micronutrient fertilizer | सूक्ष्म अन्नद्रव्ये खते

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 04. 2023
  • ▶️ व्हिडीओमध्ये दिलेली कृषी उत्पादने खरेदी करण्यासाठी आता खाली दिलेल्या 👇🏼 लिंकवर क्लिक करा आणि 🥳 100% कॅशबॅकसह उत्पादन घरपोच मिळवा! 📢 कॅश ऑन डिलिव्हरी सुविधादेखील उपलब्ध!
    👉महाधन कॉम्बी ( मिक्स माइक्रोन्यूट्रिएंट ) - krushidukan.bharatagri.com/pr...
    👉इंस्टाफर्ट कॉम्बी - मिक्स माइक्रोन्यूट्रिएंट - krushidukan.bharatagri.com/pr...
    ===============================================================================
    👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏
    🌱 भारतअ‍ॅग्री मध्ये आपले स्वागत आहे.
    ✅आजचा विषय - 🌱micronutrient fertilizer | सूक्ष्म अन्नद्रव्ये खते👍
    पिकाच्या वाढीसाठी आवश्यक १६ अन्नद्रव्यांपैकी १३ जमिनीतून, तर तीन अन्नद्रव्ये पाणी आणि हवेतून मिळतात. या १३ अन्नद्रव्यांपैकी अधिक प्रमाणात लागणारी तीन, मध्यम प्रमाणात लागणारी तीन व कमी प्रमाणात लागणारी सात मूलद्रव्ये आहेत. त्यांना अनुक्रमे प्रमुख, दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये म्हणतात.
    👉प्रमुख अन्नद्रव्ये - ही नत्र (N2), स्फुरद (P2O5) व पालाश (K+)
    👉दुय्यम अन्नद्रव्ये - कॅल्शियम (Ca2+), मॅग्नेशियम (Mg2+) व गंधक (SO42)
    👉सूक्ष्म अन्नद्रव्ये - लोह (Fe2+), मँगेनीज (Mn2+), कॉपर (Cu2+), झिंक (Zn2+), बोरॉन (H3BO3) मॉलिब्डेनम (MoO42) आणि क्लोरिन (Cl-). चला जाणून घेऊयात सूक्ष अन्नद्रव्यांबाबत.
    ✅सूक्ष्म अन्नद्रव्ये -
    1️⃣लोह (Fe2+)
    👉कार्य : हरितद्रव्यांच्या निर्मितीसाठी लोहाची गरज असते. प्रकाशसंश्‍लेषण व श्‍वसनक्रियेत लोहाचा सहभाग असतो. नत्र, स्फुरद व पालाश यांच्या शोषणात लोहाचा अप्रत्यक्ष सहभाग असतो.
    👉कमतरतेमुळे दिसून येणारी लक्षणे - शेंड्याकडील पानांच्या शिरामधील भाग पिवळा होतो. झाडांची वाढ खुंटते.
    👉उपाय - चिलेटेड लोह १ ग्राम प्रति लिटर पाणी फवारणी करावी किंवा पिकानुसार चिलेटेड लोह २५० - ५०० ग्राम प्रति एकरी ड्रीप मधून द्यावे.
    2️⃣मँगेनीज (Mn2+)
    👉कार्य : प्रकाश संश्‍लेषण, प्रथिने निर्मिती, संजीवके प्रक्रियेत सहभाग. संप्रेरक म्हणून रासायनिक प्रक्रियेत सहभाग असतो. हरितद्रव्य तयार करण्यात महत्त्वाचे कार्य.
    👉कमतरतेमुळे दिसून येणारी लक्षणे - पानांच्या शिरा हिरव्या व शिरामधील भाग क्रमाक्रमाने पिवळा होतो व नंतर पांढरट व करडा होतो, संपूर्ण पान फिकट होवून नंतर पान गळते.
    👉उपाय - चिलेटेड मँगेनीज १ ग्राम प्रति लिटर पाणी फवारणी करावी किंवा पिकानुसार चिलेटेड मँगेनीज २५० - ५०० ग्राम प्रति एकरी ड्रीप मधून द्यावे.
    3️⃣कॉपर (Cu2+)
    👉कार्य : तांबे प्रकाशसंश्लेषणाच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक भूमिका पार पाडत असते.
    पिकांच्या फळाची चव, रंग आणि फुलाचा रंग हा योग्य प्रमाणात तांबे असल्यास उत्तम होतो.
    👉कमतरतेमुळे दिसून येणारी लक्षणे - झाडांच्या शेंड्याची वाढ खुंटते, झाडांना डायबॅक नावाचा रोग होतो. खोडाची वाढ कमी होते, पाने लगेच गळतात.
    👉उपाय - चिलेटेड कॉपर १ ग्राम प्रति लिटर पाणी फवारणी करावी किंवा चिलेटेड कॉपर २५० ग्राम प्रति एकरी ड्रीप मधून द्यावे.
    4️⃣झिंक (Zn2+)
    👉कार्य : पिकाच्या शेंड्याची जोमदार वाढ करण्यास मदत करते. वनस्पतीच्या पाणी शोषण कार्यात जस्ताची मदत होते. पिकाच्या पेशीमधील योग्य प्रमाणामुळे पीक कमी - जास्त तापमानात देखील तग धरुन राहते.
    👉कमतरतेमुळे दिसून येणारी लक्षणे - पाने लहान होऊन शिरामधील भाग पिवळा होतो. व पाने ठिकठिकाणी वाळलेले दिसतात.
    👉उपाय - चिलेटेड झिंक १ ग्राम प्रति लिटर पाणी फवारणी करावी किंवा पिकानुसार चिलेटेड झिंक २५० - ५०० ग्राम प्रति एकरी ड्रीप मधून द्यावे.
    5️⃣बोरॉन (H3BO3
    👉कार्य : वनस्पतीतील फुलंनिर्मिती, परागीभवन, फलधारणा, फळांची संख्या, बीजनिर्मिती हे सर्व बोरॉन आणि संप्रेरके यांच्या सहयोगाने घडते.
    👉कमतरतेमुळे दिसून येणारी लक्षणे - बोरॉन च्या कमतरतेमुळे फुले, फळे यांचे अकाली गळुन पडतात. बोरॉनची कमतरता असल्यास फळे तडकतात.
    👉उपाय: फुले लागताच बोरॉन २०% ५०० ग्राम प्रति एकरी ड्रीप मधून द्यावे. फवारणीसाठी १ ग्राम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
    6️⃣मॉलिब्डेनम (MoO42)
    👉कार्य : नत्र स्थिरीकरण करणाऱ्या सूक्ष्म जिवांची क्रियाशीलता वाढते. द्विदल धान्यामध्ये नत्रीकरणाचा वेग वाढविण्यास हे सूक्ष्मअन्नद्रव्य मदत करते.
    👉कमतरतेमुळे दिसून येणारी लक्षणे - पाने पिवळी होऊन त्यावर तपकिरी ठिपके पडतात. पानाच्या मागच्या बाजूने तपकिरी
    👉उपाय - सोडियम मॉलिब्डेट २०० ग्राम एकरी जमिनीतून द्यावे. अमोनिअम मॉलिब्डेट १ ग्राम प्रति लिटर पाण्यामधून फवारणी करावी.
    ✅महत्वाचे - कमतरतेची लक्षणे दिसण्याच्या आधीच पीक लागवड करताना मायक्रोनुट्रीएंट मिक्शर (ग्रेड १) एकरी १० किलो खतासोबत दिल्यास तसेच उभ्यापिकामधे मायक्रोनुट्रीएंट मिक्शर (ग्रेड २) हे १५ ग्राम प्रति १५ लिटर पंप किंवा २५० ग्राम प्रति एकरी ड्रीप मधून दिल्यास कमतरतेची लक्षणे दिसणार नाहीत.
    तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍
    ✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -
    👉भारतअ‍ॅग्री ऍप - bit.ly/2ZyV2yl
    👉फेसबुक हिन्दी - bit.ly/36KuGOe
    👉फ़ेसबुक मराठी - bit.ly/36KuGOe
    👉इंस्टाग्राम - bit.ly/3B9Ny8G
    👉वेबसाइट - www.bharatagri.com
    👉लिंक्ड इन - bit.ly/3TWtK0Z
    👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - bit.ly/3Ryf3zt
    👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - bit.ly/3L2cRxF
    #bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

Komentáře • 84

  • @sunilshelke2767
    @sunilshelke2767 Před 4 měsíci

    ❤❤❤

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 4 měsíci

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !

  • @yogeshchavan5899
    @yogeshchavan5899 Před rokem +7

    आतिशय सुंदर माहिती

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !

  • @siddharthdialani9282
    @siddharthdialani9282 Před rokem +4

    Good video by BharatAgri!

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !

  • @AmarPasare
    @AmarPasare Před rokem +4

    उपयुक्त माहीती दिलीत धन्यवाद 🙏🙏

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !

  • @sopanraut5686
    @sopanraut5686 Před 6 měsíci

    अतिशय सुंदर माहिती

  • @ranjeetbhosale5089
    @ranjeetbhosale5089 Před 7 měsíci

    छान माहिती दिली सर

  • @user-pf1zq8vw5g
    @user-pf1zq8vw5g Před 11 měsíci +1

    जबरजस्त माहीत दिली सर 😊😊😊😊

  • @bapumali2050
    @bapumali2050 Před 11 měsíci

    Good माहिती सर

  • @user-qu4lm8vn1q
    @user-qu4lm8vn1q Před rokem +1

    खुप छान

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !

  • @sagardhok9750
    @sagardhok9750 Před rokem +1

    Khubach Shan mahiti dili sir

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !

  • @vikasadasul2499
    @vikasadasul2499 Před 10 měsíci +1

    धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 10 měsíci

      मी देखील आपला आभारी आहे

  • @dnyaneshwarthete5828
    @dnyaneshwarthete5828 Před 7 měsíci

    खूपच छान 👌 माहिती दिली आहेत सर तुम्ही 👌

  • @nitinghadge4002
    @nitinghadge4002 Před rokem +1

    छान माहिती दिली सर💐💐

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !

  • @mohsinKhan-sz7ej
    @mohsinKhan-sz7ej Před 11 měsíci

    माहिती खूब छान आहे आणि आणि तुमची भाषा पण खूब चांगली आहे 👌🏻👌🏻

  • @daulatraochavan8670
    @daulatraochavan8670 Před rokem

    Thanks sir

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !

  • @arundamdhar5088
    @arundamdhar5088 Před rokem +1

    गजब मस्त शान

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !

  • @anilkandalenagnikar
    @anilkandalenagnikar Před 8 měsíci

    Very nice sir

  • @haribhaupadwal9629
    @haribhaupadwal9629 Před rokem

    छान माहिती दिली अभिनंदन माऊली

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !

  • @afsarshah2081
    @afsarshah2081 Před rokem +1

    Very nice

  • @sharadpawar5720
    @sharadpawar5720 Před 5 měsíci

    सुंदर

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 5 měsíci

      आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !

  • @ganeshbarde6084
    @ganeshbarde6084 Před rokem +3

    दादा सोयाबीन पेरणी/ खत / फवारणी/ असा सविस्तर व्हिडिओ बनवा फवारणी चे संपूर्ण schedule दया

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem +1

      आपण दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे आमच्या साठी लवकर या विषयावर एक नवीन व्हिडिओ बनू !

    • @ganeshbarde6084
      @ganeshbarde6084 Před rokem

      @@bharatagrimarathi दादा फवारणी चे सविस्तर माहिती द्या किती दिवसांनी कोणती फवारणी आणि कोणती औषधे असा धन्यवाद

  • @suyogjadhav3644
    @suyogjadhav3644 Před rokem

    Necessary information for farmer

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !

  • @yogeshkale4913
    @yogeshkale4913 Před 11 dny

    Micronutrients ha khat haladi sathi lagvadinantar kiti divsani dyava

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 9 dny

      हळद उगवणनंतर दिले तरी चालेले सर, धन्यवाद सर !

  • @DhanajayAadlinge
    @DhanajayAadlinge Před rokem

    👌🏼

  • @sagarsonawane089
    @sagarsonawane089 Před rokem

    👌👌👌

  • @biradarnagnath
    @biradarnagnath Před 11 měsíci

    🙏🙏👍👍

  • @vijaymore1091
    @vijaymore1091 Před rokem

    Far chhan

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !

  • @sopansanap2688
    @sopansanap2688 Před 7 měsíci

    Surplus+bouns+Antracol +marshal com challe ka

  • @samadhandeore6010
    @samadhandeore6010 Před 7 měsíci

    Sir chelated chi mahiti sanga

  • @dnyanupuri7057
    @dnyanupuri7057 Před 10 měsíci +2

    छान माहिती दिली सर पण कोणत्या स्टेजला कोनते खत वापरावे कोणते मिक्स करून वापरावे हे एकदा माहिती द्यावी

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 10 měsíci +2

      ओके. आम्ही यावर एक नवीन विडियो बनयू

  • @nitinsawant844
    @nitinsawant844 Před rokem +1

    खुप छान😅😅😅😅

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !

  • @rameshwarmisal
    @rameshwarmisal Před 5 dny

    या सोबत npk विद्राव्य खत मिक्स करून फवारणी केली तर चालेल का...

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 2 dny

      फक्त दोन प्रॉडक्ट असे तर नाही फुटणार पण डोज कमी असावा अजून काही गोष्टी अॅड केल्या तर नक्की फुटेल, धन्यवाद सर ! f

  • @saurabhdivase6971
    @saurabhdivase6971 Před rokem

    chelated foliar application grade 2 हे केळी पिका वरती चालते का

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      आपण विचारलेल्या प्रमाणे केळी पिकात ग्रेड २ चा वापर करू शकता !

  • @vipulpatio7799
    @vipulpatio7799 Před rokem

    Mahiti kup changali dili bhau

  • @ssjadhav4759
    @ssjadhav4759 Před rokem +1

    नमस्कार
    Zinc 12% काकडी वर फुल आणि फळ अवस्थेत फवारणी चालते का
    कृपया reply दयावा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      झिंक ऐवजी सूक्ष्म अन्नद्रव्या ची फवारणी करावी !

  • @popatbabar7845
    @popatbabar7845 Před 10 měsíci

    Micrountan मध्ये fungiside +incictiside चालते ka स्प्रे karayla

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 10 měsíci

      शक्यतो Micronutrient सेपरेट फवारणी साठी वापरावे

  • @malemasonawane4501
    @malemasonawane4501 Před 8 měsíci

    सुक्षम अन्न द्रव जिंक आणि बोरान एकत्र मिक्स करून ड्रीप मध्ये सोडता येईल का?
    माहिती पाठवा "सर".....

  • @user-zd2sj5fo9y
    @user-zd2sj5fo9y Před rokem

    सर नमस्कार दुययम अन्नद्रव्ये ची ब्रँड असलेली कोणती बॅगा आहेत बाजारात आहेत

  • @user-pb1qm2xf6l
    @user-pb1qm2xf6l Před 10 měsíci

    सर. शेडनेट मध्ये खरं बुज लागवड करायची बेन्यासाठी माहिती

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 10 měsíci

      कृपया याची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी आमच्या BharatAgri App मध्ये मेसेज करा. आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती देऊ

  • @satishingale977
    @satishingale977 Před rokem +1

    भारत अँग्री चे टि शर्ट मिळतील का .

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर ! क्षमा असावी .

  • @user-oy7jb1iz4d
    @user-oy7jb1iz4d Před 4 měsíci

    चिलेटेड मायक्रो न्यूट्रियन्त कोणती आहेत

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 4 měsíci

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी व्हिडिओ कॉल वरती सविस्तर चर्चा करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat

  • @yogeshghawade2882
    @yogeshghawade2882 Před rokem

    Santra vr video bnva

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      आपण दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे आमच्या साठी लवकर या विषयावर एक नवीन व्हिडिओ बनू !

  • @jagdishmaind653
    @jagdishmaind653 Před rokem +1

    Sir prom badal mahiti dya

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर ! व्हिडिओ बनू या विषया वर .

  • @slash9373
    @slash9373 Před rokem

    जर आवश्यक नसताना याचा उपयोग केला तर काही दुष्परिणाम होतो का

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem +1

      आपण विचारलेल्या प्रमाणे काही दुष्परिणाम नाही ! १५ दिवसातून करावा !

  • @umeshchougule879
    @umeshchougule879 Před rokem

    ऊस पिकात काहि पाने मध्येच पिवळी पडत आहेत उपाय काय करावा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      आपण संपर्क साधावा --BharatAgri मध्ये आपले स्वागत आहे. कृपया BharatAgri अॅपद्वारे आमच्याशी चॅट करा, तुम्ही कृषी दुकानात औषध पाहू शकता, तुम्ही व्हिडिओ कॉल करू शकता. चॅट उघडण्यासाठी किंवा अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - app.bharatgri.co/chat

  • @suhaspalande6077
    @suhaspalande6077 Před 10 měsíci

    सर आमची ४०आंब्याची एक वर्ष बाग आहे.मला तिसरा सुक्ष्म अन्नद्रव्यांचा मात्रा देण्याचा आहे.कोणती अन्नद्रव्ये वापरावीत?याची माहिती मिळाली तर बरे होईल.

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 10 měsíci

      ओके. तुम्ही कृपया तुमच्या आंबा बागेच्या सर्व माहिती सह आमच्या BharatAgri App मध्ये मेसेज करा. आमचे कृषि डॉक्टर तुम्हाला सर्व माहिती देतील

  • @umeshchougule879
    @umeshchougule879 Před rokem

    अशीच छ्यान विडीवो टाकत जा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !

  • @arundamdhar5088
    @arundamdhar5088 Před rokem +1

    नमस्कार सर संत्रा झाडावर झिंक, फेरस, मॅग्नेशियम,बोरॉन हे सर्व एकत्र करून फवारणी करता येते का . धन्यवाद💐🙏💐

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      आपण विचारलेल्या प्रमाणे करू शकता !

    • @arundamdhar5088
      @arundamdhar5088 Před rokem

      @@bharatagrimarathi ok