Story of MSRTC's Central Workshop Dapodi (C.W.D.) | कहाणी एसटीच्या दापोडी कार्यशाळेची

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • ही कहाणी आहे आशिया खंडातील एकेकाळच्या सर्वात मोठ्या बस बांधणी कार्यशाळेची. बस फॉर अस फाउंडेशन सादर करीत आहे "कहाणी दापोडी कार्यशाळेची". आपण सर्वानी आज पर्यत कधी ना कधी एसटी बस मध्ये प्रवास केला असेलच. महाराष्ट्राच्या पाठीवर असे कोणतेही गाव नाही जिथे एसटी बस जात नाही. काही जण या एसटीला लालडब्बा म्हणतात तर काही लालपरी. पण तुम्ही कधी विचार केला आहे का कि आपण ज्या लालडब्ब्यातून किंवा लालपारीतून प्रवास करत आहोत ती कशी बनते, कुठे बनते? चला तर मग या विशेष डॉक्युमेंट्रीतून माहिती घेऊ एसटीच्या फॅक्ट्रीची अर्थातच दापोडी वर्कशॉपची. एसटीचे बस बांधणीसाठी महाराष्ट्रात एकूण तीन वर्कशॉप कार्यरत आहेत. दापोडी पुणे, चिखलठाण औरंगाबाद आणि हिंगणा नागपूर. यातील दापोडी पुण्याचे वर्कशॉप हे मुख्य वर्कशॉप असून बस बॉडी बिल्डिंग क्षेत्रातील आशिया खंडातील एके काळचे सर्वात जुने आणि मोठे वर्कशॉप समजले जाते ज्याला इंग्रजीत CWD अर्थात Central Workshop Dapodi या नावाने ओळखले जाते. बस बॉडी बिल्डिंग हे दापोडी वर्कशॉप चे मुख्य काम असले तरी त्याच बरोबर, जुन्या बसेस चे रिकंडिशनिंग आणि री बॉडी बिल्डिंग, टायर रेमोल्डींग आणि इंजिन रिकंडिशनिंग हि कामे देखील मोठ्या स्तरावर येथे केली जातात. वर्षाला सरासरी एक हजार बसेस ची निर्मिती आणि त्याचाही दुप्पट बसेसचा ची दुरुस्ती आणि पुनर्रबांधणी येथे केली जाते. तर पाहूया या वर्कशॉपचा रोमांचकारी ७० वर्षांचा ऐतिहासिक प्रवास.
    Bus For Us Foundation
    ➡️ Supporters of State and Local Transport Undertakings
    ➡️ Promoters of Public Transport
    ➡️ Friends of Passengers
    Follow & Visit us @
    Website - busforus.in/
    Facebook - / busforusfoundation
    Instagram - / busforusfoundation
    Tweeter - / thebusforus

Komentáře • 575

  • @BusForUsFoundation
    @BusForUsFoundation  Před 4 lety +20

    अवश्य पहा, "कथा १९४८ साली सुरु झालेल्या पहिल्या एसटीची"
    czcams.com/video/ozy8bgNsVOs/video.html

    • @pradipdarekar5192
      @pradipdarekar5192 Před 3 lety +2

      अहमदनगर (माळीवाडा) ते पुणे अशी धावली होती..

    • @sanjayshinde6506
      @sanjayshinde6506 Před rokem +1

      1 जून 1948 रोजी पहिली एस. टी बस सुरू झाली होती

  • @ankush07ankush89
    @ankush07ankush89 Před 5 lety +155

    *प्रवाशांनो, तुम्ही लाखो-कोटींच्या गाडीमध्ये फिरा, खूप हौस-मौज करा परंतू एस्.टी. मधून प्रवास करण्याची कधीही लाज बाळगू नका किंवा कमीपणा वाटून घेऊ नका. कधी ना कधी तरी संकटकाळी तीच तुमच्या मदतीला धावून आली असेलही किंबहुना यापुढे येईलही*
    -
    *एक एस्.टी. प्रेमी*

    • @pramodgunjkar8687
      @pramodgunjkar8687 Před 5 lety +5

      लय भारी एष्टीची सवारी जास्त प्रवास मी केला नागपुर ते पुणे व पुणे ते नागपुर दहा वषे

    • @ankush07ankush89
      @ankush07ankush89 Před 5 lety +2

      @@pramodgunjkar8687
      👍👍👍

    • @supremeenterprises3916
      @supremeenterprises3916 Před 4 lety

      czcams.com/video/qpV8w7kMBMc/video.html
      Check this

    • @vishalkhandait3039
      @vishalkhandait3039 Před 3 lety

      Amol

  • @ganeshshinde5474
    @ganeshshinde5474 Před 5 lety +60

    माझे वडील तिथेच काम करायाचे 2008 ले ते रिटायर्ड झाले 2017 21जानेवारी ला त्याच निधन झाल वडील लाचा पगारावलरच आमच घर चालायच बहीनीच शिक्षण आणि लग्न वडीलांचा पगारावर झाल आमच नवीन घर पण धन्यावाद st dapodi workshop

  • @sandipdeore9153
    @sandipdeore9153 Před 3 lety +7

    अतिशय सुंदर मांडणी...बघताना एक क्षण देखील लक्ष हटले नाही...मनापासुन आभार आपले एस टी चा इतिहास आणि ओळख करून दिल्याबद्दल...!!!

  • @vinayakgavali4328
    @vinayakgavali4328 Před 5 lety +45

    ST ही वाट पहायला लावते 😅 पण त्यातही काय वेगळीच मजा असायची..
    छान होती video 🤘👍

  • @PrashantChindarkar
    @PrashantChindarkar Před 5 lety +42

    अंगावर काटा आणि डोळ्यात अश्रू हेच वर्णन करेन ह्या छायाचित्रफितीचे. खूप सुंदर माहितीपट.
    #vaatpahinpnstnechjaeen

    • @meerakshirsagar8604
      @meerakshirsagar8604 Před 5 lety

      Nice

    • @VK-xw4yz
      @VK-xw4yz Před 5 lety +2

      अंगावर काटा येणे म्हणजे भीती वाटणे, मराठीची वाट नका लावू हो अशी...अंगावर शहारा आला असं म्हणा

    • @PrashantChindarkar
      @PrashantChindarkar Před 5 lety +1

      @@VK-xw4yz ठीक

    • @VK-xw4yz
      @VK-xw4yz Před 5 lety +1

      @Rahul Gaikwad अंगावर रोमांच येत नसतो, शहारा येणे हेच बरोबर आहे

    • @supremeenterprises3916
      @supremeenterprises3916 Před 4 lety

      czcams.com/video/qpV8w7kMBMc/video.html
      Check this

  • @jayeshmanje.1853
    @jayeshmanje.1853 Před 4 lety +4

    खूप छान डॉक्यूमेंट्री. महाराष्ट्राच्या जडणघडणीत खूप मोठं योगदान आहे ST चं. कोकणची लालपरी सर्व सामान्यांच हक्काचं वाहन.👌👌👍

  • @surajsalunke8754
    @surajsalunke8754 Před 5 lety +39

    खुप खुप छान माहिती दिलीत आणि निवेदन सुध्दा अतिशय सुंदर उत्तम प्रकारे सादर केले आहे

    • @vasantdhumal2901
      @vasantdhumal2901 Před 2 lety +1

      एसटी बस. शिवाय. महत्वाची सुचना प्रवास. करावा.तो.सरकारी.एसटी. ने

  • @prathameshparab4293
    @prathameshparab4293 Před 5 lety +84

    खूप सुंदर व्हिडिओ आहे ....माझं पण स्वप्नं आहे एस् टी महामंडळात यायचं ड्रायव्हर म्हणून ........

    • @maheshojale
      @maheshojale Před 5 lety +2

      आपणास शुभेच्छा! मनापासून प्रवाशांची सेवा करा व महामंडळाचा लौकिक वाढता ठेवा.

    • @supremeenterprises3916
      @supremeenterprises3916 Před 4 lety

      czcams.com/video/qpV8w7kMBMc/video.html
      Check this

    • @KrushnaDeshamukh-nl4ow
      @KrushnaDeshamukh-nl4ow Před 3 lety

      सेम आहे..भाऊ👍👍👍

    • @KrushnaDeshamukh-nl4ow
      @KrushnaDeshamukh-nl4ow Před 3 lety

      @@maheshojale धन्यवाद! ड्रायव्हर लोकांची मदत करा.🙏🙏

    • @dk6237
      @dk6237 Před 3 lety +1

      @@maheshojale jara dream tri mothe bga tikde tri kanjuspna

  • @MH12_MH04
    @MH12_MH04 Před 5 lety +14

    अतिशय सुरेख मांडणी..पुण्यात असणारी अजून एक ऐतिहासिक वास्तू.

  • @abhijeetnaik7577
    @abhijeetnaik7577 Před 5 lety +11

    अतिशय सुंदर .माझे काका security officer होते तिथे.मी स्वतः 2 वर्ष तिथे बालपनी होतो.

  • @mohankulkarni9658
    @mohankulkarni9658 Před 5 lety +2

    दापोडी सेंट्रल एस टी वर्कशॉप ची डॉक्युमेंटरी खूपच छान वाटली. वर्कशॉप च्या यशोगाथेत तज्ज्ञ कर्मचारी व कुशल अधिकाऱ्यांनी महत्वाचा वाटा उचलला आहे. सर्वांचे अभिनंदन व भावी प्रगतीकरिता शुभेच्छा...।।।।।।।।।।।।

  • @balkrishnawavhal3675
    @balkrishnawavhal3675 Před rokem +1

    धन्यवाद!!!!
    फारच छान माहितीपूर्ण विश्लेषणात्मक
    माहितीपट.
    एस टीम च्या सुरूवातीच्या *निळ्या*
    रूपाचा ऊल्लेख हवा होता.
    एस टी>>>सर्वसामान्य माणसाच्या प्रवासाच्या
    गरजा माफक दरात पुर्ण करणारी *जीवनरेखा*
    होय!!! 卐ॐ卐

  • @shubhampukale1208
    @shubhampukale1208 Před 5 lety +1

    कार्यशाळा एकदम मस्त आहे, सर्व काही मेन्टेन आहे, आणि तेथील लोक ही खूप सपोरटीव्ह आहेत, मी एक मेकॅनिकल इंजिनीयर आहे माझा शेवटच्या वर्षीचा प्रोजेक्ट मी याच वर्कशॉप मध्ये पूर्ण केला आहे, मला तेथील वर्क मॅनेजर साहेब मा. इ. मु. वण्यालोलु सर ,कोपर्डे सर आणि सौ. गिरी मॅडम याचे खूप मार्गदर्शन लाभले👍👍

  • @balkrishnawavhal3675
    @balkrishnawavhal3675 Před rokem +1

    धन्यवाद >>>बस फार अस,
    महाराष्ट्राची *धमनी* व जिव्हाळा एस टी !!!
    आपले त्यासंदर्भातील सुंदर,ओघवत्या भाषेत
    ऊत्कृष्ठ सादरीकरण असलेले व्हीडीओ फारच
    सुंदर!!!! 卐ॐ卐

  • @balasahebgotarne5749
    @balasahebgotarne5749 Před 4 lety +4

    लालपरी च्या जन्माची कहाणी...म्हणजे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची बस होय...दापोडी मध्यवर्ती कार्य शाळा, एस.टी ची निर्मिती एक सत्य कहाणी....अनेक कर्मचारी यांची जोड होय.S.T.BUS,#एस्. टी.कामगार #आम्ही घडलो एस्. टी.मुळे

  • @maheshb5718
    @maheshb5718 Před 5 lety +2

    ६०-७० वर्षांपासून अखंड सेवा पुरवणारी लाल परी आज ही स्पर्धात्मक युगात तग धरून आहे.🚌🚌🚌.
    पुढील ध्वनीचित्रफित ही बस आगार,विभागीय कार्यालये,कामगार यांची कथा आणि व्यथा मांडणारी असावी आणि तिकिट आकारणी पद्धतीत होत गेलेले बदल या विषयांवर आधारभूत असावी.

  • @sagardhatombe5067
    @sagardhatombe5067 Před 4 lety +2

    सर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आपली लाल्परी ही अशीच धावत जाऊ दे आणि तिच्यामध्ये बदल होत जाऊ दे आपली महाराष्ट्राची शान लाल्परी जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @madhuratamhankar2273
    @madhuratamhankar2273 Před 5 lety +20

    महाराष्ट्राची लाल परी
    खुपचं मस्त जुण्या आठवणी

  • @bhushanpawar1323
    @bhushanpawar1323 Před 5 lety +7

    Khup mast...
    Proud of MSRTC

  • @aniketpangam5100
    @aniketpangam5100 Před 5 lety +9

    मला अभिमान आहे माझे वडील एस्. टी. मध्ये चालक म्हणून काम करत होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मुंबई साठी चालू झालेली सुपर डिलक्स बस चालवायची पहिली संधी त्यांना मिळाली होती.

  • @sagarj1874
    @sagarj1874 Před rokem +1

    Nostalgic !
    Khup sundar banavla aahe video.

  • @mangeshparmar4544
    @mangeshparmar4544 Před 5 lety +4

    Wow. Amazing what a history of MSRTC bus. Maharashtra buses are one of my favourite and best buses. 😃

  • @SachinPatil-up8yh
    @SachinPatil-up8yh Před 4 lety +1

    खूप छान लालपरी आजही महाराष्ट्राच्या सेवेत आहे होती आणि वर्षानुवर्षे अशीच सेवा करत राहील अशी अपेक्षा माझी लाल परी MSRTC

  • @amitkadam7856
    @amitkadam7856 Před 5 lety +15

    खुप छान
    एक विनंती करतो की अजून सखोल माहीती अर्जीत करून आनखी एक विस्त्रुत ध्वनीचित्लफीत बनवावी.
    धन्यवाद🙏

  • @yogeshgonde7606
    @yogeshgonde7606 Před 2 lety

    एकदम झकास, सुंदर, अप्रतिम, काम करणाऱ्या ची प्रसिद्धी आवश्यक.

  • @hrishikeshwasankar1621
    @hrishikeshwasankar1621 Před 5 lety +18

    Voice and language assembly amazing...

  • @BusForUsFoundation
    @BusForUsFoundation  Před 5 lety +89

    मित्रहो आपण दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद. एसटीचा कधीही न सांगितला गेलेला इतिहास जगासमोर आणण्याचा हा आमचा प्रयन्त सदैव सुरूच राहील. पुढील माहितीपट कोणत्या विषयवर असावा हे आम्हला नक्की कळवा.

    • @pranitmusic3680
      @pranitmusic3680 Před 5 lety +5

      प्रथम आपले मनापासून धन्यवाद व आभार आपण एसटीचा इतिहास ज्या पद्धतीने दाखवले आहे खरच अप्रतिम आहे..पन त्याच बरोबर माझी एक आपणास विनंति आहे, जर आपणास शक्य असेल तर ही एसटी ज्या कर्मचार्यांमुळे यशस्वी वाटचाल करु शकली, स्वता मधे जे बदल घडवून स्पर्धेच्या युगात टिकून आहे त्याला कारणीभूत म्हणजे हेच ते एसटी कर्मचारी..यांची अवस्था आज खुपच दय नीय होउन बसली आहे...आणि त्यांची परिस्थिति तेव्हाच सुधरेल जेव्हा त्यांच्या कामाचा योग्य मोबदला मिळुन त्यांच कुटुंब मानसिक आणि शारीरिक रित्या स्थिर होउन जगू लागेल तेव्हा कुठ आपण केलेल्या कष्टाच सार्थक झाल अस त्याला वाटेल..
      शक्य झाल्यास एसटी कर्मचार्याची व्यथा व कथा दाखविल्यास..तो आपला सदैव ऋणी असेल..धन्यवाद.

    • @jaswantpadam4417
      @jaswantpadam4417 Před 5 lety

      khub chaan watala tumcha video pahun best wishes maaja kadun ani barach mahiti miliali hindi athva angreezit pan banava lookna mahita padeel kahi chuki jaala assal taar maala shama kara karan maajha marathi matru basha nahi hai mee sikh aahye

    • @nitishsalunkhe1692
      @nitishsalunkhe1692 Před 5 lety +2

      Pune kasa ghadla, Marathi film industry right from Dadasaheb phalke, V shantaram,.. evolution of lavani, powada, tamasha.. Bhakti movement started by Sant dnyaneshwar to today's warkari sampraday.. Kesari and other newspapers history.. Ganesh utsav..

    • @parthburse1295
      @parthburse1295 Před 4 lety

      रिकामी चलवतील परंतु हात दखावल्यावर थाम्बनार नाही ती म्हणजे st बस

    • @sharukhpatel721
      @sharukhpatel721 Před 4 lety

      avinash more ek dam brobar bollat bahu ST chya karmachareynchi vyatha manda .

  • @jatinmalekar6314
    @jatinmalekar6314 Před 5 lety +8

    कम्माल....हॅट्स आॅफ टू दापोडी वर्कशाॅप...आणि आपली लालपरी एस् टी...
    आणि डाॅक्यूमेंट्री सुंदर झालीये

  • @SameerShaikh-zj8kz
    @SameerShaikh-zj8kz Před 5 lety +4

    I am also ST family my father was driving 35 years I proud to be part of this family I am staying ST Colony last 25 years such a good memory and good friends I miss my friend and place

    • @user-bx3vc6qv8i
      @user-bx3vc6qv8i Před 5 lety +1

      एक नंबर आहे आपला महाराष्ट्र

    • @wasimshaikh39
      @wasimshaikh39 Před 4 lety

      Ho barobar bhau ani India pan

  • @sanjaykanitkar4796
    @sanjaykanitkar4796 Před rokem

    खूप छान इतिहास दर्शन
    माहिती व सादरीकरण फारच सुंदर
    हार्दिक शुभेच्छा

  • @shrenikmagdum7199
    @shrenikmagdum7199 Před 3 lety +3

    एक ST कर्मचारी म्हणून मला खूप आवडला हा विडिओ....
    यातल्या बर्‍याच गोष्टी मलाही माहित नव्हत्या...
    धन्यवाद 🙏🙏

  • @ankush07ankush89
    @ankush07ankush89 Před 5 lety +1

    *अगदी लहानपणापासून आपले भावनिक व जिव्हाळ्याचे नाते एस्.टी. सोबत जोडले गेले आहे...*
    *माझ्या लाडक्या एस्.टी. चे कोटी कोटी आभार*

  • @atullendave7450
    @atullendave7450 Před 5 lety +11

    Aditya Sir Rane khup mast video banvla ahe. Khup important mahiti bhetli thank you Aditya Sir 😊😍🙏

  • @pramodshetye8065
    @pramodshetye8065 Před 4 lety

    एसटी चे दापोडी कार्यशाळेचा माहितीपट छान माहिती दिलीत.धन्यवाद

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh Před 3 lety +1

    खुपच छान माहितीपूर्ण व्हिडिओ.

  • @roshanshinde9539
    @roshanshinde9539 Před 5 lety +1

    खंरच एसटी चा असा इतिहास कधी कुठेच दिसला नाही खुप छान वाटलं 🤙🏻❣️🤙🏻👌👌👌😍

  • @babannatu5900
    @babannatu5900 Před 2 lety +1

    ही पद्धत आजही लोकांना चांगली रुजवली तर सुजलाम सुफलाम होईल एसटी फक्त पारदर्शकता पाहिजे ,,, टेंडर पद्धतीने नको जय महाराष्ट्र जय हिंद भारत माझा देश आहे मी भारतीय असल्याचा मला अभिमान आहे

  • @animalsandbirdslovertukara2058

    Abhiman ahe mazya msrtc chi... Jay maharashtra desha 👌🏼👌🏼👌🏼👌🏼😘😘🥰🥰🥰

  • @nanduborude
    @nanduborude Před rokem +1

    खूप छान माहिती दिली. 👍👍👍

  • @sandeepambekar11
    @sandeepambekar11 Před 3 lety

    मला लहानपणापासून एस टी आवडते.अगदी आजही..व्हिडिओ बद्दल धन्यवाद.

  • @rahulnagmal2999
    @rahulnagmal2999 Před 5 lety +6

    Very nice documentary! So much of information about this workshop! It’s very close to my home, but wasn’t aware of the history. Thank you for sharing. Feeling nostalgic now.

  • @ameytulaskar5634
    @ameytulaskar5634 Před 5 lety +1

    खुप छान व्हिडिओ..

  • @shivs8681
    @shivs8681 Před 5 lety +91

    मला अभिमान आहे..
    मी दापोडी कार्यशाळेत काम करत असल्याचा...

    • @karanshitkal
      @karanshitkal Před 5 lety +2

      मित्रा माजा ITI fitter जालाय तर मला काम मिळेल का तीथे .pलीज coll 8208706359

    • @vaibhavk008
      @vaibhavk008 Před 5 lety +1

      असेच छान काम कर आणी सम्पूर्ण योगदान दे कामात

    • @supremeenterprises3916
      @supremeenterprises3916 Před 4 lety +1

      czcams.com/video/qpV8w7kMBMc/video.html
      Check this

    • @sagardhatombe5067
      @sagardhatombe5067 Před 4 lety +1

      लाल परी चा अभ्यास घ्यावा भावा

    • @vishalshinde.145
      @vishalshinde.145 Před 4 lety +2

      Ithe kunihi yeu dhakat ka firayala

  • @vijaymulekar6073
    @vijaymulekar6073 Před 3 lety

    फारच सुंदर आहे. जरी ST च्या बसेस बघत
    आलो आहे तरी hya डॉक्युमेंटरी मुळे खुप छान माहिती मिळाली. Jai hind

  • @shivkumarkumbhar3365
    @shivkumarkumbhar3365 Před 5 lety +3

    एकच नंबर खूपच छान माहिती दिली आहे जुण्या आठवणी ताज्या झाल्या
    जय महाराष्ट्र

  • @vinayakpisal2055
    @vinayakpisal2055 Před 4 lety

    अशी माहिती दिली तर फार मोठा उपयोग सरकारने करून कामगार खुश करावे.

  • @dnyaneshrotake9614
    @dnyaneshrotake9614 Před 3 lety +2

    Such a fantastic story.wonderfull and fantastic ❤️❤️❤️

  • @purnesh8889
    @purnesh8889 Před 5 lety +3

    मी दापोडीत च राहतो आईकुन खूप अभिमान वाटला जय महाराष्ट्र 🚩

    • @MayurS700
      @MayurS700 Před 5 lety +1

      Same here mi sangvit rahto

    • @supremeenterprises3916
      @supremeenterprises3916 Před 4 lety

      czcams.com/video/qpV8w7kMBMc/video.html
      Check this, like, share & subscribe.

  • @sureshjadhav7645
    @sureshjadhav7645 Před 4 lety

    फारच उपयुक्त माहिती. धन्यवाद.

  • @VinodWaghmare333
    @VinodWaghmare333 Před 5 lety +2

    Khup Chaan Video Banvla ahe
    जुन ते सोन

  • @shubham9294
    @shubham9294 Před 5 lety

    आपण एका वेगळ्या मुद्द्याला हात घातला त्या बद्दल खरंच आपले आभार. डॉक्युमेंट्री अतिशय उत्कृष्ट होती.
    खरंच कधी विचार केला नव्हता की अर्ध आयुष्य ज्या लाल डब्ब्यात गेलं त्याची येवढी मोठी प्रवास यात्रा असेल. खरंच आपले आभार.

  • @rovanvaz1701
    @rovanvaz1701 Před 5 lety +9

    great documentry!
    Keep it up... make more such videos

  • @keshavjoshi8788
    @keshavjoshi8788 Před 4 lety +1

    खरच्. खूप छान माहिती. मी सन 1981 पासून महामंडळाच्या सेवेत ईले विभागात होतो.मला ही माहिती नव्हती की दापोडी विभागीय कार्यशाळेत एव्हडया चांगल्या प्रकारच्या बसेस तयार झालेल्या आहेत. खरच् तेथील कार्यशाळेचे कर्मचारी कौतुकास्पद आहेत.

  • @maheshmorye673
    @maheshmorye673 Před 4 lety +1

    खुप छान माहिती दिली कि एसटी महामंडळा इतिहास आहे खुप छान

  • @nitinkumarzol5940
    @nitinkumarzol5940 Před 5 lety +2

    जय हिंद जय भारत...
    .जय महाराष्ट्र.. जय MSRTC

  • @walidsiddiuq4677
    @walidsiddiuq4677 Před 5 lety +1

    खूप छान. सुपर विडियो. 👌👌👌👌

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Před 3 lety

    फारच छान माहितीपट सादर केला .. फार आनंद वाटला. पुर्ण माहिती मिळाली राज्य परिवहन महामंडळ दापोडी वर्क शॉप ची 🙏🙏🙏👍👍 आता नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून राज्य परिवहन महामंडळाने सुधारणा करावी. जिपिस कार्य प्रणाली. बस स्थानकावर विनाकारण होणारी गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात. बसची देखभाल दुरुस्ती वेळच्या वेळेवर व्हावी विषेता लांब पल्ल्याच्या बसची, 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @harishchandra1275
    @harishchandra1275 Před 5 lety +1

    💐खूप छान
    माझ्या लहानपणापासून प्रवास केलेल्या सर्व ST बसेस आठवल्या.
    व्हिडीओ पाहून या बसेस बरोबर जोडले गेलेले भावनिक नाते प्रकर्षांने जाणवले.👌

  • @msrtcgamingstation8249
    @msrtcgamingstation8249 Před 3 lety +2

    Khupch chaan #MSRTC❤️

  • @satyajeetkamble619
    @satyajeetkamble619 Před 3 lety

    खूप मस्त माहिती सांगितली, ST चा आमच्या जडणडणीमध्ये खूप मोठा वाटा आहे महाराष्ट्र ST ही माझ्यासाठी खूप जिव्हाळ्याचा विषय आहे.

  • @krishnalaad1825
    @krishnalaad1825 Před 5 lety +3

    This workshop also participate in cultural activity in Ganpati festival and decoration is actually run small ST buses models which is amazing

  • @vlogswithhitesh2349
    @vlogswithhitesh2349 Před 4 lety +1

    अतिशय सुंदर माझी आवडती एस्टी मला अभिमान आहे की मी एस्टी वर्क्क शोप चा शेजार च संगविगाव त राहतो आहे. जय महाराष्ट्र

  • @MrHR-uy5hh
    @MrHR-uy5hh Před 5 lety +1

    Nice video sir.................. CWD मध्ये माजी १ वर्षाची अॅपरेंटशिप झालीया तरी आम्हाला ऐवढ काही माहीती नाही ... Thanks sir

  • @ashokmarathe8367
    @ashokmarathe8367 Před 2 lety

    अतिशय सुंदर व्हिडिओ आहे,msrtcच्या सर्वांनाच मनापासून हार्दिक शुभेच्छा 🙏🌹💐😃

  • @shubhambhagwat7054
    @shubhambhagwat7054 Před 3 lety

    👌👌मस्त खुप छान आणि व्हिडिओ👌👌

  • @salluinmumbai
    @salluinmumbai Před 5 lety +1

    अतिशय माहितीपूर्ण व्हीडीयो

  • @sunilsathe369
    @sunilsathe369 Před 3 lety

    एकदम मस्त वडिल या ठिकाणी कामाला होते आणि मी दसऱ्याच्या दिवशी या ठिकाणी जात असे

  • @vishalsurwase2321
    @vishalsurwase2321 Před 5 lety +1

    Khupch chan mahiti dilit apan ..
    Me swataha dapodi t rahto .this is my birthplace.
    I feel very proud

  • @arnaav4179
    @arnaav4179 Před 2 lety +2

    This is why we love Maharashtra

  • @mayurgade30
    @mayurgade30 Před 4 lety

    अप्रतिम... खूपच सुंदर

  • @rubendaniel8248
    @rubendaniel8248 Před 4 lety +1

    Wonderful video of MSRTC,

  • @aniketpangam5100
    @aniketpangam5100 Před 3 lety +1

    माझ्या वडिलांनी पहिली सावंतवाडी बोरीवली सुपर डिलक्स बस चालवली होती...सोहळाच होता तो. 🤩

  • @maheshthorat466
    @maheshthorat466 Před 3 lety

    खुप छान माहिती मिळाली आपल्यामुळे

  • @sagareeid
    @sagareeid Před 5 lety +4

    अश्वमेध राहीली ना सर
    🚩जय हिंद जय महाराष्ट्र 🚩

    • @sagareeid
      @sagareeid Před 5 lety +1

      मराठी माणसाला
      आपला नेहमीच सपोरट राहील
      पन तो (शरद पवार ) नसावा...

  • @omkar0306
    @omkar0306 Před 5 lety

    अगदी आणि पुरेपूर माहिती, उत्कृष्ट निवेदन व सादरीकरण आणि त्यासमांतर दर्जेची चित्रफीत... खरच अभिमानकारक. मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏

  • @sunildeshpande4551
    @sunildeshpande4551 Před 5 lety

    धन्यवाद ,जुन्या आठवणी जाग्या केल्यात.
    मी सत्तरीच्या दशकात इथे उमेदवारी केली होती.
    पुढे याचा खूप उपयोग झाला.

  • @bhupendrasonawane
    @bhupendrasonawane Před 5 lety +3

    Truely very nice and wonderful documentary... well done.

  • @KDada-vh5cn
    @KDada-vh5cn Před 5 lety +1

    खूप सुंदर 😘👌
    संभाषण कौशल्य अप्रतिम 💐

  • @dineshambhore1430
    @dineshambhore1430 Před 4 lety

    खुप छान माहीती दिली . अशीच माहीती कंङक्टर व ड्राइव्हर यांच्या बाबतीत द्यावी जसे तांच्या सोयी सुवीधा अडचणी

  • @yasinnadaf1952
    @yasinnadaf1952 Před 5 lety +2

    माजे वडील एस टी बस काम करत होते हा एस टी बस चा प्रवास मी खुप जवलूण पाहीला आहे आता पर्यंत असा कोणी जनसेवाक कोणी नाही ना कोणी होईल

  • @ajoyin8283
    @ajoyin8283 Před 4 lety

    Majhya prantacha maan Maharashtrachi shaan ST Mahamandal. Nice video, jai Maharashtra.

  • @pankajubale9047
    @pankajubale9047 Před 5 lety

    Sampurn bhartat...aplya maharatracya bus sundar ahet....love you lal pari

  • @rjaybhay
    @rjaybhay Před 5 lety

    खूपच छान!!कितीतरी दिवसांनी चांगलं काहीतरी पाहिल youtube वर!!

  • @mukundbane
    @mukundbane Před 5 lety

    khup mast aahe video ... old is gold ... lalpari , asiyad, hirkani, Volvo Shivneri, shivshahi , ashwamedh... dapodi workshop always greatt..

  • @yogeshgawari4477
    @yogeshgawari4477 Před 3 lety

    खुप छान👌 विडियो बनवला आहे

  • @user-lh6xd6jm1d
    @user-lh6xd6jm1d Před 5 lety +1

    खुप छान माहिती

  • @yogeshsalunke127
    @yogeshsalunke127 Před 4 lety

    Khup chan..ekdum crisp aani detailed madhe video banaval..baryach goshti mahit navhtya..aikun aani baghun bara vatala..keep it up..Ha ST cha pravas Museum madhe sadar karayala havey..

  • @shamuphade735
    @shamuphade735 Před rokem

    खूप भारी होता व्हिडिओ

  • @GANESHPATIL-de6fx
    @GANESHPATIL-de6fx Před 5 lety +12

    my father was in this ST workshop and I m proud of st workshop

  • @nileshghadigawkar2861
    @nileshghadigawkar2861 Před 5 lety

    Atisunder awesome video ST bus ne pravas karu ani aplya ST bus chi shaan vadhavu...

  • @nageshkadam1232
    @nageshkadam1232 Před 5 lety +1

    khup chaan mast...Lal pari...👌👌

  • @ashaysawant1990
    @ashaysawant1990 Před rokem

    👌 superb documentary.

  • @sachingavit9508
    @sachingavit9508 Před 3 lety

    Tya aplya sobti hotya kadhi tari school,college,love,race,travel extra miss you lalpari 💔

  • @kiranmenkudale5294
    @kiranmenkudale5294 Před 4 lety +1

    खूपच छान अप्रतिम माहिती

  • @unseentravelstories838
    @unseentravelstories838 Před 5 lety +1

    khup bhari ahe pahnya sarkh ahe he sagla

  • @sohamkulkarni2805
    @sohamkulkarni2805 Před 5 lety +1

    Very nicely documented....got historical data about msrtc

  • @swapnilpawar4363
    @swapnilpawar4363 Před 2 lety

    अतिशय उत्तम 👍🙏

  • @abhishekpingale7170
    @abhishekpingale7170 Před 3 lety

    Mala tar ya kalatli st bus lal pari khup khup Aavdte😍😍😍😍

  • @Atmakeeawaz
    @Atmakeeawaz Před 3 lety

    अतिशय छान. खूप खूप धन्यवाद.