#yzindiatv

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • सातारा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ कराड येथील पंकज मल्टीपर्पज हॉल येथे मंगळवार दि.30 एप्रिल रोजी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रीय कॉंग्रेसचे कराड दक्षिण तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे यांनी आयोजित केलेल्या या मेळाव्याला कराड दक्षिण मधून हजारो महिला उपस्थित राहिल्या होत्या.
    या मेळाव्याला अनिता जाधव,कविता म्हेत्रे,वैशालीताई शिंदे,सौ. सत्वशीला चव्हाण,माजी मुख्यमंत्री व विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण, खासदार श्रीनिवास पाटील माजी मंत्री राजेश टोपे, उमेदवार शशिकांत शिंदे,मनोहर शिंदे, प्रा.धनाजी काटकर यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
    या मेळाव्याची सुरुवात माजी जिल्हा परिषद सदस्या विद्याताई थोरवडे यांच्या स्वागत पर भाषणांनी झाली.
    सातारा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या या महिला मेळाव्याला कराड दक्षिणमधून उपस्थित राहिलेल्या महिलांची संख्या ही खरोखरच लक्षणीय होती सकाळी 11:00 वाजल्यापासून सुरू असणार हा मेळावा दुपारी चार वाजेपर्यंत सुरू होता तरी देखील महिलांचा उत्साह व उपस्थिती ही वाखाण्याजोगी होती.
    नितिन ढापरे
    वायझेड इंडिया टीव्ही कराड.

Komentáře •