l आदी गणाला रणी अनीला l पारंपरिक जुना गण l गोड आवाजाचा बादशाह 🎤🎤 भास्कर खिलारे l

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 05. 2022
  • आदी गणाला रणी अनीला l पारंपरिक जुना गण l गोड आवाजाचा बादशाह 🎤🎤 भास्कर खिलारे l
    आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा व शेअर करा🙏🙏
  • Zábava

Komentáře • 579

  • @sureshchavhan4074
    @sureshchavhan4074 Před 2 lety +69

    मी तमाशा संगीत शौकीन आहे मी हलगी ढोलकी ऑर्गन वाजवतो आपला गण आणि कृष्णाची संगीतमय ओळख ऐकताना मा संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर यांचा तमाशा पाहत असल्याचा भास झाला आपल्या संगीतकार बहीण भाऊ याची कला किती ही ऐकत राहावे असे वाटले आपणास खूप खूप शुभेच्छा असेच आम्हाला जून ते सोन ऐकण्याची आपणा कडून संधी मिळो ही अपेक्षा

  • @haridaskarkare2369
    @haridaskarkare2369 Před rokem +25

    अश्या लोक कलाकाराला कोटी कोटी प्रणाम, अशी गण गवळण बतावणी परत ऐकायला मिळत नाही , सलाम या कलाकाराला

  • @vijaykantmirkar1105
    @vijaykantmirkar1105 Před rokem +45

    आज पुष्कळ दिवसांनी अस्सल शाहिरी कला तुम्हा कलाकारकडून ऐकली, धन्य झालो, तुम्हाला मानाचा मुजरा!!

  • @BaluTupe-pr3fl
    @BaluTupe-pr3fl Před měsícem +3

    अभिनंदन सर्वांचे सर्व टीम उत्कृष्ट उच्च कोटीची गायन करतात वादन करतात सलाम तुमच्या कलेला आज महाराष्ट्राची कला जिवंत तुमच्यामुळेच आहे धन्यवाद

  • @sanjaymore6592
    @sanjaymore6592 Před rokem +9

    एक लाख चार हजार इतक्या लोकांनी पाहीलेला गण! अभिनंदन भास्करराव खिलारे !! हार्दिक अभिनंदन !!!

  • @kashinathdhagare3396
    @kashinathdhagare3396 Před 2 měsíci +4

    गण ऐकून 2024 चा तमाशा बघितल्या सारखं वाटलं धन्यवाद खिलारी बंधू

  • @kondibaabhang2703
    @kondibaabhang2703 Před 5 měsíci +3

    डोळ्यात पाणी आलं, लहानपणी चोरून तमाशा बघायला जायचो ही धून महिना भर तरी कानात घुमत राहायची आणि खूप दिवसांनी आज ऐकली, नेमकं काय झालं आज हा आवाज पोरका झालाय. 👌👌

  • @Jjjj-ms3rg
    @Jjjj-ms3rg Před rokem +7

    वा! ग्रामीण ठसका . खरंच असे कलाकार नेहमीच होत नाहीत. नाळ जुन्या कलेची आहे. सुंदर आणि बापुरावांचा गण खरंच जबरदस्तच

  • @subhashsapkale512
    @subhashsapkale512 Před 11 měsíci +10

    गोडं आणी सुरेख आवाज शाहीर 💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻

  • @santoshlondhe189
    @santoshlondhe189 Před rokem +32

    हा गण ऐकल्यानंतर कोण म्हणतं आपली लोककला लोप पावत चालली आहे म्हणून,,,,,,
    हा खजिना आहे आपल्या मराठी संस्कृतीचा,,,,

  • @sachinbhingardeve3578
    @sachinbhingardeve3578 Před rokem +33

    भास्करराव आपण अप्रतिम आवाजाचे धनी आहात, खूप छान...

  • @user-kf8lp7cl1g
    @user-kf8lp7cl1g Před 28 dny +1

    हा माझा खरा खुरा गावाकडील महाराष्ट्र आहे . शोधा म्हणजे सापडेल बघा कला क्षेत्रातील हिरे माणिक मोती आहेत. देव यांना खूप यश देवो ही प्रार्थना.....!!!!!

  • @onlyramkrushnaharidattatra4934

    कलाकार म्हणून आपण खरोखरच पात्र ठळला आहात ❤देवा हि कला अवगत होणे खरोखरच सरस्वती प्रगट आहे.❤अप्रतिम अनेक आशीर्वाद❤

  • @madhukarthokare3606
    @madhukarthokare3606 Před měsícem +1

    सलाम तुमच्या जिवंत कलेला - अशा गुणाची कदर झाली पाहीजे .

  • @triratnamusicalsnavimumbai6804
    @triratnamusicalsnavimumbai6804 Před 5 měsíci +2

    लहान असताना.. मी.. एचएमव्ही च्या थाळीवर ऐकलेला गण .. आणि तमाशात गाजलेला गण... शाहीर तुमच्या आवाजात ऐकून तृप्त वाटलं! वंदन!

  • @user-lb7sl4xr4e
    @user-lb7sl4xr4e Před rokem +20

    खरे लोककलेचे उपासक....खूप सूंदर आवाज....त्रिवार वंदन.....💐💐👌

  • @Sagarreshma6767
    @Sagarreshma6767  Před 2 lety +20

    तमाम तमाशा प्रेमी साठी एक विनंती आहे,खरतर हे कलाकार एका गरीब कुटुंबातून आहेत.यांची परिस्तिथी सध्या बिकट आहे.आपण दाद देतात त्या बद्दल धन्यवाद.परंतु जर आपल्यातील च दानशूर व्यक्तींनी जर थोडा पुढाकार घेतला तर आणि यांना थोडी मदत म्हणून जर आपण थोड आर्थिक सहाय्य केलं तर फार मोठं योगदान राहील आपले.सर्वांना विनंती आहे.जे इच्छुक असतील त्यांनी कृपया या सर्व कलाकारांना सढळ हाताने मदत करा🙏🙏 जे इच्छुक आहेत त्यांनी कृपया कॉमेंट मद्ये आपले उत्तर द्यावे🙏🙏
    तुमची एक मदत या कलाकारांना खूप मोठा आधार देऊ शकतात 🙏🙏

    • @ravindrazambare9621
      @ravindrazambare9621 Před 2 lety

      भास्कर खिलारेंचा फोन नंबर द्या 🙏

    • @kedargirbuwa8802
      @kedargirbuwa8802 Před rokem

      भास्कर खिल्लार यांच्या मोबाईल नंबर द्या

    • @kedargirbuwa8802
      @kedargirbuwa8802 Před rokem

      अतिशय सूर ताल लयबद्ध गणगवळण अप्रतिम मानाचा मुजरा

    • @navnathbankar7746
      @navnathbankar7746 Před rokem

      खिलारे.याचा.फोनं.नंबर.पाठवा.

    • @bharatmali4467
      @bharatmali4467 Před rokem

      Peti.dholki.gayak.khup.chan.aahe.bharat.mali.ra.gour.tta.kallam

  • @vithalsonawane6099
    @vithalsonawane6099 Před rokem +15

    अप्रतिम आवाज त्याच प्रमाणे सर्व कलाकारांची खूप छान साथ

  • @valmikbodake7716
    @valmikbodake7716 Před 6 měsíci +10

    खुप सुंदर सादरीकरन विना साऊंड सिस्टम चा इतका सुंदर अवाज खुप छान

    • @shreekantdabholkar1555
      @shreekantdabholkar1555 Před 2 měsíci

      बिना साउंड सिस्टीम इतका सुंदर आवाज तर उत्तम साउंड असेल तर काय बहार येईल.

  • @dagadujadhav4509
    @dagadujadhav4509 Před rokem +9

    जुन्या आठवणी जागृत करणारा गण अप्रतिम सादरीकरण धन्यवाद!कलाकारांचे अभिनंदन,,,,,

  • @rajesh_Jgtp
    @rajesh_Jgtp Před 4 měsíci +1

    महाराष्ट्राची अस्सल संस्कृती आणि लोककला. .जबरदस्त .... जुन्या काळातील तमाशाचा अनुभव आला...

  • @shrikantnikam2141
    @shrikantnikam2141 Před měsícem +4

    Age 70 years. Old is Gold. Salam maza Ganala.

  • @dnyaneshmaharao1789
    @dnyaneshmaharao1789 Před rokem +12

    अस्सल आवाज. आज इतक्या चढ्या सूरात कुणी गात नाही. शाहीर कमाल केली! मस्त-जबरदस्त!

  • @mineshsawant628
    @mineshsawant628 Před rokem +3

    लहानपणी ची आठवण आली.गन आणि गौळण तमाशाच अंग आहे.पन आजकाल ते पाहायला मिळत नाही.खुप छान 🙏 लाजवाब

  • @Political1300
    @Political1300 Před měsícem

    खूप छान ❤️❤️❤️तुमच्या सारखे कलावंत आहेत म्हणून हे सगळं ऐकायला भेटत अशीच सादरीकरण करत राहा 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼धन्यवाद देतो ऐकून खूप आनंद झाला ❤

  • @ramnathkharde460
    @ramnathkharde460 Před 7 měsíci +1

    अस्सल पारंपरिक गण.असे कलाकार पुन्हा होणे नाही.सर्वांना दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना.

  • @rohidasrokade1519
    @rohidasrokade1519 Před 5 měsíci +2

    फार फार सुंदर आवाजात एक गीत प्रस्तुतीकरण ऐकूण समाधान झाले. धन्यवाद.

  • @BhausahebGaikavad
    @BhausahebGaikavad Před 14 hodinami

    लाजवाब।एकच।नंबर।महाराटृची।शान

  • @ratanmore8298
    @ratanmore8298 Před rokem +3

    आदराने डोळे भरले तुमची कला पासून गुरू राज

  • @dilipkumbhar3661
    @dilipkumbhar3661 Před 4 měsíci

    सर्व कलाकारांचे आवाज अजूनही या वयात खूपच दमदार लाज़वाब आहेत.लहानपणी तमाशा पहायचो,अजूनही खेडोपाडी तमाशा पहाण्यास जातो.तुमच्या सारख्या अशा थोर कलावंता मूळेच ही परंपरा अजून ही चालू आहे,व चालूच रहाणार
    *सलाम तुम्हां सर्वांना व तुमच्या अप्रतिम आवाजाला*

  • @balasahebpawar4712
    @balasahebpawar4712 Před 28 dny +1

    Ekdam kdk sadrikaran navin video patva

  • @ashokbaviskar2263
    @ashokbaviskar2263 Před 2 měsíci

    1 number. Maharashtra chi lok kala aapan jivant thevat aahet. Shasnane dakhal ghyavi & yogya madat karavi. Hi lok kala jivant rahili pahije. Sarv kalakaranna dhannyawad.

  • @chandrakantadhav2974
    @chandrakantadhav2974 Před 2 lety +11

    खानदानी कलाकार म्हणतात ते यांना पाहिल्यावर कळते .खरच दाद दयावी यांच्या कलेला.

  • @dadapatole9341
    @dadapatole9341 Před 2 lety +12

    वा वा वा! काय गायकी अप्रतिम, लहानपणी असे ऐकत होतो, खूप छान दादा, ताई 🙏👌👍💐💐💐💐💐

  • @ravisonawane3936
    @ravisonawane3936 Před 2 lety +6

    एकदम भारी दादा ह़ो खूप जुनी आठवण झाली भाऊ खरच मनापासून अभिनंदन करतो भगवंता उदंड आयुष्य देवो तुमले 🙏🙏

  • @kisanbamble1889
    @kisanbamble1889 Před rokem +6

    अतिशय गोड आवाज व संगीत अप्रतिम आहे
    सर्वांना मनापासून धन्यवाद
    आम्ही संगमनेर कर

  • @umeshmane3527
    @umeshmane3527 Před rokem +3

    खूप छान सुंदर आवाज, धन्यवाद ही कला जोपासून लोकांचे मनोरंजन करता.

  • @ravindrazambare9621
    @ravindrazambare9621 Před 2 lety +9

    अतिशय जीवंत कलाकृती... शतशः प्रणाम 🌹🌹🌹🌷🌷🌷💐💐💐🙏🙏🙏

  • @shashikantpalkar4531
    @shashikantpalkar4531 Před 4 měsíci +1

    वा क्या बात है .छानच सुंदर .सुंदर चाल आणि आवाज पण❤❤

  • @navnathshinde3582
    @navnathshinde3582 Před rokem +2

    खुपच छान गण आहे माझ्या आवडीचा आहे १च नंबर 💐💐

  • @shankarkadale4309
    @shankarkadale4309 Před 14 dny +1

    खुप सुंदर

  • @madhukarthokare3606
    @madhukarthokare3606 Před měsícem +1

    एकदम छान सादरीकरण .

  • @tukaramyadav8439
    @tukaramyadav8439 Před rokem +2

    एकदम कडक सादरीकरण आपली गायकी उच्च लेव्हल आहे

  • @sampatjadhav2238
    @sampatjadhav2238 Před měsícem +1

    अभिनंदन भास्कर 🎉🎉

  • @anillohararu197
    @anillohararu197 Před rokem

    खूप च मस्त
    मी अधून मधून सकळी उठल्यावर ऐकत असतो खूप मस्त वाटते
    खूप मस्त गायले आणि वाजवले
    डोलकी मला जास्त आवडते ,खूप पण वाजवता येत नाही
    ह्या सर्व म्युझीक ची खूप आवड आहे मला खूप ईच्छा आहे मला शिकायची ,लहान पणा पासून ची इच्छा आहे ,मी लहानाचा मोठे झालो आता नियमित कामा मुळे ह्या गोष्टी दुरावल्या आहेत पण मी रोज सकाळी गन गवळण ऐकल्या शिवाय कामात मन रमत नाही
    तुम्ही किती मस्त गाता वाजवता अप्रतिम
    तुम्हचे खूप कौतुक करावे तेव्हडे कमी आहे आशीच लोकसेवा करत रहा धन्यवाद ।

  • @hasrajkale3110
    @hasrajkale3110 Před měsícem

    वा काय सुरेख गण गायला धन्यवाद🎉🎉🎉

  • @daglejaganath6505
    @daglejaganath6505 Před 10 měsíci +1

    जय महाराष्ट्र कला खुप छान आपणास मानाचा मुजरा 🎉❤

  • @shreekantdabholkar1555

    खूपच छान , मन प्रसन झाले, विषेश म्हणजे ढोलकी वादन आतिशय जबरदस्त, त्यांचे नांव कृपया नमूद करणे. ढोलको वादकास पून्हा एकदा खूप खूप शुभेच्छा.

  • @arundatkhile4106
    @arundatkhile4106 Před rokem +3

    भास्कर भाऊ तुम्हचे वग सादरीकरण मी दररोज ऐकल्या शिवाय झोपत नाही. तुमच्या गायकीला त्रीवार मानाचा मुजरा 👏👏👏

    • @aanasahebaadangle921
      @aanasahebaadangle921 Před rokem

      Very nice but the society and government don't care.its great sad.its our responsibility to keep this art alive.

  • @madhukarhyalij4342
    @madhukarhyalij4342 Před 8 měsíci

    सलाम आपण सर्वांना आपल्यासारख्या कलावंतामुळे लोककला जिवंत आहे

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise5647 Před 6 měsíci +1

    सुपर गण गायला ‌🙏💐🌺🌾🚩

  • @shailendrakumartupsunder4475

    आजही महाराष्ट्राची लोक कला जिवन्त आहे.. हे पाहून खरंच मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा...हे सांगताना आभिमान वाटतो... असे हाडामासाचे कलाकार पुन्हा होने नाही... अजरामर करून टाकलत पट्ठे बापूराव यांना...
    महाराष्ट्र शासनाने अशा कलाकारांना योग्य तो सन्मान देऊन पुरस्कार करावा .. जे ने करून महाराष्ट्रा ची लोक कला जिवन्त राहील. शाहीर आपल्या परिवारास खूप खुप शुभेच्छा....

  • @laxmikale8958
    @laxmikale8958 Před 2 lety +3

    अप्रतिम सुपर एकच नंबर 👌🏻💐💐💐💐

  • @sachindevmane1558
    @sachindevmane1558 Před rokem +1

    महाराष्ट्राची परंपरागत कला आपण जिवंत ठेवत आहात हे पाहून फार आनंद वाटतो. आज अनेक तमाशा मंडळे सुद्धा आर्केस्टा होऊन धांगडधिंगा होतायतं, पण आपले हे प्रयत्न नक्कीच यशस्वी होवोत अशी गणरायाचरणी प्रार्थना करतो.

  • @sudampatil.omnamahshiway9983
    @sudampatil.omnamahshiway9983 Před 2 měsíci +1

    Bhaskar khilare group Aplyala sarswati devi ,Rangdevata pathishi raho Ashi Prabhu charni pratha a

  • @achyutkoli533
    @achyutkoli533 Před rokem +6

    खूपच सुंदर आवाज आहे. 👏👏

  • @kondibaabhang2703
    @kondibaabhang2703 Před 5 měsíci

    खरंच किती दंग झालो होतो सलाम या कलाकारला 🙏🙏🙏🙏

  • @hasrajkale3110
    @hasrajkale3110 Před 4 měsíci

    वि काय गन गायला आहे आज मात्र जुने शब्द ऐकायला मिळाले आहे धन्यवाद

  • @ramkrishnapanchal9103
    @ramkrishnapanchal9103 Před měsícem

    ह्या कलाकारां मुळे कला आज टिकून आहे 🙏❤️

  • @dr.sanjaylokhande2965
    @dr.sanjaylokhande2965 Před 2 lety +6

    आवाजाची जादू आहे गणाचा रंगच न्यारा।👌💐

  • @changdevmasurkar3119
    @changdevmasurkar3119 Před měsícem +1

    मस्तच❤

  • @subhashpawar3089
    @subhashpawar3089 Před 4 měsíci +1

    अशा लोक कलाकाराला कोटी कोटी प्रणाम👌✌️

  • @user-ne4qq5sh1d
    @user-ne4qq5sh1d Před 10 měsíci +1

    मस्त खुपच छान वाटले ऐकुन 😊

  • @tukaramsutar8560
    @tukaramsutar8560 Před 2 lety +1

    सुंदर अति सुंदर अप्रतिम ऐकतच राहवं असं सादरीकरन परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो

  • @SagarHarpude
    @SagarHarpude Před rokem +1

    आधी गणाला रणी आणला
    नाहीतर रंग पुन्हा सुनासुना
    धन्य शारदा ब्रह्म नायका, घेऊन येईल रूद्रविणा
    साही शास्‍त्रांचा मंत्र अस्‍त्रांचा, दाविल यंत्र खुणाखुणा
    नाहीतर रंग पुन्हा सुनासुना
    सद्गुरू माझा स्वामी जगद्गुरू, मेरूवरचा धुरू आणाआणा
    ब्रह्मांडा भवता तो एक सवता, दिवाच लाविल म्हणाम्हणा
    नाहीतर रंग पुन्हा सुनासुना
    माझ्या मनाचा मी तू पणाचा, जाळून केला चुनाचुना
    पठ्ठेबापूराव कवि कवनाचा, हा एक तुकडा जुनाजुना
    नाहीतर रंग पुन्हा सुनासुना❤

  • @dhondibhaurakshe9572
    @dhondibhaurakshe9572 Před 4 měsíci

    गण,गौलन,बतावणी काही औरच,मराठी मातिची अस्मीता ❤

  • @shankarbhosle7942
    @shankarbhosle7942 Před měsícem

    स्पष्ट आवाज फार छान, धन्यवाद

  • @socialhuman7556
    @socialhuman7556 Před 2 lety +1

    अरे वा
    काय बहीण भाऊ एकजीव रहत्तात
    खरंच ही रत्ने आहे
    भारतीय संस्कृती या गरीब लोकांच्यात च बघायला मिळतात

  • @rajuwalke6360
    @rajuwalke6360 Před 2 měsíci

    🎉 वाह उस्ताद खुब दिलकश अदा...

  • @kalupatil3777
    @kalupatil3777 Před rokem

    परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य आयुष्य लाभो आपली लोककला मंडळ स्थापन केले आहेआपली कला खरोखर चांगली आहे आपले कुटुंब या कलेत सहभागी झाले

  • @nivruttipatil5500
    @nivruttipatil5500 Před 7 měsíci +2

    खानदानी सच्चे कलाकार 🎉
    अभिमान वाटतोय 😊

  • @NamdevKhude-le6gq
    @NamdevKhude-le6gq Před měsícem +1

    Very Good. Sound And. Gan ..

  • @RohidasShinde-d7l
    @RohidasShinde-d7l Před 13 dny +1

    खूप छान 5:51

  • @pranavkengar2257
    @pranavkengar2257 Před 2 lety +1

    छुम छुम नाचुलागला गण गौरीचा रंगला कराव हा गण सादरीकरण

    • @bhaisahebinamdar5840
      @bhaisahebinamdar5840 Před rokem

      आठवणीतील गाणी या साईट वर आहेत काही गण.. कृपया पहावे

  • @satishundalkar5879
    @satishundalkar5879 Před 8 měsíci

    खिलारी बंधू भगिनी विनम्र वंदना, अतिशय अप्रतिम गायन वादन प्रत्यक्ष patthe बापूराव तुम्ही उभा केला, एका डोळ्यात आनंद एका डोळ्यात अश्रू

  • @sanjayrodi4783
    @sanjayrodi4783 Před rokem +1

    आजच्या या आधुनिक युगामध्ये आपण ही जी आपली, पारंपरिक कला जपली आणि जोपासली त्या बद्दल आपले आभार

  • @rahuldesale7264
    @rahuldesale7264 Před rokem +13

    आमचे कान तृप्त केल्याबद्दल तुमच्या सर्व कलाकारांचे मनस्वी आभार....

  • @bhaskarahire6056
    @bhaskarahire6056 Před rokem +1

    व्वा भास्करराव अप्रतिम आवाज. सलाम आपल्या कलेला.

  • @shubhamlandge3132
    @shubhamlandge3132 Před 2 měsíci

    क्या बात हैं कमाल.. 🙏🏻👌🏻

  • @rajuwalke6360
    @rajuwalke6360 Před 2 měsíci

    खूपच सुंदर गायन आणि ढोलकी... दत्ता महाडिक यांचे चार तमाशे पाहिले आहेत दत्ता महाडिक यांचे कलाकार म्हणुन उत्तुंग व्यक्तिमत्व होते.....
    सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा.

  • @arunbarde8270
    @arunbarde8270 Před rokem +2

    खूपच छान कान तृप्त झाले हा गण ऐकून, अशा लोककलावंत यांना मदत होईल यासाठी कृपया यांचे UPI देत चला.🙏

  • @radhakrushnakende1000
    @radhakrushnakende1000 Před 10 měsíci

    असल खानदानी हाडांचे कलाकार,माझा मुजरा आहे तुम्हाला,

  • @balasahebaiwale3416
    @balasahebaiwale3416 Před rokem +1

    गण ऐकूण ऐकून असे वाटले खर तर स्टेज वर तुम्ही ढोलकी पेक्षा गण गवळण म्हणाली असती तर तमाशा पहिलयापेक्षा जास्त नकीच गजलाच असता ऐकून समाधान वाटले🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️

  • @vpawarp786
    @vpawarp786 Před 6 dny +1

    खूपच सूंदर❤😂

  • @ganeshkadam2218
    @ganeshkadam2218 Před 3 měsíci

    आरे वा हेच खरे जजातीवंत कलाकार ..आहेत या कलावंता साठी शासन दरबारी आवाज ऊठवणारा नेता निवडा आणी विधान सभेत पाठवा ❤

  • @user-rt7ld2lu6b
    @user-rt7ld2lu6b Před 2 lety +1

    खरंच खूपच सुंदर सादरीकरण,,,,,,,
    ग्रामीण भागातील ही पारंपरिक लोककला आता लोप पावताना दिसत आहे,,,,,, कारण या कलेमध्ये आताची तरुण पिढीचा म्हणावा तेवढा उत्साह दिसून येते नाही,,,,,व तरुण प्रेक्षक सुद्धा नाहीस होताना दिसत आहे,,,,,, तरी सुद्धा युट्युब च्या माध्यमातून ही कला आमच्या सारख्या शौकीन प्रेक्षकांपर्यंत पोहचविण्यासाठी खिलारे बंधु अविरत प्रयत्न करताना दिसत आहेत,,,,, म्हणुन माझ्या सर्व प्रेक्षक बांधवाना एक विनंती करावीशी वाटते,,, की आपण जर तमाशा पाह्यला गेलो तर तिकीट काढून ही कला पाहतो,,,असेच आपण जरी मोबाईलवर यांची कला पाहत असलो तरी,,,,त्यांच्या कलेला दाद म्हणून त्यांना माणुसकीच्या नात्याने मदत करावी अशी मी विनंती करतो,,,,
    पत्रकार,,,,,,, बाळासाहेब गुरव
    मु, पो, बेळंकी, ता,मिरज, जि, सांगली
    मो,7414912964

  • @ajinathvidhate2178
    @ajinathvidhate2178 Před rokem +2

    खूपच छान गायन गायन वादन कला आहे आपणाला काही मानधन मिळते की नाही हे कळले तर बरे होईल तसेच शासनाने या कलाकारांची कदर केली पाहिजे व यांना मानधन दिलेच पाहिजे

  • @shivmatsangeet6075
    @shivmatsangeet6075 Před rokem

    खूप छान सादरीकरण
    एकच नंबर

  • @harunmogal8263
    @harunmogal8263 Před rokem +1

    भास्कर दादा व त्यांचे सहकारी टीमचे फार फार अभिनंदन धन्यवाद

  • @RanjeetJadhav-oz4oy
    @RanjeetJadhav-oz4oy Před rokem

    मनापासून आदर मस्त लय भारी

  • @sandipbharmal9404
    @sandipbharmal9404 Před rokem

    खुप सुंदर ताल स्वर लय मधील गायन वादन या कलेचा वारसा पुढे घेऊन गेले पाहिजे.आणि ही लोककला तरुण पिढी मध्ये कशी रुजविता येईल यासाठी प्रयत्न झाले पाहिजे कला टिकवली पाहिजे

  • @Arjunhaeale5707
    @Arjunhaeale5707 Před rokem

    अप्रतिम गण गायलात आपण .विशेष म्हणजे यांचा तमाशा आमच्या गावी बऱ्याच वेळा झालेला आहे (तीसंगिकर)

  • @eshwarshivdas7726
    @eshwarshivdas7726 Před 4 měsíci +1

    खूपच छान गायन

  • @hirwebabasaheb258
    @hirwebabasaheb258 Před 3 dny

    खुप छान 🎉🎉

  • @agatrojadhav8623
    @agatrojadhav8623 Před 6 měsíci

    अतिसुंदर. आमच्या कुंभारी गावी यात्रेनिमित्त येणारा पूर्वीचा हक्काचा तमाशा. कलेची परंपरा असणारे खिल्लारे कुटुंब.

  • @user-pd3mb2rp2u
    @user-pd3mb2rp2u Před 2 měsíci

    खूपच सुंदर धन्यवाद

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 Před 2 lety +2

    खरच तुमच्या पाचही भावंडाच मी विठठल काळे पाटील. नाना पुणे खरच तुमाला माझा मनापासून. दंडवत कारण खरच खिलारे परीवार खूप कलेने भरून वाहत आहेत .देवाने खरच तुमाला हि कला दिली. खरच आपल कुटूंब. सर्व गुण संपन्न आहे महाराज खरच खूप खूप अभिनंदन

  • @dnyaneshkolpe968
    @dnyaneshkolpe968 Před 6 měsíci

    व्वाह..शाहीर सलाम..👌👌❤❤🙋🙏

  • @potdarnandkumar9325
    @potdarnandkumar9325 Před 4 měsíci

    अश्या कलावंतांना सरकार कोट्यातून सहकार्य मिळायलाच पाहिजे, तसेच कलाकारांना प्रोत्साहन मिळावे म्हणून आपन सर्वांनी या कार्यक्रमाचे आयोजन करुन यांना मदत केली पाहिजे.....

  • @Jjjj-ms3rg
    @Jjjj-ms3rg Před rokem

    खूपच सुंदर 🎉 कारण अशा ग्रामीण ठसक्यात गायले आहे की अंगावर रोमांच येतो. काय कडकं आणि वरच्या पट्टीत गवळण गाणे म्हणजे कुणाचेही काम नाही. ही गवळण बघताना आणि ऐकताना गाण्याचा आणि ढोलकी हरमोनियम्म ठसका जबरदस्तच!
    अशी लोककला ज्यांनी लहानपणी ऐकली असेल त्यांना हा ठेवा म्हणजे अतुलनीय🎉
    अभिनंदन करावे तेवढे कमीच. कला नसानसात काय असते याची खात्री पटते.
    तुमच्या कलेला प्रोत्साहन द्यावे असे सरकारने ठरवले पाहिजे . आर्थिक
    मदत द्यावी. नाहीतर निस्वार्थी पणे सेवा करणे कुठे आणि कुठे सध्याच्या बेगडी मालिका आणि बेगडी अभिनय गायन कला. फक्त आर्थिक फायद्यासाठी कलेचा वापर करून पैसे कमावणारे कुठे?