आजी : कवितेची ओळ | Grandparents' Day | Spruha Joshi | Marathi Kavita

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • For Brand Collaborations, Partnerships, or inviting us to your place, drop an email to: Teamspruhajoshi@gmail.com
    _______________________________
    आजी: कवितेची ओळ
    आजीच्या सुरकुत्यांमध्ये दडली आहेत बालपणातली असंख्य पावलं.
    भूतकालीन शेणानं सारवलेल्या ओसरीपासून वर्तमानकाळाच्या व्हरांड्यापर्यंत चालत जाणारी.
    माझी आजी मृत्यूला जगण्याचं फुल वाहत असते दर पहाटे.
    ती स्वार होते श्लोक म्हणत वास्तवाच्या यानात
    आणि रोज हरवून जाते शहराच्या ढिगाऱ्यात
    आजीच्या ताज्या आठवणींचे देठ उगवले आहेत आमच्या संस्कृतीत.
    बाबा लिहीत असतात काहीतरी शहराबद्दल, कवींबद्दल, घरांबद्दल.
    स्वतःच्याच तुटत चालेल्या आतड्यांबद्दल.
    आजी मात्र गुपचूप शहर होत जाते बाबांच्या कवितेत किंवा चिमणी होऊन बसते
    बाबांच्या कुठल्याशा ओळीवर.
    आजीची कातडी मी जपून ठेवली आहे, माझ्या कवितेत.
    रोज तिची एक सुरकुती काढून एक कविता लिहितो.
    आजही तेच केले आहे.
    - संकेत म्हात्रे
    तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि Like, Share, Subscribe करायला विसरू नका.
    #SpruhaJoshi #Poems #Marathi
    Travel Vlog Playlist: • Travel Vlog
    खादाडी Playlist: • Khadadi Series
    गंमत गाणी Playlist: • गंमत गाणी
    _________________________________
    Credits
    ________________________________
    Produced by: Spruha Joshi
    Filming & Production Stills:
    Anirudha Joshi
    Kshitij Kulkarni
    Arya Patil
    Avdhut Tivarekar
    Editors:
    Tanishq Mohite
    Soham Kurulkar
    Graphics:
    Yogesh Dixit
    Managed by: Anurag Pathak
    ___________________________
    About Spruha Joshi :
    ___________________________
    Spruha Joshi is an Indian Marathi television, film, and theatre actress. She is also a poet and lyricist for films.
    Instagram: / spruhavarad
    Facebook: / spruhavarad
    Twitter: / spruhavarad
    ____________________________
    DISCLAIMER: This is the official CZcams Channel of Spruha Joshi. The Audio/Video is Strictly meant for Promotional purposes and is intended to Showcase the Creativity and work of the Artist Involved.
    __________________________________

Komentáře • 143

  • @suchemahajan9830
    @suchemahajan9830 Před rokem +4

    खूप छान.आजी ही संस्था हृदयावर राज्य करते अजूनही..

  • @shailasarode5733
    @shailasarode5733 Před 2 lety +6

    👌👌खूप सुंदर व भूतकाळात घेऊन गेली ही भावपूर्ण कविता. आज मीही आजी आहे तरी माझ्या आजीची आठवण प्रकर्षाने जाणवली या कवितेमुळे, धन्यवाद संकेत आणि स्पृहा. 🙏🏻🙏🏻

  • @ishavadodkar1159
    @ishavadodkar1159 Před 2 lety +3

    खूप छान सादरीकरण. आजी ही आठवणींची शिदोरी असते. या कवितेने ती आठवण परत करून दिली.

  • @vasudhakhandare3169
    @vasudhakhandare3169 Před 2 lety +2

    खूप खूप खोल आहे याचा अर्थ ... अप्रतिम स्पृहा

  • @arunasarwadikar9384
    @arunasarwadikar9384 Před rokem +1

    Farch sparshun jate hi kavita 👌👌

  • @kvisualtree
    @kvisualtree Před 2 lety +2

    Superb ! असा एकही दिवस जात नाही आजी-आजोबांच्या आणि दादर हिंदू कॉलनी च्या आठवणींशिवाय. असं नेहमी वाटतं आजी आजोबा कुठेतरी भेटतील. आजी-आजोबांबरोबरच्या memories
    लिहायच्या होत्या पण तजमत नव्हतं, नेहमी डोळ्यात पाणी यायचं पण थोडं थोडं लिहून ठेवलं.

  • @neetabhanage479
    @neetabhanage479 Před rokem +1

    कवितेच्या सुरुवातीलाच आजी चा चेहरा डोळ्यासमोर आला, माझी आजी सांगते तिचं लग्न त्या वयात झालंय जेव्हा मंडपात तिला खाऊ देऊन बसवलं होत....संगण्यामागचा उद्देश हाच की तिच्या इतक्या वर्षांच्या प्रवासात ज्याप्रकारे तिने अनेक बदलांना आत्मसात केल आहे..त्यासाठी hatsoff 👏❤️

  • @pranitadeshmukh5192
    @pranitadeshmukh5192 Před 2 lety +2

    आजीच्या स्पर्शाचीच आठवण झाली स्पृहा ताई तो मायेचा हात तीचे सुरकुतलेले हात स्पर्शुन गेले मनाला
    खुप खुप धन्यावाद ताई 😊😊🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @nishakabre482
    @nishakabre482 Před rokem +2

    अतिशय सुंदर कविता! स्पृहा तुझ्या तोंडून ऐकून आनंद द्विगुणित झाला.संकेतचंपण विषेश अभिनंदन!

  • @vishwaasmugalikar9580
    @vishwaasmugalikar9580 Před 2 lety +11

    Mazi ajji...maza pride.she was wife of martyar my grandfather who lost his life at age 32 during Hyderabad liberation movement.This freedom struggle was faught in 1948 after indiaan independence.she was zasichi Rani in our kulkarni(Mugalikar)family 🙏Thanks for choosing such poem.

  • @sukhadadanave2824
    @sukhadadanave2824 Před 2 lety +1

    नि : शब्द ...... असंख्य अलवार पदर उलगडले या कवितेने , आज्जी आजोबांबरोबर एकत्र असलेले असंख्य क्षण , एका आठवणीतून दुसऱ्या आठवणींमध्ये ..... आता जरी ते आपल्याबरोबर नसले तरी , आठवणी खूप कोरल्या गेल्या आहेत .... संकेत आणि स्पृहा , मन : पूर्वक धन्यवाद , ही कविता सादर केली त्याबद्दल 🙏🙏🙏 . अगदी बालपण दिसलेच , जाणवले , ❤️❤️❤️❤️

  • @ratnakorpe9763
    @ratnakorpe9763 Před rokem +1

    धन्यवाद स्पृहा. खुप सुंदर कविता तु अतिशय छान सादर केली, आणि खरेच अनंतात विलीन झालेल्या सगळ्या आजींची मनापासुन फक्त आठवणच नाही झाली तर एकेक सुरकुतीचा स्पर्श जाणवला.

  • @ashasawant948
    @ashasawant948 Před rokem +1

    मनाला चटका लावून जाणारी, आजी ची गोड आठवण.खूप सुंदर, खूप प्रेम.

  • @prabhakarjoshi2318
    @prabhakarjoshi2318 Před 11 měsíci

    खू sssss प छान कविता, आजीची आठवण करून देणारी. तिच अस्तित्व, मायेचा स्पर्ष, तिची वात्सल्यपूर्ण नजर , आणखी किती लिहावे , तितके कमीच वाटते, कविता ऐकली आणि डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या.
    स्पृहा, तुझ कविता वाचन दीर्घकाळ मनात रेंगाळतं.

  • @rekhakesare9880
    @rekhakesare9880 Před rokem

    Khup chan aahe. Aaji aathavali

  • @sanjaysawantofficial
    @sanjaysawantofficial Před 2 lety +2

    कोकणात माझी आजी सकाळी 4 वाजता उठून खणातल्या जात्यावर पीट दळताना ओवी बोलायची.
    काळया मटक्या मधे पिठी बनवायची त्याची चव लय भारी.
    आजी गाईच्या दुधापासून खरवस बनवायची
    खूप आठवणी आहेत आजीच्या ...
    कविता ऐकताना डोळे भरून आले . धन्यवाद स्पृहा ताई

  • @suvidyapanchpor6507
    @suvidyapanchpor6507 Před rokem

    खूप छान कविता वाचली स्पृहा आजीची आठवण आली आज आजीची आठवण आली तिचा सोज्वळ चेहरा आज तुझ्या कवितेमुळे आठवला धन्यवाद स्पृहा

  • @ojasKamthikar
    @ojasKamthikar Před 2 lety +1

    Mam उत्कृष्ट कविता... खऱ्या अर्थाने आजी आजोबांना समर्पित...

  • @manishachaudhari6897
    @manishachaudhari6897 Před rokem +1

    आजी म्हणजे मायेचा झरा... अप्रतिम कविता❤️... God bless you 🌹

  • @yaminisawant2325
    @yaminisawant2325 Před rokem

    Kharach khup chan spruha mam

  • @darshanakale6
    @darshanakale6 Před rokem

    dolyat pani aanle ekdam Kavitene aani tuzya sadarikarnane, aathwaninchya gawi neles Spruha!Khup khup thank you.

  • @shitalpatil9040
    @shitalpatil9040 Před rokem +2

    माझी आजी माझी जान आहे .
    गुजगोष्टींची खान आहे .
    मायेचा सदैव प्रेमळ हात आहे .
    गोड गोड खाऊंचा पेठारा आहे .
    दारी आलेल्या कोणालाही रिकाम्या हाती पाठवू नये ,
    ही तीची शिकवण आहे .
    परिक्षेत शून्य मार्क जरी मिळाले तरी प्रामाणिक गुणांना ही तीची भरघोस दाद आहे .
    साधी राहणी , उच्च विचार असा तिचा साधा भोळा स्वभाव आहे .
    शरीर थकल तरी कष्ट करणे हे तिच ठाम आहे .
    शिक्षणाच्या बाबतीत हयगय नाही ,
    "एक मुलगी शिकली तर , कुटूंब शिकत "
    हे तीच ब्रिदवाक्यच आहे .
    कुंटूबाचे हित हेच तीच्यासाठी सर्व काही आहे .
    ही मी लिहलेल्या चार ओळी माझ्या आजीसाठी....😊🌼

  • @profeetenterprises9088
    @profeetenterprises9088 Před 2 lety +3

    VERY, very emotionally relatable.. We, all share a very special bond with our Grandparents...and this poem provides you with that much needed warmth of their hug.. #RESPECT Sanket Mhatre and thanks a ton, Spruha for presenting it..❤

  • @bhaskarpandit767
    @bhaskarpandit767 Před 2 lety +1

    एक छान कविता, लहान होती पण महान होती, धन्यवाद

  • @neenaneena6205
    @neenaneena6205 Před 2 lety +1

    सुरेख.... तुझे कविता वाचन तर अप्रतिमच

  • @ojasKamthikar
    @ojasKamthikar Před 2 lety +2

    आणखी एका मस्त कवितेसाठी thank you Mam
    Just loved it ...

  • @soumyasakhee
    @soumyasakhee Před 2 lety +2

    माझी अत्यंत आवडती कविता आहे ही ! सुंदर सादरीकरण मॅडम ❤️❤️

  • @shubhadavyas8968
    @shubhadavyas8968 Před 2 lety +1

    नेहमी प्रमाणे खूप छान कविताही आणि सादरिकरणही!

  • @poojatendulkar7712
    @poojatendulkar7712 Před 2 lety +1

    Wahh! Kharach खास VDO 🙏माझी आई BMC teacher नोकरी करत असल्यामुळे २ ते ५ वर्षांपर्यंत आजीनी सांभाळ केला अगदी दुधावरच्या सायी सारखा❤️ बेळगावला college paryant pratyek सुट्टीत रहायला जायचे.खूप आठवणी आहेत न विसरण्यासारख्या😍 खूप छान कविता आणि तुझं सादरीकरण..Spruha 👌

  • @user-st6kc1uf2i
    @user-st6kc1uf2i Před 2 lety +1

    खूप खूप भूतकाळात घेऊन गेली कविता. Thank you स्पृहा.

  • @surekhadharmadhikari2352

    खरच आपल्या आजीच्या उबदार कुशीत गोधडीत तिच्या श्वासात थेट घेऊन जाते ...कविता.... अप्रतिम सादरीकरणही .... स्प्रुहा

  • @yogitadeshpande9498
    @yogitadeshpande9498 Před 21 dnem

    हृदयस्पर्शी .....❤❤

  • @riddhisiddhivlogs7856
    @riddhisiddhivlogs7856 Před 2 lety +2

    Spruhatai tuzi kvita ekun mala mazya aaji chi aathven aali 🥺😭🥺😭😭🥺

  • @madhavdole9788
    @madhavdole9788 Před rokem

    फारच सुंदर. आजीची आठवण नक्कीच आली. कविता खूप आवडली

  • @mangalwable7677
    @mangalwable7677 Před 11 měsíci

    खूप छान आहेकविता.

  • @ashwinni1052
    @ashwinni1052 Před 2 lety +1

    खूप छान.. रोजच आठवण येते तिची पण आज तिच्यासोबत spend kelela प्रत्येक क्षण डोळ्यांसमोर आले. Thank u 🙂

  • @shubhangijoshi4416
    @shubhangijoshi4416 Před rokem

    खूप सुंदर
    तिचीच सुरकुती काढून मी रोज एक कविता करतो
    अप्रतिम कल्पना ❤️

  • @nikitabhagwat2687
    @nikitabhagwat2687 Před rokem +1

    खूप छान कविता आहे. जियो संकेत, स्पृहा!!♥️♥️

  • @smitagadekar9362
    @smitagadekar9362 Před rokem

    अगदी आजीच डोळ्यासमोर उभी राहिेली,...तुझ्या आवाजातील आजीची कविता ऐकताना.... अप्रतिम 👌👌👌

  • @gaytrithorat8835
    @gaytrithorat8835 Před rokem

    खुपच अप्रतिम कविता आहे ताई... मी माझ्या आजी कडे लहानाची मोठी झाली त्यामुळे माझ तिच्या सोबत खुप घट नात आहे आणि ही कविता ऐकून तर ते नात अजुन घट झाल्या सारख वाटत आहे.... Thank you so much ताई इतकी सुंदर कविता ऐकवल्या बद्दल

  • @oruone1
    @oruone1 Před rokem

    …तू खूप गोड वाचलास... प्रत्येक शब्द छान उच्चारला. आणि संकेतची कविता आत्म्याशी बोलते..loved this!

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 Před rokem

    Grandparent's Day च्या निमित्ताने तुम्ही आजचे कवी संकेत म्हात्रे यांची 'आजी: कवितेची ओळ' हे काव्य सादर केलं.
    हे काव्य आजीच व्यक्तीचित्रणं तर आहेच पण, मला असं वाटतं की, हे काव्य कुठे तरी तीन पीढ्यांचं खोलवर नातं किंवा प्रवास दर्शवते, हे काव्य खुपचं खोल आहे. कवी संकेत म्हात्रे यांच्या काव्याची‌‌ ओळख करून दील्या बदल मनःपुर्वक आभार. अतिशय खोलवर भिडणारे मनस्पर्शी सादरीकरण. 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @prachisoman1844
    @prachisoman1844 Před 11 měsíci

    स्पृहा आम्ही तुझ्या छान छान कविता सादर करत असते आणि खरंच खूप छान ऐकत असताना वेळ दिवस कधी सम्पला कळत नाही सो तुझं कौतुक 🌹💐🌹💐🙌👍👍👍

  • @sayalithete2614
    @sayalithete2614 Před rokem

    Kharech ahe, Mazi ajji suddha mazya khupach javal hoti 👍😊 Happy Grand parents day 🎉🥳

  • @kalyanighayal1964
    @kalyanighayal1964 Před 2 lety +1

    आजी म्हणताच मन आगदी हळवं होत..दीड वर्षापूर्वी गेली माझी आजी...रोज सकाळी चहा करण्यापासून आठवते...माझ्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाची प्रिय व्यक्ती माझी आजी...तिच्या नुसत्या हाताकडे पाहिलं तरी त्यात माया भरलेली होती..

  • @vaijayantikulkarni5215

    खूप छान अनुभव आहेत तुमच्या सर्व कवितेत एक वेगळे पण असते ताई 👌👌🙏🏻🙏🏻

  • @ojasKamthikar
    @ojasKamthikar Před 2 lety +1

    ही कविता मला माझ्या आजोबांची आठवण करून देते जे त्यांच्या कामाच्या वागण्यात आणि प्रत्येक गोष्टीत परिपूर्ण होते...... Miss u today...

  • @maheksfoodworld874
    @maheksfoodworld874 Před 2 lety +1

    खूप सुंदर कविता आणि तुझं सादरीकरण ही सुंदर 👌🏻🌹🌹

  • @patilharshal4483
    @patilharshal4483 Před rokem

    खूप छान 👌👌👌👌...

  • @rushikeshchavan9570
    @rushikeshchavan9570 Před rokem

    Khup chhan

  • @suvarnachinti1140
    @suvarnachinti1140 Před rokem

    Khup sunder Ajji samor ubhi Rahili Thanks 🙏🏼

  • @vitthalgat0709
    @vitthalgat0709 Před rokem

    खूप भावनिक आणि ऊर्जा देणारी ही कविता आहे उत्तम सादरीकरण केल्याबद्दल स्पृहा तुझ कौतुक 🌹👍

  • @kshubha1
    @kshubha1 Před rokem

    खूप सुंदर कविता आणि भावपूर्ण
    वाचन. आजीची आठवण करुन देणारी कविता. 🌷

  • @shamar4408
    @shamar4408 Před rokem

    Aaji aajoba, ek jivhalyacha vishay..khup sunder kavita..

  • @mrunalinivadnerkar5335
    @mrunalinivadnerkar5335 Před rokem +1

    Thanku spruha 👌🙏

  • @ujartmaster1730
    @ujartmaster1730 Před rokem

    nice choose topic bcz all discussed about parent only u also advance discussion about our chilhood time best partner grandparents which also try to Happy 😊 us everyday.

  • @gopalkolekar2801
    @gopalkolekar2801 Před rokem

    खूप मस्त कविता ताई

  • @nitinvaidya3013
    @nitinvaidya3013 Před rokem

    खुप सुंदर कविता आहे भूतकाळात घेऊन गेली

  • @umadonkar6519
    @umadonkar6519 Před 2 lety +1

    Khup sunder Kavita

  • @nehaPatil-my2kl
    @nehaPatil-my2kl Před 2 lety +2

    खूप छान आवडली कविता...

  • @jayasaolapurkar6745
    @jayasaolapurkar6745 Před 2 lety +1

    सुंदर सादरीकरण आणि अप्रतिम कविता

  • @mohanmustikar7013
    @mohanmustikar7013 Před 2 lety +1

    khup chan hoti mazi aaji premal jashi mayachi savli

  • @prajaktapatil6870
    @prajaktapatil6870 Před rokem

    Tuza kavita vachan lekhan .pharach chan ahe.....aani tu hi

  • @padmajachoudhari4713
    @padmajachoudhari4713 Před 2 lety +1

    Khoop chhan ahhe kavita

  • @samruddhikadam2038
    @samruddhikadam2038 Před rokem

    👌👌😊💐💐🌹🌹❤️
    Khupach chan spruh
    माझ्या अज्जची आठवण करून दिली👌👌👌😊
    आणि तितकेच तुझे सुमधुर सादरीकरण नेहमी प्रमाणे👌👌👌👍😊💐💐💐

  • @manasikane5855
    @manasikane5855 Před rokem

    खूप छान

  • @mohininaik6793
    @mohininaik6793 Před rokem +1

    खूप छान कविता.मला पण आजीची आठवण झाली.माझी आजी , आपघातात एक पाय गमावला, त्यामुळे घरातच असायची, पण सर्वांच्या डोळ्यांनी जग पहायची.कुठलीच खंत,नाही. आनंदाने गजानन महाराजांची पोथी वाचायची.बसूनच घरात फिरायची.

  • @anjalikulkarni7429
    @anjalikulkarni7429 Před 2 lety +1

    आजीची आठवण नेहमीच असते. पण आज ती परत प्रकर्षाने परत खूप आठवली. धन्यवाद. स्पॄहा.

  • @ujartmaster1730
    @ujartmaster1730 Před 2 lety +1

    U R always best poet which describes all topics very well ways.

  • @shubhangikanse3480
    @shubhangikanse3480 Před 4 měsíci

    Majha Aaji sathi ek Chan Kavita mla banvun devu shkta tar khup Upkar hotil

  • @Luvya95
    @Luvya95 Před 2 lety +1

    Apratim Kavita

  • @kansearchana
    @kansearchana Před 2 lety +1

    खुप छान कविता

  • @urmiladeshpande3326
    @urmiladeshpande3326 Před rokem

    स्पृहा, तुझी शब्दांची फेक, सहजपणें काव्याचा मतितार्थ रसिकांपर्यंत पोहोचवण्याची तुझी पध्दत कौतुकास्पद आहे.तुझ्या स्वरचित कविता ही श्रवणीय असतात. आज ऐकवलेली तुझ्या मित्राची रचना पण खूप भावली मनाला.मी स्वताः चौसष्ठ वयाची असून, एका नातवाची आजी आहे.सुदैवानं अजून चेहेर्‍यावर अजिबात सुरकुत्या नाहीत माझ्या, पण ही कविता ऐकून, माझी आजी तर मला आठवलीच, व वाटून गेल, की येऊदे चेहर्‍यावर सुरकुत्य्, कदाचीत माझ्या नातवाला त्याच अप्रुपच वाटेल.मी स्वतःथोड लेखन करते.3 कादंबर्‍या, 2 कथासंग्रह व 10 नाटकं मी लिहीली आहेत.साहित्य प्रिय असल्यानं, मला तुझ विशेष कौतुक आहे.अशाच छान रचना कर व आंम्हाला ऐकव.धन्यवाद.आणी हो, तुझ महाराष्र्ट गीत अप्रतीम.

  • @dattakhalapure1898
    @dattakhalapure1898 Před 2 lety +1

    खुप खुप छान कविता...

  • @cancer4684
    @cancer4684 Před rokem

    Khup Chan kaviteche sadarikaran, nehamipramane spruhaniya. Mala ajji nahi, but Kavita eikun Chan vatale, mulat tuzhya tondun Kavita eikane Ani tuzha chehra pahun Chan vatate. Keep up the good work. 👈😃👍

  • @nileshjadhav5279
    @nileshjadhav5279 Před rokem

    Chan ahe hi kavita👌 maz hi mazya aaji ajobachyavar khup prem ahe मीही 1 kavita keli ahe mazya aaji ajobachyavar tyach 1 mekavar khup prem hot i miss alot

  • @akshatayadav9794
    @akshatayadav9794 Před 7 měsíci

    सुंदर

  • @sanjaymanwatkar6722
    @sanjaymanwatkar6722 Před 2 lety +1

    धन्यवाद 🙏🙏

  • @smitanagarkar9602
    @smitanagarkar9602 Před 2 lety +1

    खूप छान कविता ...👌👌❣️

  • @pranavvaidya5775
    @pranavvaidya5775 Před 2 lety +1

    कविता ऐकून आज आजीची खूप आठवण आली. माझ्या आजी-आजोबांच्या आठवणी मला अजूनही आनंद देतात कारण बालपणापासून मला त्यांची ओढ होती आणि मी जास्तीत जास्त वेळ त्याच्यासोबत घालवला आहे. आजोबांच्या गोष्टी आणि आजीच्या हातचे उत्कृष्ट पदार्थ मला अजूनही आठवतात. दोघांनी माझ्यावर केलेले सौंस्कार हे माझ्यासाठी शाश्वत शिक्षण संपत्ती आहेत. आज त्याच्याबद्दल इथे लिहिताना मी माझ्या पापण्यांना ताकीद देतोय करण प्रत्येक वेळी त्यांची आठवण मला भावनाविवश करते. आजी- आजोबांचं नातवांवर प्रेम हे खरंच बिनशर्त असतं. स्पृहा ताई आज तू ही कविता सादर करून परत एकदा माझ्या जुन्या गोड आठवणी जागृत केल्या.❤️

  • @lalitauplenchwar2895
    @lalitauplenchwar2895 Před rokem

    अतिशय भावूक आणि हळवी रचना,अप्रतिम सादरीकरण. ... 🙏🌹

  • @bhaktilalsare2105
    @bhaktilalsare2105 Před rokem

    म्सत👌

  • @riddhisiddhivlogs7856
    @riddhisiddhivlogs7856 Před rokem +1

    स्पृहाताई तू उत्कर्ष दादाच श्रीमंत महाराष्ट्र हे गान लिहिलं आहेस ना खूप छान मी ते गान जेव्हा एकते तेव्हा अंगाला कटा येतो मला फक्त तो शेवट चा अंतरा सांग ना

  • @jayshri_jj
    @jayshri_jj Před rokem

    Kharach aaji aajoba baddal khup Prem vatat

  • @shailadeokar2348
    @shailadeokar2348 Před rokem

    तुझी आजि कविता खुप काळजाला भीडणारी वाटली. मी युट्यूबवरील तुझ्या कविता पुन्हा पुन्हा वाचते. नव्हे ऐकते.मी ७० वयाची आहे.गुजरात मधे राहते.मुलगा अमेरीकेत लेकीच लग्न झाल.ती परगावी. सुनबाई अजुन यायच्या.हे आता मे. मधे गेले.मला ईतीहासात जास्त आवड. पाडगावकर. तुझ्या कविता खुप आवडतात. वार्धक्यात बाईला जो एकटेपणा येतो आयुष्याचा जोडीदार गेल्या नंतर त्यावर तु कविता लीहावी.अशी इच्छा आहे. आशा करते तु या आजीचा हट्ट पुरवशील.

  • @thoughtoftheheart7290

    संकेत भाई ..तु भारीच.🌹

  • @sanjaysvlog3159
    @sanjaysvlog3159 Před rokem

    खूप छान....
    मी पाच वर्षाचा असताना माझी आजी वारली होती.
    माझा उजव्या हाताच्या बोटांना आणि अंगठ्याला जन्मतः काही खोड आहेत.
    पुढे मी वयाने मोठा झाल्यावर डॉक्टरांनी सांगितले आपण हे ओपरेशन करुन ठीक करू शकतो....तेंव्हा माझे वडील म्हणाले...नको ह्याची आजी असे काही ही करायला मनाई करुन गेली आहे म्हणून आम्हाला हे असेच ठेवायचे आहे......
    हा असतो आपल्या आई वडिलांच्या बदल चा प्रेम आणि आदर ❤🙏

  • @sanjaysawantofficial
    @sanjaysawantofficial Před 2 lety +1

    कोकणातील गणपती उत्सवा मुळे काही व्हिडिओ बघू शकलो नाहीत पण आता नक्की

  • @manjupatel1644
    @manjupatel1644 Před 2 lety +1

    Khup Chan

  • @asmitashirgaonkar1020

    तू मी आपण होतो,अशी, सवयीचे प्रेम,अशा अर्थाची नवकोरं या कार्यक्रमात तू सादर केलेली कविता ,इथे सादर करशील का

  • @yogeshlokare6414
    @yogeshlokare6414 Před 2 lety +1

    Fantastic your development wow Great !! Spruha !!

    • @nitingolatkar7973
      @nitingolatkar7973 Před rokem

      Khup chaan kavita aahe mala khup avadali. Khare tar na mi aajobana pahile na aajila pan hya kavitemule te kase asavet hyachi kalpana aali. Hya baddal aani Sundar kavite baddal dhanyavad !!

  • @vaibhavjadhav4183
    @vaibhavjadhav4183 Před rokem

    छान

  • @AnusAcademy
    @AnusAcademy Před rokem

    Chan 🌼 🌼

  • @prachi2529Jadhav
    @prachi2529Jadhav Před rokem

    Khar tar aaji mahnje na sukhach gav
    Jivnat mahtvach as nav
    Ti kayam sobat asavi
    Tichya ch sathi kavita bahravi
    Kharch mazi aaji mahnje maz jag me jevha hi aajari padte na tevha sarvat aadhi mazi yete. Mazya pratek birthday na chukta mazya aavdicha shila aante. Me banvleli pratek kavita mazi aaji utsahane vachte Aaji. 😇😇

  • @amulyam.15
    @amulyam.15 Před rokem

    गावच्या खेड्यात त्या गावात त्य येद्यात मी पाहिलंय...
    लाईक मी स्पृहा फॉर my आज्ज्जीलु....
    Mi लिहिलेल्या प्रत्येक कवितेत ती असतेच
    माझी आज्जी

  • @poojadesai4475
    @poojadesai4475 Před rokem

    खरच समोरच आली आजी

  • @shubhangikanse3480
    @shubhangikanse3480 Před 4 měsíci

    Majhi aaji khup khup Sundar ani agdi ek devicha roop hoti aaj ticha 3 ra zala mi majha aaji la khup miss krta I love you Aaji 😢😢😢😢😢😢😢❤ 😭😭😭😭😭😭😭😭

  • @tejalchaudhari3421
    @tejalchaudhari3421 Před 2 lety +1

    Waiting

  • @tanajishinde8829
    @tanajishinde8829 Před 2 lety +1

    💐💐 शुभ संध्या 💐💐

  • @mangalwable7677
    @mangalwable7677 Před 11 měsíci

    अभिनंदन 0:35