Kavitecha Paan | Episode 42 | Shashi Dambhare

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 06. 2019
  • KAVITECHA PAAN | कवितेचं पान - Episode # 42
    Shashi Dambhare reciting her own poems.
    Concept | Direction : Madhurani Gokhale - Prabhulkar
    Camera : Prasad Jadhav, Ashish Maind, Heramb Mandke, Abhishek Shelar
    Editing : Muktal Mawal
    Costumes : Sayali Rajadhyaksha
    Jewellery : Shilpa Pandit (Tibes Vibes)
    Location Courtesy : Manoj Karekar, Anjali Karekar
    Production : Miracles Academy of Arts & Media Pvt.Ltd.
    #KavitechaPaan #MiraclesSaraswati
  • Zábava

Komentáře • 351

  • @adityahonkalas9745
    @adityahonkalas9745 Před 5 lety +11

    कवियत्री : शशी , यांच्या कविता खरच खूप छान आहेत , मित्र मैत्रिण या नात्यातील कविता इतक्या हळुवार शब्दांनी पण हव्या हव्याश्या वाटणाऱ्या मोकळे पणा साठी आवश्यक आहेत , अभिनंदन ...💐
    मुलाखत , कविता सादरीकरण साठी मधुराणी यांचे नेहमी स्वागत , अभिनंदन .
    मित्र मैत्रीण नात्याचं अस असत ...
    अल्याड पल्याड
    सर्व सांगूशी वाटणार ...
    धीर जाताना
    उर भरून येताना
    सांभाळून घेणार
    स्वप्न - सत्यातील
    जस साकव बंध ,
    पांचाली कृष्णाचं
    कालियुगाला भिडणार नात ...
    आनंदाला खेळवणार नात ....
    मन कवड्या , निर्मल मनाचं
    जीवा भावच , मैत्रीच नात .
    मित्र मैत्रिणीचं नितळ सुंदर नात ...
    संजय होनकळस ....

  • @gayatripotdar3869
    @gayatripotdar3869 Před rokem +2

    शशी ma'am excellent... आणि मधु राणी ma'am... किती मनापासुन एकतात, किती छान दाद देतात... Naturally... यात कृत्रिमता अजिबात नाही

  • @rspatil1759
    @rspatil1759 Před 5 lety +21

    कवितेला जन्म घ्यायचा असतो म्हणून आपली निवड होते....किती सहज सांगितलं

    • @sachinwagh6474
      @sachinwagh6474 Před 5 lety +1

      R S Patil खरचं हे फार आवडलं

  • @poojakarekar37
    @poojakarekar37 Před rokem +5

    कधी बंधनांची चौकट मोडीत तर कधी लवचिकता राखत लिहिलेल्या अप्रतिम कविता! ग्रेट👍

  • @pratibhavishwasrao956
    @pratibhavishwasrao956 Před 4 lety +7

    मधुराणी,
    'मधुराणी प्रभुलकर' इतकं म्हटलं तरी एक छोटीशी कविता म्हटल्यासारखं वाटतं मला!
    नावासकट कवितेशी एकरुप झाली आहेस तू!
    'कवितेचं पान' उलगडून तुला माहीतही नसेल, तू किती मोठ्ठं काम करतेस ते.....
    तहानलेल्यांची तहान शमवतेयस; ज्यांना नाही त्यांच्यात निर्माण करतेयस.
    आणि......
    शशी,
    गंमत बघा ना, तुझं नावही आहे खुलं......
    त्याच्यासाठी आणि तिच्यासाठी देखील!
    आणि केवढं ठासून भरलंय शब्दांपलिकडचं
    प्रत्येक शब्दात आणि शब्दांमधल्या मोकळ्या जागेत देखील!
    केवळ अप्रतिम!!!!!!!!!!

  • @vijayabhise8513
    @vijayabhise8513 Před rokem +1

    खूपच छान ! शशी डंभारे तुमच्या कवितांनी मी भारावून गेले. मध्यम वयातील स्त्रीच्या भावनांशी मी त्याच वयाची आणि काळाची असल्याने relate होता येतं.खरोखरच तुमच्यातील मित्र प्रेमाला आसुसलेली ,मनातलं त्याला धीटपणे बोलणारी आणि समाजाच्या दांभिक बेमुर्वतपणाची हसत खिल्ली उडवणारी तुमची कविता मला मनोमन भावली. पुन्हा पुन्हा वाचा - ऐकाव्या अशा काविंताचा संग्रह मिळाला तर काय बहार !! कुठे मिळतील तुमचे दोन्ही काव्यसंग्रह

  • @udaychitnis1904
    @udaychitnis1904 Před rokem +1

    कवितेचं पान मला मागच्या आठवड्यात, यू ट्युब वर ,अचानक सापडलं! आणि मग मी झपाटल्या सारखा ह्या कविता अनुभवत राहिलो. वेगवेगळी लहान मोठी कविता करणारी माणसं, आणि त्यांची मनोगतं मनात साठवत राहिलो. पण आज ह्या सगळ्याचाच अगदी कळस झाला. शशी दंभारे आणि मधुराणी गोखले-प्रभुलकर ! तुम्ही दोघी ग्रेट आहात! आजच्या एवढ्या विलक्षण सुंदर, भावनांनी ओतप्रत, मार्दवतेनं आणी उत्कटनेनं ओथंबलेल्या आणि प्रामाणिक कविता प्रथमच अनुभवल्या मी! ह्या भावना तुमच्या पर्यंत पोचाव्यात! एवढंच!.....

  • @abhijittere3693
    @abhijittere3693 Před 5 lety +19

    रविवार ची दुपार सार्थकी लागली आहे.
    एक तास मंतरलेला होता.
    आज पुन्हा श्रीमंत झालो आहे.
    खूप नितळपण कवितेत दिसलं.
    पुन्हा एकदा "एक तास श्रवणीय" केल्याबद्दल आपला ऋणी आहे.
    मराठीत इतकं सुंदर कोणीतरी लिहितयं त्या व्यक्तीची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. हळुवारपणा, तरलता ह्या गोष्टी आज परत जिवंत झाल्याचा भास झाला.
    सुंदर " श्र व णा नं द"
    जातकासारखीच आम्ही तुमच्या नविन भागाची वाट बघत असतो.

  • @sachinthite3987
    @sachinthite3987 Před 3 lety +2

    ग्रेट.. कविता सुद्धा, त्यातील शब्द सुद्धा, शब्दांचा अर्थ सुद्धा, शब्दांचे कारण सुद्धा, शब्दांचा गर्भ सुद्धा, त्यातील मर्म सुद्धा आणि ते लिहिणारी कविता सुद्धा ग्रेट आहेत. मधुराणी आणि 'कवितांचे पान' तुमच्या दोघांच्याही प्रेमात पडलोय मी. या कवितांतील जग प्रत्यक्षात यावं यासाठी आमच्यासारखे, तुमच्यासारखे, शशी यांच्यासारखे अनेकजण धडपडत आहोत. हा काही दशकांचा किंवा शतकांचा प्रवास असू शकेल; पण आपण एक दिवस असं जग, असं समाजमन तयार करण्यात नक्की यशस्वी होऊ. खूप खूप धन्यवाद आणि शशी व कविता यांना सलाम!!!
    हे जास्तीतजास्त शेअर होईल यासाठी प्रयत्न करू.👍

  • @sumitajagtap4557
    @sumitajagtap4557 Před rokem +1

    Speechless 😮
    Mi khupach bharavun gele aahe.
    Shashi Ma'am che khup kautuk aani Madhurani Tai..mi tar tumchi Fan zale aahe
    Tumhi khup chan kavvya Vachan karta aani jya tarhene navin kavayatrinshi sanvadh sadhata tya varun tumhi ek vyakti mhanun khup top chya aahat.
    This is called Women Empowerment ❤
    Abhinandan 🎉

  • @rekhasonawane7105
    @rekhasonawane7105 Před 4 lety +3

    मधुराणी चां मधुर आवाज.. मर्दवता .. मनापासून देणारी दाद सर्व मनाला भावते.
    इतका सुंदर कार्यक्रम मला उशिरा कळलं. खूप जणांना माहीत नाहीय अजुन.. इतकी कमी व्ह्यूज पाहून वाईट वाटले . एक लाईक ऐकल्यावर प्रत्येकाने देवून जावे.ही विनंती

  • @kalpanabarad7963
    @kalpanabarad7963 Před 4 lety +4

    वा खुपच सुंदर कविता !!तुम्हा दोघींचा संवाद आणी मधुराणी मी तुझ्या आवाजाच्या प्रेमात आहे..तुझी कविता वाचण्याची स्टाईल आहाहा क्या बात!! लताबाईंच गाणं ऐकताना जशी तंद्री लागते तशीे तू कविता वाचत असताना तंद्री लागते.. *मी तर म्हणेन तु कविता वाचत नाहीस तर तू कविता होतेस*👌...

  • @vidyadeshpande6881
    @vidyadeshpande6881 Před rokem +1

    मधुराणीजी , मला आपलं अत्यंत कौतुक आहे. तुमचा हा उपक्रम आणि kavyashraavya मालिका उपक्रम फारच आवडतो. 🌹🍁

  • @user-ju3jq4vx3j
    @user-ju3jq4vx3j Před 8 měsíci +1

    मधुराणीचं सादरीकरण आणि शशीचे शब्द..यात आकंठ बुडालेय..एकेरी उल्लेख जाणीवपूर्वक केलाय.. इतक्या दोघी आत खोलवर रुजल्या आहेत..❤❤

  • @minalyeole2091
    @minalyeole2091 Před 2 lety +2

    मधुराणी किती गोड आवाज
    बोलण्याची शैली,काव्य वाचन सारेच अफलातून💐💐💐

  • @revatirayrikar3909
    @revatirayrikar3909 Před 3 lety +2

    प्रिय मैत्रिणी स' ही कविता प्रचंड आवडली...मनावर फुंकर घातली कुणी अशी तर किती छान वाटेल..सगळ्याच कविता छान!

  • @archanamuley5399
    @archanamuley5399 Před 3 lety +2

    प्रिय मित्रास हा काव्यसंग्रह हवा आहे. कसा मिळू शकेल. मधुराणी एपिसोड खूपच छान रंगला.

  • @sangitadeshmane9104
    @sangitadeshmane9104 Před rokem +2

    सगळ्याच कविता अगदी माझ्या मनातलं बोलत आहेत असं वाटतं होतं 👌👌
    इतका छान अनुभव मिळाला कविता वाचनातून 👍👍👍
    कान अन् मन अगदी तृप्त झाले 🙏
    मनस्वी धन्यवाद मधुराणी आणि शशी💐💐👏🏻👏🏻

  • @haribhaukudekar3590
    @haribhaukudekar3590 Před 4 lety +2

    Khupkhup duanyvad madhurani tai Dev tumhala dirghayushya Devo ki jyamule aamhala kavitechy swapnachya jagat harvata yeil.

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 Před 3 lety +3

    ‘कॅाफी’ या कवितेच्या भावनेतून कित्ती स्त्रिया जात असतील !!!! अफलातून कविता !! आज एकाच दिवसात तिसऱ्यांदा ऐकते आहे तुमच्या कविता!! मलाही मित्र हीच संकल्पना आवडते आणि मला असा एक गाढ मित्र आहे ! त्यामुळे या खूपशा भावना अनुभवल्या आहेत!! शशीजी खूप धन्यवाद

  • @pradnyapavagi9283
    @pradnyapavagi9283 Před 3 lety +2

    खूपच सुंदर एपिसोड, बोल्ड तरीही मनाला लोभवणाऱ्या कविता आहेत शशी डुंबरे यांच्या आणि मधुराणी च्या आवाजात, वाचण्याच्या style मधे त्या जास्त खुलतात, समजतात.
    धन्यवाद दोघीनाही 🙏

  • @SundeepGawande
    @SundeepGawande Před 5 lety +8

    व्यक्त होतांना रिक्त होत नाही हे महत्त्वाचं
    याचकच राहतो भक्त होत नाही हे महत्त्वाचं
    आणखी काय बोलणार?
    शशीजींचे खूप खूप धन्यवाद आणि मधुराणी तुझे आभार.

  • @rekhavaidya7784
    @rekhavaidya7784 Před 5 lety +5

    खूपच छान कविता.. आणि आजच्या काळात खरोखरच बोल्ड कविता लिहिल्या गेल्या आहेत... कवयित्रीने जे म्हंटलय की कविता लिहून झाल्यावर मन घाबरते.. एक प्रकारची भिती, दडपण असते मनात.. साहजिकच आहे.. अशा प्रकारच्या कविता आपला समाज (घर - चार भिंती) मान्य करीत नाही. कविता कितीही काल्पनिक असल्या तरीही त्या आपल्याच मनाचा एक भाग असतो. मनाचं वास्तव कवितेत उतरत असतं..

    • @shashidambhare9463
      @shashidambhare9463 Před 5 lety +2

      खर आहे

    • @shrikantchavan9369
      @shrikantchavan9369 Před 5 lety +2

      Rekha Vaidya तुम्ही कवयित्री आहात काय?? नेमक्या शब्दात मांडता

    • @rekhavaidya7784
      @rekhavaidya7784 Před 5 lety +1

      @@shrikantchavan9369 नाही... पण लिहिते कधी कधी... प्रतिलिपीवर आहेत माझ्या काही कविता आणि लेख

  • @nilambarisonawane9330
    @nilambarisonawane9330 Před rokem +2

    शशीजी शब्दात कस व्यक्त करू तुमच्या कविते वरच प्रेम, मनाच्या दशदिशा न्हाऊन निघाल्या काळजात भिणला शब्दांचा थेंब अन् थेंब,
    खुपच छान कविता करतात तुम्ही अन् सादरही त्याहून खुप सुंदर करतात, त्यात मधुराणी जी साथ तर अमृता हून ही गोड कवितेच पान होत,😇👌👌

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 Před rokem +2

    50 वेळा हा भाग बघितला असेल पण मन भरत नाही. 💖💖💖💖💖

  • @bharatikawade7943
    @bharatikawade7943 Před 3 lety +2

    अगदी सहज सोप्या आणि सुंदर शब्दात मैत्रीच्या नात्याचे वर्णन

  • @sangitapandhare6967
    @sangitapandhare6967 Před rokem +1

    खूप सुंदर ...नवीन कवयित्रीची ओळख झाली.. मनाच्या वेगवेगळ्या जाणीवा,नेणीवांवर भरभरुन भाष्य करणाऱ्या कविता ऐकायला मिळाल्या.. धन्यवाद.. आणि हार्दिक शुभेच्छा !!मधुराणी 💐💐

  • @samitasulakhe4858
    @samitasulakhe4858 Před 5 lety +13

    खूप सुंदर कविता आहेत सगळ्याच. खूप सुंदर शब्दात नेमके पणाने आणि ठाम पणे मांडलं आहे. शशी ताई आणि मधुराणी खूप आभार💐 मन भरलं नाही, पुस्तक विकत घेऊच पण अजून एक एपिसोड हवा आहे तुम्हा दोघींचा, कृपया दखल घ्यावी 🙏😊

    • @ranjitbonate
      @ranjitbonate Před 5 lety +1

      rankavi.blogspot.com/?m=1 please visit

  • @swapnilchavan4618
    @swapnilchavan4618 Před 5 lety +32

    पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या सोबत ज्ञानेश्वरांच्या विराण्याबद्दल एक दीर्घ एपिसोड व्हावा अशी उत्कट इच्छा आहे , हृदयनाथजींचं ज्ञानदेवाच्या कवितेबद्दलचं निरूपण हा एक अद्भुत ठेवा असेल पुढच्या कित्येक पिढ्यासाठी ....

  • @manasikelbaikar3607
    @manasikelbaikar3607 Před 4 lety +1

    Ya kavitechya panat Shashi Madam ni manatil kahi haluvar,kahi vidrohi,akramak ,kahi vastav pan dhumsat aslele ase anek kangore. khupch chan shabdat ulgadle.

  • @shubhajoshi7863
    @shubhajoshi7863 Před 2 lety +2

    किती किती खोल खोल रुतून मनात शिरते आणि पुन: प्रत्ययाला आनंद मनाला देतात तुमच्या कविता..
    दोघींचे सादरीकरण अप्रतिम 👌👌👌🌹

  • @rjpriya4265
    @rjpriya4265 Před 5 lety +11

    बायका ...कशातही कुणातही गुंतणाऱ्या बायका..या बायका अश्या का असतात..यांना गुंतण जमत पण गुंता मात्र सोडवता येत नाही...बायका कुणातही गुंतणाऱ्या बायका..

  • @nileshindulkar295
    @nileshindulkar295 Před 5 lety +7

    गरम गरम चहाच्या कपा सोबत, आजच कवितेचं पान मनाला तजेला देऊन गेलं. Shashi Dambhare खूप भन्नाट कविता लिहिता आपण आणि Madhurani खूप सुंदर सादरीकरण. 💐🌺💐

  • @sandip_natha_agane07
    @sandip_natha_agane07 Před 2 lety +1

    वाह फारच छान...
    अमृता इमरोज हे खूप वेगळं नातं...
    ह्या नात्यावर मी अनुभवलेल्या ह्या चारोळी...
    स्वयंभू अमृतासाठी
    कधी इमरोज मी झालो
    सदा मागे ती साहीरच्या
    तरी ना मी खचून गेलो
    ✍शब्द: संदिप नाथा आगाणे...

  • @nitakadam1547
    @nitakadam1547 Před rokem +1

    शशिचं कवितालेखन आणि मधूराणीच मधूर काव्यवाचन काळजात घर करतं कवयत्रिच्या प्रेमात पाडत..,आम्ही कायम प्रेमात....

  • @mayurim8569
    @mayurim8569 Před 2 lety +1

    Khup sundar bhaag ma’am..Tumhi hi kavyaparvani parat suru karavi ashi aamha sarv kavya rasikanchi khup khup iccha ahe.tumche manapasun aabhar🙏

  • @veenakulkarni3087
    @veenakulkarni3087 Před 4 lety +2

    खूपच सुंदर, स्त्री मनाच्या भावना भावल्या. मनातील मित्राचे नवनाते निर्मिती होती माझ्यासाठी, अतिशय सुंदर.
    शशिताई व मधुराणीताई धन्यवाद।

  • @mdknowledgecreation...7353

    खूपच अप्रतिम भाराऊन टाकणार असं लिखाण .....आम्हाला ऐकायला मिळाले त्याबद्दल धन्यवाद 👍🎉🙏

  • @sujatamarne8178
    @sujatamarne8178 Před 3 lety +2

    खूप खूप छान. मधुराणी खूप छान उपक्रम आहे हा. आणि तुमच्या तोंडून कविता ऐकणं ही सुद्धा पर्वणी आहे. खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा.

  • @archanapund1991
    @archanapund1991 Před 3 lety +2

    Shashi mam I am your bug fan.....I like your poem very very much

  • @prajaktashah5387
    @prajaktashah5387 Před 3 lety +2

    Amaizing shashi maam.....i am obsessed....kitihi kautuk kela tari shabda kami padatil...
    You are free soul ......☺

  • @laxmanyadaoraoaucharmal7301

    छान कविता आहे, तिच्या कडे त्यांनी कधी मैत्री म्हणून पहिलच नाही.शशी you are great.

  • @shreyabapat
    @shreyabapat Před 4 lety +2

    फार म्हणजे फारच सुंदर झालाय हा एपिसोड! यावेळी प्रतिक्रिया दिल्याशिवाय राहवेना! यातली प्रत्येक कविता ऐकताना अनेक व्यक्ती, अनेक प्रसंग, अनेक क्षण डोळ्यासमोर तरळून गेले..मनातले अनेक कप्पे अलगद उघडले..खूपच छान..स्त्री पुरुष यांच्यातल्या बहुआयामी निखळ मैत्रीविषयीचे प्रगल्भ विचार असं मी या कवितांचं थोडक्या शब्दात वर्णन करेन.. या कविता आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि तुम्हाला खूप शुभेच्छा. मला हा कविता संग्रह हवा आहे. त्यासंदर्भात कोणाला आणि कुठे संपर्क करावा लागेल?

    • @shashidambhare9463
      @shashidambhare9463 Před 4 lety

      कवितासंग्रहासाठी खालील नंबरवर संपर्क करावा.
      संजय सिंगलवार +919403628032

  • @minalyeole2091
    @minalyeole2091 Před 2 lety +2

    वा शशी
    माझ्या कवितेचा सांजपुरुष होशील का....
    फारच सुंदर कविता गं

  • @priyankatekalepatil1468
    @priyankatekalepatil1468 Před 4 lety +2

    Imroz......atttiishay sundar kavita.....ya eka kavitesathi mla prachand bhetaychi icha aahe Shashi Taiani madhurani Tai tumha doghina.....
    Mi tumha doghina ekeri bolale karan ya kaviteni tumhi doghi mala majya khuup javalcha maitrini vatata....
    Shashi tai tu jevdhi sundar hi maitrichi bhavna kavitet utarvalis...n madhurani Tai jya padhatine t tu sarvanparyant pochvalis....Apratim......kharach!!
    Sahaj mood banla ki mi anekda hi kavita aikte.....bhari vatt....sarya mitrana ani tumha doghina pratyaksha bhetlyacha anand milto......:))

  • @sheetalgargote7881
    @sheetalgargote7881 Před 2 lety +4

    Madhurani mam... all time favourite actress ❤️... really thanks for the 'Kavitech Paan'❤️

  • @aratikhopkar
    @aratikhopkar Před 5 lety +7

    फार सुंदर. कविता, त्यामागचा विचार, ते सगळं व्यक्त होणं सगळच आवडलं. शशी, खुप शुभेच्छा!
    मधुराणी खुप खुप धन्यवाद

  • @shubhajoshi7863
    @shubhajoshi7863 Před 4 lety +2

    किती सुंदर विलक्षण आहे हे सगळं..छानच आहे तुमचा साहित्य प्रवास... खरंच प्रेरणादायी..निखळ
    आनंद देणारा‌..

  • @dhanedharkiran1556
    @dhanedharkiran1556 Před 4 lety +2

    शशी मॅम,
    कवितेचा जन्म ते उत्तम कवयित्री हा प्रवास खरोखर प्रेरणादायी आहे....
    सर्वच कविता ह्रदयला भिडणा-या आहेत...

  • @seema6101
    @seema6101 Před 3 lety +2

    Way (read age) hi apli sampatti asu shakte he aajach umagle ani tumchya udaharantun te patle hi! Thank you so much Shashiji for such a beautiful realisation! 💕

  • @sandipraut
    @sandipraut Před 4 lety +2

    So nice, कविता आणि त्यामागील इतका तरल प्रवास उलगडणारा हा प्रयत्न फार अप्रतिम

  • @seemanagaonkar599
    @seemanagaonkar599 Před 5 měsíci

    कितीही ऐकाल्या तरी शशीताईंची प्रत्येक कविता अवीट गोडी असणारी....... खुप मज्जा येते... आणि मनोवेधक वाटतात...... तुमच्या दोघींच्या आवाजात त्यांची सुंदरता अधिकच वाढते❤❤

  • @sachinshinde8283
    @sachinshinde8283 Před 7 měsíci +1

    Hii Madhurani Tai Awesome Kavita.God Bless u Guys.

  • @verginamot1742
    @verginamot1742 Před 2 lety +1

    खूप खूप सुंदर शशी ताई bold असू देत पण काळजाला भिडणाऱ्या आहेत तुझ्या कविता ....अशीच बोल्ड रहा खूप खूप शुभेच्छा ❤️

  • @rekhasonawane7105
    @rekhasonawane7105 Před 4 lety +2

    शशी ताई... एक तास कसं संपला कळालेच नाही. प्रिया मित्र कल्पना खूप आवडली.नक्की वाचीन. सरळ साधे आणि मनाला भिडणारे शब्दा... माझंच मनोगत जणू.. असेच वाटत होते.
    खूप सुंदर कार्यक्रम..

  • @anupamadagaonkar3249
    @anupamadagaonkar3249 Před 3 lety +2

    खूप खूप सुरेख झाला कार्यक्रम खूप खूप शुभेच्छा तुम्हां सर्वांना
    अरुणा ढेरे यांना पण बोलवा

  • @mkelkar18
    @mkelkar18 Před 5 lety +4

    अप्रतिम सादरीकरण , किती सुंदर एपिसोड आहे हा , सगळ्यात जास्त आवडलेला एपिसोड आहे हा माझा. Shashi Dambhare तुम्हाला खूप शतशः प्रणाम , खूप जवळचं वाटतं तुमचं लिखाण. मधुराणी तुझ्या बद्दल काय बोलू गं परत , आज तुझ्यामुळे इतकं सुंदर लिखाण आमच्यापर्यंत पोचत आहे.

  • @pramodlaxmiarts3066
    @pramodlaxmiarts3066 Před 5 lety +6

    अफलातुन episode. Thanks a lot dear.
    चहा, कॉफी, कविता जन्म घेताना, इमरोज, अमृता, ती, प्रिय मैत्रिणीस. सर्वच कविता आवडल्या. शेवटची; 'हे महत्वाच'-खूप भावली. तुमच्या "चहा"च्या तर प्रेमात आहे मी...❤ अनेक शुभेच्छा.

  • @swapnilvardekar2331
    @swapnilvardekar2331 Před 5 lety +17

    एक सुंदर कवियित्री, मैत्रीण....
    खूप मैत्रीपूर्ण एपिसोड..
    कवितेला जन्म घ्यायचा असतो, मग कविता कवीला निवडते.. 👌👌
    शशि मॅडमच्या कविता तुमच्याकडून ऐकणे,ही आमच्यासाठी पर्वणी आहे.
    'Imroz'खूप आवडली.
    'चहा', 'प्रिय मैत्रिणीस', 'मौनाचा प्रवास' ....... छान♥️♥️
    'मैत्री' एक निखळ नात समजावुन देणं, खूप आवडलं.. खूप खूप सदिच्छा..👌👌💐

  • @jayshreedongre8950
    @jayshreedongre8950 Před 3 lety +2

    खूच सुंदर मांडणी आणी वाचन..धन्यवाद मधुरा आणि शशिताई 🙏🙏

  • @varshagore5602
    @varshagore5602 Před 8 měsíci +1

    फारच सुंदर मनमोकळ्या
    गप्पातून आशयगर्भ भावना
    व्यक्ती
    प्रिय मित्रातून समाजपरिवर्तनाला घातलेली साद मनाला भिडली
    प्रत्यक्षात उतरली तर सोनियाचा दिनु असच म्हणता
    येईल
    आशा करु या

  • @padmapatil1055
    @padmapatil1055 Před 3 lety +1

    खूप छान, अफलातून, कवितेच पान ऐकायला मिळाले ,बरं वाटलं

  • @swarupasawant8247
    @swarupasawant8247 Před 2 lety +4

    Superb.... I couldn't Stop myself listening to this episode of kaviteche paa. Tumchya kavita bhidlya.

  • @manishapotdar7198
    @manishapotdar7198 Před rokem +1

    फार सुंदर..हा इपिसोड.खूप आवडला.

  • @mazi_ambabai3167
    @mazi_ambabai3167 Před 2 lety +1

    खुप सुंदर काव्य प्रवास,, कवितेच पान असच बहरत जाव, मधुराणी ताई खुप खुप शुभेच्छा 🌹

  • @kundanelge9470
    @kundanelge9470 Před 3 lety +1

    शशी मॅडम आणि मधुराणी तुमच हा संवाद ऐकतच रहावं असं वाटतं शशीताई तुमच्या कवितेइतकच तुमचं बोलणं गोड आहे प्रतिक्रिया देण्यासाठी शब्द सुचत नाही

  • @mrudulakishor898
    @mrudulakishor898 Před 2 lety +1

    पूर्वी दूरदर्शन वर रानजाई कार्यक्रम असायचा शांता शेळके - सरोजिनी बाबर यांची आठवण आली एकदम....खूप छान सादरीकरण....कवितेचे पान अप्रतिम👌

  • @pranetapawar
    @pranetapawar Před 3 lety +1

    खुप सुंदर आणि खुप शुभेच्छा

  • @aparnajamdade6012
    @aparnajamdade6012 Před 4 lety +2

    शशीताई,तुमच्या कविता अप्रतिम.
    मधुराणी, तुझं बोलणं व बोलते करणे खूपच छान

  • @user-dp6cs6rl3s
    @user-dp6cs6rl3s Před 6 měsíci +1

    Apratim kavya khup sundar,bharaun gele mi etake kase suchate khup kautuk vatate mala tumche...etak sundar kavya aikayla milale dhanyavad...

  • @mrunalinibarve665
    @mrunalinibarve665 Před 3 lety +2

    एकदा बहिणाबाईंच्या कवितांचे वाचन व्हावे
    ही एक आमच्यासाठी पर्वाणी असेल
    ही माझी विनंती

  • @seemazunjarrao8813
    @seemazunjarrao8813 Před 4 lety +4

    फार सुंदर कविता आहेत तुमच्या शशी जी 👌👌
    अगदी सगळ्याच ❤️👍

  • @nileshsamant81
    @nileshsamant81 Před 5 lety +5

    शशी डंभारे फाचर छान... इमरोज ऐकल्यावर मला ही माझ्या आयुष्यातील काही अमृता आठवल्या 😊... मैत्री वरच्या तुमच्या कविता फार प्रामाणिक आहेत... फार कमी जण अगदी पुरुष सुद्धा समाज, संस्कृती आणि घर यांचा विचार करून मैत्री बाबतीत व्यक्त होताना दिसतात... तुमच्या कविता खूप जवळच्या वाटल्या... बहुतेक कोणाचा तरी मित्र असल्यामुळे असेलही कदाचित... तिलाही (माझ्या प्रत्येक मैत्रीणीला) तेच बोलायचं असतं आणि जरी नाही सांगता आलं तरी माझं मलाच ते समजून घ्यायचं असतं.. कारण मैत्रीचं नातंच समजूतदार असतं .. शशी तुमचा कविता संग्रह पुस्तक स्वरुपात कुठे उपलब्ध होईल? Amazon वर फक्त ई पुस्तक उपलब्ध आहे...
    फार सुंदर होता हा episode विषय मैत्री असल्यामुळे आणि तुमच्यातील मैत्री मुळे सुद्धा तो अधिक खुलला..
    मधुराणी आणि टिम प्रत्येकवेळेस दर्जेदार कवितेचे पान आमच्या साठी घेउन आल्याबद्दल तुमचे खरंच खूप आभार . 😊🙏

    • @shashidambhare9463
      @shashidambhare9463 Před 5 lety +1

      मधुराणीने प्रकाशकांचा नंबर शेअर केलाय वर. पहा.

    • @shashidambhare9463
      @shashidambhare9463 Před 5 lety +2

      आणि तुमची कमेंट खूप आवडली. तुम्ही तुमच्या मैत्रिणींचा , तुम्ही मित्र असल्याचा उल्लेख केला त्याबद्दल तर विशेष विशेष आभार. माझ्या कवितांमध्ये नमूद मित्र आजुबाजूला असले किंवा असे समोर आले तर तो खूपच मोठा दिलासा असेल मला... माझ्या कवितेला.
      🌹🌹🌹🌹

    • @shashidambhare9463
      @shashidambhare9463 Před 5 lety +1

      नमस्कार..... कवितासंग्रहासाठी खालील नंबरवर संपर्क करावा.
      संजय सिंगलवार +919403628032

    • @nileshsamant81
      @nileshsamant81 Před 5 lety

      @@shashidambhare9463 धन्यवाद 😊🙏

    • @nileshsamant81
      @nileshsamant81 Před 5 lety

      @@shashidambhare9463 धन्यवाद 😊🙏

  • @nishigandhabodake1016
    @nishigandhabodake1016 Před 3 lety +1

    Kharach kiti sadhe panane suddha aaple vichar mandata yetay he tumchya kavitetun kalat👌

  • @dr.vaishalijadhav-more1193
    @dr.vaishalijadhav-more1193 Před 6 měsíci

    स्त्री विश्व आणि स्त्री मन .....किती हळुवारपणे जपले आहे शशीने आपल्या कवितेतून....
    अफलातून...❤❤

  • @rohinikulkarni7765
    @rohinikulkarni7765 Před 5 lety +7

    सुरेख....प्रत्येक स्त्री च्या मनाचा ठाव घेणारी कविता.....प्रत्येक कविता एकेक अनुभव घेऊन आली आहे........अजून एक इपिसोड करा ना ....😘😘😘

    • @shrikantchavan9369
      @shrikantchavan9369 Před 5 lety

      Rohini Kulkarni आज माझा दिवस खूप चांगला गेला आहे मी गेल्या चार वर्षापासून कविता लिहीत होतो पण माझं स्टेज डेअरिंग नव्हतं आज शेजारच्या गावांमध्ये ग्रामीण मराठी साहित्य संमेलन भरवलं होतं पेपर ला बातमी वाचून मी मुद्दाम भावाला घेऊन गेलो त्यामध्ये मी धाडस केले आणि शिवाजी महाराज विषयी मी लिहिलेली खूप चांगली कविता खणखणीत आणि मोठ्या आवाजात म्हणून दाखवले आणि प्रेक्षकांचे तसेच संयोजकांचे टाळ्या मिळवल्या माझ्या धाकट्या भावाने मला शाबासकी दिली. अंगावर पाच किलो मास चढल्यागत वाटलं. रविवार 16जुन 2019 खूप चांगला दिवस गेला शिवाजी महाराजांचा कार्यक्रम तसेच वड पौर्णिमा सण आईने केलेल्या पोळ्या आमटी भात गोड भजे मस्त जेवण आणि कवितेचे पान शशी मॅडम चा एपिसोड अप्रतिम लाजवाब.. मधुराणी मॅडम असाच तुमचा कार्यक्रम दिवसेंदिवस बहरत राहो आणि नव्या कवींना जास्तीत जास्त संधी मिळो ही हार्दिक सदिच्छा..👏👏👏

  • @varsha397
    @varsha397 Před 5 lety +5

    Khup chan episode aahe madhurani... Shashi tai u should right more often.. Me fan zhale tumche

  • @chandramahale6385
    @chandramahale6385 Před 3 lety +1

    Maarwa ! Aprateem ...

  • @pratibhamatle5196
    @pratibhamatle5196 Před 9 měsíci

    असं वाटतं की आपणच व्यक्त होतोय या कवितेतून.या दोघींचे कविता वाचन आणि हा संवाद म्हणजे पर्वणी❤️

  • @amolsamant9348
    @amolsamant9348 Před 5 lety +3

    Khup sunder.....far aawadat madhurani tumach Kavita wachan

  • @pranitakale9687
    @pranitakale9687 Před 5 lety +4

    सगळ्यात सुंदर भाग. किती गोड आणी किती सहज.

  • @anantbapat3967
    @anantbapat3967 Před 4 lety +1

    'कवितेची पानं' चाळुन
    मनाला फार छान वाटलं
    मनाला वाटलं जे
    लगेच मी सांगुन टाकलं

  • @deepapujari112
    @deepapujari112 Před 3 lety +1

    पहिली कविता खरच स्त्री च्या पुर्ण आयुष्यात घडणाऱ्या घडामोडींच्या पण तरी त्या कधी कधी आपल्याना सुद्धा कळत नाही व दिसत नाहीत खूप सुंदर

  • @SuvarnaShelake-wp7fx
    @SuvarnaShelake-wp7fx Před 4 měsíci

    मी एवढ्यातच कवितेचं पान ही वेब सिरीज ऐकायला पाहायला सुरुवात केली मला जाम आवडली का मधुर आणि तू किती सुंदर बोलतेस आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू कविता खूप सुंदर वाचतेस कविता वाचन ही एक कला आहे हे मला आता एवढ्यातच समजते मला कवयित्री शशी ताई यांच्या सोबत तुझं जे काही संभाषण जे काही कविता तुम्ही दोघींनी ऐकवल्या मला जाम आवडल्या मी अक्षरशः फॅन झाले त्यांची मला त्या कविता माझ्या अगदी जवळच्या जसं काही माझ्या अंतःकरणातून निघाल्यात असं मला वाटलं ऐकून फार फार भारी वाटते मला जर जमलं तर ही कमेंट्स त्यांना नक्की ऐकव मला फार आवडेल

  • @veenanaik7783
    @veenanaik7783 Před 4 lety +2

    खुप सुंदर कविता.. एक एक शब्द वास्तव दर्शवते..

  • @amolmore29
    @amolmore29 Před 3 lety +1

    Khup khup khup sunder...

  • @ninnisoft
    @ninnisoft Před 4 lety +3

    This is the best episode... Wow!!!
    Hya ashya kavita spurane mhanje kamaal...
    Thnx for enlightening us all with this collection!

  • @mayecha_aaswad
    @mayecha_aaswad Před 2 lety +1

    खूप कमाल आणि 👌👌👌कविता आहे तुमच्या...

  • @pratimapunde
    @pratimapunde Před 4 lety +2

    खुप छान कविता आहे. सगळ्या सख्यांचे भावविश्व तुमच्या कवितेतून.....👌👌👌

  • @rajeshreepatil7902
    @rajeshreepatil7902 Před 3 lety +1

    Khup sundar dhadad.sashi... books miltil Ka...kevel apratim..

  • @kishorepoorkar4587
    @kishorepoorkar4587 Před 5 lety +2

    क्या बात है शशी जी...मधुराणी जी तुम्ही नेमकं बोललात....त्यांच्या कविता आशय - अनुभवाने समृद्ध असून ही त्यात आक्रस्ताळी प्रकटन नाही.... तरी ही त्यांना जे सांगायचं आहे ते अलवार पणे एखाद्या नवजात रोपा प्रमाणे सरसरून येतं.

  • @shraddhakulkarni441
    @shraddhakulkarni441 Před 3 lety +1

    Khup khup chan👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @meaanimazikavita
    @meaanimazikavita Před 11 měsíci +1

    सगळ्याच कविता छान आहेत👌👌

  • @geetanerurkar5623
    @geetanerurkar5623 Před 3 měsíci

    सर्व कविता सुंदर पण मौन ही कविता मला खरी व मनाला भावली.अप्रतिम.

  • @rajeshwarijoharle6860
    @rajeshwarijoharle6860 Před 4 lety +1

    मी खुप भावुक झाले हां भाग ऐकुन, ऐकुन या साठी की सगळी कामं करता करता ऐकतेय☺️, असं वाटलं ना की आज भी माझ्या मनातल्या प्रतिबिंबाचं ऐकत होते🙏, खुप धन्यवाद माझी माझ्याशी भेंट घडवुन आण्यल्या बद्दल 🙏☺️

  • @anitaraut8506
    @anitaraut8506 Před 2 měsíci

    शशी ताईंचे कवितेचे बाळं खुपच सुंदर आहेत, आणि मधुराणी ताईंचे संभाषण, वाचन खूपच छान !

  • @pramiladesai6028
    @pramiladesai6028 Před 2 lety

    चहा आवडला खूप छान.... मस्त मस्त खूप मस्त 😘😘😘

  • @gaurav_dhere
    @gaurav_dhere Před 4 lety +2

    माया हा गुण मित्रा मध्ये असतो 😊 वाह वाह 👌👌

  • @innovations5120
    @innovations5120 Před 5 lety +7

    मनातला मित्र स्वप्नच चित्र
    रंगाचं सोहळा भावनांच मोहळा
    मित्राच चित्र मोहलाचा सोहळा
    निष्पाप निरागस तरी का उठे अंतरात कोहळा

  • @seemanagaonkar599
    @seemanagaonkar599 Před 2 lety +1

    वाह! किती छान सुंदर कविता मधुराराणी तुमच्या गोड आवाजाच्या जादूने कविता अगदी जिवंत होते , आणि शशीताई खुप खुप भावस्पर्शी सुंदर काव्यरचना आहेत तुमच्या 🙏🏻🙏🏻🙏🏻