आ. ह. तात्या - विद्रोहाचे विद्यापीठ (एकपात्री प्रयोग) : सादरकर्ते - डॉ. नवनाथ शिंदे

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 08. 2024
  • डॉ आ. ह. साळुंखे हे नाव मराठी वाचकांना सुपरिचित आहे. फुले शाहू आंबेडकरी आणि विवेकी विचारांची मुळं घट्ट करण्यासाठी त्यांनी आपले अवघे आयुष्य वेचले आहे. आजवर त्यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांनी महाराष्ट्राचे समाजमन घडवण्याची किमया केलेली आहे. त्यांनी लिहिलेल्या सर्वोत्तम भूमिपुत्र गोतम बुद्ध, विद्रोही तुकाराम, बळीवंश यांसारख्या ६० हून अधिक पुस्तकांनी महाराष्ट्राला एका वेगळ्या अंगाने विचारप्रवृत्त केलेलं आहे. त्याच डॉ आ. ह. साळुंखे यांच्या जीवनावर आधारित प्रा डॉ नवनाथ शिंदे यांनी साकारलेला हा एकपात्री प्रयोग आहे. डॉ साळुंखे यांच्या जीवनातील नाना छटांना अतिशय चपखलपणे चितारणारी ही एकांकिका एका ज्ञानयुगाचा वेध घेते.
    जीवनातील अनेक प्रश्नांना साध्या सरळ आणि स्पष्ट शब्दांत उत्तरे देणारी डॉ आ. ह. साळुंखे यांच्या जीवनावर आधारित ही एकांकिका आपल्याला निश्चितच आवडेल
    .
    .
    .
    ahsalunkhe
    a h salunkhe
    ekpatri prayog
    mahitipat
    documentary
    a h salunkhe speeches
    vidrohi
    lokayat
    charvak
    balivansh
    budhha
    sarvottam bhumiputra
    gotam buddha
    mitranna shatru karu naka
    chandnyat bhijayche rahun jau naye mhnun
    tathagat buddha
    sant tukaram
    mangalsutta
    manusmrutichya samarathakanchi sanskruti
    hindu sanskruti ani stree

Komentáře • 24

  • @vasnatshinde804
    @vasnatshinde804 Před 2 měsíci +2

    आदरणीय शिंदे सरांनी ज्या वयाच्या टप्यावर आ. ह. नावाचं शिवधनुष्य पेलेले आहे त्याला मनःपूर्वक सलाम. आ. ह. उर्फ तात्या समस्त महाराष्ट्रातील नसून या देशातील चालता बोलता महाग्रंथ आहे. या महाग्रंथाला पाहता आलं , त्यांच्या सोबत चार क्षण बसता आलं, मोडक्या शब्दांत संवाद साधता आला , खरेतर आयुष्याची हीच खरी कमाई आहे एवढंच इथे नमुद करतो. शिंदे सरांचे मनःपूर्वक आभिनंदन आणि आभार 🙏

  • @dhanajivasantkothavale5212
    @dhanajivasantkothavale5212 Před 2 měsíci +2

    अतिशय छान ,ओघवत्या भाषेत तात्यांचा जीवनपट

  • @plantworld-dr.rajivkarpe
    @plantworld-dr.rajivkarpe Před 2 měsíci +2

    एकपात्री प्रयोग खूप सुंदर आहे.

  • @dhanajivasantkothavale5212
    @dhanajivasantkothavale5212 Před 2 měsíci +2

    शिंदे सर अप्रतिम सादरीकरण

  • @ramdashorate8789
    @ramdashorate8789 Před měsícem +2

    सर आपल्यातल्या कला सादरीकरण कौशल्याला पहिला सलाम.. आ. ह. साळुंखे सरांसारख्या व्यक्तित्वाला सामान्य लोकांपर्यंत पोहचवण्याचा खूप अभिनंदनीय प्रयोग आहे... वेशभूषा, संवाद, छायाचित्रण अप्रतिम सर... आपल्याला आवडला प्रयोग... डॉ. आ ह साळुंखे हे एक महाराष्ट्राचे चालते बोलते विद्यापीठ फक्त शिक्षण समाजकारण या क्षेत्रापुरतं मर्यादित न राहता. ते सामान्य जना पर्यंत पोहचत आहे.. या प्रयोगातून त्यांचं चरित्र उलगडत गेले आहे. अभिनंदन सर

  • @pramodjagtap8595
    @pramodjagtap8595 Před 2 měsíci +2

    आदरणीय शिंदे सर खूप सुंदर सादरीकरण 🎉 मनःपूर्वक धन्यवाद 🙏
    आदरणीय आ.ह.सरांचा जीवनपट आपण प्रयत्नपुर्वक आणि त्याहीपेक्षा खूप मनापासून, तळमळीने उलगडून दाखविलात.निश्चितच आमच्यासाठी हे खूप प्रेरणादायी आहे.खूप खूप धन्यवाद सर 🙏💐

  • @sambhajishinde3485
    @sambhajishinde3485 Před měsícem +1

    अप्रतिम आण्णा

  • @Hasantakildar
    @Hasantakildar Před 2 měsíci +1

    सर खूप छान... आपल्या प्रयत्नांना माझा सलाम 🙏

  • @jyostnadeshmukh6526
    @jyostnadeshmukh6526 Před 2 měsíci +1

    खूप खूप छान.

  • @uttamkokitkar2200
    @uttamkokitkar2200 Před 2 měsíci +1

    अप्रतिम निर्मिती, सर

  • @LukeshRathod-mh7we
    @LukeshRathod-mh7we Před 2 měsíci +1

    Too good

  • @prof.dr.g.s.deshmukh1017
    @prof.dr.g.s.deshmukh1017 Před 2 měsíci +1

    अतिशय महत्वपूर्ण माहिती

  • @manishpatil3132
    @manishpatil3132 Před 2 měsíci

    जबरदस्त

  • @urmilajagadale7971
    @urmilajagadale7971 Před 2 měsíci +2

    डॉक्टर शिंदे यांचा हा प्रयोग अत्यंत प्रेरक आणि तात्यांचे विचारधन प्रसारक असा खूप खूप भावस्पर्शी आहे🎉🎉🎉

  • @Nilesh8
    @Nilesh8 Před 2 měsíci +2

    खूपच छान, छान माहिती दिली आहे तळागाळातील लोकांपर्यंत जाण्यासाठी उत्तम माध्यम आहे.

  • @rajaramkamble9794
    @rajaramkamble9794 Před 2 měsíci +2

    खूप खूप छान सर तुमच्या एक पात्री नाटकातून आ. ह. साळुंखे(तात्या) यांचा जीवनपट. समजला. आपले धन्यवाद व्यक्त करतो. शिंदे सर आभारी आहे🙏🙏 जय जिजाऊ नमो बुद्धाय🌹🌹 जयभीम🌹🌹🙏

  • @sushilmoon245
    @sushilmoon245 Před 2 měsíci +1

    अप्रतीम सर तात्यांचा जीवनपट तळागळातील लोकांपर्यंत पोहचविण्याचा सुरेख प्रयत्न आहे

  • @ashokarak5456
    @ashokarak5456 Před 2 měsíci +2

    खूप छान

  • @sunilwaghamode-tp7jw
    @sunilwaghamode-tp7jw Před 2 měsíci +2

    खूप छान माहिती आणि सादरीकरण

  • @user-ji8ct1qm4j
    @user-ji8ct1qm4j Před 2 měsíci +2

    Great event

  • @sagarshankar707
    @sagarshankar707 Před 2 měsíci +2

  • @charlievaraprabha7962
    @charlievaraprabha7962 Před 2 měsíci +2

    Thanks

  • @sushillad3864
    @sushillad3864 Před 2 měsíci +3

    कंटेंट बरा आहे, शिवाय तांत्रिकदृष्ट्या चांगला प्रयत्न आहे. पण सादरीकरण जमलेले नाही. सगळी पात्रे एकाच सुरात आणि एकसारखेच हातवारे करून का बोलतायत? शिवाय अतिशय संथ असा हा प्रयोग झाला आहे. तात्यांचे जीवन चरित्र प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहचण्यासाठी यात बऱ्याच सुधारणा होण्याची नितांत गरज आहे.

  • @AbhimanyuJagdale
    @AbhimanyuJagdale Před 2 měsíci +2