एका हत्तीच्या सोंडेत सापडला हिरा.. 🤔 | ऐश्वर्य संपन्न गोंदेश्वर | Maharashtra Desha | gondeshwar

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 10. 2021
  • नमस्कार मंडळी
    आज आपण नाशिक जिल्ह्यातील गोंदश्वर या ठिकाणी भेट देणार आहोत.. कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा..
    गोंदेश्वर मंदिर हे महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर या तालुक्याच्या गावी असलेले महादेवाचे मंदिर आहे. भारत सरकारने या मंदिराला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून दिनांक ४ मार्च, इ.स. १९०९ रोजी घोषित केलेले आहे.[१]
    सिन्नर येथील गोंदेश्वर मंदिर
    हे मंदिर पुरातन [[भूमिज स्थापत्यशैली|बांधकामाचा उत्तम नमुना आहे. हे मंदिर १२ व्या शतकात गवळी राजकुमार राजगोविंद याने बांधलेले आहे. हे मंदिर १२५ फुट Χ ९५ फुट आहे. हे मंदिर पाच मुख्य मंदिरांचा समूह असल्याने त्याला शैवपंचायतन म्हटले जाते. यांतील गोंदेश्वराचे मुख्य शिवमंदिर मध्यावर असून सभोवतीची चार उपदिशांना असणारी मंदिरे पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू यांची आहेत. मंदिरात सभामंडप व गाभारा आहे. गर्भगृहावर बांधलेले, आकाशाकडे झेपावणारे मंदिराचे पटईचे शिखर अतिशय देखणे असून अप्रतिम कोरीवकामाने सजवलेले आहे. गर्भगृहात रेखीव शिवपिंडी आहे. सभामंडपातील खांब नक्षीने कोरलेले असून त्यांवर आणि मंदिरांच्या भिंतींवर देव-देवता, गंधर्व-अप्सरा, पौराणिक आणि रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत. मंदिरातील शिल्पकाम त्रिमित असून त्यावर पडणार्या परावर्तित प्रकाशाच्या आणि सावलीच्या छटांतून मंदिराचे देखणेपण अधिकच उठावदार दिसते.
    रथसप्तमीनिमित्त अनेक भाविक या मंदिरात येऊन सूर्यपूजन करतात. तसेच विद्यार्थ्यांकडून मंदिराच्या प्रांगणात सूर्यनमस्कार काढून बलोपासनेचा संकल्प केला जातो.
    या मंदिराचा अजून एक वैशिठ्ये म्हणजे गर्भगृहात देवतेवर अभिषेक केल्यानंतर ते वाहून जाणारे पवित्र जल मंदिराच्या बाहेर सोडले जाते तिथे मगरीचे तोंड शिल्पित केलेले दिसते. बऱ्याच मंदिरात आपल्याला गाईचे तोंड (गोमुख) शिल्पित केलेले दिसते आणि त्यातून ते जल बाहेर येते. गोमुखातून आलेले जल हे पवित्र मानले जाते. परंतु हे गोमुख इ.स.च्या तेराव्या शतकानंतर दिसू लागते. त्याआधी मकरप्रणाल अर्थात मगरीचे तोंड कोरलेले दिसते आणि ते पवित्र जल मगरीच्या तोंडातून बाहेर पडत असते. मगर हे गंगेचे वाहन आहे. त्याच्या तोंडातून येणारे जल ते गंगाजल हे सांगण्यासाठी, मगरीचे गंगेचे असेलेले नाते स्पष्ट करण्यासाठी मकरमुख कोरलेले दिसते...
    धन्यवाद..
    आपलाच - आशुतोष देशमुख
    जय महाराष्ट्र 🙏🚩

Komentáře • 21

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Před 2 lety

    Khoop. Sundar.

  • @rajivvaidya5314
    @rajivvaidya5314 Před 2 lety

    छान माहीती मिळाली.

  • @sanjayjadhav-ld5gk
    @sanjayjadhav-ld5gk Před 2 lety +2

    आशुतोष भाऊ सुपर खूपच छान काम चालू आहे. आपल्या मुळे खूप खूप कही वेगळे पाहायला व त्याची अप्रतिम अशी माहिती भेटती आपले खूप खूप आभार 🙏🙏🙏🙏

  • @dhanashreephadke34
    @dhanashreephadke34 Před 2 lety

    खूप सुंदर माहिती... एक suggestion tumhi जागांचे google map pan share kara na...

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs  Před 2 lety

      नक्कीच करेन यापुढे ☺️👍🏼🙏🚩
      मनापासून धन्यवाद

  • @ransindhu
    @ransindhu Před 2 lety +1

    आशुतोष भाऊ तुम्ही एक अनोखा महाराष्ट्र आम्हाला दाखवत आहात. संपुर्ण महाराष्ट्र आपण लवकरच कव्हर कराल ही आशा आहे.

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs  Před 2 lety

      धन्यवाद दादा
      तुमचे आशिर्वाद असेच सोबत राहोत
      जय महाराष्ट्र

  • @rscmathsacademy317
    @rscmathsacademy317 Před 2 lety

    भाऊ महाराष्ट्र प्राचिन इतिहास वर एक मालिका निर्माण करण्याचा प्रयत्न आपण करत आहात खुप खुप धन्यवाद

  • @anilakulkarni2591
    @anilakulkarni2591 Před 2 lety

    खूप छान माहिती दिलीत.
    मी सिन्नर तालुक्यातील आहे.
    आमची शाळा गोंदेश्वर मंदिरा जवळच होती.
    आम्ही श्रावण महिन्यात महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेत आसू .या मंदिरात दहावी बारावीचे अनेक विद्यार्थी आभ्यासासाठी येतात. तेथील वातावरण अतिशय शांत असते. तुम्ही आशीच नविन नविन माहिती देत जा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.

  • @yashwantgadgil8989
    @yashwantgadgil8989 Před 2 lety

    Khidrapur narshihwadi, सेनापती kapashi, khidrapur to सांगली 35 k. M
    . आहे अतिशय सुंदर महादेवाचे मंदिर आहे 100 हत्ती वर देऊळ पेलले आहे, नक्षी काम छान, सुंदर आहे कोल्हापूर जिल्हा मध्ये आहे, सांगली, जयसिंगपूर, narshihwadi, सेनापती kapashi, khidrapur आहे कृष्णा नदी पलीकडे कर्नाटक राज्य आहे नक्षी काम सुंदर आहे

  • @vaibhavrajethorat9960
    @vaibhavrajethorat9960 Před 2 lety +1

    बाळा,गोंदेश्वर व पदमेश्वर अशी दोन मंदिर आहे,
    लीळाचरित्र या ग्रंथात यांचा उल्लेख केला आहे
    हे मामा भाच्यांनी बांधले आहे असे म्हणतात

  • @Ghumakkad_Sachin
    @Ghumakkad_Sachin Před rokem

    Episode 1 Trirashmi-Pandav caves, Nashik
    czcams.com/video/73CUfQCD4H4/video.html
    Episode 2 Trirashmi-Pandav caves, Nashik
    czcams.com/video/oNXdBVe--w0/video.html
    Episode 3 Trirashmi-Pandav caves, Nashik
    czcams.com/video/5Taed5aYcqw/video.html
    Kanheri caves, Mumbai:
    czcams.com/video/VaqWBSUpCXk/video.html
    Lothal-Indus Valley Civilization:
    czcams.com/video/Gw_gluB0gyg/video.html
    Dholavira- Kutch Sindhu culture:
    czcams.com/video/xrxliZ7eZuM/video.html
    Karle caves, Lonavala:
    czcams.com/video/kOxBIkb3mPo/video.html

  • @hemantpathak8472
    @hemantpathak8472 Před 2 lety

    न ला नच उच्चारा ,न चा ण करण टाळा

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs  Před 2 lety

      सर्दी झालेली दादा तेव्हा 😂 त्यामुळे आपोआपच असा उच्चार झालेत

    • @sampatlaxmankudalekudale3136
      @sampatlaxmankudalekudale3136 Před 2 lety

      आतीशय सुंदर कलाकृती आसैलेले शिव मंदिर आशा मंदीराचै जपनूक झाली पाहिजे आसा ठैवा पुन्हा होणे नाही आपलया पुर्रवजानी आपलया साठी ठैवलैला ठैवयाचै सवरकक्षण चांगल्या पद्धतीने संभाळला पाहिजे जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs  Před 2 lety

      @@sampatlaxmankudalekudale3136
      नक्कीच बंधू 😊🙏🚩