या मंदीरात देवी ही छतावरती आहे | कांबी | kambi | कांबी महालक्ष्मी मंदीर | महालक्ष्मी मंदीर कांबी

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 06. 2022
  • #maharashtradesha
    #maharashtradeshavlogs
    कांबी kambi हे गाव नगरपासून एकशेपाच, तर शेवगाव या तालुक्याच्या ठिकाणापासून पस्तीस किलोमीटरवर आहे. ते महालक्ष्मी मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. गंमत म्हणजे कांबी kambi गाव नगर, बीड, जालना व औरंगाबाद या चार जिल्ह्यांच्या सीमेवर येते! महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या देवीनंतर कांबीच्या kambi महालक्ष्मी देवीची महती सांगितली जाते. परिसरातील नवरात्रीत भाविक नऊ दिवस मंदिरात राहून कडक उपवास करतात. मंदिर ऐतिहासिक हेमाडपंथी शैलीत बांधलेले आहे. kambi
    यादव घराण्याचा उदय महाराष्ट्रात बाराव्या शतकात झाला. दृढ प्रहार हा राजा यादव घराण्याचा संस्थापक होय. त्या घराण्याची राजधानी देवगिरी येथे होती. यादव राजांनी अनेक मंदिरांची निर्मिती कांबी kambi व तेथील परिसर येथे केली आहे. हेमाडपंथी स्थापत्यशैली यादवांच्या काळात विकसित झाली असल्याने त्या पद्धतीची मंदिरे निर्माण केली गेली आहेत. कांबी kambi
    कांबीचे kambi महालक्ष्मी मंदिर हे भव्य आहे. ते पूर्वाभिमुख आहे. मंदिरामध्ये अनेक ठिकाणी दगडांवर शिल्पकाम केलेले आढळते. मंदिरातील महालक्ष्मीची मूर्ती विलोभनीय आहे. ती दरवाज्यासमोर नसून, छतावर कोरलेली आहे. महालक्ष्मी मंदिरात एक शिवलिंगही आहे. त्या शिवलिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे शिवलिंगाजवळ नंदी नाही! मंदिरामध्ये आडव्या खांबावर एक शिलालेख कोरलेला असून, त्यात मंदिर निर्माण करणाऱ्या यादव राजाविषयी माहिती दिलेली आहे. त्या शिलालेखाचे वाचन ब्रह्मानंद देशपांडे यांनी केले आहे. खांबावर सुबक नक्षीकाम केलेले आहे. मंदिराच्या बाहेर नवीन बांधलेल्या सभामंडपात काही वीरगळ उभ्या करून ठेवलेल्या दिसून येतात. मात्र, मंदिराची दुरवस्था झालेली आहे. पुरातत्त्व खात्याने या पुरातन वास्तूचे जतन व संवर्धन करावे व परिसर विकासाला चालना द्यावी, अशी मागणी कांबी kambi ग्रामस्थांची आहे.

Komentáře • 23

  • @rahulgawade7858
    @rahulgawade7858 Před rokem +2

    सर तुमचे खुप आभार; आमच्या गावाच्या मंदिराची माहिती सर्व महाराष्ट्रात पोहचवली. मी कांबी येथील रहिवासी आहे. खुप छान आहे मंदिर.

  • @pradnyakalyankar7966
    @pradnyakalyankar7966 Před 2 lety +3

    खूप छान videos आहेत , प्राचीन मंदिरे हि ऐतिहसिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहेत, ही महत्त्वाची वारसा स्थळे आहेत, आशा महत्त्वपूर्ण वारसा स्थळांची माहिती देण्याचे लोकांना त्याबाबत जागृत करण्याचे मोठे कार्य करीत आहात त्याबद्दल अभिनंदन, म्हसवड तालुका माण, जिल्हा सातारा येथे श्री सिद्धनाथ जोगेश्वरी मंदिर आहे तेथे , ते देखील प्राचीन हेमाडपंथी बांधणीचे आहे.

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs  Před rokem

      खरोखरच मनापासून धन्यवाद तुमचे 😊👍🏼

  • @pradnyakalyankar7966
    @pradnyakalyankar7966 Před 2 lety +2

    प्राचीन हेमाडपंथी मंदिरांची माहिती videos च्या माध्यमातून मिळते , अप्रतिम video आहे

  • @medhakamble3828
    @medhakamble3828 Před rokem +1

    छान माहिती.आख्यायिकेनुसार पार्वतीचे मंदिर असायला पाहिजे,पण इथे महालक्ष्मीचे मंदिर आहे.
    हे समजले नाही.

  • @yogesh_kale
    @yogesh_kale Před 2 lety +3

    Apratim mahiti video bhau 👍👍

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs  Před 2 lety

      दादाराव मनापासून धन्यवाद 😍🙏🚩

  • @kartikchandlethakur6847
    @kartikchandlethakur6847 Před rokem +3

    मी कांबी कडून कांबीला रातो

  • @itihasachyaPaulkhuna
    @itihasachyaPaulkhuna Před 2 lety +1

    छान व्हिडिओ झाला दादा👌

  • @adityakature
    @adityakature Před 2 lety +1

    Nice Info Dada 👏👏

  • @RAJMALAMUSIC
    @RAJMALAMUSIC Před 2 lety +1

    ❤️❤️❤️❤️

  • @mohangouli6032
    @mohangouli6032 Před 2 lety +1

    ❤️❤️

  • @AkhandBharatAB1
    @AkhandBharatAB1 Před 2 lety +1

    🚩🚩🚩🚩👌👌👌👌

  • @kadamkrushna5802
    @kadamkrushna5802 Před 2 lety +1

    Great first comment

  • @vandanabarange4146
    @vandanabarange4146 Před 2 lety +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👣👣👣👣👣👣👣👣

  • @Ghumakkad_Sachin
    @Ghumakkad_Sachin Před rokem

    Episode 1 Trirashmi-Pandav caves, Nashik
    czcams.com/video/73CUfQCD4H4/video.html
    Episode 2 Trirashmi-Pandav caves, Nashik
    czcams.com/video/oNXdBVe--w0/video.html
    Episode 3 Trirashmi-Pandav caves, Nashik
    czcams.com/video/5Taed5aYcqw/video.html
    Kanheri caves, Mumbai:
    czcams.com/video/VaqWBSUpCXk/video.html
    Lothal-Indus Valley Civilization:
    czcams.com/video/Gw_gluB0gyg/video.html
    Dholavira- Kutch Sindhu culture:
    czcams.com/video/xrxliZ7eZuM/video.html
    Karle caves, Lonavala:
    czcams.com/video/kOxBIkb3mPo/video.html