před 2 lety +83

      Mast bhawa vachun chan vatl hi comment...

    • @mangeshpuri868
      @mangeshpuri868 Před 2 lety +25

      🙏

    • @happysoul.1905
      @happysoul.1905 Před 2 lety +131

      आणि आम्हाला तुमच्या सारख्या मुस्लिम बंधूंचा अभिमान आहे

    • @vinayakswami111
      @vinayakswami111 Před 2 lety +12

      👌👍

    • @abhijitrasal4724
      @abhijitrasal4724 Před 2 lety +110

      महाराष्ट्रा मध्यें.... राहणार प्रत्येक व्यक्ती हा माणुस मराठा म्हणजे महाराष्ट्रत राहणारा प्रत्येक माणूस होय........त्यामुळें कोण मुसलीम ......नाही ना कोणी मराठा नाही.. ‌‌
      सगळे
      महाराष्ट्रीयन आहोत....
      जय महाराष्ट्र....

  • @aadimunde100k
    @aadimunde100k Před rokem +60

    माझी पंढरीची माय 🚩🚩
    मराठी संस्कृती चा अभिमान

  • @ZoyaKhan-yl8ir
    @ZoyaKhan-yl8ir Před rokem +55

    माझी विठू रुकमाई 🙏🏻मला गर्व आहे की मी एक मराठी मुस्लिम आहे 🙏🏻

    • @india3572
      @india3572 Před 11 měsíci +1

      मराठी मुस्लिम मूर्ती पूजा करतात का?

    • @ganesha53388
      @ganesha53388 Před 2 měsíci +1

      Puja karatat

  • @shubhamgond11
    @shubhamgond11 Před 5 lety +1542

    तुम्ही कितीही EDM, Trance, DJ म्यूसिक ऐका हो, पन मराठी क्लासिकल संगीता मध्ये वेगळाच् जादू आहे. धन्यवाद 🚩

    • @deepakkanade7575
      @deepakkanade7575 Před 5 lety +4

      Yes bro

    • @brucesekliar5824
      @brucesekliar5824 Před 5 lety +3

      खरच..

    • @prashantchandu
      @prashantchandu Před 5 lety +10

      5:23 beat drop

    • @siddarthgavade685
      @siddarthgavade685 Před 5 lety +25

      11PointZero8 yo yo आले किती गेले किती पन प्रत्येकाच्या मनात जागा फक्त मांझी मराठी भाषा घेते ...... जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩 बेळगाव

    • @Allrounder.Trader
      @Allrounder.Trader Před 5 lety +3

      खूप छान. मन तृप्त झालं.

  • @pankajsinhasthe1001
    @pankajsinhasthe1001 Před 5 lety +522

    कुठली तरी दैवी शक्ती पाठीशी असल्या शिवाय हे घडणार नाही! धन्यवाद अजय अतुल

    • @rishikeshjunnarkar5507
      @rishikeshjunnarkar5507 Před 3 lety +2

      Very right sir

    • @mohanyenpure2332
      @mohanyenpure2332 Před 3 lety +1

      Ha kashtachi shakti

    • @surajsonawane1105
      @surajsonawane1105 Před 3 lety

      दैवी शक्ती वगेरे काही नसतं जगात..
      माणसाच्या बुद्धी,शक्ती वर माणुस या पृथ्वीवर जगतो .

    • @sumitgpatil
      @sumitgpatil Před 3 lety

      अर्थात...🙏🏻😢

    • @saurabhr4560
      @saurabhr4560 Před 3 lety

      Khrch 🙏🚩

  • @onkarkamble4706
    @onkarkamble4706 Před rokem +37

    वाहह !! हा कंमेंट सेक्शन पूर्ण पणे संस्कार आणि भक्तीने भरलेला आहे, काश असे लोक खऱ्या आयुष्यात पण एकमेकांना सोबत जाती धर्म विसरून प्रेमाने वागले असते 🙏 जय विठू माऊली🙏

  • @prasadb20
    @prasadb20 Před 11 měsíci +10

    अ रे कोण म्हणत कि आमच्याकडे कोहिनुर हिरा नाही. पण कोहिनुर हिऱ्यासारखे अजय -अतुल हे संगीतकार आम्हाला लाभले आहेत.. 🙏🙏 माऊली 🙏🙏

  • @sumeetrane4384
    @sumeetrane4384 Před 5 lety +522

    पुन्हा एकदा अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी... माऊलीच्या कृपेचा वर्षाव सर्वांवर होऊ दे. अजय-अतुल च्या नावानं चांगभलं🙏

    • @vinayakugale
      @vinayakugale Před 5 lety +7

      खरच डोळ्यात पाणी आले ।। आणि अंगावर शहारे ।। सरळ ह्रदयात शिरणारं गाण ।।

    • @PrathuGujar
      @PrathuGujar Před 5 lety +2

      काय बोललात दादा, अक्षरशः मनातलं बोललात माझ्या।। पाणी आले डोळ्यातून आणि अंगावर काटा आला।।
      ।। माउली माउली ।। 🙏🙏

    • @maheshshinde6101
      @maheshshinde6101 Před 5 lety +4

      डोळ्यात पानी आले !!!!!!! खरच मस्त सॉंग केले आहे...... अजय अतुल महाराष्ट्चे स्टार आहेत........पुनःहा एकदा आंगवार शहरे आले........ह्र्दयायत शरणारे गाने🎉🎉🎊🎉🎊

    • @soorajwaphare2874
      @soorajwaphare2874 Před 5 lety +3

      Dada kharach he movie superhit honar ahe

    • @mk9519
      @mk9519 Před 5 lety +2

      अगदी बरोबर बोललात

  • @shubhamardhapurkar3110
    @shubhamardhapurkar3110 Před 5 lety +332

    हे गीत ऐकल्या वर ,मराठी म्हणून जन्मल्याचा सार्थ अभिमान वाटतो !!!

    • @rohitdeore1885
      @rohitdeore1885 Před 5 lety +3

      shubham ardhapurkar i

    • @jivankale9140
      @jivankale9140 Před 5 lety +3

      सत्य बोललात दादा...

    • @yogeshpawar-rv1tg
      @yogeshpawar-rv1tg Před 5 lety +1

      Ho...bhau

    • @virajmore3419
      @virajmore3419 Před 3 lety +1

      Bhau bhakti chi konti jaat naste

    • @rahulraut2689
      @rahulraut2689 Před 2 lety

      @@virajmore3419 आणि मराठी ही जात/धर्म नाहीये भाऊ.... तुला कसकाय जात दिसली ?

  • @vishalgawas2136
    @vishalgawas2136 Před rokem +28

    "मी तुझ्यात विरता माझी राहीलीचं ओळख काय"
    Wt a composition ❤️

    • @jayendraghanekar4450
      @jayendraghanekar4450 Před dnem

      शेवटी ते जगत गुरू संत श्रेष्ठ तुकोबांचे अभंग आहेत..❣️🤞

  • @khandugurav6363
    @khandugurav6363 Před rokem +6

    अभिमान आहे मी मराठी असल्याचा आणि हिंदू असल्याचा.... ❤️😊

  • @lifeofmsd7
    @lifeofmsd7 Před 3 lety +2357

    I am Muslim पण हे गाणं ऐकल्याशिवाय मन लागत नाय माऊली माऊली

  • @nandakishortoraskar1177
    @nandakishortoraskar1177 Před 4 lety +146

    मला तर कमेंट्स वाचूनच खूप भारी वाटलं.. पुन्हा या मातीत जन्म व्हावा हीच माऊली चरणी प्रार्थना🙏🚩

  • @siddharthmore2568
    @siddharthmore2568 Před rokem +8

    गर्व आहे मला मराठी असल्याचा, खरंच छत्रपती शिवाजी महाराज की जय🙏 तुमच्या मुळे आज हे दिवस आहे🙏🚩जय हरी विठ्ठल🙏

  • @priyathombre7307
    @priyathombre7307 Před 8 měsíci +3

    राम कृष्ण हरी. केवळ स्वर्गीय ! मला Corona झाला तेंव्हा योगायोगाने मी हे गाणे पाहिले, ऐकले आणि आजपर्यंत ही अनेकदा ऐकते, पाहते पण कधीच मन भरत नाही. दरवेळी रडू येते. या गाण्याने मला जगण्याचे बळ दिले. केवळ तुमच्यामुळेच lockdown मध्ये ही वारीचा आनंद आम्हाला मिळाला. ❤❤

  • @ajayrokadepatil
    @ajayrokadepatil Před 4 lety +79

    एअरफोन मध्ये ऐकत होतो डोळ्यात पाणी व अंगावर काटा आला महाराज🙏🚩🚩

  • @sanjaybaramate7118
    @sanjaybaramate7118 Před 5 lety +170

    या दोघांचा जन्म लोकांच्या डोळ्यात पाणी व अंगावर शहारे आणण्यासाठी झालाय !

  • @ashwinirajput6873
    @ashwinirajput6873 Před rokem +4

    मला खूप वाईट वाटतंय की मी हे गाणं खूपच उशिरा ऐकलं..काळजाला भिडणारा अजय अतुल चा आवाज ऐकून मन जणू काही स्तब्ध झालं..गाण्याचे बोल अप्रतिम,संगीत अप्रतिम..माऊली हे गाणे अजूनही तसच ओठांवर आहे त्यातील बोल खरंच खूप अप्रतिम होते..आणि हे गाणं ही तितकच अप्रतिम..

  • @maheshbiradar3315
    @maheshbiradar3315 Před rokem +38

    The Goosebumps
    love from Karnataka

  • @vaishanvisonar7603
    @vaishanvisonar7603 Před 3 lety +75

    1 like ज्यांच्यासाठी, ज्यांनी हा अभंग बनवला, संत जगद्गुरू तुकोबाराय 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shashanks.mahadik3046
    @shashanks.mahadik3046 Před 5 lety +459

    नतमस्तक त्या माऊलीला जिने ह्या दोघांना जन्म दिला. साक्षात विठ्ठल दिसला .....🤗🙏🙏🙏🙏

  • @shwetapanchal2909
    @shwetapanchal2909 Před rokem +5

    Mahit nahi ka... Pan Pratyek ch weli 'Majhi Pandhrichi Maay' Aaiktana, boltana dolyat pani yete... Agadi pratyek weli... Ajay Atul hyanna manapasun Pranaam🙏🏼🙏🏼🙏🏼 tyanchya awajachya jaadu ne Baslya jagi Pandharit pohochalyachi Anubhuti yete😭😭😭😭 khup prem tumha doghanna❤❤❤❤❤❤

  • @ParamBhauYoutuber
    @ParamBhauYoutuber Před 2 lety +18

    विडिओ जर लव स्टोरी गाणं असतं तर 100M च्या वरती बघणारे असते परंतु देवाचे गाणं असले की त्याला फक्त 50M च्या आत बघणारे असतात‌.........! वाह दुनिया क्या कर रही है. एक लाईक आपल्या विठ्ठला साठी मित्रांनो.❤️

  • @sushantgunde8503
    @sushantgunde8503 Před 5 lety +1836

    Pune to mumbai..3 hrs journey by bus... हे गाणं 3 तास नॉन-स्टॉप रिपीट मोड वर ऐकल आहे! प्रत्येकवेळी अंगावर शहारे! आणि डोळे पाणावलेले! अजय-अतुल 🙏 मराठी संगीताला टिकवून ठेवला आहे तुम्ही!

    • @rakeshranjansahoo4231
      @rakeshranjansahoo4231 Před 4 lety +11

      Hindi mai todha boliye

    • @crazyadi6422
      @crazyadi6422 Před 4 lety +18

      @@rakeshranjansahoo4231 kyu be marathi hi best h

    • @gutteyadavrao
      @gutteyadavrao Před 4 lety +4

      Ho kharach kadhihi aika dole apoaap panavtat

    • @gutteyadavrao
      @gutteyadavrao Před 4 lety +4

      Aaj paryant khup Vela aikal aahe gan pan as vatat pahilyandach aiktoy and same reaction hotat
      This is best song in my life

    • @pramoddukre3094
      @pramoddukre3094 Před 4 lety +1

      Nice

  • @akkimaske4106
    @akkimaske4106 Před 2 lety +115

    "मी तुझ्यात विरता माझी, राहिली च ओळख काय" डोळ्यात पाणी आलं ही ओळ ऐकून❤️

  • @SIDDHARTHC111
    @SIDDHARTHC111 Před 5 měsíci +8

    हा गाना ऐकुन काय तरी अलगच feeling होती राव..💫💖🧡🤍💚

  • @nirmalagopale3667
    @nirmalagopale3667 Před 2 lety +7

    जय महाराष्ट्र गर्व आहे मी मराठी असल्याचा 🙏 जय हरी विठ्ठल🙏

  • @vaishnavimurumkar9283
    @vaishnavimurumkar9283 Před 5 lety +504

    अभिमान वाटतो मराठी म्हणून जन्माला आल्याचा❤😍😘

  • @foutgsg_67
    @foutgsg_67 Před 3 lety +272

    3:18 मृदुंग...जबरदस्त....🔥👌🙏 हे गाणं जितके ऐकावे तितके...त्यातला अर्थ आणि...आयुष्याचा अर्थ उलगडत जातो...🙏👌

  • @raj__korde34
    @raj__korde34 Před rokem +11

    2023 मध्ये हे अप्रतिम गाणे कोणी एकले ❤️#माऊली🙇🏻🙏🏻😘🌏

  • @sagardhavalepatil6759
    @sagardhavalepatil6759 Před 5 dny +4

    वेगळीच ताकद या गाण्यात....सर्व दुःख विसरायला झालं.....जय हरी.....!

  • @sagardhondage1331
    @sagardhondage1331 Před 5 lety +2015

    कोणा-कोणाच्या डोळ्यात हे गाणं ऐकून पाणी आले ?😘
    अभिमान आहे मी मराठी असल्याचा 🙏😚😚🎵

  • @vishwambharmohite9264
    @vishwambharmohite9264 Před 2 lety +275

    सन 2031 मध्ये हे गाणे कोण कोण ऐकणार आहे त्यांनी like करा

    • @aadeshsalve765
      @aadeshsalve765 Před rokem

      Aas fix Kai nahi pn bgu

    • @user-xq4rn9pc4s
      @user-xq4rn9pc4s Před měsícem +1

      Tula mahit ahe bhavishya jnu 2024 te 2030 pryant ch

    • @prasadchoure
      @prasadchoure Před 28 dny +1

      Bhava jaglo vachlo pandhurangchya krupene tr nakki aikel 😌🙏🏻❤️

    • @akashbaraf2782
      @akashbaraf2782 Před 9 dny

      फक्त 2031 नाही तर हे गाण युगानुयुगे चालणार आहे.
      कारण हा कधीही न संपणारा विषय आहे .
      राम कृष्ण हरी

    • @sudhanandurkar3301
      @sudhanandurkar3301 Před 9 dny

      Mi 2031paryant kay jecdhe divash jivant ahe shevtchya swasa paryant eknar nahi tar ekte.. Jay Jay ram krishan hari.. Jay hri vitthal...

  • @GaneshIngale.
    @GaneshIngale. Před rokem +5

    माझा महाराष्ट्र महान 🚩🚩🔥🔥

  • @bhavikawani8613
    @bhavikawani8613 Před rokem +8

    गाणं सम्पताना शहारा आला अगावर
    खरचं गरज आहे का हिंदी गाण्याची जेव्हा मराठीच येवढी सुंदर आहे
    जय महाराष्ट्र 🌸💐

  • @YogeshJadhav02
    @YogeshJadhav02 Před 5 lety +171

    थेट पंढरपूर ला माऊलीचे दर्शन घेऊन आल्यासारखं वाटतंय. Hats off To Ajay Atul Sir...
    ज्यांनी वायफळ बडबड केलेली अजय अतुल सरांबद्दल त्यांना यातून चांगलीच चपराक मिळालीये
    काटा किर्रर्रर्रर्र 😍🙏🏻

  • @akshaychandurkar3220
    @akshaychandurkar3220 Před 5 lety +123

    2018 मध्ये सुद्धा ताळ आणि मृदुंग वर ईतके अप्रतीम गाणं होउ शकते.
    सलाम अजय अतुल 🙏🙏🤦‍♂️

  • @vijaysawant1315
    @vijaysawant1315 Před rokem +5

    हे गाणं कितीही वेळा ऐकलं तरीही मन भरत नाही.❤🙏 धन्यवाद अजय-अतुल

  • @malikjanmulla6530
    @malikjanmulla6530 Před rokem +26

    I am Muslim but this song very good ❤
    Jai Mauli

  • @suryakantjadhav6364
    @suryakantjadhav6364 Před 3 lety +68

    पृथ्वी जल ब्रम्हांड विठ्ठल
    जगतासी आधार विठ्ठल
    अवघाची साकार विठ्ठल
    हरिनामे झंकार विठ्ठल
    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
    विठ्ठल विठ्ठल
    तू बाप तूच बंधू तू सखा रे तूच त्राता
    भूतली या पाठीराखा तूच आता
    अंधार यातनेचा भोवती हा दाटलेला रे
    संकटी या धावूनी ये तूच आता
    होऊन सावली हाकेस धावली
    तुजवीण माऊली जगू कैसे
    चुकलो जरी कधी तू वाट दावली
    तुजवीण माऊली जगू कैसे
    कर कटावरी ठेऊनी ठाकले विटेवर काय
    माझी पंढरीची माय माझी पंढरीची माय
    साजीरे स्वरूप सुंदर तानभूक हारपून जाय
    माझी पंढरीची माय माझी पंढरीची माय
    ना उरली भवभयचिंता रज तम ही सुटले आता
    भेदभाव कातरला रे तनमनात झरली गाथा
    तू कळस तूच रे पाया मज इतुके उमजून जाता
    राऊळात या देहाच्या मी तूलाच मिरविन आता
    लोचनात त्रिभुवन अवघें लेकरास गवसून जाय
    माझी पंढरीची माय माझी पंढरीची माय
    संपू दे गा मोह मनीचा वासना सुटावी हो
    जन्म उभा चरणीची त्या वीट देवा व्हावी हो
    कळस नको सोनियाचा पायरी मिळावी हो
    सावळ्या सुखात इतुकी ओंजळी भरावी हो
    भाबडा भाव अर्पिला उधळली चिंता सारी हो
    शरण गे माय आता लागले चित्त हे तुझिया दारी हो
    विझल्या मनातली दिपमाळ चेतली बळ आज माऊली तुझे दे
    मी तुझ्यात विरता माझी राहिलीच ओळख काय
    माझी पंढरीची माय माझी पंढरीची माय
    मी पणाच सोडून जाता या कुडीत उरले काय
    माझी पंढरीची माय माझी पंढरीची माय
    पृथ्वी जल ब्रम्हांड विठ्ठल
    जगतासी आधार विठ्ठल
    अवघाची साकार विठ्ठल
    भक्तीचा उद्धार विठ्ठल
    अंतरी मिळे पंढरी सावळा हरी भेटला तेथ
    बोलला कुठे शोधीशी मला दशदिशी तुझ्या मी आत
    जाहलो धन्य ना कुणी अन्य सांगतो स्वये जगजेठी
    तेजात माखले प्राण लागले ध्यान उघडली ताटी
    ना उरली भवभयचिंता रज तम ही सुटले आता
    भेदभाव कातरला रे तनमनात झरली गाथा
    हो..... मी तुझ्यात विरता माझी राहिलीच ओळख काय
    माझी पंढरीची माय माझी पंढरीची माय
    मी पणाच सोडून जाता या कुडीत उरले काय
    माझी पंढरीची माय माझी पंढरीची माय
    माऊली माऊली माऊली माऊली
    माऊली माऊली माऊली माऊली
    माऊली माऊली माऊली माऊली
    माऊली माऊली रुप तुझे
    माऊली माऊली माऊली माऊली
    माऊली माऊली रुप तुझे
    🙏🏻🙏🏻🚩🚩🚩

    • @sahebraopatil8541
      @sahebraopatil8541 Před 3 lety +2

      धन्यवाद सर

    • @raj__korde34
      @raj__korde34 Před rokem +1

      अप्रतिम दादा ❤️🙏🏻😘🌏

    • @anantamali9401
      @anantamali9401 Před 9 měsíci +1

      मनाला वेड लावणारा हे गीत आहे विठ्ठला च
      धन्यवाद अजय अतूल सर ❤

    • @reenadive7859
      @reenadive7859 Před měsícem +1

      Thank you sir

    • @sachinbhosle3038
      @sachinbhosle3038 Před měsícem +1

      🙏🏻🚩

  • @deepakchavan37
    @deepakchavan37 Před 5 lety +254

    अरे बापरे काय जबरदस्त आपले मराठमोळी गाणी आहेत व्हा..व्हा... अजय अतुल सारखे संगीतकार पुन्हा होणे नाही.अजय अतुल या महाराष्ट्रातलेच नव्हे तर अवघ्या भारतातील उत्कृष्ट संगीतकार आहेत. जय महाराष्ट्र...

  • @dineshmalunjkar1622
    @dineshmalunjkar1622 Před rokem +7

    आयुष्यात एकच इच्छा आहे...अजय-अतुल यांच्या पायावर डोकं ठेवायचे आहे🙏

  • @sumitnikam5480
    @sumitnikam5480 Před rokem +5

    आपले किती भाग्य आहे की अजय अतुल हे मौल्यवान रत्न आपल्या मराठी सृष्टी ला लाभले आहेत... खूप उपकार आहेत त्याचे आहेत.. साक्षात देव उभा राहतो त्यांची गाणी ऐकली की...❤

  • @TheCrules
    @TheCrules Před 5 lety +352

    Jai Marata, Jai Chatrapathi Shivaji Maharaj.
    From Karnataka a Kannadiga.

  • @terracegarden17
    @terracegarden17 Před 4 lety +303

    अशी विनवणी केल्यास तो विठ्ठल जरूर हाकेला धावेल सर्व लेकरांच्या🙏🏼😥💙
    कोरोना काळातुन बाहेर काढ माऊली🙏🏼

  • @tatanvastadvastad8146
    @tatanvastadvastad8146 Před 2 lety +6

    श्रद्धेनं मन ह्रदय भरुन येतं हे भक्तीगीत ऐकलं की..🙏💞

  • @LUCKYMore-Vlogs
    @LUCKYMore-Vlogs Před rokem +19

    जो हिंदू आहे तो आपल्या माऊली च्या गाण्याला dislike कधीच करणार नाही । काही आहेत तेच ते करतात । राम कृष्ण हरी ।।

  • @Mandar_Sitar
    @Mandar_Sitar Před 4 lety +1527

    I'm from Goa. And we have lot of old Vitthal temples in Villages. But all those who visit Goa thinks it's all about beer, bikini, beach and churches . But we have maintained our traditions. We sing both Kokani and Marathi bhajans in temples. And our ppl go to Wari every year for Ashadhi Ekadashi vrat.

    • @akshatakulkarni5601
      @akshatakulkarni5601 Před 4 lety +12

      Gova is all about Christians. I think there are no marathi people Exists

    • @Mandar_Sitar
      @Mandar_Sitar Před 4 lety +65

      @@akshatakulkarni5601 you need to check your facts properly. What you thinking is totally wrong lady.

    • @akshatakulkarni5601
      @akshatakulkarni5601 Před 4 lety +12

      @@Mandar_Sitar mi pan marathi ahe gova la capture kelay tya lokanii

    • @Mandar_Sitar
      @Mandar_Sitar Před 4 lety +43

      @@akshatakulkarni5601 population census tells that majority are Hindus in Goa. So don't worry. They know how to retain their culture.

    • @akshatakulkarni5601
      @akshatakulkarni5601 Před 4 lety +2

      @@Mandar_Sitar what abt baghaa beach condolim and other parts

  • @RahulRautVlogs
    @RahulRautVlogs Před 5 lety +267

    2018 अखेरीस तुफान गाणे.. वर्ष भरपासून मराठी फिल्म इंड्ट्रीतील संगीत शांत होते..आता गाजावाजा होणार... Awesome

    • @YogeshJadhav02
      @YogeshJadhav02 Před 5 lety +3

      आता राडा व्हनार 🔥

  • @umesh3587
    @umesh3587 Před 2 lety +5

    1 billion like jhale pahije hya ganyala mitrano.❤

  • @pravinbhoite2991
    @pravinbhoite2991 Před 2 lety +13

    तुम्ही फार महान आहात.मागील जन्म्ही फार पुंन्य केले आहे. पुण्य फळासी आले.पांडुरंगाची कृपा.

  • @mangeshtaware1
    @mangeshtaware1 Před 5 lety +74

    7 मिनिटात पंढरीची वारी घडविली. धन्य झालो!

  • @thekarnworld3660
    @thekarnworld3660 Před 3 lety +194

    माझी एक वर्षाची मुलगी आहे, तिला संपुदेगा मोह मनीचा कडवे ऐकवल्या शिवाय ती झोपत नाही...
    कधी मी म्हणतो कधी sound var lavto विठ्ठल विठ्ठल ❤️

  • @Pravinc2
    @Pravinc2 Před 9 měsíci +7

    देवा त्यांना पण सुखी ठेव ज्यांनी डीसलाईक केलं आहे कारण ते पण तुझीच मूल आहे

  • @sudhirdhumal7641
    @sudhirdhumal7641 Před rokem +5

    मला गर्व आहे की मी, विठ्ठला चा भक्त आहे🙏

  • @jagdishbhadane8454
    @jagdishbhadane8454 Před 3 lety +604

    त्या 5000 लोकांसाठी भावपूर्ण श्रद्धांजली ज्यांनी हा व्हिडिओ डिसलाइक केला

    • @NoobGamer-ki9pz
      @NoobGamer-ki9pz Před 3 lety +7

      Brobar bhau

    • @ajay_pawar1364
      @ajay_pawar1364 Před 3 lety +4

      RIP💐

    • @amardeepmore476
      @amardeepmore476 Před 3 lety +3

      Kon ahet te mht ahe 😡

    • @dnyaeashwarpotdar6093
      @dnyaeashwarpotdar6093 Před 3 lety +11

      खरंच विठ्ठल आहे इथे पाहिजे जातीचे येरागबाळ्याचे काम नाही या जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज अभंगाप्रमाणे सत्य आहे विठ्ठल अवतार परिपूर्ण आहे श्री गुरु निवृत्तीचा दास श्री ज्ञानेश्वर महाराज पोतदार मिरज

    • @akshaymandale3124
      @akshaymandale3124 Před 3 lety +1

      RIP

  • @bscrapcenter8033
    @bscrapcenter8033 Před 3 lety +194

    मराठी मातीतले अनमोल दोन कोहिनूर आहेत अजय-अतुल सर 🙏

  • @prakashtawade6826
    @prakashtawade6826 Před rokem +4

    ❤ Vitthal Mauli❤🙏🙏🚩

  • @shreedharnayik1000
    @shreedharnayik1000 Před 2 lety +4

    Tabala music is unmatchable to any dj, jai vitthala 🚩🚩🚩 proud to be HINDU

  • @adeshkhomane9627
    @adeshkhomane9627 Před 2 lety +18

    हे गाणं एखाद्या नास्तिकाला पण पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन व्हायला लावेल🙌🙌🙌

  • @ajaykumarmahapatra3155
    @ajaykumarmahapatra3155 Před 4 lety +366

    I don't understand Marathi...I am Odiya (odisha) But listening again & again this soul full song..My India always great.

    • @rajkhair3839
      @rajkhair3839 Před 4 lety +15

      because this song is dedicated to lord vitthal in maharashtra an avtar of maha vishnu and second incarnation of krishana

    • @poojatupe4938
      @poojatupe4938 Před 3 lety +4

      Great sir

    • @OMI_25
      @OMI_25 Před rokem

      Vitthal is krishna him self 📿🪷✨💙

  • @pallavigarud8612
    @pallavigarud8612 Před rokem +3

    हे गीत ऐकताच ऊर भरून येतो 🙏🚩 मना पयरेंत पोहचणार गीत 🙏🚩 राम कृष्ण हरी 🚩🚩

  • @rajkumarbansode4703
    @rajkumarbansode4703 Před 2 lety +4

    रितेश दा आणि अजय अतुल दादांची जोडी🥰, त्यात विठ्ठल रुक्मिणीची गाणी😍मन प्रसन्न होऊन जाते रोज. धन्यवाद इतके सुंदर गाणी दिले .

  • @shankarmore9540
    @shankarmore9540 Před 5 lety +89

    मराठी चित्रपटा कडे हिंदी चित्रपट स्रुश्टितील लोकांचा बघण्याचा द्रुश्टिकोण बदलत चालला आहे खरच मनापासून आनंद होतोय ... जय विठू माऊली 🙏🙏

  • @VishalKumar-og7hl
    @VishalKumar-og7hl Před 5 lety +439

    Thanks Marathi, Tamil, Telugu film industries. You are showing our hindu culture.

  • @chandushinde4937
    @chandushinde4937 Před dnem +2

    माझे मन भरुन ज़ाते हे गानं खुप आवडते माझा विठु माऊली विठु ❤❤

  • @appannalokur4721
    @appannalokur4721 Před 16 dny +2

    M from karnataka i dont know marati but i felt panduranga heartly.. ವಿಠ್ಠಲ ವಿಠ್ಠಲ ಪಂಡರಿನಾಥ ವಿಠ್ಠಲ🙏🙏🙏🙏

  • @PrasadSandArt
    @PrasadSandArt Před 5 lety +182

    ७ मीनिट्स १७ सेकंद कोणी गाणं बनवावं तर ते फक्त अजय अतुल दांनीच.. ०.५० ला अंगावर शहारे आले ते जात नाहीत तोपर्यंत १.५० ला परत आले आणि हे पुढे प्रत्येक ट्रान्सफॉर्मशन मध्ये येत गेले आणि ४.५० ला तर माऊली version अस काही बनेल ह्यावर विश्वास बसत नाहीये.. अजय अतुल, गुरू ठाकूर, रितेश देशमुख.. कमाल आहात तुम्ही..!!! 🙏🙏

  • @sonimahajan7376
    @sonimahajan7376 Před 5 lety +611

    माझा मुलगा 3 वर्षांचा आहे त्याला हे गाणं खुप आवडते
    दिवसातून एकदा तरी आवर्जून तो हे गाणं ऐकत असतो
    आम्ही पंढरपूर मध्ये राहतो आमाला रोज त्याच्या त्या रुपात विठ्ठलाचे दर्शन होते

    • @surajmehare
      @surajmehare Před 4 lety +12

      kiti bhagywaan ho tumhi. dar roj vitthal maulichya sanidhyaaat

    • @0Yuva0
      @0Yuva0 Před 4 lety +7

      Bhagyawan aahat tai.
      roj pandurangache darshan hote.
      ya varshi aamhala pandurang nahi disnar ekadashila.
      RAM KRUSHNA HARI

    • @rahulrewale16
      @rahulrewale16 Před 4 lety +1

      Maauli maauli

    • @amolkunkule5590
      @amolkunkule5590 Před 3 lety +1

      Nice

    • @sonimahajan7376
      @sonimahajan7376 Před 3 lety

      @@0Yuva0 राम कृष्ण हरी माऊली

  • @poonamsutar1728
    @poonamsutar1728 Před rokem +2

    अजय सर आणि अतुल सर तुम्हा दोघांची गाणी एकुण मन तृप्त होऊन जाते Please... 2023 च्या वारीला ही एक नवीन विठ्ठू माऊलींचे नवीन गाणं होऊन जाऊद्या की जेणे करून वारीला न जाता ऐणार्यांना विठ्ठू माऊलींचे दर्शन तुमच्या गाण्यातुन घरीच अनुभवतील जसं मला तुमची विठ्ठल माऊलींची गाणी ऐकून माऊली नव्याने समजतात .....🚩🙏!!..जय जय राम कृष्ण हरी..!!🙏

  • @sagarpore5068
    @sagarpore5068 Před rokem +5

    Great song forever ❤..माऊली माऊली💐🙏

  • @suhasnarsale7191
    @suhasnarsale7191 Před 5 lety +205

    शब्द रचना जबरदस्त
    मी पणा च सोडून जाता , या कुडीत उरले काय ,
    माझी पंढरीची माय , माझी पंढरीची माय

  • @surajshinde2897
    @surajshinde2897 Před 4 lety +210

    3:19 ला जेव्हा मृदुंगाच्या आवाज येतो आईशप्पथ अंगावर शहारा येतो राव ....पुंडलिक वरदा हरी वट्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय..⛳

  • @poonammali6946
    @poonammali6946 Před 10 dny +3

    कोण कोणाला हे गाणं आवडलं ❤

  • @yogeshdehade2257
    @yogeshdehade2257 Před 12 dny +1

    खरंच भाग्यवान मानतो मी स्वतःला ह्या महाराष्ट्र भूमीत जन्म झाला

  • @nikhilhere3526
    @nikhilhere3526 Před 5 lety +2672

    दररोज एकदातरी हे गाणं ऐकतं असे कोण आहे का??♥️

    • @akashkhomane4842
      @akashkhomane4842 Před 5 lety +22

      Ho mi..te pan khup vela

    • @sushantshinde4394
      @sushantshinde4394 Před 5 lety +13

      मी ऐकतो.....khup meaningfull song ahe

    • @MrKdr01
      @MrKdr01 Před 5 lety +11

      आहे भावा।।

    • @nikhilhere3526
      @nikhilhere3526 Před 5 lety +14

      मी सुद्धा दररोज ऐकतो ..जणू सवयच लागली आहे ...♥️

    • @rohitsawant8246
      @rohitsawant8246 Před 5 lety +7

      होय मी आहे

  • @shrinivaskatkamwar1144
    @shrinivaskatkamwar1144 Před 5 lety +164

    I am from pandharpur
    अभिमान वाटतो..
    जय हरी विठ्ठल..

  • @ganeshgardare2128
    @ganeshgardare2128 Před rokem +3

    आजच्या आषाढी एकादशी निमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sharadjandrao507
    @sharadjandrao507 Před 5 dny +2

    एकचं नंबर अभंग वाणी मनापासून खुप छान आहे आशा चं पध्दतीने पुढेही ऐकत राहु

  • @MrUdaykadam
    @MrUdaykadam Před 5 lety +177

    विठ्ठलाच्या पायाखालची वीट जेवढी महत्वाची तेवढेच या गाण्याचं लिखाण - अख्ख गाणं उभं आहे त्या शब्दांवर !!
    गुरू ठाकूर - अप्रतिम!!

    • @shivananad6824
      @shivananad6824 Před 5 lety +1

      अजय अतुल.. आणि गुरू ठाकूर

    • @shivananad6824
      @shivananad6824 Před 5 lety +2

      Description box madhe
      Lyrics - ajay atul and guru thakur
      Lihilay...

    • @GaneshPawar-vq2fg
      @GaneshPawar-vq2fg Před 5 lety +1

      डोळे पाणावले माऊली श्रद्धा अजून दृढ झाली पृथ्वी जल ब्रह्मांड विठ्ठल

    • @sujatawani1429
      @sujatawani1429 Před 5 lety

      Very nice song

    • @swatishivekar2083
      @swatishivekar2083 Před 5 lety

      @@shivananad6824 👌👌👌👌👌👌

  • @arnavproperties9311
    @arnavproperties9311 Před 5 lety +124

    कळस नको सोनियाचा पायरी मिळाली हो सावळ्या सुखात इतकी ओंजळी भरावी हो
    धन्य धन्य आहेत अजय अतुल तुम्ही

    • @ashishdhagepatil9458
      @ashishdhagepatil9458 Před 4 lety +1

      कळस नको सोनियाचा पायरी मिळाली हो सावळ्या सुखात इतकी ओंजळी भरावी हो

  • @rajanisuroshi4715
    @rajanisuroshi4715 Před 10 měsíci +2

    असा एकही दिवस जात नाही
    ज्या दिवशी मी हे गाणं नाही ऐकत
    हे गाणं जिवंत करणार आहे
    माझी विठू माऊली 🙏🚩🚩🌹👍👍
    माझी पंढरीची माय
    जय महाराष्ट्र

  • @user-og1nl7cv7t
    @user-og1nl7cv7t Před 10 dny +4

    मला गर्व आहे मी मराठा असल्याची ❤❤❤

  • @sadhnapatil4833
    @sadhnapatil4833 Před 3 lety +68

    मराठी असल्याचा नेहमी गर्व होतो. गाणं सुरु झालं की आनंदी वातावरण होऊन जात. simplicity always best...

  • @niranjanjoshi3212
    @niranjanjoshi3212 Před 3 lety +52

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    ‘मी’ तुज्यात विरता माझी
    राहीलीच ओळख काय
    माझी पंढरीची माय
    माझी पंढरीची माय
    🙏🙏🙏🙏🚩🙏🙏🙏🙏

  • @Bhushanpatil491
    @Bhushanpatil491 Před rokem +3

    अजय अतुल तुम्हाला मानाचा मुजरा यार
    काय lyrics असतात तुमच्या गाण्याचे
    जस काही आपण पंढरपुरात उभे आहोत आणि
    आमचा सावळा हरी समोर उभा आहे असा भास गाणे ऐकताना होतो
    आणि काय आवाज मस्त
    मराठी चित्रपटसृष्टीला अशोक काका आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यानंतर तुम्हा दोघांसारखे गायक
    लाभले हीच या मराठी चित्रपटसृष्टीची खरी कमाई
    जय हरी विठ्ठल

  • @mukeshbansod5415
    @mukeshbansod5415 Před rokem +2

    हे माऊली मला 20 वर्ष झाले ,
    मी तुमचा आशीर्वाद ची वाट भगतो ❤