सांगली | मालकाविना चालणारी बैल गाडी,"सोन्या बैलाची" पंचक्रोशीत चर्चा | Golden bull | सोन्या बैल

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 06. 2019
  • सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील काळमवाडी हे साडे चार हजार लोकसंख्येचे गांव आहे... याच गावात शिवाजी साळुंखे हे शेतकरी राहतात.. त्यांना चार मुले आहेत.. आणि शेती 10 एकर आहे.. त्याच्या कडे गाई आणि म्हैस अश्या ब्बल 40 जनावरे आहेत..
    शिवाजी साळुंखे यांच्या घरच्या देशी गाईचे सोन्या हा बैल झाला.. तो गेल्या 10 वरश्यापासून त्याच्या कडे आहे.. आपल्या मुला प्रमाणे ते सोन्याला जपतात.. तर सोन्या हा तसा पहिल्यापासूनच हुशार आहे.. तो कोणहल मारत नाही.. जे सांगितले जाईल ते तो ऐकत असतो.. पण शिवाजी हे वैरण गोळा करत असताना बैल आपोआप पुढे जायचा आणि एके दिवशी तो आपोआप दूध डेअरी वर गेला.. त्यावेळी पासून बैल हा विना मालकाचा दूध घालून येत आहे.. सोन्या हा तब्बल 7 ते 8 वर्ष झाले विना मालकाचा डेअरीला जात आहे..
    सोन्या बैल हा सकाळी उठल्यावर शेताकडे जातो.. त्यानंतर तो दूध घेऊन तब्बल 3 किलो मीटर गावाकडे जातो.. त्याच्या गाडीत पाच कँन असतात त्यामध्ये 200 लिटर दुध असते.. विशेष म्हणजे हे दूध न सांडता तो जात असतो.. तर अगदी एका माणसा प्रमाणे रोडच्या कडेने जात असतो.. एखादी गाडी माघून आली की साईडला जातो.. आणि गावातून जाताना कुठे वळायचे आहे तेथे टर्न घेतो आणि डेअरी गाठतो..
    सोन्याची वाट सर्व गावकरी पाहत असतात.. आणि जर सोन्याने गावात एन्ट्री केली की लोक सोन्या आला रे म्हणून त्याला कुटुहुलाने पाहतात.. आणि जर ज्या दिवशी सोन्या गावात गेला नाही तर सोन्या का आला नाही अशी चर्चा सतत गावात सुरू असते.. अगदी लहानपणापासून ते वयोवृद्ध लोक सोन्याची वाट पाहत असतात.. आणि त्याचा लळा या गावाला लागला आहे..
    आमचा गावात दूध संकलन करण्यासाठी गेले 20 वर्ष दूध डेअरी आहे.. डेअरीत दूध घालण्यासाठी कोण्ही सायकल वरून तर कोण्ही चालत येत असते.. पण सोन्या बैल हा विना मालकाचा बैल गाडी घेऊन येतो.. तो गेल्या अनेक वरश्यापासून आमच्या डेअरीत येत आहे.. आम्ही रोज त्याची वाट पाहत असतो.. सोन्या आला की डेअरी पशी गर्दी जमते..
    गावात सोन्या बैल आला की त्याचे फोटो काढण्यासाठी तरुण वर्ग गोळा होतात.. तसेच पै पावणे आले की सोन्याला विचारत असतात.. सोन्या बैल हा गावचा वैशिष्ट्य झाला आहे.. माणसाला जेवढे कळत नसेल तेवढे या जनावराला कळते. त्यामुळे सोन्याचे सगळ्यांना आचार्य वाटत आहे..
    #SONYA_BAIL
    #सोन्या_बैल
    लोकसंदेश_न्यूज_सोन्याबैल

Komentáře • 482

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe4142 Před 3 lety +7

    सोन्या बैल हा खरंच सर्वांसाठी आदर्श आहे,असं आम्हाला वाटतं ह्या "सोन्याला" उदंड आयुष्य लाभावं हीच त्या भगवंताकडे मनापासून प्रार्थना!

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 Před dnem

    खरंच खूप हुशार आहे तुमचा सोन्या बैल . खूपच कौतुकास्पद आहे सोन्या बैल .सलाम आहे सोन्या बैलाला आणि त्याच्या मालकाला . सोन्या बैलाला उदंड आयुष्य लाभो .हिच ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @tanajiraohubale1031
    @tanajiraohubale1031 Před 3 lety +26

    अशी जनावरांना भरपूर आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @aabaaher8128
    @aabaaher8128 Před 5 lety +64

    व्वाह सोनू …

  • @sachinchaure1315
    @sachinchaure1315 Před 3 lety +3

    सलाम या सोन्याला आणि त्याच्या आपल्या या मालकावर असलेल्या प्रेमाला 😘😘😍😍😍

  • @ashashedage9572
    @ashashedage9572 Před 4 lety +9

    हीच जबाबदारी एखाद्या माणसाला दिली असती तर रोज चार पाच लिटर दूध गायब झाले असते व त्या ठिकाणी पाणी घालून ते दुध डेरीमधे गेले असते हा फरक सोन्यात व आपल्या मध्ये आहे

  • @firozkirana8745
    @firozkirana8745 Před 4 lety +15

    मेरे भारत कि शान जय किसान सलाम ईस शोनीया को भगवान ईसे लमब्बी उमर दे

  • @milindduse9750
    @milindduse9750 Před 3 lety +1

    खरोखरीच सोन्यासारखा प्रामाणिकपणा प्रत्येक मनुष्याने अंगिकरायला पाहिजे. सदरील बातमीचे सादरीकरणही अत्युकृष्ट असे झाले आहे. बातमी पाहणाऱ्याच्या मनात निर्माण होणाऱ्या उपप्रश्नाचा उकलही सुरेखरीत्या उलगडत बातमी सांगून ती अतिशय आकर्षक केली आहे, लोकसंदेश वृत्त वाहिनीस पुढील यशस्वी वाटचालिस्तव हार्दिक शुभेच्छा व सर्वांचे मनःपुर्वक अभिनंदन.

  • @savitaborate9860
    @savitaborate9860 Před 3 lety +5

    सलाम सोन्याला उदंड आयुष्य लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना🙏🙏🙏

  • @Ramshinde2874
    @Ramshinde2874 Před 4 lety +7

    सोन्या चे मालक चे जन्मोजन्मीची नातं असेल.,... लयभारी

  • @Adityakhandarevlogs1
    @Adityakhandarevlogs1 Před 3 lety +1

    सलाम सोन्या खुप हुशार आहे

  • @sukhdevdeshmukh7022
    @sukhdevdeshmukh7022 Před 4 lety +58

    सोन्या

  • @Sam_441
    @Sam_441 Před 3 lety +3

    Very nice aase judge pahile navaye wonderful surprise God bless ur Sonya nice ❤️❤️❤️❤️👍👍

  • @anilgawande7401
    @anilgawande7401 Před 5 lety +64

    खूप खूप कौतुकास्पद बाब....उदंड आयुष्य लाभो

  • @reshmareshmassaladallu2620
    @reshmareshmassaladallu2620 Před 5 lety +30

    खरं सोनु तुझ्या नावा प्रमाणेच आहे तु

  • @sachingodase3838
    @sachingodase3838 Před 4 lety +54

    सलाम या बैलाला आणि धन्याला

  • @Chinmayjadhav-wr4eo
    @Chinmayjadhav-wr4eo Před 5 lety +2

    खुप छान सोन्या तुला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @arjunmali8909
    @arjunmali8909 Před 3 lety

    फारच छान आहे. सोन्या सोन्यासारखे काम करतो. त्याला सुंदर कपडे घाला.

  • @mangalasawant2913
    @mangalasawant2913 Před 4 lety +1

    Sonya khup khup tula aayushya Milo, love you so much.... Goa.

  • @ayushgaming8062
    @ayushgaming8062 Před 3 lety +8

    येवढा प्रामाणिक सोन्या आज पर्यंत मी कधीच पाहिला नाही ‌.. सोन्या is a great