जिवंत समाधी आणि संजीवन समाधी यातील फरक - जिवंत आणि संजीवन समाधी घेतल्यानंतर शरीराचे काय होते???

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 12. 2022
  • जिवंत समाधी आणि संजीवन समाधी यातील फरक
    ह्याचे उत्तर माझ्या अभ्यासातून या व्हिडिओद्वारे आपल्याला देत आहे.
    योगी, संत, महात्म्यांच्या, साधकांच्या ध्येयाची किंवा तपश्चर्येची शेवटची इच्छा म्हणजे समाधी अवस्था. पण जिवंत समाधी आणि संजीवन समाधी यातील फरक या व्हिडिओद्वारे आता आपण पाहणार आहे.
    सामान्यत: लोक जिवंत समाधी व संजीवन समाधी यात गल्लत करतात. त्यामुळे कोणा संत योगी महात्म्यांनी जिवंत समाधी घेतलेली असेल तर त्याला लोक संजीवन समाधीच म्हणतात. वस्तुत: संजीवन समाधी ही जिवंत समाधी पेक्षा खूपच वेगळी आहे. जिवंत समाधी घेतलेल्या महात्म्यांचा कालांतराने नैसर्गिक मृत्यू होऊनच देहपात होत असतो. परंतु या संजीवन समाधीमध्ये मृत्यूच होत नाही, देहत्याग घडतच नसतो. या संजीवन समाधीची प्रक्रिया अत्यंत जटिल व विलक्षण आहे. अनेक संत, महात्म्यांना ही प्रक्रिया सद्गुरुकृपेने ज्ञात असली तरी, श्रीभगवंतांच्याच आज्ञेने श्री ज्ञानेश्वर महाराजांनीच त्या प्रक्रियेचा अवलंब करून तशी संजीवन समाधी घेतलेली आहे. सर्व महात्म्यांनी मिळून तो केवळ श्री माउलींसाठीच एकमताने राखीव ठेवलेला विशेष अधिकार आहे, असे म्हणावे लागेल.
    संजीवन समाधीच्या प्रक्रियेचा सूचक संकेत श्रीसंत नामदेव महाराजांनी माउलींच्या समाधिवर्णनाच्या आपल्या अभंगांत केलेला आहे. श्री नामदेवरायांच्या गाथ्यात "श्रीज्ञानदेव समाधिमहिमा" नावाचे आणखी एक स्वतंत्र प्रकरण आहे. यात प्रत्यक्ष भगवान श्रीपंढरीनाथच, संतांच्या प्रेमळ विनंतीवरून माउलींचे व त्यांच्या समाधीचे माहात्म्य कथन करीत आहेत. या प्रकरणातही काही विशेष संदर्भ मिळतात. त्यात श्री सोपानदेवांच्या समाधीचा उल्लेख करताना श्रीपांडुरंग म्हणतात की, "त्यावेळी हा ज्ञानदेवही दिव्यदेहाने आमच्यासारखाच सासवडला येईल तुझ्या समाधीसाठी." माउलींच्या संजीवन समाधीत त्यांचा देहत्याग घडलेला नाही, हेच देवही येथे सूचित करीत आहेत.
    माउलींच्या संजीवन समाधीबद्दलचे विशेष... आता आपण जाणून घेऊया...
    माउलींनी श्रीभगवंतांना समाधीची परवानगी मागितल्यावर, देवांनीच त्यांना आळंदीच्या त्यांच्या स्थानाची माहिती दिली. म्हणजे माउलींना ते माहीत नव्हते असे नाही, पद्धत म्हणून त्यांनी देवांना त्याबद्दल विचारले. आळंदीच्या सिध्देश्वर मंदिराच्या समोरील नंदीखाली असणारे समाधिविवर हेच माउलींचे अनादिस्थान आहे. तेथेच त्यांनी या पूर्वी एकशेआठ वेळा समाधी घेतलेली असून ही त्यांची एकशेनववी वेळ होती समाधी घेण्याची. ...असे नामदेवराय सांगतात. तेथूनच ते पुन्हा पुन्हा दरवेळी अवतार घेऊन येत असतात. देवांच्या सांगण्यानुसार नंदी हलवल्यावर खालचे विवर मोकळे झाले. नामदेवरायांच्या चारही पुत्रांनी ते स्वच्छ करून त्यातील चौथ-यावर मृगाजिन वगैरे घालून समाधीची सर्व सिद्धता केली.
    आदल्या दिवशी, कार्तिक कृष्ण द्वादशीला प्रत्यक्ष श्रीभगवंतांनी स्वहस्ते दिव्य अन्न तयार करून माउलींना स्वत: भोजन वाढले . त्या अमृतमय अन्नामुळे माउलींच्या आत शरीरभर अमृतच तयार झाले.
    कार्तिक कृष्ण त्रयोदशीला सकाळच्या वेळी माउलींची पूजा झाल्यावर, एकीकडून श्री निवृत्तिनाथ व एकीकडून श्रीभगवंतांनी हाताला धरून माउलींना त्या समाधिविवराच्या आत नेले. तेथील आसनावर बसून माउलींनी डोळे मिटून तीन वेळा नमस्कार केला, आणि ते 'संजीवन समाधी'त गेले. त्यानंतर श्रीपांडुरंग व श्री निवृत्तिनाथ बाहेर आले.
    संजीवन समाधी साधण्यासाठी तत्त्वांचा तत्त्वांमध्ये नाथ संप्रदायोक्त पद्धतीने लय केला जातो. सद्गुरु श्री माउलींनी समाधीविवरात बसल्यानंतर याच पद्धतीने तत्त्वांचा लय करायला सुरुवात केल्यावर, ती प्रक्रिया उपस्थित सर्व संतांना डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहता आली. पृथ्वीतत्त्वाचा जलतत्त्वात, जलाचा अग्नीत, अग्नीचा वायूत व वायूचा आकाशतत्त्वात लय झाला. आकाशाचा लय कशातच होत नसल्याने ते भगवती शक्तीच्या आकाशाशी, चिदाकाशाशी तदाकार होऊन राहते. ही प्रक्रिया माउलींच्या देहावर घडताना उपस्थित संतांना प्रत्यक्ष पाहता आली. पृथ्वी व जलतत्त्वाचा लय झाल्यावर माउलींच्या स्थूल शरीराचा भाग अदृश्य झाला आणि त्याजागी तेजोमय मूर्ती दिसू लागली. तेजतत्त्वही लय पावल्यावर समोरची ती तेजाकृती देखील दिसेनाशी झाली व केवळ नादरूपाने प्रचिती शिल्लक राहिली. ते वायूतत्त्वही आकाशात लय पावल्यावर तो नादही मावळून गेला व माउलींची संजीवन समाधीची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सर्वांना समजले. "संजीवन समाधीचा अर्थ असा नाही की, माउलींनी देहत्याग केला. याच्या उलट प्रक्रियेने त्यांना केव्हाही हवे तेव्हा पुन्हा देहावर येता येते. मग ते जसे समाधीच्या पूर्वी होते तसेच पुन्हा आपल्याला दिसू लागतील." संजीवन सामाधीच्या रूपाने ते विश्वाकार होऊन राहिलेले आहेत.
    जिवंत समाधी आणि संजीवन समाधी यात हाच फार मोठा फरक आहे.
    श्री ज्ञानेश्वर महाराज हे नित्यअवतार असल्याने, आजही त्याच रूपाने समाधिस्थ राहून ते आपल्या भक्तांवर कृपाप्रसाद करीत आहेत. " कलियुगातील देव ज्ञानेश्वर महाराज आहेत."
    माउली हे जसे एकमेवाद्वितीय यूनिक ( Unique ) अवतार आहेत, तशीच त्यांची संजीवन समाधी देखील एकमेवाद्वितीयच आहे. त्यांच्यासारखे केवळ तेच ! अलौकिक, अद्भुत, अनिर्वचनीय आणि अपरंपार कनवाळू !! त्यांचे पावन नाम घेण्याची, त्यांच्या दिव्य चरित्राचे अनुसंधान राखण्याची आणि त्यांचेच स्वरूप असणारे त्यांचे वाङ्मय वाचण्याची, त्याचे मनन-चिंतन करण्याची संधी व सद्बुद्धी दोन्ही आपल्याला लाभत आहे, हेच माउलींची आपल्यावर अद्भुत कृपा असल्याचे प्रतीक आहे, यात शंकाच नाही ! या देवदुर्लभ भाग्यासाठी परमकनवाळू करुणाब्रह्म श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या श्रीचरणीं, सर्वांच्या वतीने कृतज्ञतापूर्वक अनंतकोटी दंडवत प्रणाम.
    धन्यवाद.
    चिंता नको भविष्याची, साथ तुम्हांला योगसद्गुरूंची.

Komentáře • 8

  • @anantraokulkarni2078
    @anantraokulkarni2078 Před 14 hodinami +1

    स्वतः घेउन पहाम्हणजे कळेल

  • @rakeshbharati1264
    @rakeshbharati1264 Před rokem +1

    सर खूप महत्त्वाचे विचार ऐकायला मिळाले आहे

  • @omrajenimbalkar2086
    @omrajenimbalkar2086 Před rokem

    अतिशय खुप छान विवेचन केले माऊली 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🙏🚩🙏🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @meghabharti5011
    @meghabharti5011 Před rokem +1

    बरोबर आहे सर

  • @tusharkolhe7096
    @tusharkolhe7096 Před dnem

    Jay shree Ram 🚩

  • @babasawant1983

    श्री स्वामी समर्थ

  • @SomnathGiri-mw2hy

    ओम नमो नारायण जय जय राम कृष्ण हरी नर्मदे हार

  • @UrmilaBharati.1111
    @UrmilaBharati.1111 Před rokem

    🌹अगदी अद्भुत माहिती दिली 🌹👍