श्री क्षेत्र जेजुरीच्या खंडोबाचं दर्शन | Jejuri Khandoba Temple | श्री मयुरेश्वर मंदिर | Morgaon

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • श्री क्षेत्र जेजुरी खंडोबा मंदिर 🌸
    खंडोबा, खंडेराया, मल्हारीमार्तंड अशा नावांनी ओळखले जाणारे पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यातील जेजुरी गावात हे जागृत देवस्थान असून महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे. आपल्या महाराष्ट्रा बरोबरच कर्नाटक आणि आंध्र प्रदेश राज्यातील लोकांचे लिंगायत दैवत आहे. गडारीया, वंजारी, धनगर, आगरी, कराडी, कुणबी, खारवी, गवळी, गोसावी, भंडारी, भोई, मराठा, मल्हारकोली, मातंग, माळी, रामोशी, वडवळ, लिंगायत, सोनार, गानाली, गान गोलू, सोनकोळी समाज तसेच ब्राह्मण आणि कायस्थ प्रभू यांचे हे कुलदैवत आहे. यांच्या परिवारात म्हाळसा, बाणाई या दोन पत्नी, हेगडे प्रधान ( बानाई चा भाऊ ) कुत्रा आणि खंडोबाचे वाहन घोडा यांचा समावेश होतो. श्री खंडोबाना भगवान शंकराचा अवतार किंवा भैरव रूप मानले जाते.
    खंडोबाचे हे जागृत देवस्थान धनगर, आगरी, कोळी व इतर अनेक लोकांचे आराध्य दैवत असून १६०८ मध्ये त्याचे बांधकाम झाले. खरतर श्री खंडोबा हे भुलेश्वरचे भक्त होते. बळीराजाच्या काळात ते एका खंडाचे मुख्य होते. त्यामुळे लोकदेव खंडोबा आणि लोकदेव विठोबा ही त्यांची नावे घराघरात रुजलेली दैवते आहेत. हे भुलेश्वरचे मंदिर जेजुरी पासून १७ किमी अंतरावर आहे. खंडोबा हे शिव, भैरव आणि सूर्य तीन देवतांचे एकत्रित स्वरूप आहे म्हणून खंडोबाचा उपवास रविवारी सूर्याच्या वारी करण्याचा प्रघात असावा असे मानले जाते.
    श्री खंडोबाचे प्रथम स्थान उंच डोंगरावरील कडेपठारावर होते. नंतर जेजुरीला नव्याने मंदिर बांधण्यात आले ते ई. स. १७१२ मध्ये. या देवळा समोर दगडी दीपमाळा आहेत या कडेपठारावर ३०० मी उंच डोंगरावर व ५ किमी अंतरावर मुख्य देऊळ आहे. किल्ला कोटा हे मंदिर खाली आहे. गेल्या अनेक शतकात धनगर व इतर जमातींच्या भक्तांनी दगडी पायऱ्या, दीपमाळा आणि कमानी उभारल्या आहेत. त्यामुळे यात मराठी वास्तुकला आणि निसर्गाशी असलेले सानिध्य दिसून येते. मंदिरात असलेले दीपमाळाचे प्रकार, कमनिवरील भित्तीचित्रे आणि नाजूक नक्षी जेजुरीच्या गतवैभवाची साक्ष देते.
    #jejurichakhandoba #jejurigad #jejuritemple #khandoba #jejuri
    श्री मयुरेश्वर मंदिर 🌺
    अष्टविनायक मंदिरांमध्ये हे सर्वात महत्वाचे देऊळ असून याला चार प्रवेशद्वार आहेत. प्रत्येक प्रवेशद्वारावर प्रत्येक युगातील गणपतीच्या अवताराचे चित्र आहे. हे मंदिर उत्तराभिमुख असून त्यास पन्नास फुट उंचीची तटबंदी आहे. मंदिराच्या आवारात दोन दीपमाळा आहेत. मंदिरात प्रवेश करताच सहा फुटी उंच दगडी उंदीर आणि भल्या मोठ्या बसलेल्या नंदीचे दर्शन होते. नंदीचे तोंड गणपतीकडे असून गणपतीसमोर नंदी असणारे हे एकमेव देऊळ आहे. उंदीर आणि नंदी हे मंदिराचे जणू पहारेकरी आहेत. या देवळातील स्वयंभू गणपतीची सोंड ही डावीकडे वळलेली असून गणपतीच्या नाभीत आणि डोळ्यात हिरे जडवलेले आहे. यामुर्तीवर नागाचे संरक्षक छत्र आहे. मंदिरात रिद्धी (बुद्धी) आणि सिद्धी (क्षमता) यांच्यासुद्धा मुर्त्या आहेत.
    सकाळी ५ वाजता प्रक्षाल पूजा (गणपतीचे स्नान), सकाळी ७ वाजता शोडपचार पूजा, दुअपारी १२ वाजता दुसरी शोडपचार पूजा, रात्री ८ वाजता पंचोपचार पूजा आणि रात्री १० वाजता शेजारती केली जाते.
    मुख्य गणेश मूर्तीची पूजा दररोज सकाळी ७, दुपारी १२ आणि रात्री ८ वाजता केली जाते. माघ शुक्ल चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी या दोन दिवशी भक्त मोठ्या प्रमाणावर मयुरेश्वराचे दर्शन घेण्यास गर्दी करतात. या दोन्ही दिवशी चिंचवड येथे संत मोरया गोसावी यांनी स्थापिलेल्या मंगलमुर्ती मंदिरातून भक्तगण पालखी घेऊन येतात. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या दहा दिवसात मयूरेश्वराच्या मंदिरात जत्रा भरते. विजयादशमी आणि सोमवती अमावस्या हे दिवससुद्धा साजरे केले जातात.
    #mayureshwar #morgaon #ganpati #ganesha

Komentáře • 2