Charan Gadad, Phopsandi फोफसंडी, महाराष्ट्रातील एक अतिदुर्गम गाव.

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • फोफसंडी, महाराष्ट्रातील एक अतिदुर्गम गाव. नगर जिल्ह्यातील एक निसर्ग रत्न.
    पावसाळ्यातील या गावाचे रौद्र सुंदर निसर्ग आपल्याला संमोहित करतो. आज प्रत्येक ठिकाणी आधुनिकतेचा भस्मासुर बोकाळत चालला असून सुद्धा हे गाव मात्र त्याचे अश्मयुगीन संस्कार टिकवून आहे. आजही या गावात डोंगरदऱ्यांमध्ये भटकताना गुफांमध्ये राहणाऱ्या आदिवासींचे दर्शन सहज घडते. एकदा अशीच भटकंती करत असताना मला चारण गडद बघण्याचे भाग्य मिळाले. गडद म्हणजे गुहाच, फक्त त्या गुहेला राहण्याजोगी बनवलेले असते. गुहेचा खुला भाग कारवीच्या काड्यांनी आणि शेण मातीच्या मिश्रणाने झाकलेला असतो. हा आडोसा भक्कम नसला तरीही सुरक्षेच्या दृष्टीने पुरेसा असतो.
    डोंगराच्या उदरात खोलवर पसरलेल्या या गडदी बाहेर एक धबधबा कोसळत असतो. चारण गर्दीचा मुख्य वापर स्थानिक गुरांना चारायला नेल्यानंतर रात्री मुक्कामासाठी करतात. साधारणतः 200 ते 250 गुरे यात सहज सामावू शकतात. आपणही येथे राहू शकतो परंतु येथे पिसवांचा त्रास प्रचंड आहे.
    या गळती बाहेर चूल पेटवून, कॉफीचे घोट घेत, धबधब्याचे धीर गंभीर संगीत ऐकत, निसर्ग न्याहाळणे म्हणजेच...स्वर्गसुख!
    यायचं ना मग कारण गडद बघायला ? सह्याद्रीची अपरिचित बाजू जाणून घ्यायला Trekkamp चं CZcams Channel नक्की SUBSCRIBE करा.

Komentáře • 4