Encounter Specialist Pradeep Sharma आणि Hitendra Thakur यांच्यात लढत होणार ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 09. 2019
  • एनकाऊटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा विरूध्द ठाकूर लढत लक्षणीय ठरणार
    - प्रदीप शर्मा नालासोपाऱ्यातून शिवसेनेचे ऊमेदवार असण्याची शक्यता
    - प्रदीप शर्मा यांनी यांनी सुरू केली मोर्चेबांधणी
    - प्रदीप शर्मा विरूध्द क्षितीज ठाकूर किंवा हितेंद्र ठाकूर ऊभे राणहण्याची शक्यता
    - विद्यमान आमदार क्षितीज ठाकूर यांच्यासमोर प्रदीप शर्मा यांचे कडवे आव्हान
    राज्यात सगळ्यात चुरशीची आणि सर्वांचं लक्ष वेधून घेणारी लढत कुठे होणार असेल तर ती पालघर जिल्ह्यात ... एनकाउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांनी शिवबंधन बांधून लगेच नालासोपारा मतदारसंघात प्रचाराला सुरूवात केली आहे. या मतदारसंघात सध्या हितेंद्र ठाकूर यांचा मुलगा आणि जितेंद्र अर्थात भाई ठाकूर यांचा पुतण्या क्षितीज ठाकूर आमदार आहे. या संपूर्ण परिसरात भाई ठाकूर अर्थात जितेंद्र ठाकूर गँगचं वर्चस्व होतं. जितेंद्र ठाकूर सध्या जेलमधे आहे. पण तिथूनही त्यानी काही हत्या घडवून आणल्याचा आरोप आहे. ६० वर्षीय हितेंद्र ठाकूर हे सध्या वसईचे आमदार आहेत. पण मुलगा क्षितीज ठाकूर याला प्रदिप शर्माविरूध्दची निवडणूक अवघड जाणार असं वाटलं तर ते नालासोपाऱ्यातून उभे राहण्याची शक्यता आहे आणि मुलगा क्षितीज पाटील याला वसईचं तिकीट देण्याची शक्यता आहे.
    हितेंद्र ठाकूर यांच्यावर अर्धा डझनपेक्षा जास्त केसेस आहेत. त्यात शस्त्रास्त्रांचा धाक दाखवणे, सार्वजनिक शांतता भंग करणे, सरकारी कामात अडथळा आणणे वगैरे केसेसचा समावेश आहे. त्यांना अजून एकाही केसमधे शिक्षा झालेली नाही. म्हणूनच ते निवडणूक लढवू शकतात.
    भाई ठाकूर गँगचा या भागातला दबदबा आणि हितेंद्र ठाकूरनी स्थापन केलेली बहुजन विकास आघाडी यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत कठीण असणार आहे. शिवसेनेनी पालघर जिल्ह्यावर वर्चस्व मिळवण्याचा चंग बांधला आहे.
    पालघर जिल्ह्यात विधानसभेच्या एकूण ६ जागा आहेत. त्यापैकी तीन जागांवर बहुजन विकास आघाडी निवडून आली होती. त्यात वसईमधून पक्षाचे सस्थापक हितेंद्र ठाकूर, त्यांचा मुलगा क्षितीज नालासोपाऱ्यातून तर बोईसरमधून विलास तरे निवडून आले होते. पण विलास तरे यांनीा नुकताच शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यामुळे बोईसरमधे तेच उमेदवार असतील. वसईमध्ये मागच्या निवडणूकीत हितेंद्र ठाकूरनी शिवसेना पुरस्कृत विवेक पंडीत यांचा पराभव केला होता. पंडीत आताही उत्सूक आहेत पण काँग्रेसचे राज्य सचीव विजय पाटील हे शिवसेनेत दाखल झाले आहेत आणि त्यांनाच तिकीट दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे वसईमधेही बहुजन विकास आघाडीला तगडं आव्हान उभं राहणार आहे.
    अजून जागावाटप झालेलं नसलं तरी शिवसेनेनी वसई, नालासोपारा आणि बोईसर या तिन्ही मतदारसंघात जोरदार मोर्चेबांधणी सुरू केलीय.
    पण या सगळ्यांत महत्त्वाची लढत असेल ती एनकाऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा विरूध हितेंद्र ठाकूर किंवा त्यांचा मुलगा क्षितीज ठाकूर ... ठाकूर कुटुंबीयांची या भागांत चांगलीच दहशत आहे आणि ही लढत एक एनकाउंटर स्पेशलिस्ट विरूध्द गँगस्टरचा भाऊ असलेल्या हितेंद्र ठाकूरच्या कुटुंबियांमधे होणार आहे.
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    #LokmatNews
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Subscribe to Our Channel 👉🏻
    czcams.com/users/LokmatNe...
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat september2019 apr-oct19

Komentáře • 29

  • @adityajadhav9081
    @adityajadhav9081 Před 4 lety +10

    ठाकुर परिवारची दहशत नाय आहे त्यानी 100% केलेली विकास कामे आहेत...
    म्हणून बहुजन विकास आघाडी निवडुन येते

  • @amber7713
    @amber7713 Před 4 lety +5

    Only Kshtij Thakur

  • @HasanShaikh-lj7fd
    @HasanShaikh-lj7fd Před 4 lety +1

    Medam aap nam to barabar lo vo ek lok neta hai logo ki jaan hai vikas ki shan hay

  • @kamleshmalpedi5042
    @kamleshmalpedi5042 Před 4 lety +1

    Pradeep Sharma kis charjes me Thane jail me band thaa Uske staff ke sath public ko pta hai & rahi baat progress ki vo kisne kiya ye bhi public ko pta hai ...Kuch log public ko missgide kr rahe hai ....? Public ko sirf progress krne wale Ka sath dena chahiye bolbachan dene wale Ka Nahi ....?

  • @hadalbhavesh
    @hadalbhavesh Před 4 lety +10

    bhadotri vasait nakoch ... 🤘

  • @akshaysawant24
    @akshaysawant24 Před 4 lety +4

    Thakur’s did very well in Vasai virar 🤘🏼

  • @bharatmerijaan6
    @bharatmerijaan6 Před 4 lety +1

    Don barobar raahecha ki kutrya barobar hai aplaya decision aahey

  • @mohanpatil7457
    @mohanpatil7457 Před 4 lety

    SS win

  • @bittulobo7770
    @bittulobo7770 Před 4 lety +3

    आयात केलेला परप्रांतीय आमदार आम्हाला नकोच आहे.भेटला दिली ओसरी आनं भट हातपाय पसरी.अशी तुमची हालत होईल.

  • @Ymmusic-so1bd
    @Ymmusic-so1bd Před 4 lety +4

    बोगस एनकाऊंटर किंग😁

  • @dtraveller3146
    @dtraveller3146 Před 4 lety

    If Shiv Sena comes development will happen in Vasai n Virar n bhai Giri will go away