v36.भावाला लेकी झाल्या..भयनी त्यानं इसरल्या. जाते ओवी. आधी descriptionवाचा. मगचvdo पाहणे बरे राहिल.

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • जात्या वरील गायिका:
    1. शिवाबाई फुलमंते
    2. शेषाबाई बडगिरे
    रा.खडी ता.पालम जी.परभणी
    3.संकल्पना : एम. आर. भालेराव
    4.सुत्रसंचालक व
    ऑर्गनायजर : शा. गोपाळ गोविंद एंगडे
    (सचिव: जनजागृती कला
    पथक खडी,
    ता.पालम जी.परभणी)
    पुर्वीच्या काळात जात्या वरील ओव्या ह्या भावा- बहिनिची मया यावर असायच्या, माय-लेकीची मया यावर असायच्या, बाप-लेकिची मया यावर असायच्या. मामा-भाचा,भाची यांच्या मया व्यक्त करना-या ओव्या असायच्या. आपला भ्रतार कसा धाडसी आहे, याचे गुणगान करना-या ओव्या असायच्या. त्याला गावात कसा मान मिळतो यावर ओव्या असायच्या. आजा-आजी, नात-नातू यांच्या संबंधावर ओव्या असायच्या. शेतीवाडी, बैल गायी वासरे, मळ्यातील मोट- झूळ झूळ वाहनारे पाटाचे पाणी यावर ओव्या असायच्या. म्हणून पुर्वीचे लोक म्हनायचे की या जात्यावर ओव्या होत्या तो पर्यन्त लोका मधी मयाचा रेशिम धागा घट्ट होता. गिरन्या आल्या, जाते गेले तसा लोकान्च्या एकमेका वरील मयाचा झराच आटुन गेला. एव्हढं या जात्याने लोकात मानूसकी आणली होती, अन हे काम त्या दगडी जात्याने कमीत कमी 2000ते 3000 वर्ष तरी केले होते. म्हणून लोक आवर्जुन गिरन्या आल्याच्या जमान्यात जाते गेल्याची खन्त बोलून दाखवित होते. त्यांना भावा-बहिनित अंतर का पडत आहे? हे दिसत होतं. भावा-भावात कटुता का येत आहेत? हे दिसत होतं. बाप लेकात अंतर का येत आहे? हे दिसत होत. म्हणून लोक तसं बोलत होते. पहाटे उठुन जात्यावर दळल्या शिवाय लोकांना पोटाची आग विझविता येत नसायची. म्हणून बाया मानसाना पहाटे उठावेच लागे आणी मग दळण दळताना त्या मानसा मानसात, नात्या नात्यात मया पैदा करनारी गानी म्हणत, आपल्या वरील कष्ट तर हालके करीतच. पण या मयाची पारायने रोज घरो घरी पहाटे पासुन होत असल्याने लोकान्चा दिवस सुखा समाधानात जात असे. जाती गेली अन लोकातील मया संपल्या. असे जात्याने जगात येउन खुप असे संस्कृती जतनाचे काम केले होते. अन गिरण्या येवुन सबंध महिला वर्गाला रोजच्या कष्टातून मुक्ती दिली पण सबंध मानव जातीला मया पासुन पारखे व्हावे लागले, ही वस्तूस्थिती आहे हे आपलयाला मान्यच करावे लागते.
    या चानल वर आणखी पोतराज ओव्या, जात्यावरच्या ओव्या, आराधिन ओव्या आणी ईतर कार्यक्रम आहेत.
    पहायची ऐकायची असतील तर कशी शोधायची?
    तर खाली काही स्टेप दिल्या आहेत. त्या स्टेप बाय स्टेप तूम्ही क्लिक करीत पुढी जात राहिलात की आमचे सर्व vdo तुम्हाला भेटतील.
    स्टेप: तुमच्या मोबाईल वर you tub उघडा. .. वरच्या बाजुला बहिर्गोल भिन्गाचे चित्र दिसेल..त्यावर क्लिक करा..त्यावर मराठीत..रिदम (मध्य मराठवाडा) अगदी असेच कंसा सह टाईप करा. त्या अक्षरावरच क्लिक करा.. काही चानल येतील..त्यात एका गोलात ढोलकी पेटीचे चित्र व कला हेच जिवन, असे लिहिलेले दिसेल..त्या गोलावरच क्लिक करा..आमचे सर्व vdo दिसतील. हे सर्व vdo एकाहून एक मनोरंजक व उदबोधक आहेत..आपण त्याचा आनंद घेऊ शकता. असे आनंददायक vdo दुस-या लोकायला जरुर जरुर पाठऊन द्या.
    या पुढे आणखी vdo चानल वर टाकण्यात येणार आहेत. तुम्हाला असे कार्यक्रम आवडत असल्यास, ताबडतोब तुमच्या मोबाईलवर हे vdo येण्यासाठी या चानलला subscribe करुन ठेवा.
    like नाही केले तरी चालेल, कॉमेंट नाही केल्या तरी चालतील, पण तुम्हाला आवडलेले vdo इतराना नक्की share करा (दुस-याना पाठवा), म्हणजे या कला कृतीचा दुस-यानाही आनंद घेता येईल.
    धन्यवाद 🙏🏻 #महाराष्ट्र #ओवी #परंपरा

Komentáře • 12