टर्कीमधील ४७०० वर्ष जुनं शिव लिंग! | Sadhguru Marathi

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • #turkey #shivalinga #rumi #europe #consecration #temple
    सद्गुरू - २००९ मध्ये, जेव्हा आम्ही कोन्या, टर्की मध्ये होतो, तेव्हा आम्ही रुमीच्या स्मारकावर गेलो. तिथे फिरत असताना, मला एक मोठं लिंग बागेत पडलेलं दिसलं. त्यामध्ये काही भेगा दिसत असल्याने थोडं नुकसान झालेलं, पण तरी ते अजूनही जिवंत होतं.
    जेव्हा मी चौकशी केली, तेव्हा ते म्हणाले की ते जवळपास ४,७०० वर्ष जुनं आहे. ४,७०० वर्षांपूर्वी तिथे पाच फुट लिंग प्रस्थापित केलेलं परिपूर्ण मंदिर होतं.
    माझ्यासोबत असलेल्या काही लोकांना मी रुद्राक्ष वापरून दाखवलं की कसं वेगवेगळ्या जागी ते लिंग वेगवेगळ्या प्रकारे कार्य करतं. लिंगाचा प्रत्येक बिंदू वेगवेगळा होता. याच्यावर ज्यांनी काम केलं, त्यांना ते काय करत आहेत हे चांगलंच माहित होतं. हे काही प्राथमिक स्तराचं कार्य नव्हतं, हे एक अगदी सूक्ष्म काम होतं.
    युरोपच्या बहुतेक भागांत अशा प्रकारची मंदिरं आणि प्राण प्रतिष्ठित जागा होत्या, पण जेव्हा ‘माझाच मार्ग खरा’ हा दृष्टीकोन निर्माण झाला, तेव्हा ही मंदिरं धुळीस मिळवली गेली. आज, खूप थोडी अस्तित्वात आहे, मुख्यतः भारतात आणि काही दक्षिण आशियायी देशांमध्ये.
    ही मंदिरं कधीच प्रार्थनेची स्थळं म्हणून बांधली गेली नव्हती. हेतू असा होता की लोकांना तिथे जावं आणि काही वेळ तिथे बसून त्याचा लाभ घ्यावा. तुम्ही फक्त तिथे बसून तिथली उर्जा ग्रहण करणं अपेक्षित असतं कारण या प्राण प्रतिष्ठित जागा आहेत.
    .
    #SadhguruMarathi
    #सद्गुरू ​​​
    योगी, आत्मज्ञानी आणि दिव्यदर्शी असलेले सद्गुरू एक आगळेवेगळे अध्यात्मिक गुरू आहेत. प्रगल्भतेचा आणि व्यवहारिकतेचा अनोखा संगम असलेले त्यांचे आयुष्य आणि काम, आपल्याला याची आठवण करून देतं, की 'योग', हे आजही आपल्या काळासाठी अर्थपूर्ण आणि अत्यंत महत्वाचं एक विज्ञान आहे.
    #SadhguruApp (डाउनलोड करा)
    📱 onelink.to/sadh...
    अधिकृत सद्गुरू वेबसाइट
    🌎 isha.sadhguru.org​​​
    माती वाचवा मोहीम
    savesoil.org
    जागरूक पृथ्वी (कॉन्शिअस प्लॅनेट) घडवून आणण्यासाठी सहाय्यता करा
    🙏 isha.co/sangham...
    सद्गुरूंकडून मार्गदर्शित योग #Yoga आणि ध्यान #Meditations (ऑनलाइन विनामूल्य)
    🌼 isha.sadhguru.o...
    🌼 isha.sadhguru.o...
    सद्गुरूंच्या अधिकृत सोशल प्रोफाइलस् (सबस्क्राइब करा)
    🌐 / sadhgurumarathi​
    🌐 / sadhguru_marathi_official
    🌐 / sadhguru​marathi
    English -
    A 4700 Year Old Linga In Turkey
    / c8654yjvrfa

Komentáře • 1