मी अरुणा बोलतेय... डॉ. प्रतिभा जाधव...हृदयद्रावक कविता...

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • 'मी अरुणा बोलतेय’ हा एकपात्री प्रयोग पाहिला आणि साक्षात 'अरुणा’च समोर उभी राहिल्याचा भास झाला. तिच्या वेदना, तिची स्वप्नं, तिची घुसमट, तिची जगण्याची धडपड सारं सारं अनुभवल त्या एका तासात. प्रयोग पाहताना काळीज थराथरून उठलं. माझ्याच नाहीत तर त्या हॉलमधील प्रत्येक स्त्री-पुरुषांच्या डोळ्यात पाणी होतं.
    नर्सच्या पांढऱ्या पोशाखात एक स्त्री हॉलमध्ये दाखल झाली आणि म्हणाली. ओळखलं मला...? मी.. अरुणा... अरुणा शानबाग...
    42 वर्ष मरणाप्रय यातना सहन करणारी... मी नक्की जिवंत होते की मृत होते ? हा मलाच पडलेला मोठा प्रश्न...
    मग अरुणा आपला लहानपणापासू ते मोठे होईपर्यंतचा प्रवास सांगते. त्यानंतर 27 नोव्हेंबर 1973 च्या रात्री काय झाले हे सांगते. ते ऐकत असताना डोळ्यासमोर सगळे दृश्य जणू उभे राहतात.
    रात्रीची वेळ.., निरव शांतता...वार्डमध्ये एक राउंड घेतला... त्यानंतर मी तळघरात माझ्या कामसाठी गेले.. तर तिथे “तो’ त्या मुक्या प्राण्यांच्या अन्नातलं काही मास चोरू पाहत होता. तो कोण समजलं न तुम्हाला, तो नराधम, वासनांध.. हॉस्पिलटच्या कुत्र्यांसाठी आलेलं मास 'तो’ चोरायचा, त्याची चोरी मी पकडली होती...
    'असे प्रकार बंद कर नाही तर वरिष्ठांकडे तुझी तक्रार करते.’. एवढं बोलून मी वार्डमध्ये वळली तोच त्याने मागून येऊन माझा हात धरला, पिळला.. मी ओरडले.
    “आई गं...’ वाचवा... (प्रतिभा इतक्या मोठ्याने ओरडली की हॉल स्तब्ध) इतक्या वेगाने हे सारं घडत होतं.. मला काहीही समजत नव्हतं.. अंगभर नुसत्या वेदनाचं काहूर, कपड्यांची ओढाताण, अंगावरची कातडी कुणी सोलून घेतयं जणू... मी संपले.. मी उद्ध्वस्त झाले.. वाचवा.. वाचवा.. मदत करा.. पण आवाज वरच्या मजल्यावर गेलाच नाही.. मी तशीच रात्रभर. प्रेतासारखी पडून होती...
    अत्याचार करुन त्या नराधमानं कुत्र्याच्या गळ्यात बांधायच्या बाधांयच्या जाडजूड साखळीने माझा गळा आवळला... माझ्या मेंदूची नस या हल्ल्यात भयंकर दुखावली गेली. अन् मी बनले जिवंत प्रेत... जिवंत मुडदा... जिवंत शव...
    यानंतर अरुणा कशी निःशब्द झाली तो 42 वर्षांचा प्रवास प्रतिभा यांनी मांडला.. त्यानंतर देशात झालेल्या दिल्ली ते कोपर्डी सगळ्या बलात्कारांच्या घटनावंरही त्यांनी प्रकाश टाकला. उपस्थितांना निशब्द करणारे या प्रयोगाचे सादरीकरण डॉ. प्रतिभा जाधव-निकम यांनी केला होता.

Komentáře •