गड आला पण सिंह गेला

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 03. 2024
  • मठपिंप्रीच्या सिंहांनी गड ही राखला आणि सिंह ही ....!!
    जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत जिल्ह्यात द्वितीय क्रमांकावर उमटवली मोहर .....!!.
    "महाराष्ट्राला छत्रपती शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाची उज्वल परंपरा आहे, हा इतिहास पाठ्यपुस्तकात तर शिकवला जातोच पण आमच्या शाळेतल्या चिमुकल्यांनी आज त्यांच्या बहारदार सादरीकरणाने तो इतिहास इथे जिवंत उभा केला. म्हणून म्हणावं वाटत की, आमच्या मठपिंप्रीच्या सिंहांनी गड ही राखला आणि सिंह ही ....!!" असे सुनिता गोलवड मॅडम म्हणाल्या.
    नुकत्याच पार पडलेल्या अहमदनगर जिल्हा परिषद आयोजित जिल्हास्तरीय विविध गुणदर्शन व सांस्कृतिक स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मठपिंप्री ता. जि.अहमदनगरने नेत्रदीपक यश संपादन करत सांस्कृतिक सादरीकरण लहान गट इयत्ता पहिली ते चौथी सादर केलेल्या गड आला पण सिंह गेला या ऐतिहासिक सादरीकरणाने जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक प्राप्त करत धवल यश मिळवले आहे. "विद्यार्थ्यांच्या मेहनतीला आलेले हे गोंडस फळ त्यांना भविष्यातील आणखीन मोठ्या यशासाठी प्रोत्साहन देईल. छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचे इतके छान सादरीकरण पाहून आमचा ऊर अभिमानाने भरून आलं आहे." असे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.शरद बोरकर म्हणाले.
    शाळेच्या या सादरीकरणाचे शिक्षणाधिकारी श्री.पाटील साहेब गटशिक्षणाधिकारी श्री. बाबुराव जाधव साहेब विस्ताराधिकारी चंद्रकांत सोनार, कापरे साहेब, निर्मला साठे मॅडम, रामनाथ कराड ,केंद्रप्रमुख सौ मंदा माने मॅडम शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब कापसे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद बोरकर उपाध्यक्ष अरुण नवसुपे आणि सर्व सदस्य तसेच मठपिंप्री गावचे सरपंच संजय कदम पा. उपसरपंच सुरेखाताई शरद नवसुपे, सेवा सोसायटी चेअरमन अशोक कामठे, व्हाईस चेअरमन प्रकाश उकांडे, मार्गदर्शक सुनिता गोलवड मॅडम, श्रीनिवास एल्लाराम सर यांनी विशेष अभिनंदन केले.
    या कार्यक्रमासाठी मेकअप सौ.पल्लवी गणेश काळोखे यांनी केले. तर सौ.कमल परसराम नवसुपे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी मोठे योगदान दिले.ड्रेपरी राजलक्ष्मी केडगाव यांनी सहकार्य केले तसेच व्हिडिओ शूटिंग श्री नितीन पंडित सर वाकोडी शाळा यांनी केले.
    गड देखावा डिझाईन अरूण तडका, फॅब्रिकेशन विनोद बोगा, संकल्पना नारायण मंगलारम् सर, शुभेच्छा संपूर्ण ग्रामस्थ मठपिंप्री

Komentáře • 2

  • @narayan_mangalaram
    @narayan_mangalaram Před 4 měsíci +1

    धमण्यामधील रक्त सळसळ करायला लावणारे बहारदार सादरीकरण .....🎉
    मनःपूर्वक अभिंनंदन .....🎉🎉

  • @user-ud4bj5tr4m
    @user-ud4bj5tr4m Před 4 měsíci +1

    छान आहे 🎉🎉