नाट्यसंगीत आणि आशाताई खाडिलकर | Asha Khadilkar Interview | Dhyeyawede kalakar | Swarshree |

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • Dhyeyawede kalakar New Season | Swarshree | Parag Mategaonkar
    Welcome back
    we are back with New Season of Dhyeyawede kalakar with Asha Khadilkar.
    For more videos subscribe to our channel.Hit the bel icon.
    Let us know if you like the video in our comments box.
    Videography and Editing -Amol Mategaonkar
    Hits Of Suresh Wadkar Vol 1 | Lagi Aaj Sawan Ki | Audio Jukebox
    Top 50 Songs of Suresh Wadkar | सुरेश वाडकर के 50 गाने | HD Songs | One Stop Jukebox
    Meri Kismat Me Tu Nahi Sayad | Suresh Wadkar | Kavita Krishnamurti | Suron Ki Mehfil London
    Mauli के Performance ने किया Suresh Wadkar को चकित | Superstar Singer
    मन हा माेगरा | Mann Ha Mogara | Suresh Wadkar | JUKEBOX | Lord Vitthal Marathi Devotional Songs
    Yaman Medley by Suresh Wadkar Live HappyLucky Entertainment
    Raja Lalakri | Suresh Wadkar | Sayali Kamble |Shashank Kalyankar | Ek Sangeet Sandhya
    Asia's Singing Superstar - Grand Finale - Part 1 - Alankar Mahtolia's Performance
    OMG : Arijit Singh SHOCKING Comments by Suresh Wadkar | bakwas Behuda Songs
    Suresh Wadkar | प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्याशी सुरेल गप्पा | माझा कट्टा | ABP Majha
    Padma Bhushan Suresh Wadkar Talks About His Career As A Playback Singer
    GandharvaGaan Season2 Episode 05 | 'गंधर्वगान' पर्व २ भाग ५
    God Sakali | Vidya Karlagikar | Sukhada Bhave-Dabke | Makarand Vaishampayan
    साज़ तरंग : भाग ४० - हवाईयन गिटार विशेष भाग
    Smrutigandha Digital Diwali Pahat 2018
    Tithe Nande Shambhu | Ravindra Sathe, Prathamesh, Mugdha, Shalmali, Omkar | Spruha Joshi | Pranav H
    साज़ तरंग : भाग ३९ - पियानो विशेष भाग
    Hari Darshanachi Odha | Ketaki Mategaonkar | Suresh Wadkar | Abhang Marathi
    Asia's Singing Superstar - Grand Finale - Part 1 - Alankar Mahtolia's Performance
    Suresh Wadkar His Life Sadhana in his own words | Dhyeyawede Kalakar | Parag Mategaonkar | SwarShree
    Suresh Wadkar His Life Sadhana in his own words | Dhyeyawede Kalakar | Parag Mategaonkar | SwarShree
    The Maestros featuring Suresh Wadkar | Awesome TV
    Mauli के Performance ने किया Suresh Wadkar को चकित | Superstar Singer
    Suresh Wadkar SLAMS The Remix Culture, Praises Arijit Singh & Thanks Fans For Padma Shri

Komentáře • 56

  • @sunandagadgil9766
    @sunandagadgil9766 Před 2 lety +9

    आशा माझी बालवाडीपासूनची मैत्रिण! बोडसकाकांची पण आधीच्या पिढ्यांपासूनचे संबंध. आम्ही सर्व कुटुंब १९६५ साली उत्तर हिंदुस्थान पाहायला गेलो होतो तेव्हा कानपूरला त्यांच्याकडे तीन दिवस राहिलो होतो.काका,काकू, काशिनाथदादा, वीणाताई, सर्वांची दोन दिवस मैफिलच घरी होती.सांगलीला आले की घरी यायचेच. आशा व मी एकमेकींच्या घरच्याच! रविववारीही घरी जाऊन भेटायचोच. तिचे १ लीत असल्यापासूनच गाणे एक स्वतंत्र पठडीचे होते. माणिकताईंची अवघड गाणी सहज म्हणायची. " विजयपताका श्रीरामाची" इ. तसंच देहाता शरणांगता इ. नाट्यगीते प्राथमिक शाळेच्या स्पर्धेत गाऊश ठरलेला पहिला नंबर मिळवायची. तिचे दादा( वडील) तिला घरीच अशी गाणी शिकवायचे. पाचवीत ती आमचे राणी सरस्वती शाळेतील संगीत शिक्षक मोहिते बुआंकडे शाळेत पहिल्या ४ परीक्षांचा शाळा सुटल्यावर क्लास होता. नंतर आशा त्यांच्या घरी जाऊन शिकत असे.
    आशाने बापट बाल मंदिरमधे चौथीत असताना रंगमंचावर प्रथम " ध्रुवबाळ " नाटक आमच्या तेली सरांनी स्वत: लिहून बसविले होते, त्यात " ॐ नमो भगवते वासुदेवाय " हे गाणं अभिनयासह गायलं होतं. आशानं नारदमुनींची भूमिका केली होती.मी सुनीतीची भूमिका केली होती. आमच्या रा.स. कन्या शाळेची बहुतेक दरवर्षी एक संगीत नाटक बसवायची परंपरा होती.मोहिते सरांच्या मार्गदर्शनाखाली अनेक मुली गाण्यात तयार होत असायच्या. आशाच्या बहिणीही गाणं शिकून या नाटकात अभिनय करायच्या. आम्ही १० वीत असताना मोहितेबुआंची शाळेनी एकसष्टी साजरी करायचे ठरविले. त्यासाठी " संगीत सौभद्र " लिमये सर व लिमये बाईंनी त्यांच्या घरी तालमी घेऊन बसविले. देणगी तिकिट लावून हे नाटक केले असता सर्व खर्च वजा जाऊन ६१ हजराची गुरूदक्षिणा बुआंना अर्पण केली.(१९६९ साल) आज त्याची किती पट होईल! मोहितेबुआ ही महान! अत्यंत सामान्य आर्थिक परिस्थिती पण मनाची श्रीमंती आणि औदार्य केवढं! ती सर्व रक्कम त्यांनी शाळेला देणगी दिली! त्यांना साष्टांग नमस्कार. असे आदर्श आमच्या समोर असल्यामुळे संपत्तीचा लोभ कधी शिवलाच नाही.
    मला वाटतं आता एक मोठा लेखच लिहावा ! आशा मैत्रिण याचा खूप अभिमान आहे! थांबते.जयजय रघुवीर समर्थ!

    • @dhananjayprabhughate2477
      @dhananjayprabhughate2477 Před rokem

      काय सुंदर संस्कार,अहाहा! आमच्या पिढीला अशी माणसे बघायलाही मिळणे दुर्मिळ, खरंच हीच सालसता आशाबाईंकडे आहे। तुम्हा सर्वांना नमस्कार।

  • @santoshjoshi5633
    @santoshjoshi5633 Před 2 měsíci +1

    आशाताईंना अगदी प्रत्यक्ष नमस्कार करायला मिळाला हेच परमभाग्य

  • @shubhangideshak1997
    @shubhangideshak1997 Před 4 měsíci

    आशाताई मुलाखत अत्यंत सुंदर व प्रेरणादायी

  • @smitabhagwat13
    @smitabhagwat13 Před 10 měsíci +2

    इतक्या प्रसिद्ध आणि तितक्याच नम्र 🙏🙏🙏 आशा ताईंच्या विनम्र स्वभावालाच वंदन 🙏🙏🙏

  • @sumansawant5015
    @sumansawant5015 Před 5 měsíci +2

    न भूतो न भविष्यति🎉 अप्रतिम अनुभूतीचा अनुभव लाभला आहे.🎉🎉🎉🎉🎉

  • @vishwanathpurohit8182
    @vishwanathpurohit8182 Před rokem +2

    अत्यंत उत्तम मुलाखत झाली , एका मोठ्या परंतू अत्यंत सोज्वळ कलाकाराचे विचार ऐकण्याचे भाग्य मिळाले.

  • @umeshpotdar2529
    @umeshpotdar2529 Před rokem +3

    आपला वसंतराव देशपांडे यांच्या बरोबर शाकुंतल ते मानापमान हा दूरदर्शन वरील कार्यक्रम कधीही विसरू शकत नाही.त्यावेळी मी खूप लहान होतो, पण या कार्यक्रमा मुळे मला नाट्यसंगीताची आवड निर्माण झाली. अजूनही हा कार्यक्रम यु ट्यूब वर पुन्हा पुन्हा पाहतो. महाराष्ट्रासाठी हा कार्यक्रम एक मोठा ठेवा आहे.

  • @chitrabhat8151
    @chitrabhat8151 Před rokem +2

    Great Asha Tai 💐👏👏👏

  • @seetahariharan4089
    @seetahariharan4089 Před rokem +2

    Such a famous lady but so simple and so humble... I had attended her concert in 1992 in Pune, Nigdi Pradhikaran.. That was the first time i saw her in person... She had long hair.. Coincidentally I too have long hair.. I'm 67 yrs old now... Hope she still has long hair!

  • @dhananjayprabhughate2477

    फार सुंदर। आयुष्य असंच असावं । सकारात्मक

  • @dinkarlule664
    @dinkarlule664 Před 2 lety +1

    मला चि.सौ.आशा खाडिलकर व पती ह्यांच्याशी मैत्रीचा अभिमान वाटत असतो. ' सब मिल गावो, नंद ललन, पकड मोरी बहीयां " छान सादरीकरण. संधीचा उपयोग करणारी कलाकार गियीका. सस्नेह आशीर्वाद व शुभेच्छा.

  • @nareshmanjrekar6127
    @nareshmanjrekar6127 Před 14 dny

    ❤️❤️🌹🌹🙏🙏

  • @vijaynadkarni3228
    @vijaynadkarni3228 Před 3 měsíci

    अत्यंत गुणी कलाकार. खूप माहितीपूर्ण कार्यक्रम.

  • @rajudongarwar5908
    @rajudongarwar5908 Před 2 lety +2

    आशाताई खाडीलकर म्हणजे नाट्यसंगीतातील फार मोठा आविष्कार.......!!!

  • @jvjoshi1247
    @jvjoshi1247 Před rokem

    आपणा दोघांचेही आभार.. आजच्या नेटच्या युगात आशाताईंच्या सोज्वळ आणि सुसंस्कृत बंदिशी ऐकून
    बरं वाटलं.. नाहीतर यूट्यूब आणि इंस्टा वरील बीभत्स रिल्स युवकांना कुठे नेणार हा प्रश्नच आहे..

  • @anjukeni3907
    @anjukeni3907 Před 4 měsíci

    Khup chhan Ashatai❤

  • @dilipphadke565
    @dilipphadke565 Před rokem

    अतिशय सुरेख मुलाखत आहे आणि काही करायकलाचा मी साक्षीदार आहे याचा अभिमान आहे.

  • @arunbhalchandra2080
    @arunbhalchandra2080 Před 2 lety

    सुंदर, प्रांजळ आणि श्रवणीय मुलाखत. अभिनंदन आणि शुभेच्छा

  • @pramodjoshi5349
    @pramodjoshi5349 Před rokem +1

    Apratim

  • @arvindlimaye3477
    @arvindlimaye3477 Před 2 lety

    अतिशय सुंदर मुलाखत...! अत्यंत प्रांजळ आणि अभ्यासपूर्ण विवेचन. भारतीय शास्त्रीय, नाट्य व सुगम संगीताचा चालता बोलता इतिहासच जणू या मुलाखतीतून उलगडला आहे.अनेक मातब्बर गुरूंचे मार्गदर्शन, स्वतःच्या अंगी असणारी एकलव्य वृत्ती आणि आपल्या आई वडिलांवर असलेली नितांत श्रद्धा याचा परिपाक त्यांच्या गायकीतून आपल्याला दिसतोच...तो इथं व्यक्त झालाय.
    ऐकणार्याच्या मनात चैतन्य उत्पन्न करणारं गाणं आशाताई नेहमीच सादर करतात...अशा या विदुषीला मनःपूर्वक नमन व उत्तम शुभेच्छा...!
    मुलाखत अपलोड केल्याबद्दल त्यांचेही आभार...!👍💐💐💐

  • @aishwaryakhardenavis7952

    मजा आला (भैय्या स्टाईल) 👌🏻👏🏻

  • @cpvn889
    @cpvn889 Před 2 lety

    I am happy to see madam 👩🙏

  • @gurudini
    @gurudini Před rokem

    mastach

  • @shrikrishnadhage2086
    @shrikrishnadhage2086 Před 2 lety +1

    भाग्यवशात ,सौ.आशाताईंना कु.आशा पाटणकर असल्यापासून ऐकण्याचा योग आला.१९७२ पासून ह्या विद्यार्थीदशेतील गायिकेच्या आवाजाने मनांत घर केलं ते आजतागायत.
    अपरिमित कष्ट,गायन कलेवरील अढळ निष्ठा याचबरोबर ईश्वरी अधिष्ठान ह्यामुळे गायनक्षेत्रातले एक स्वयंभू व्यक्तिमत्व म्हणून त्या उच्च स्थानी आहेत.असंख्य चाहत्यांच्या शुभेच्छा नेहमीच त्यांच्या पाठीशी असतील.

  • @scharduldeshpande
    @scharduldeshpande Před měsícem +2

    mategaonkarani pratyek vakyanantar "bar" nahi mhanla tari chalel

    • @swarshree24
      @swarshree24  Před 29 dny +1

      नक्की लक्षात ठेवेन🤗

  • @kailaslaigude1142
    @kailaslaigude1142 Před 2 lety

    आशाताई, खुप गुणी कलाकार

  • @girishambhaikar9443
    @girishambhaikar9443 Před 2 lety

    खूपच सुंदर...श्रवणीय...प्रेरणादायी मुलाखत... स्पर्धेच्या युगातून तावूनसुलाखून निघालेली चतुरस्र गायिका...अनेक गुरूंकडून शिक्षण घेऊनही स्वतंत्र ओळख निर्माण केली... उत्तुंग व्यक्तिमत्त्व... हसतखेळत मुलाखत घेतली आहे... खूप शुभेच्छा...

  • @sanjaysawant6042
    @sanjaysawant6042 Před 5 měsíci

    Namaskar TAI

  • @nandkumarranade203
    @nandkumarranade203 Před rokem

    आशाताईंचा डाॅ वसंतराव देशपांडे यांच्याबराेबरचे ३ भाग नुकतेच ऐकले

  • @santoshpawar5700
    @santoshpawar5700 Před rokem

    आजवर मी त्यांच्यातल्या कलाकारा वर वेडा होतो, पण त्यांना ऐकल्यावर त्यांच्या मनावर सुद्धा वेडा झालो.

  • @sandeepsohoni8664
    @sandeepsohoni8664 Před 11 měsíci

    Recording khup low awajat jhala ahe. Actually Ashatai is my favorite singer

  • @shubhangideshak1997
    @shubhangideshak1997 Před 4 měsíci

    आशाताई मुलाखत अत्यंत सुंदर व प्रेरणादायी