स्वामी मकरंदनाथ गुरुपूजन १८ जून २०२३ आशीर्वचन

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 07. 2024
  • सद्गुरू पू स्वामी मकरंदनाथ हे आदिनाथ श्री शंकरांपासून ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत आणि पुढे पावसचे स्वामी स्वरूपानंद तसेच पुणे येथील पू स्वामी माधवनाथ ह्यांच्यापर्यंत थेट चालत आलेल्या नाथ संप्रदायाचे सांप्रत अध्वर्यू आहेत.
    राजयोगात सांगितल्या जाणाऱ्या भक्तीसहीत सोहम ध्यानसाधनेचे पू स्वामी मकरंदनाथ हे अंतरंग अधिकारी व मार्गदर्शक आहेत. पू स्वामी मकरंदनाथ 1996 सालापासून नियमितपणे भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध ह्या अद्वैत ग्रंथांच्या आधारे पारमार्थिक विचारांचे प्रबोधन ते करीत आहेत. समाजातील सुशिक्षित, तरुण मंडळींमध्ये ध्यान नामादि साधनेची गोडी निर्माण करून समाज घडविण्याचे गुरुपदिष्ट कार्य अव्याहतपणे करीत आहेत. प्रपंच व परमार्थ एकरूप करून धन्यतेचे जीवन जगता येते हा आदर्श वस्तुपाठ स्वतःच्या उदाहरणावरून त्यांनी समाजाला घालून दिला आहे.
    स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ आणि श्री ज्ञानेश्वरी प्रसारक मंडळ ह्या दोन संस्थांच्या माध्यमातून ते परमार्थाचा प्रचार आणि प्रसार कार्य गेली 35 वर्ष पुणे तसेच देश, परदेशात करीत आहेत.
    अधिक माहितीसाठी संपर्क साधावा:
    मंदार वझे - 9545388686

Komentáře • 2

  • @prajaktaghanate3173
    @prajaktaghanate3173 Před 17 dny

    दुर्लभ दुर्मिळ मार्ग
    गुरुकृपा ही केवलम.
    रुणाईत आहे स्वामीजी.

  • @shobhasalunke9307
    @shobhasalunke9307 Před 16 dny

    Swamiji sastang namaskar