भुरा । शरद बाविस्कर । प्रकाशन सोहळा । लोकवाङ्मय गृह

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 09. 2024
  • लोकवाङ्मय गृहाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ २३ जून २०२३ रोजी संपन्न झाला. यानिमित्ताने लोकवाङ्मय गृहाने प्रकाशित केलेल्या आणि अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या 'भुरा' या प्रा. शरद बाविस्कर यांच्या आत्मचरित्राच्या १० व्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा सायं. ५:३० वाजता भूपेश गुप्ता भवन, ८५, सयानी रोड, लेनिनग्राड चौक, प्रभादेवी, मुंबई येथे आयोजित केला होता. सदर पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला कॉ. भालचंद्र कानगो अध्यक्ष तर प्रमुख वक्ते म्हणून लेखक शरद बाविस्कर यांच्या समवेत राजन गवस, कुमार केतकर, अलका धुपकर आणि उर्मिला मातोंडकर उपस्थित होत्या.
    भुरा । शरद बाविस्कर
    हार्डकव्हर । पाने : ३५४ । किंमत : ५०० /-
    पुस्तकासाठी संपर्क : ८४५४०४९०३६ । ०२२-२४३७६०४२
    मला व्यवस्था आणि स्वातंत्र्य ह्या मानवी जीवनातील एकाच नाण्याच्या दोन बाजू वाटतात. व्यवस्था मानवी जीवनाची अपरिहार्यता आहे, तर व्यवस्थेचं कुठल्याही क्षणी निरंकुश होणं मात्र मानवी स्वातंत्र्यावरील टांगती तलवार. व्यवस्था म्हणजे फक्त समाज आणि इतिहास नसून,आपण जी भाषा बोलतो तीसुद्धा व्यवस्थेचं काम करत असते. आपलं कुंठीत आणि शीघ्र आकलनसुद्धा व्यवस्थेचं प्रतिबिंब असते. एका अर्थाने आपला जन्मच अनिवार्यपणे व्यवस्थेनं घेरलेल्या साखळदंडांमध्ये बंदी म्हणून होत असतो. त्या साखळदंडांच्या अस्तित्त्वाची जाणीव ही आपल्या सापेक्ष सुटकेची पूर्वअट. धुळे जिल्ह्यातील रावेर या लहानशा खेड्यात एका कोरडवाहू शेतकऱ्याच्या घरात जन्मलेल्या, रोजंदारीवर पडेल ते काम करून भाषाशिक्षण आणि तत्त्वज्ञानाच्या ओढीने वेगवेगळ्या देशातील प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये शिकलेल्या, भाषा आणि तत्त्वज्ञानाच्या अभ्यासासाठी जग पालथे घालणाऱ्या, तत्त्वज्ञानासारख्या गहन आणि गंभीर विषयाच्या अभ्यासाने समृद्ध झालेल्या, 'भुरा' ही आपली जातजाणीव ओलांडून मार्क्स, अल्थुझर, ग्राम्शी , महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांपर्यंत पोहोचूनही स्वतंत्रपणे आपले सामाजिक वास्तव संवेदनशीलतेने आणि तेवढ्याच कठोर वैचारिक शिस्तीने तपासणाऱ्या प्रा. शरद बाविस्कर यांचे हे प्रांजळ आत्मकथन.
    #bhura #autobiography #jnu #book #lokvangmayaGriha #bookpublication #bookpublisher #publishinghouse

Komentáře • 15

  • @ramdasbokare29
    @ramdasbokare29 Před 21 dnem

    अप्रतिम सोहळा

  • @jyotimaurya812
    @jyotimaurya812 Před 11 měsíci

    Khoop apratim karyakram ❤

  • @udaynikam8184
    @udaynikam8184 Před rokem +3

    नामवंत वक्त्यांचे विचार ऐकायला मिळाले, ती आजची काळाची वैचारिक गरज आहे. खूप खूप आभार.

  • @susmitakhutale3112
    @susmitakhutale3112 Před rokem +4

    खूप सुंदर आणि नेटका कार्यक्रम... लोकवाङ्मय गृहाचे खूप आभार... आपण ह्या कार्यक्रमाचा व्हिडिओ उपलब्ध करून या नामवंत वक्त्यांना ऐकण्याची संधी दिलीत...
    भुरा आणि लोकवाङ्मय गृहाचे अभिनंदन आणि आभार.... 🌿🌷

  • @rekhaerchhe6972
    @rekhaerchhe6972 Před rokem +2

    अशा विचारवंतांची खरंच खूप गरज आहे....आजच्या पिढीला

  • @dadakhandekar
    @dadakhandekar Před rokem

    खूप महत्वपूर्ण पोस्ट आहे.ही एक अमूल्य भेट आहे,वाचक आणि दर्शक यांचेसाठी.

  • @rajkrantiwalse4952
    @rajkrantiwalse4952 Před rokem +2

    अप्रतिम

    • @narendratikle2143
      @narendratikle2143 Před rokem +1

      कार्यक्रम अतिशय सुंदर.लोकवाङ्मय प्रकाशनाचे खूप खूप अभिनंदन.स्तुत्य उपक्रम.
      उपप्राचार्य नरेंद्र टिकले,चंद्रपूर.

  • @pavanmankar4884
    @pavanmankar4884 Před rokem

    अप्रतिम कार्यक्रम अश्या विचारांची अत्यंत गरज आहे.

  • @MLTR-1995
    @MLTR-1995 Před rokem +1

    फक्त महाराष्ट्रात नाही तर भारताबाहेर हे पुस्तक मिळाले पाहिजे. मला हे पुस्तक जरा प्रयत्नाने हस्ते परहस्ते विदेशात मागवता मागवता आले, मिळाले . आणि ते मी वाचले. पण ते ते थेट विकत घेता यायला पाहिजे

  • @2m561
    @2m561 Před rokem +1

    खुपच छान

  • @ranjanachavare-patil8498

    खूप खूप आभार विक्रम हा व्हिडीओ पाठवल्या बद्दल, खूप संवेदनशील भाषण ऐकायला मिळाली

  • @vibhaawale4814
    @vibhaawale4814 Před rokem

    Very Inspirational book BHURA

  • @Rakesh_Bhadane
    @Rakesh_Bhadane Před rokem +1

    Thank you so much !!

  • @anilshirsath4996
    @anilshirsath4996 Před rokem +1

    अप्रतिम