गोकर्ण आणि मुरडेश्वर..

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • #YesNewsMarathi #SolapurNews
    कर्नाटक येथे गोकर्ण शंभू महादेवाचे आत्मलिंग आहे .ते गाईच्या कानाच्या आकाराचे असल्याने त्यास गोकर्ण असे नाव पडले आहे .मुरडेश्वरला आरएनएच्या माध्यमातून भव्य अशी 123 ft उंचीची शंकराची मूर्ती उभी केली आहे . शंकराच्या रौद्र रूप दर्शविणारी महाकाय मूर्ती पाहणार्याच्या नजरेमध्ये मावत नाही . मूर्तीच्या खाली मंदिर असून त्याच्या कडेने ही गणपती व रावणाची कथा सांगणारे सचित्र देखावे उभे करण्यात आले आहेत समोर अठरा मजली प्रवेशद्वार असून त्यावरून नारळांच्या बागांमध्ये झाकून गेलेले मुरडेश्वर व फैसाळ लाटांनी भरले गेलेले मुरुडेश्वर बीचचे विहंगम दृश्य न्याहाळता येते .
    आख्ययिका अशी संगतीला जाते कि रावणाने तपश्चर्या करून शंकराला प्रसन्न केले शंकराने त्यास आत्मलिंग प्रदान केले त्यावेळी अशी अट घातली की हे आत्मलिंग जर खाली जमिनीवर ठेवले तर तिथेच राहील . आत्मलिंग घेऊन कैलासहुन रावण लंकेला जात होता. रावणाची शक्ती वाढून तो प्रबळ बनेल म्हणून सर्व देवतांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले . वरुण आणि गणेश देवता यांनी चालाखीने असे होऊ दिले नाही. वरुण देवतेने सूर्याच्या समोर ढग धरल्याने दुपारीच सायंकाळ झाली. संधीची वेळ झाल्याने रावणाला समुद्रात स्नान करावयास जायचे होते. त्यावेळी हे आत्मलिंग शेजारी असलेल्या गुराखी मुलाकडे त्याने दिले.मात्र त्यावेळी मुलाने सांगितले कि मी एक दोन तीन असे मोजून मला हे अोझे सहन नाही झाले तर मी खाली ठेवेन . आणि घडलंही तसंच त्या मुलाने तीनपर्यंत मोजून आत्मलिंग समुद्रकिनारी ठेवले . तो लहान मुलगा म्हणजेच गणेश देवता. त्यामुळे आधी गणपतीचे दर्शन घेऊनच आत्मलिंग दर्शन केल्याचे फळ मिळते
    रावण स्नान करून आल्यावर त्यास ही गोष्ट दिसली त्यामुळे त्यास प्रचंड राग आला आणि त्याने गणेश देवतेच्या डोक्यामध्ये मारले. तसेच रागाच्या भरात पूर्ण ताकदीनिशी तो लिंग हातात उचलून घेऊ लागला . या झटापटीमध्ये लिंगाचा आकार गोकर्णासारखा झाला आणि त्याचे तुकडे आजूबाजूला चार ठिकाणी पडले . त्यातील एक म्हणजे मुरडेश्वर .
    ★Follow us, Share, Support★
    Website:- yesnewsmarathi.com
    Facebook:- / yesnewsmarathi
    Twitter:- / yesnewsmarathi
    shivaji survase 9881748329
    ★Contact us★
    mobile- 9881748329
    Email:- yesnewsmarathi@gmail.com
    येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.

Komentáře • 15