84 Ye Hawa Ye Fiza | Prem Yatra | Pt. Raju Sawar | CP

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • A series of songs performed by Pt. Raju Sawar for CP members on the topic of 'Prem' (Love).

Komentáře • 17

  • @smitapatil6555
    @smitapatil6555 Před měsícem +1

    दत्त 🙏🌹
    प्रेमयात्रा
    सूत्र क्र.84
    ये हवा, ये फिजा...........❤️
    पंडितजींनी अत्यंत सुंदर गायलेले गीत आणि त्याचा केलेला बोधाचा विस्तार अतिशय सुंदर आजच्या सूत्राच्या अनुषंगाने दिव्य -हृदयाचा -हदयाला जाहलेला स्पर्श आणि त्या -हृदयाने घातलेली साद या -हृदयाची अर्तता वाढवते
    आहे.🙏
    खरच जीव किती क्षुल्लक, क्षणभंगुरातून कधी बाहेर येणार, आणि कधी दिव्य हाक त्याला ऐकू येणार, मायेच्या जंजाळात अडकून स्वतःलाच विसरून गेलेल्या जीवाला अगदी जवळची हाक ऐकूच येत नसावी तुझी जीवाच्या कल्याणाची कळकळ कधी उमगणार त्याला आज हे सूत्र जगताना तुझ्या निरपेक्ष निर्विकार शुद्ध -हदयाचे अन त्यातल्या दिव्य प्रेमाचे, तुझ्या कृपेचे प्रखर दर्शन होत आहे आणि तुझी पुकार गैहीराइत जावून खोलीतल्या ओलीस साद घालत आहे आ भी जा... आ भी जा...🙏
    दतात्रया,आज तुला आणि तुझ्या निर्वीकार प्रेमाला कडकडून सलाम🙏 तुझी हाक मला आज खुप बेचैन करते आहे आज पूर्ण पणे तु मला जाग करत आहेस झाकलेल्या डोळयात बोधाच अंजन घालून अंधारलेल्या जीवनात बोधाचे किरण पसरवत आहेस आणि सहज जीवन जगणारी नजर जीवात घटीत करतआहेस, तुझी नजर सामान्य होऊन जीवाची वाट न्याहाळत राहते खरे आहे पण याची खबर जीव घेतच नाही तो ना एक विशिष्ट जडाच्या आकारात अडकून खोटी भक्ती करत बसतो दृश्य मोठ करत राहतो खोट जीवन खोटा आनंद घेत राहतो ठरलेला काळ जगून जीवन अक्षरशा वाया घालवतो जीव खोटया कृत्रीम फुलाच्या सुगंधात सहवासात अडकलाय खऱ्या गुलाबाच्या फुलाचा सुगंध तर त्याच्या सहवासात जाऊनच येतो ना तसच खरा आनंद खरी मुक्ती ही फक्त तुझ्या पाशीच आहे रे अंन्यत्र कुठे असूच शकत नाही आणि हे भाग्य मी जगत आहे बघ तुझीच कृपा आहे म्हणून मी तुझ्या सानिध्यात आहे आणि मी तुझ्या जवळ असणे ही तुझी दयाच आहे बघ🙏
    दतात्रया, तुझा एक क्षण तो जीवाचे पूर्ण आयुष्य असते हे समजल्यावर तर जीवाची किती क्षुल्लक पात्राता आहे मग का हे माया मृगजळ ओढवून खोटया ज्ञानाने प्रेमाने जीवन मिरवतो अज्ञाणाने बंधनाचा श्वास जगतो आणि तो श्वास काय देतो तर मृत्यू आणि खर सांगू का हेच माझे अधिचे जीवन होत रे, पण खरा मोकळा श्वास आनंद प्रेम तर तुझ्या सानिध्यात येऊन अवगत जाहले आहे बघ रिक्त श्वासाचे, बंधन मुक्त जीवन वाट्याला येऊन जीवन बहरले आहे त्या खडका वरच्या बीजाला उगवणारी जमीन मीळाली, धडधडणाऱ्या -हृदया पलिकडचे -हृदय मीळाले त्या -हृदयाची धडधड दत्त जाहली धन्यवाद दत्त 🙏
    पंडितजी खुप खुप-हृदयापासून धन्यवाद दत्त आनंद 🙏
    धन्यवाद दत्त 🙏🌹

  • @nileshpandit6766
    @nileshpandit6766 Před měsícem +1

    🙏दत्त 🙏
    🌸 प्रेम यात्रा 🌸
    🌼 ये हवा, ये हवा, ये फिजा 🌼
    दत्त प्रभू 🙏
    प्रेमाचे सूत्र बनवून जीवाला तू🙏 ज्या पद्धतीने नटवतो आहेस. त्या साठी जीवाकडे खरं तर शब्द नाहीत. तुला हृदया ने वंदन कराव जीवाची वात होऊन तुला ओवाळावे. असं काहीस होत आहे.
    हे हृदयाच्या श्वासा 🙏 सूत्र ऐकले. मीच मला पाहिले मी कुठे दिसेना थोडं आत डोकावले.
    आणि जे दिसले ते खूप भारीच होते.
    तुझे🙏 वाट पाहणे खूप उंचीच्या गहराईत नेणारे आहे.🙏
    जीव स्वतः तुझ्या कडे येईल हे अशक्य आहे
    ज्या पद्धतीने तू🙏 मला वेधले, मला सानिध्यात बसवले तो प्रवास आज डोळ्यासमोरून गेला.
    बंधनाने बांधलेलं, विकारात अडकलेलं जीवन एका क्षणात समाप्त झालेलं दिसलं.
    एक तुझा 🙏आवाज मात्र कानात परत परत ऐकू आला आ भी जा.. आ भी जा..... 🙏
    दत्त परमेश्वरा 🙏 क्षणिक सर्व गळून पडले आहे.
    उदासीनता आता थांबत नाही, तुझा चेहरा सतत डोळ्या समोर आनंदाने स्मित करत असतो. 🙏 तुझं🙏 अस्तित्व माझ्यात आनंदाने खेळत आहे.
    सर्व कण नी कण बदलून गेलं आहे.
    यत् गत्वा न निवर्तनते 🙏जीवात भिनल आहे.
    अगदी ठरवलं तरी आता पहिल्या सारखं जगू शकत नाही.
    तुझ्या🙏 नशेत मी नित गुंग झालो आहे.अशातच तुझं हे प्रेम सूत्र पुन्हां आवाज देऊ लागलं. 🙏
    पण माझ्या करुणाकारा 🙏 आता माझ्या ईच्छेचा प्रपंच राहिलाच कुठे. 🙏 सर्वत्रच तर तूच उरतो आहेस. करण्यातील करणे केव्हाच संपले आहे.आता फक्त होणे आपोआप इतकेच उरलेले दिसले. 🙏
    एकदा का आंबा मुराला त्याच लोणचं झालं तर परत आंबा कुठून आणायचा. 🙏
    त्यातून ही काही उरलं असं दिसत असेल तर 🙏
    सब भार सोप दिया तेरे हाथो में..... 🙏
    कर तुला जसं करायचं 🙏 घडव तूला जसं घडवायचं 🙏
    अज्ञानी मी बालक 🙏
    पण तुझ्याशिवाय आता जगू शकत नाही, नाही नाही. 🙏
    आता फक्त तू🙏 हाक मारावी
    आणि जीवाने आदेश म्हणावं. 🙏
    धन्य 🙏
    पंडितजी हृदय🌹पूर्वक धन्यवाद. 🙏
    प्रेम 🌹आनंद
    दत्त! 🫂🙏🌸🙏

  • @rajubhansali649
    @rajubhansali649 Před měsícem

    दत्त 🙏🌹💝🎷🎻🎹🎵🎺🥁🎶🩷💗

  • @vinodranade6967
    @vinodranade6967 Před měsícem

    दत्त

  • @dattatraynikam9988
    @dattatraynikam9988 Před měsícem

    ❤️ दत्त प्रेमयात्रा रचना क्र. 84 ❤️
    🌹 ये हवा, ये हवा, ये फिज़ा 🌹
    दत्तात्रया,नाही चिपकली होऊन परत जन्माला यायचं मला, नाही अडकायचं आता परत मायेमध्ये.
    दत्तात्रया,मी अनेक जन्म मायेमध्ये गुंतून संपवले, तू प्रत्येक वेळेस आवाज दिला,परंतु, मायेतून मला नाही सुटता आलं.
    दत्तात्रया, आता असं नाही होणार, तू समोर आहे, मी समोर आहे, मी जिवंत आहे, तू प्रत्यक्ष आहे, आता मिठी नाही सुटणार ,आता सानिध्य नाही वायाला जाऊ देणार .
    दत्तात्रया, तुझ्या हृदयाची हाक या हृदयापर्यंत पोचली आहे तुझा परेचा आवाज, या बेंबीच्या देठात शिरला आहे.
    दत्तात्रया, तुझं प्रेम हेच सर्वस्व आहे, तू नेशील तिकडे जायचं आता yes मध्ये बसलो आहे.
    लगन तुमसे लगा बैठे जो होगा देखा जायेगा तुम्हे अपना बना बैठे जो होगा देखा जायेगा.🙏
    चलो दिल के लंबे सफर पे चलेंगे,
    सफर खत्म कर देंगे हम तो वही पर,
    जहा पर तुम्हारे कदम ले चलेंगे..
    पंडितजी, तुम्हाला हृदयापासून खूप खूप धन्यवाद धन्य!दत्त!🌹🙏

  • @ravindrataksale2151
    @ravindrataksale2151 Před měsícem

    🙏🙏🙏 दत्त 🙏🙏🙏
    प्रेम यात्रा रचना 84
    --- ये हवा ये फिजा ---
    मागील सूत्रात दत्त परमेश्वराने सांगितले की, तु तुझे रंजो गम, परेशानी मला देऊन टाक. आता तुझा आनंद प्रवाही होईल.
    पण या सूत्रात परमेश्वर कळवळून जीवाला म्हणतो. अजुनही तु तुझ्या जुन्या सवयी सोडत नाहीस. त्या तुला आपल्या वाटतात. पुन्हा पुन्हा त्याच त्याच चुका तु करत आहेस. त्यामुळे तुझे जीवन अमृ्ताप्रमाणे वहात नाही. तुझ्या धारणेत "चिरंजीत्व "येत नाही. तुझे जीवन उमलले आहे. आता पुन्हा माघारी जुन्या जगात जाऊ नकोस.
    ज्ञान अथवा प्रेम या दोन्ही पैकी एक मार्ग निवड. पण सानिध्याला पर्याय नाही. तूची किती वाट पाहणार? हे तु ध्यानी घे, मी आहे म्हणुन आनंदाचा मौसम चिरंजीव पीठात आहे. तु आनंदी असशील तर तुला चेतन जगत मिळेल. तु आनंदी नसशील तर शुष्क जीवन वाट्याला येईल.
    माझे बोधाचे डोळे तुला मार्गदर्शन करीत आहेत. ते तुला आनंद राज्यात निश्चित घेऊन जातील.
    जीव मायेच्या जगात राहुन ध्येयापासून दूर जायचा संभव असतो. पण ईश्वरा तु, गुप्त राहुन युक्त्या योजतो. आणि तुझा आवाज जीवापर्यंत पोहचवितोस. शाश्वत आनंदासाठी प्रयत्न करतोस.
    पैसा, मान दृश्य आहेत. पण आनंद अदृश्य आहे.त्यातून फायदा नाही, असे हे व्यापारी जगत सांगते. जीव या फसव्या जगात आता रमणार नाही.
    हे सूत्र सांगते की, जीव त्याची लौकिक जगातील प्रतिष्ठा काही कारणाने कमी झाली की तो स्वतःची पात्रता वाढविण्यासाठी कार्यरत होतो. ईश्वराकडे जाऊन पात्रता वाढेल असा त्याचा विश्वास असतो. ईश्वरही त्याची तळमळ जाणुन प्रेमाने त्याला जवळ करतो. त्याचा सन्मान वाढवितो.
    तर काही भक्त अवसर ऐकून, चिरंजीव पिठातील पुस्तके वाचून ईश्वराच्या समीप जाण्याची मनिषा बाळगतात. उत्सुकता जागृत होते. ईश्वरी कृपेची महती कळते.
    स्वतःच्या कर्तृत्वाने पुढे जाऊ पाहतो. ईश्वर कर्मामुळे नाही तर कृपेने मिळतो. हे ठाऊक नसल्याने तो ईश्वराची साथ कंटाळून सोडतो. ईश्वराच्या राज्यात स्वतःचे डोके चालत नाही. 10वी फ च्या वर्गात बसावे लागते. हे समजले की तो ईश्वराच्या राज्यात स्थिर होतो.
    आकारातील ईश्वर पाहण्याची सवय असल्याने निराकार ईश्वर पचनी पडत नाही. बोधाने निराकार ईश्वराची गाठ घेणे त्याला रुचत नाही.
    दत्त परमेश्वर शेवटी म्हणतात - आता माझ्या अवतार समाप्तीचीही वेळ आली आहे.. तु कधी जागा होणार?
    तुला बोध आहे पण इंद्रिये तिकडे वळत नाहीत. यामुळे तुला ईश्वराच्या स्वरूपाचे ज्ञान आहे, पण ते अज्ञान ठरते. जे बंधनात अडकवते ते कसले प्रेम ?
    ईश्वर पतन पावतो. तो जीवाच्या पातळीवर येऊन संवाद साधतो. प्रेमाने जवळ घेऊन त्याचा मान सन्मान वाढवितो. अवसरा मधे बसवितो. ते फक्त आनंदी व्हावे म्हणुन.
    शेवटी तो कळवळुन म्हणतो -
    रुक रही है सासे = आ, के मिल, आ के मिल, आ के मिल.
    आ भी जा, आ भी जा, आ भी जा.
    ही हवा आनंदाने बागडु दे. हा मौसम बहरू दे.
    पंडितजींनी ईश्वराचे हे मनोगत ऋजु अंतःकरणाने, काळजाच्या ओलाव्याने आमच्या पर्यंत पोचविले. 🙏🙏🙏
    संगीतकार रवी यांनी गीतातला भावार्थ आमच्या पर्यंत पोचवीला. धन्यवाद.
    🌹🌹🌹🌹 दत्त 🌹🌹🌹🌹