आज बस जाळ्या जात आहेत पण यात बस ची काय chuk अवलिया प्रवासी ft.रोहीत धेंडे

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • #ST #Avaliya #Pravasi #podcast #एसटी
    सरकारं बदलली, नेते बदलले, काळ बदलला पण अख्ख्या महाराष्ट्राचं ओझं खांद्यावर पेलणारी लोकवाहिनी अजूनही तोऱ्यात उभा आहे. आजच्या धावपळीच्या युगातही एसटीचं दिवसेंदिवस बदलणारं रूपडं जगासमोर ठेवतोय तो "अवलिया प्रवासी" म्हणजे रोहित धेंडे. लालपरीसाठी या पठ्ठ्याने आपलं सर्वस्व वाहून घेतलंय.
    सध्या सोशल मीडियाचा जमाना. तसं बघितलं तर प्रत्येकजण आपल्याच मोबाईलमध्ये गुंग. बदलत्या तंत्रज्ञानामुळे आणि आधुनिक गोष्टींमुळे आपण हळूहळू परंपरागत गोष्टीसुद्धा विसरत गेलो. इतिहास, वारसा, संस्कृती या गोष्टींबरोबरच अभिमानाच्या गोष्टीसुद्धा हळूहळू लुप्त होताना दुर्दैवाने आपल्याला पाहाव्या लागतायेत.
    लालपरीचा अभिमानास्पद इतिहासही आपण हळूहळू विसरत चाललो आहोत. पण याच सोशल मीडियाच्या माध्यमातून "अवलिया प्रवासी" लालपरीचा समृद्ध वारसा जपण्याचा आणि आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मागच्या १५ वर्षांपासून प्रयत्न करतोय. त्याच्या आवडीच्या याच कामातून त्याला समाधान मिळतं.
    दुर्गम भाग, डोंगरदऱ्या, वाड्यावस्त्या, जंगल असो किंवा दुष्काळी भागातील एखादा डेपो असो. सगळ्या एसटी डेपोचा प्रवास करत या अवलियाने अख्ख्या महाराष्ट्र पालथा घातलाय. सोशल मीडियाच्या माध्यमातून एसटीच्या नव्या गाड्या, नव्या योजना, गाडीतील सुसज्ज आसन व्यवस्था आणि सुविधा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न रोहितचा असतो. "बस फॉर अस" या फाऊंडेशनच्या माध्यमातून तो एसटीचा प्रवास आपल्याला घडवून आणतो.रील्स, व्हिडिओमधून एसटीचं बदलतं रूपडं जगाला दाखवण्याचं काम तो करतोय... तेही न थांबता. पण एसटीच्या सतत बदलणाऱ्या वेळापत्रकामुळे प्रवाशांची गैरसोय होते. ही गैरसोय कमी होण्यासाठी त्याने एक अॅप काढण्याचा निर्णय घेतलाय. त्याच्या या अॅपचा फायदा भविष्यात प्रवाशांना होणार आहे.
    Instagram-@avaliyapravasi
    Twitter -avaliyapravasi
    YT -‪@AvaliyaPravasi‬
    शोध मराठीला सोशल माध्यमांवर फॉलो करा:
    📸 इन्स्टाग्राम - bit.ly/46l2kYO
    ▶️ CZcams - bit.ly/44i80AT
    Avaliya Pravasi
    Avaliya Pravsi mulkhat
    Interview of Avaliya Pravasi
    Rohit Dhende
    ST mahmadal
    MMRCTC

Komentáře • 23