लोणकढी रवाळ साजूक तूप | विरजण कसे लावावे? कसे साठवावे? सविस्तर कृती| रवाळ तुपासाठी 2 टिप्स Sajuk Tup

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • *सरिताज किचनची शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित लाकडी घाण्याची तेलं ऑर्डर करण्यासाठी ८९५६१६८७८२ या नंबर वर व्हॉटस अॅप मेसेज किंवा कॉल करा.
    किंवा खालील लिंक वर क्लिक करून ऑर्डर बूकिंग करा
    saritaskitchen...
    To Order Sarita’s Kitchen Chemical Free Pure Cold Pressed Oils Whats App OR Call on 8956168782
    Or Click on the link below to book the order -
    saritaskitchen...
    लोणकढी रवाळ साजूक तूप | विरजण कसे लावावे? कसे साठवावे? सविस्तर कृती| रवाळ तुपासाठी 2 टिप्स Sajuk Tup
    पूर्वी घरात फ्रीज नसायचे, तरीसुद्धा प्रत्येक घरी साय साठवून घरच्या घरी लोणकढी साजूक तूप कढवले जायचे. मुख्य म्हणजे ते आंबट नसायचे, ही कसं काय बुवा? पूर्वी एकत्र कुटुंब असेल किंवा दूध चांगल्या प्रतीचे असल्याने साय भरपूर साठायची. अगदी आठवडाभरात भरपूर साय साठून लोणी काढले जाऊन तूप निघायचे. माझ्या माहेरी सुद्धा 2008 पर्यंत फ्रीज नव्हता. आईला कधी गरजच भासली नाही. माझ्या लग्न झाल्यावर सुद्धा विषखपटणं सारख्या उष्ण प्रदेशात 2 वर्षे फ्रीज नव्हता, पण मला कधी गरज भासलीच नाही, कारण आई मुले फ्रीजशिवाय किचन सांभाळणे चांगलेच माहिती होते.
    पण आजकाल घरामध्ये दूध भरपूर नसल्याने किंवा पातळ दूध असेल तर साय कमी निघते आणि पुरेसे लोणी काढण्यासाठी वेळ जास्त लागतो. त्यामुळे फ्रीज मध्ये साय साठवली जाते, पण त्यामध्ये तयार होणारे ताक बेचव निघते. अस म्हंटले जाते की दूध पूर्णानं आहे. त्यापासून कोणताच पदार्थ वाया जात नाही. पण बऱ्याच जणांना तूप कसे कढवायचे माहिती नसते. तर आज आपण घरच्या घरी फ्रीज कहा वापर करून लोणकढी तूप आणि चवदार खमंग ताक कसे बनवायचे ते पाहुयात.
    कृती -
    1) दूध तापवून संपूर्ण थंड झाले की त्यावरची साय काढून झाकून फ्रीज मध्ये ठेवावी. अशीच 3 दिवस साय साठवून ठेवावे, फक्त दर वेळेला नवी साय घातली की हलवून घ्यावे. म्हणजे साय कडवट होत नाही.
    2) चौथ्या दिवशी साय घालावी आणि त्याच्या सोबत थोडे विरजण म्हणजे दही घालावे. आणि चांगले घवळून 5-6 तास रात्रभर साय फ्रीज बाहेरच ठेवावी. म्हणजे मलई ल चांगले विरजण लागते.
    3) दुसऱ्या दिवशी सकाळी साय फ्रीज मध्ये ठेवून द्यावी. आणि आता दररोज येणारी दुधावरची साय यामध्ये घालून रोजच्या रोज चांगले मिसळून घ्यावे, म्हणजे वरची साय चांगली मिसळली जाते आणि पिवळी होत नाही, कडवट होत नाही किंवा बुरशी येत नाही.
    4) पुरेशी साय जमा झाली की जमा झालेले सायीचे दही बेर काढून घुसळून घ्यावे. पाणी न घालता आधी चांगले घुसळून घ्यावे, थोडा तेलकट थर जमा होतोय असे वाटू लागले की थंड पाणी मिसळावे, थंडाव्यामुळे लोणी एकत्र येऊन वर गोळा होतो.
    5) लोणी काढून दुसऱ्या भांड्यात काढावे, लोणी 2-3 वेळा स्वच्छ धुवून ते पाणी जमा झालेल्या ताकात मिसळावे.
    6) तयार लोणी मंद आचेवर जाड तळाच्या भांड्यात कढवण्यासाठी ठेवावे. सुरुवातीला पाणी सुटून फेस येतो, पाण्याचा आवाज कमी होईल तसा तूप कढले असे समजावे, मध्ये मध्ये ढवळून घ्यावे.
    7) पाण्याचा आवाज कमी झाला की गॅस बंद करून त्यात तुळशी पान / खाऊचे पाने / खडे मीठ घालून घालावे, थोडा पाण्याचा शिंतोडा देवून झाकून ठेवावे.
    8) थंड झाले की गाळून काचेच्या बरणीत किंवा स्टील च्या डब्यात भरून ठेवावे.
    #howtomakegheeathome #homemadeghee #tupkasekadhave #lonkadhisajuktup #sajuktup #howtomakegheeathomeinmarathi #saritaskitchen #तूपकसेकाढावे #घरच्याघरीतूपकसेकढवावे #लोणकढतूप #साजूकतूपरेसिपी
    Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
    www.youtube.co...
    Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
    Follow Us on FaceBook - / 100053861679165
    For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com
    Production By Odd Creatives & Management 9011394304

Komentáře • 509

  • @harshpatil3672
    @harshpatil3672 Před rokem +48

    साक्षात अन्नपूर्णा महाराष्ट्र कन्या आपली सरिता ताई ,,

    • @aryasworld2023
      @aryasworld2023 Před rokem +1

      खूप छान

    • @shivajidatir5810
      @shivajidatir5810 Před rokem +1

      Ho na खरंच अन्नपूर्णेचा आशीर्वाद आहे

    • @suhasinivichare206
      @suhasinivichare206 Před rokem +1

      खरंच ,सरिताच great आहे बाकीच्या पेक्षा

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 9 měsíci

      मनापासुन आभार. Thank u very much

    • @ashavichare153
      @ashavichare153 Před 8 měsíci

      Qqqq​@@aryasworld2023

  • @anagharane776
    @anagharane776 Před rokem +57

    खूप सुंदर video👌👌 तुमची समजावून सांगण्याची पध्दत अप्रतिम आहे. सगळया प्रश्नांची उत्तरं मिळतात अशा प्रकारचे शिक्षण कोणत्याही centering college ला जाऊनही मिळणार नाही. तुमचं हे chanel आमच्या साठी स्वयंपाक शास्त्राचं विद्यापिठ आहे 👍Thanku vary much

    • @musicalharmony843
      @musicalharmony843 Před rokem +1

      Vaa kiti chhan Ani perfect bolalat mam.

    • @ashwinikulkarni9066
      @ashwinikulkarni9066 Před rokem +2

      I totally agree with this compliment ...
      सरिता ...तुमचे
      मी हे कौतुक तितके कमीच .. भाषा.. बोलणं शांत पणे पध्दत समजावून सांगितले की मनातले प्रश्न ओळखोळखून मार्गदर्शन करणं.. सगळे चे खूप कौतुकास्पद... असे च रहा मनापासून शुभेच्छा आणी Thanks

    • @motiramalu1476
      @motiramalu1476 Před rokem

      ​ Àadddd1àasaadadaaàaaa mi mi ni ki ki CT hu AA 🧔👶🧔🏽🕴🏼👧BH.
      😅😅
      😮

    • @vishalpatil455
      @vishalpatil455 Před rokem

      Chan sangital tai

    • @yasterkurundwadkar5166
      @yasterkurundwadkar5166 Před měsícem

      Wahh

  • @suvarnakadam3330
    @suvarnakadam3330 Před rokem +31

    व्हिडिओ बघण्याच्या आधीच खुप खुप धन्यवाद. I'm really waiting for this video.

    • @ushavispute6307
      @ushavispute6307 Před rokem +1

      खुप सुंदर पध्दतीने सांगितले Thanks❤🌹

  • @prabhatasgaonkar7193
    @prabhatasgaonkar7193 Před rokem +10

    लोणी क ढ त आले की त्यात दोन लवंग आणि वेलची टाकल्यास
    तुपाला खूप छान सुगंध येतो
    सरिता , खूप छान माहिती दिलीस 👌

  • @superlicious1775
    @superlicious1775 Před rokem +3

    बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळाली .खूप छान विषय घेऊन व्हिडिओ केला,धन्यवाद🙏👏👌🏻👍
    एक सुचवते , दूध तापवून गार झाल्यावर फ्रिज मध्ये ठेवावे ,त्यामुळे रात्रभर दूध थंडाव्यामुळे सकाळी साय चांगली जाड येते.अशी जाड साय चे दही,लोणी अतिशय छान होते.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před rokem +4

      हो अगदी खरे आहे. पण सगळे सत्व साय मध्ये येते.. आणि खाली दूध पातळ होते. घरात दूध पिणारे मूल असेल तर त्याला न्यूट्रिशन मिळणार नाही..

  • @najukabpawar
    @najukabpawar Před rokem +12

    माझ्या साठी खूप महत्त्वाची असणार आहे ही व्हिडिओ. . मी नेहमी तूप काढते . पण आज परफेक्ट रेसिपी समजणार. . Thank you ❤️

  • @KomalMaid
    @KomalMaid Před 26 dny

    खरंच खूप छान आणि सोपी पद्धत आहे .खूप खूप धन्यवाद सरिता ताई तुमचे❤

  • @jyotimahajan4610
    @jyotimahajan4610 Před rokem +4

    रोज माझ्या मनातलेच विषय येतात ताई मी पण कालच तुप बनवले जास्तीत जास्त मराठी भाषेचा तुम्ही वापर करतात खूप छान

  • @gayatrikhairnar1704
    @gayatrikhairnar1704 Před 3 měsíci +1

    Tai tu khup Chan explain karte 😊😊😊😊

  • @_ShitalGade_jan
    @_ShitalGade_jan Před rokem +4

    Yala mhntat sangnyachi method.. really he khup important ahe g kahi gosti amhala mahit nastat..pn ase great video ale ki khup easy hote ....thankkkkk youuuuu dear Sarita.... ❤️❤️❤️❤️

  • @varshanivalkar3178
    @varshanivalkar3178 Před rokem +2

    MaziAaji Aai DadaAatya he sarv asech tup kadhyache mast aahe tyachya barobar thalipeeth mast bet

  • @poojavaidya3074
    @poojavaidya3074 Před rokem +4

    As always video 👌👌
    तुझ्या गरम पाण्याची tip 👌👌

  • @mhaluaher5501
    @mhaluaher5501 Před rokem +2

    छान माहिती दिलीत ताई धन्यवाद मी पण सायचे तुप करते माझ्यासाठी उपयोगीआहे

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 Před rokem +1

    खूप खूप सुंदर. जुन्या गोष्टी आता दाखवल्या तर बघायला मजा वाटते व लहानपणच्या आठवणी जाग्या होतात. गरम पाण्यात भांडे व हाथ बुडवून घेणे ही ट्रिक दिल्याबद्दल धन्यवाद सरिता ताई 🙏🏼

  • @sajanimahajan9966
    @sajanimahajan9966 Před rokem +1

    Uttam tips n tricks
    Hya saglya mahiti sathi khoop anubhav lagto saglya goshtinvar barik nazar asavi lagte, pan amhi tumchya kadoon barach kahi shikat ahot, agadi aai jas samzvoon sangte tasach tumhi barik barik goshti sangata , tq very much,

  • @vibhavarijamdade9282
    @vibhavarijamdade9282 Před rokem

    खूपचं छान, ज्या गोष्टी आज्जी आईं सासूबाई यांच्याकडून शिकण्यासारखे होती, ते तुच किती छान समजाउन सांगतेस. तुझ्या मुळे हॉटेल मध्ये जेवायला जाणे बंद झाले, खुप काही recipe तुझ्याच follow करतो.
    तुझी सांगायची पद्दत पण सुरेख आहे. 🙏🙏🙏

  • @kalpanapujari9734
    @kalpanapujari9734 Před rokem +1

    Yes me pan khol Patel ghete me aaj 30 warsha zhale kadhich Tup or Loni kadhihi vikat nahi ghetle agdi sunder ghatta rawal Ani khamng tup neghte pan tak kadwat hote atta tuzhi tric waprun baghte tq Sarita

  • @archanashinde4985
    @archanashinde4985 Před rokem +1

    खुपच छान बनवलं साजुक तुप , मला दोन दिवसापासुन वाटतं होते तु तुप बनवुन दाखवणार का माहीत नाही पण जे वाटलं ते खरं झालं 😊

  • @shailajak3734
    @shailajak3734 Před rokem +2

    Chan vedio. Barik sarik khoop vichar karun abyaspurn clips astat. Grt. Taak kartana steel cha गंज म्हणजे उभे भांड घ्यावे.

  • @sonalibhise1814
    @sonalibhise1814 Před 2 měsíci

    तुप बनविण्याचे रेसिपी खूपच छान समजवून सांगितली आहे धन्यवाद

  • @rachanaransing9780
    @rachanaransing9780 Před rokem +1

    Thanks mam,kalch mi vichar krt hote tup ghari banvaych tovar,tumi video takla thanks....

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 Před rokem +9

    छान पद्धतीने सांगितले.धन्यवाद.👌👍💐

  • @shubhangichakote583
    @shubhangichakote583 Před rokem +2

    Sarita tujya saglya recipes mla khup avdtat tuji sangnyachi padhat khup Chan aste mi new subscriber ani mi pandharpur chi ye kadhi sangol alis tr

  • @bachatgatumedabhiyan5360
    @bachatgatumedabhiyan5360 Před 3 měsíci

    Tumcha video baghun pahilyanda tup banvale pn 1 no. Zale barka .
    Thank you so much.

  • @manjushakivade1140
    @manjushakivade1140 Před rokem +1

    खरपुस बेरी पण छान लागते साखर घालुन

  • @sushmabadade9806
    @sushmabadade9806 Před rokem

    ताई तुमची पद्धत खूप छान आहे मला खूप आवडली म्हणून मी fb ला भगितलं होत आता youtube ला search करून ब घितलं

  • @yugakadam5943
    @yugakadam5943 Před rokem +1

    मी असच नेहमी तूप बनवते. खूप छान टिकत.

  • @priyamane9353
    @priyamane9353 Před rokem +1

    Tumhi khup chan sangta...ek request aahe ...keral madhye kelache bhaji...banvtat...piklya kelache bhaji god astat tya baddal reciepy sanga

  • @ujwaladesai8608
    @ujwaladesai8608 Před 6 měsíci

    dahi kasa karayacha ha video kharach khup helpful hota Ani mi aata tyach padhtine dahi karte Ani khup Chan lagta.Thank you so much❤

  • @anjalibhagwatpulliwar7038

    Hi Sarita khup mastt tupa chi recipe sangitli
    Pan maajhya tupat beri khup nighate Ani tup khup Kami nighta
    Plz suggest me ki beri Kami Ani tup jast kasa kadhu

  • @user-um7rm6yt8n
    @user-um7rm6yt8n Před rokem

    ताई तूम्ही सर्व गोष्टी समजावून सांगतात त्यामुळे खूप छान समजते रेसिपी

  • @rupalidolas8485
    @rupalidolas8485 Před 11 měsíci

    खूप छान व्हिडिओ....खूपच उपयुक्त....मला हे खूप दिवसांपासून हवे होते...खूप खूप धन्यवाद सरिता जी...तुमचे व्हिडिओ आणि रेसिपी खूप छान आहेत...आणि खास तुमची समजावण्याची पद्धत 👍👍

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 11 měsíci

      मला ही यात खुप आनंद आहे

  • @aachalphadte7243
    @aachalphadte7243 Před rokem +2

    खूप छान समजावलंस Thanku Sarita
    तू आम्हाला ह्या किचनमध्ये ज्या receipe दाखवतेस, तेच तुझं जेवण असतं का?

  • @vvtgamingstudio1563
    @vvtgamingstudio1563 Před rokem +1

    मी पण पहिल्यांदा चं तूप काढले तर मी त्यांत हिरवी विलायची घेतली तर तुपाचा वास खूप छान येत आहे

  • @Anu.mohite
    @Anu.mohite Před měsícem

    खूप छान माहीत दिली ताई..... thank you

  • @shraddhasawant4049
    @shraddhasawant4049 Před rokem +2

    Thank you sarita khup divas vat baghat hoti me

  • @apoorvapingle8877
    @apoorvapingle8877 Před rokem +1

    Tumhi Sajuk tup ya padhhatine saritas kitchen ch product ka nai kadhat? Khup helpful and easy hoil for working monthers

  • @ashwinigite6234
    @ashwinigite6234 Před rokem +1

    Mla aaj ch tup kraych hot ani lagech video ala😀Thanks

  • @pavitranandita
    @pavitranandita Před rokem

    मस्त व्हिडिओ मी सुधा घरी तूप करते , मी कायच पण किंवा तुळस घालते , माझी सासूबाई पावसळत हळदी च पण घालते . त्या ला सुधा छान सुगंध येतो .

  • @sarikarite9142
    @sarikarite9142 Před rokem +1

    Khup sundar amchya ghuri pan asch kadhto amhi tup 👍👍👌

  • @ranjanagaikwad657
    @ranjanagaikwad657 Před rokem

    Khup chan Sarita. Mi asech banvte tup .fakt 8 divas freez madhe say sathavte aani virjan laun 1 divas baher thevte .kadhvtana panyacha shipka Marte karan mi kuthetari vachle hote ase kelyane tup raval hote .aani khauch pan nasel tar mi lavang takte .aso tuzi paddhat mi nakki karun baghen. Aani mixer madhe karte aata nakki ravine try karte .purvi mi ravine karayche mixer gyaychya aadhi .patakan hote mhanun karat hote
    😊👍

  • @shalakamhatre5091
    @shalakamhatre5091 Před rokem +2

    खुप छान तसेच उपयुक्त टिप्स दिल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏🙏

  • @prajaktadixit2278
    @prajaktadixit2278 Před rokem +2

    Mazi aai same yach process ne tup tayar krte 😇😇

  • @snehakamble2116
    @snehakamble2116 Před rokem +1

    Chhan Mahiti Sagitali

  • @vijaykumardeokate6891
    @vijaykumardeokate6891 Před 6 měsíci

    खुप छान सूक्ष्म tips आहेत 👍👌🙏

  • @shreeyamulmuley9227
    @shreeyamulmuley9227 Před rokem +2

    Khup chan step by step sangitles thank you. Ani ho khau cha paan 🍃 meains konte paan 🍃

  • @amrutakankekar7630
    @amrutakankekar7630 Před rokem +1

    Ya vedio chi khoop garaj hoti tx sarita tai🙏👌👌

  • @pratibhajadhav8090
    @pratibhajadhav8090 Před rokem

    Kiti Chan sangital , shree Swami Samarha tumhala nehmi anandi thevude

  • @REX_1424
    @REX_1424 Před rokem +2

    Tup garam garam dabyat galun gheun zaakan lavle tr tup ravedaar hote

  • @bhavyasmom5168
    @bhavyasmom5168 Před rokem +2

    Thank you so much... मी हाच व्हिडिओ शोधत होती... मनासारखी रेसिपी मिळत नव्हती...आता मिळाली...

  • @amolraundal5699
    @amolraundal5699 Před rokem +1

    Mla hach video pahije hota bgayla so thank you

  • @_SwamiOm-1176
    @_SwamiOm-1176 Před rokem +1

    या रेसिपीची खूप खूप वाट पहात होते
    कारण
    सरिता ताई तुच अवघड रेसिपीची डिटेल्स आणि महत्त्वाचे टिप्स देत असते👌👌
    Very Big Thanks
    🤗🤝💖🙏👍👍
    सरिता ताई तुमच्या नंतर
    मनस्वी दिदू असणार
    सुगरण
    हो
    💖🍫🍫

  • @veenashinde2343
    @veenashinde2343 Před rokem +1

    Bar zala ha vedio upload kelas mala pn he shikych hot ekdam perfect way ne , thnx Sarita

  • @swaraliawate8921
    @swaraliawate8921 Před rokem

    धन्यवाद ताई छान माहिती दिलीत, आणि खुप सोप्या पद्धतीने समजुन सांगित्याबद्दल परत एकदा धन्यवाद

  • @priyuamatey
    @priyuamatey Před rokem +1

    Thanks Didi aaj Mala Khari padhant kadli

  • @neelamtelang7369
    @neelamtelang7369 Před rokem +4

    U can use turmeric leaf also to store ghee,u will get nice fragrance as turmeric leaf is not available all d yr i dry it sun after monsoon

    • @rohinisonawane8527
      @rohinisonawane8527 Před rokem

      Very nice idea mam, i will try as i belong to rural area..... Having haldi farm near to my house 😊

  • @manoramasankpal6849
    @manoramasankpal6849 Před rokem

    Kharch ahe joint family mde he khup paramparik pdhtine banvt hote mazya ghari 1ghaghar Tak banych morya ravine srv dolyasamor ale Mazi mummy same asech karte khup agodarpasun mala Mazi mummy ch banvt ahe ass janavle ...so TQ srv mahit asun mi ha vdo full pahila ....👍😘

  • @rajshreekshirsagar2341
    @rajshreekshirsagar2341 Před rokem +1

    Hyat tulshich paan ghatala n tr te paan khup chan khamang lagta khayala.....😘☺😉

  • @prachichavan3212
    @prachichavan3212 Před rokem +1

    प्रत्येक गोष्टीचं तुझ्याकडे solution असतं.
    खुप खुप Thank you

  • @truptikapse3730
    @truptikapse3730 Před rokem +2

    Chan kadhavale tup

  • @sangitachatlawar6708
    @sangitachatlawar6708 Před rokem +1

    Khauche pan konti vanspati ahe tai. Khup Chan tip milalya tai👌👍👌

  • @alkamore8389
    @alkamore8389 Před rokem

    Mast mi pan ashech Loni kadte fakt garm panyachi tips mahit nvti thanks ani tup kdlyavr panipan shintodte.tyamule tup raval hote.thank you Sarita one's again 👍👌❤️

  • @snehabhoir6375
    @snehabhoir6375 Před rokem

    Tai tumhi khup chan samjaun sangta tumchya saglya recipe khup chan astat

  • @sangeetayadav6913
    @sangeetayadav6913 Před rokem +1

    खूप छान माहिती दिली आहे छान तुप

  • @shailalande4150
    @shailalande4150 Před 8 měsíci

    खूप छान बनवलंस तुप नेहमीप्रमाणेच परफेक्ट रेसिपी 👌👌

  • @rupalimatekar6062
    @rupalimatekar6062 Před 5 měsíci

    Khup chan samjavle tumi...tup he friedge mdhe thevave ki baher..n jar baher thevle jast divas rahile tar tyacha vas yeil mg kay karave

  • @sangitarangari6606
    @sangitarangari6606 Před rokem

    खुप छान व्हिडिओ ताई 👌 मी पण याच पध्दतीने लोणी काढते. छोट्या छोट्या टिप्स खुप छान.

  • @sachinshinde8283
    @sachinshinde8283 Před 2 měsíci

    Hii Sarita Di khup chaan Mahiti.khup chaan video.Thanks.

  • @arogyadayitruptirecipe6771

    खुप छान विडिओ 👌👌

  • @ushakar5238
    @ushakar5238 Před 7 měsíci

    Khub sunder explain karta thank you

  • @arunitapawandeep8462
    @arunitapawandeep8462 Před rokem +4

    अतिशय सुंदर पद्धत....

  • @priyalgawade8884
    @priyalgawade8884 Před rokem +1

    Mast ttt 👌👌 gharchya ghari tup banvaycji param parik padhat chan

  • @minawadekar6073
    @minawadekar6073 Před rokem +1

    खूपच छान माहिती सांगितली नक्की करून पाहिन मस्तच ताई नमस्कार

  • @hemlatarameshmoundekar7600

    Khup chan sangtes tu mi pan gharich nehmi tup kadhte 👌👌

  • @madhurapitke8229
    @madhurapitke8229 Před 8 měsíci +2

    Thank you so much for the recipe. The entire process became hassle free & mainly mess free for me. तुप करणे हे एक दिव्य काम होते माझ्यासाठी ते खुप सहजपणे झाले तुम्च्या ह्या पद्धतिमुले. Thanks ma'am.

  • @sonalimhaisekar6151
    @sonalimhaisekar6151 Před rokem

    Tujhe videos aavarjun baghnyasarakhe astat. Sagale mahit asle tari kahitari navin tips milat rahatat..Thanks!

  • @reshmabhagat2032
    @reshmabhagat2032 Před rokem +1

    Khop chan amhi pan asch kadhvto tup👌👌😊

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 Před rokem +1

    खूपच पारंपारिक पद्धतीने लोणी काढून तूप तयार केले आहे. खूप महत्वपूर्ण सूचना देवून,त्या ही सकारण.... बर्याच नव सुगरणींचे शंका निरसन केले आहे.
    खूप खूप अभिनंदन !

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před rokem +1

      आभार मावशी.. तुमच्याकडून कौतुक ऐकणे म्हणजे जिंकणे.. 😊

  • @sunitadalvi4996
    @sunitadalvi4996 Před rokem +1

    Khup chhan mahiti sangitli

  • @divyabhise4881
    @divyabhise4881 Před rokem +1

    Tai me pn asach krtey tup.tujasarkha.tu tips chan sangtey

  • @shivtejnalawade9727
    @shivtejnalawade9727 Před rokem +3

    खूप छान माहिती दिली आणि तुप मस्त👌

  • @SubhadraMhetre-rz5oh
    @SubhadraMhetre-rz5oh Před rokem

    O tai I love you tuza sarka kadi yenr bavyla
    Kup chan Amizeing 😘

  • @priyalgawade8884
    @priyalgawade8884 Před rokem +1

    Sarita tai gharchya ghari dairy sarkhe jadsar dahi banvaychi padhat sanga Karan dahi banvlyaver tyla Pani sute ter tumhi dakhval ka dahi banavnyachi param parik padhat please tai k

  • @gitanjalishinde734
    @gitanjalishinde734 Před rokem +1

    Mixer mdhun pn dakhval ka plz...karan mla vel nasto Ravi ny firvyla

  • @bhartishinde6791
    @bhartishinde6791 Před rokem +2

    Nice👌recipe. mam ashach prakare butter chi sudha recipe dakhva na 'Homemade butter'.

  • @pushpabhujade8206
    @pushpabhujade8206 Před rokem

    खूप सूंदर माहिती दिली आहे मी आज तूप करते

  • @monikaingle9605
    @monikaingle9605 Před rokem +4

    काचेच्या बरणी मध्ये जे खाण्याचं पण टाकलं ते काढवताना टाकलेलं पान टाकला का की ताजा दुसरं पान टाकला ताई

  • @rajanikulkarni643
    @rajanikulkarni643 Před rokem +2

    Dahi kadhi kadhi neet lagat nahi tyachyasathi kahi video karal ka mhanje chikat lagta

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Před rokem +4

    खूप छान घरच्या घरी मस्त तूप 👌👌👍

  • @vaishnavitengale4088
    @vaishnavitengale4088 Před rokem

    Thnkss Tai khup simple krun sangta tumhi saglch majha question asa hota ki tup kelya nntr kadhai khup chikat hote so te clean kas karych

  • @tamhanekrishana6565
    @tamhanekrishana6565 Před rokem +5

    उन्हाळा चालू झाला आहे please icecream च्या receipe share करा ना

  • @sangitapawar5540
    @sangitapawar5540 Před rokem +1

    Khupch chan sangitle

  • @manishasonkamble3635
    @manishasonkamble3635 Před rokem +1

    खूप छान पद्धतीने संगितल्या बदल धन्यवाद

  • @sayaleeparanjape5655
    @sayaleeparanjape5655 Před rokem +8

    लोणकढी नव्हे, लोणकढं किंवा लोणकढे असा शब्द आहे. लोणी कढवून केलेलं ते लोणकढं. थाप लोणकढी असते, तूप लोणकढं. बाकी टिप्स परफेक्ट आहेत.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před rokem +2

      अरे वाह.. आमच्या कडे लोणकढी म्हणतात...

    • @sayaleeparanjape5655
      @sayaleeparanjape5655 Před rokem +7

      @@saritaskitchen मी grammatically अचूक शब्द सांगितला. यात आमच्याकडे किंवा तुमच्याकडे काय म्हणतात हा प्रश्न नाही. तुमचे व्हिडिओज सर्वत्र बघितले जातात. आपल्या जुन्या पाककृती, स्वयंपाकाच्या पद्धती अचूक टिकून राहाव्यात म्हणून तुम्ही जसे प्रयत्न करत आहात, त्याचप्रमाणे मराठी भाषेतले पूर्वापार चालत आलेले शब्द अचूक पद्धतीने वापरले जावेत असं वाटतं. बाकी तुमची मर्जी.

    • @aratijoshi67
      @aratijoshi67 Před rokem +5

      @@sayaleeparanjape5655 या वरून आठवले आम्ही जेवण झाले की ताटात हात धुत नाही म्हणजे तसे संस्कार नाही लहानपणापासून तर आमचे शेजारी आहेत ते एकदा जेवायला बसलो होतो सोबत तर म्हणतात की धुवा हात ताटात की मी म्हंटले नाही धूत आम्ही ताटामध्ये तर म्हणतायेत आमच्याकडे ताटात च हात धुतात ...आम्ही असेच धुतो ..आता काय बोलायचे अश्या लोकांना ..ज्या ताटामध्ये अन्न खातो त्या मधे हात धुवू नये एवढे पण समजू नये का ..एक किस्सा आठवला म्हणून सांगितले

    • @nehamohite8549
      @nehamohite8549 Před 5 měsíci +1

      Ekdam barober chuka sudharnayat kasla kami pana yeto yana😂

  • @nehal6263
    @nehal6263 Před rokem +1

    खूप छान माहिती दिली थँक्यू सरिता 👌👌👍❤️☺️

    • @payalkamble3921
      @payalkamble3921 Před rokem

      , चांदीच्या भांड्यात तुप ठेवले तर चालेल का
      आमच्या कडे चांदीच्या भांड्यात तुप ठेवले जाते.हे योग्य आहे का.सरिता please reply de.

  • @smita5095
    @smita5095 Před rokem +1

    सरिता खूप चांगला vidio. असं पारंपारिक पद्धतीने बनवलेलंच तूप गुणांनी युक्त आणि हार्ट साठी उपयोगी ( कोलेस्टेरॉल न वाढवणारं) असतं. पण हल्ली काही चॅनलवर सोप्या पद्धतीने शाॅर्ट कट मारुन साठवलेली सायच घुसळून तूप बनवण्याचे vidio पाहाण्यात आले.तू अगदी योग्य पद्धतीने ,कारणासहीत समजावून सांगीतलेस ,हे खूप छान केलंस. नाहीतर घरचं तूप खाऊन सुद्धा काही फायदा मिळणार नाही.

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 Před rokem

    आम्ही असेच तुप बनवतो .थोङी मेथी चे दाणे टाकले तर छान सुगंध येतो.

  • @kanchankadam2093
    @kanchankadam2093 Před rokem +1

    Perfect sajuk tup , diet sathi receipy dakhva soup , salad

  • @sheetalpatil3047
    @sheetalpatil3047 Před rokem +1

    Khup Chan tai dahi kas lavayach te sanga

  • @x-d1avantibhosale923
    @x-d1avantibhosale923 Před rokem

    खूप छान, ताई या परफेक्ट रेसिपीची खूप गरज होती, तुमचे खूप खूप धन्यवाद