एका भुताची अद्भुत गोष्ट : वत्सलाबाई भोंग

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 12. 2020
  • शिदोरी दिवाळीची-५.....💐💐💐💐💐
    आज वछला बाईनं सांगितलेली ही एका भुताची अद्भुत गोष्ट.आमच्या रानात मरण आलेल्या पंची नावाच्या बंजारा बाळंतीण तरुणीच्या अपघाती निधनाचे हे भूत.हे भूत म्हणजे आमच्या कुटुंबातील एक सदस्य होतं. तीन कुणाला त्रास तर दिला नाहीच उलट ते घराला सतत मदत करीत राहिली.घरावर येणाऱ्या संकटाची कल्पना देणं,संकट आलंच तर ते परस्पर निवारण करणं,अशी कामही तिनं केली.आजकालच्या जागतिक साहित्यात ज्याला भलताच भाव आहे ते जादुई वास्तव कदाचित हेच असावं.
    उद्या माझ्या धाकट्या भावानं आंध्रप्रदेश मध्य साकारलेल्या एका अंतरराष्ट्रीय कीर्तीच्या शेती प्रकल्पाचा परिचय करून देणारी चित्रफीत टाकून दिवाळी शिदोरीचं वाटप थांबवणार आहे. धन्यवाद.
    श्रेय - चंद्रगुप्त

Komentáře • 334

  • @Pranjal1226
    @Pranjal1226 Před rokem +131

    अशी जुनी माणसं आजकाल बगायला, ऐकायला मिळणं म्हणजे भाग्यच 🙏

    • @shortvines561
      @shortvines561 Před rokem +5

      मग मी नशीबवान आहे माझे आजोबा वै वर्ष 95 प्रकृती उत्तम आजी 85 तीने तर अजून कधी दवाखाना पहिला नाही कधीच
      माझ्या मुलांचं नशीब त्याना पंज्या पंजी च्या अंगा khndyavr खेळाय मिळल

    • @karan_here2353
      @karan_here2353 Před rokem +2

      Barobar 👍

    • @p_m_g_a_m_e_r_2431
      @p_m_g_a_m_e_r_2431 Před rokem +1

      ​@@shortvines561 u

    • @swatithorat02
      @swatithorat02 Před rokem +1

      बरोबर

  • @rammore4904
    @rammore4904 Před rokem +38

    रुंद कपाळावर लाल भडक कुंकू.काठापदराचं निळं शार लुगडं.गव्हाळं वर्ण.ग्रामिण भाषाशैली. कणखर आवाज.आणि भयकथा जबरदस्त combination.... thanks आजी.

  • @jayashreedhone7692
    @jayashreedhone7692 Před rokem +110

    माई खूप छान गोष्ट सांगितली🙏आधी इतके इमानाला जागणारे लोक आता कुठं ,मेल्यावर ही भूत माणुसकीने वागायचे,आता जिवंत माणूस भुतावणी वागतो,आजीची आठवण आली😘😘😘

  • @pravinmate6384
    @pravinmate6384 Před rokem +6

    मोठ कंकू डोक्या वर पदर किती छान दिसाते आजी

  • @shailendrarahalkar5501
    @shailendrarahalkar5501 Před rokem +40

    हया आजींच्या बोलण्यात इतकी शांतता वाटते आणि प्रचंड आत्मविश्वास वाटतो. खरंच अशी आजी सगळ्या घरात असावी.

    • @sb007
      @sb007 Před rokem

      कारण आजी खूप लांब लांब फेकते जे की तुझ्या सारख्या चुतीया ला खरं वाटते

    • @shailendrarahalkar5501
      @shailendrarahalkar5501 Před rokem

      @@sb007 मी गोष्टी बद्दल बोललो नाहीये. बोलण्याची पद्धत ह्या बद्दल बोललोय. हे तुझ्या सारख्या yz ला कळत नाही

  • @ushataipatil2219
    @ushataipatil2219 Před rokem +5

    देव आहे तर दांनव पण असतात ..
    हि गोष्टं खरीचं आहे आजीं ..
    कोणाला काय समजांयचं ते समजुं द्यां..
    आजी परभणीचं भागातल्यां आहेत ..

  • @ranikhillare3182
    @ranikhillare3182 Před rokem +2

    आजी खुप सुंदर गोष्ट सांगितली माझ्या आजी आजोबा ची आठवन आली 🙏🙏🌹🌹

  • @BeingMR
    @BeingMR Před rokem +6

    आजी ने अक्षरशः त्या काळात नेऊन ठेवलं ...खूप सुंदर पद्धतीने अनुभव कथन केल आहे

  • @vishrantijamunde5925
    @vishrantijamunde5925 Před rokem

    खूप छान आजी त्या काळात सगळे मिळून मिसळून राहत होती नातीगोती सगळे सगळ्यांना मदत करत होते कोणाचं दुःख ऐकत होते कोणाचं सुख सांगत होते डोक्यावरून मायेचा हात फिरवत होते एकत्र कुटुंब होते खूप छान आजी तुमचा काळ पहिल्या या गोष्टी खऱ्या होत्या मानस खरी होती भूत खरे होते आता टिविवर भूत खोटे मानस खोटे सगळ्या काल्पनिक कथा आहेत धन्यवाद आजी जुना काळ सांगितल्याबद्दल धन्यवाद

  • @manjushajadhav8580
    @manjushajadhav8580 Před rokem +52

    माझी आजी आठवली मला …अशी माणसं दिपस्तंभ आहेत ..🙏

  • @shivrajzagade3381
    @shivrajzagade3381 Před rokem +82

    आई ,उन्हाची सावली ,
    आई ,सुखाचे नगर ,
    निळ्या आभाळा एवढा
    तिच्या मायेचा पदर .....
    आई ,नावाची वाटते
    देवालाही नवलाई ,
    विठ्ठलही पंढरीचा
    म्हणे स्वतःला "विठाई "
    आई ,कुणाचीही असो,
    तिचा सन्मान करावा ,
    तिने टाकलेला शब्द
    फुलासारखा झेलावा .....👏👏👏👏👏👏

  • @devkarsir5457
    @devkarsir5457 Před rokem +3

    आजकाल असं भारदस्त व्यक्तीमत्व पहायला मिळत नाही. आजीची गोष्ट ऐकून डोळ्यात पाणी आलं. अस्सल मराठी गावरान भाषा. आजकालचे लेखक कथाकार जी मराठी भाषा वापरतात ती ओढूनताणून आणलेली वाटते. ही खरी अनुभवातील भाषा व अनुभव. माझे देवासमान चुलते अशा गोष्टी सांगायचे, त्यांचे सासरे म्हणजे आमचे बाबा आजोबा अशाच गोष्टी सांगायचे. तेही स्व अनुभवातील . अजूनही त्या माझ्या तोंडपाठ आहेत. त्या तशाच लिहून काढील म्हणतोय, खूपच मोठी प्रेरणा मिळाली. खूप छान वाटलं. अशी आजी सर्वांना लाभो. आजीला. दीर्घायुष्य लाभो. 🙏🙏

  • @rushikolte6369
    @rushikolte6369 Před 3 lety +42

    खुप सुंदर गोष्ट होती आजीबाई।
    आमची आजी बाई पण असच मोठ्ठ कुंकू लावत होती। पण आता ती देवाघरी गेली 😥😥

  • @kishanmisal1309
    @kishanmisal1309 Před rokem +4

    मायीच अगदी खर हाय ३० ते ३५ वर्षांपूर्वी अगदी अशाच गोष्टी सागत गावातील सातारी माणसं आणि माय बाप सुद्धा

  • @sumedhmadhukar
    @sumedhmadhukar Před rokem +2

    अश्या कथेला पार्श्व संगीताची काडी मात्र गरज नाही .

  • @Milindmatre
    @Milindmatre Před rokem +5

    खर्या असतात या गोष्टी आजींनच्या जुन्या माणसानच्या

  • @surajkhandjode6259
    @surajkhandjode6259 Před rokem +1

    हे खरं असो वा खोटं पण आयकायला खूप बरं वाटतंय.आमच्या लहान पनाच्या गोष्टी.

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 Před rokem +5

    किती किती खणखणीत आवाज .कथा कशी समोरच्याला समजेल अशी आजी सांगत आहेत..

    • @pallavidarde9970
      @pallavidarde9970 Před rokem

      Aaji khup chan prsang sagitla dolyaa smor ghadt ahee as vatla mala mji ajji atvli kup chan👍 ashch atvnitil ktha sgvyt

  • @m.deshmukh2811
    @m.deshmukh2811 Před 3 lety +42

    सर...तुमच्या माईची गोष्ट ऐकून मला माझ्या आजीची म्हणजे माझ्या माईची आठवण झाली....तिच्या कपाळावर असच मोठ कुंकु असायच आणि ती सुद्धा तीला माहीत असलेल्या अशा गोष्टी मला सांगायची..तिच्या अंगावर च लुगड डोक्यावर चा पदर..हातातल्या बांगड्या आणि मनातली माया...कायम स्मरणात आहे...

  • @naushadmomin6312
    @naushadmomin6312 Před rokem +4

    एकनबर अजुन गोष्टी टाका भयानक टाईमपास मस्त होतोय लाइक करतो सबकारयब करतो बघा मुगयाबो खुश हुआ

  • @devraolone5953
    @devraolone5953 Před rokem +13

    माईची कहानी लई आवडली गडया,माय हा शब्द आता बुडला,
    खरच,माय शब्दांत कीती गोडावा होता,खरच जुनी भाषा, जुन्या भाषेचा गोडावा,किती गोड होता आमच्या जुन्या आठवणी, आता कधीतरी ऐकायला मिळतिल का,
    आणि आता कोणाच्या घरी तरी गाय बैल वासरु कीवा प्राणी मिळतिल काय माय,खरच किती शिलवान होते जुने मानस,किती माया करनारे होते,आमच्या माया बहीणी.धन्यवाद माय तु जुन्या आठवणी ताज्या झाल्या करुन
    दाखवल्या,आता ना शेत जमीन आहेत,ना कोणत्याही शेतकऱ्यांच्या घरांत कोणताच प्राणि सुद्धां नाही,
    माय तुझ्या वाणि बुजुर्ग मानसं सुद्धा आता राहीले नाहीत.
    तुझ्या पायांवर मस्तक ठेवतो
    आशिर्वाद असु दे.
    नमोबुद्धाय सर्वांचे मंगल हो.

  • @bhalchandramane4773
    @bhalchandramane4773 Před rokem +10

    आजी तुमचं ठसठशीत कुंकू आणि भाषा खुपच आवडलं.

  • @shripaddagade
    @shripaddagade Před rokem +1

    aji agadi aplya ghartali watlya....bhasha khup god watli aikyala ......

  • @VijayDSalve
    @VijayDSalve Před 3 lety +28

    उत्तम...
    मराठी भाषेचा अस्सल ग्रामीण बाज....!
    आज्जीमाईला सॅल्युट..!🙏

  • @mrdmahesh
    @mrdmahesh Před rokem +1

    काय गोड आज्जी आहेत 🙂 🙏खूप छान सांगितली गोष्ट. अशा गोड आज्जी सगळ्यांना लाभो

  • @SS-nakshatra
    @SS-nakshatra Před rokem +2

    खरच बोलल्या आजी त्याकाळी भूत मानत होते
    फार गोड वाटते ऐकायला

  • @pawanmanathkar5742
    @pawanmanathkar5742 Před rokem +1

    खुप छान खरी घडलेली कहानी सांगीतली आजीबाईनी....

  • @alkabagwe4152
    @alkabagwe4152 Před rokem +6

    आजी बाई खूप छान गोष्ट सांगितली. पूर्वी लोक खूप साधे सरळ असायचे 😄आमचा विश्वास आहे हे सगळे घडले असणार 🙏🌹😂

  • @mayabichkule8198
    @mayabichkule8198 Před rokem +2

    Hi gost khri आहे पण ही बाई आमची धनगर होती आणि हे खरच झालाय आम्हाला हे सर्व माहित आहे kati pati chi gost आहे ही

  • @luxurycars5195
    @luxurycars5195 Před rokem

    Dhanyavad aaji junyakalchi khari kahani sangitli ❤️🙏

  • @ianandrade1858
    @ianandrade1858 Před rokem +2

    Majhya aajichi aatavan jhali khupch chhan katha 👌🙏

  • @shrinivaskulkarni2848
    @shrinivaskulkarni2848 Před rokem +3

    माई 1 नंबर गोष्ट सांगितली 👌🙏

  • @yogeshpatil-ir2oe
    @yogeshpatil-ir2oe Před rokem

    1च नंबर माय माऊली

  • @gavandepatilg
    @gavandepatilg Před rokem

    खुप छान भारदस्त आज्जीबाई

  • @Atulpatil1999
    @Atulpatil1999 Před rokem +14

    आढवड्यातून एकदा नवीन नवीन गोष्टी सांगाव्यात आजीनं 🙏🏻🙏🏻

  • @balachavan7956
    @balachavan7956 Před rokem +1

    खूपच छान शंभर टक्के खरी आहे

  • @naturelover1247
    @naturelover1247 Před rokem +1

    आजी खूप छान गोष्ट ऐकवली

  • @rjpatil94
    @rjpatil94 Před rokem +76

    आजी आपल्या नांदेड भगाकडल्या आहेत..आमची भाषा ऐकून आनंद झाला..same आमची आजी अशीच होती💐💐🙏🙏

    • @semmytt372
      @semmytt372 Před rokem +10

      आमचा भाग तुमचा भाग करण्यातच आयुष्य जाणार.

    • @krushnafultambkar8716
      @krushnafultambkar8716 Před rokem +3

      @@semmytt372 🤣😅😅😅😅

    • @krushnafultambkar8716
      @krushnafultambkar8716 Před rokem +4

      Dada aji te aji aste te kontya pn bhagatli aso☺️😁

    • @sb007
      @sb007 Před rokem +4

      ही आजी खूप फेकते पण , तुमची आजी एव्हड लांब लांब नसल फेकत

    • @pratikshajadhav4812
      @pratikshajadhav4812 Před rokem +1

      Ho bhava aaply Parbhani kadilch ahet ❤️😍

  • @rupaliaaspe
    @rupaliaaspe Před rokem

    छान गोष्टी पंचवटी

  • @mahantrajdharsonpetkar6398

    खूप छान माहिती 👍🙏

  • @user-up4hb1xr6g
    @user-up4hb1xr6g Před rokem +3

    छान 👌 आजी तुम्ही गोष्ट सांगितली

  • @deepikachoure1568
    @deepikachoure1568 Před rokem +1

    Khup chaan gosht sangitli aaji. Malaa mazya aajinchi aathvan zali. 👍

  • @radhikasodgir1576
    @radhikasodgir1576 Před rokem

    खूप छान वाटले माई गोष्ट ऐकली अगदी मन लावून

  • @vidhate.kishan
    @vidhate.kishan Před rokem +1

    Dandvat Pranam experience in Era...nice

  • @patmasesnehal06
    @patmasesnehal06 Před rokem

    Aajicha goshti chan chan ashacha sangt raha

  • @meenajadhav2929
    @meenajadhav2929 Před rokem +1

    Aaji Mast Gosht.

  • @kamalbharti7601
    @kamalbharti7601 Před 2 lety +5

    खूप छान अनुभव आका

  • @ganeshawachar885
    @ganeshawachar885 Před 2 lety +4

    सर आई ने सांगीतलेली गोष्ट आवटली.

  • @manejigawande9593
    @manejigawande9593 Před rokem +1

    माय खुप छान आहे गोष्ट

  • @prajwalasabe438
    @prajwalasabe438 Před rokem +4

    शेवटी आजीच्या तोंडावर आलेलं हसु ,....😍😍😍💖

  • @dr.ranjitmuknar7015
    @dr.ranjitmuknar7015 Před rokem

    आजीचा बटवा आणि आजीच्या गोष्टी अप्रतिम असतात.

  • @gopalgiri-ms8kq
    @gopalgiri-ms8kq Před rokem +1

    Mala majhya aajichi yad aali

  • @bajiraokondlapur1061
    @bajiraokondlapur1061 Před rokem

    खरच खुप छान आजी दंडवत प्रणाम

  • @tejasvinagothanekar8846

    Khup Chan vattal

  • @priyakumbhar5062
    @priyakumbhar5062 Před rokem

    Khup chhan mla ajji khup awadli....

  • @bharatpople8063
    @bharatpople8063 Před rokem

    खूप खूप छान

  • @vijaypatil4283
    @vijaypatil4283 Před rokem +2

    छान कथा आई,

  • @editorking7181
    @editorking7181 Před rokem

    माऊली..🙏

  • @sadhanaligade4695
    @sadhanaligade4695 Před rokem

    Chan vatli bga aaji gost

  • @bhaveshbawaskar8618
    @bhaveshbawaskar8618 Před rokem

    Aaji khup Chan sangitla

  • @user-wg7tf5gc2r
    @user-wg7tf5gc2r Před rokem

    आज्जीचि गोष्ट खुपच भारी

  • @ranvirbhagwan6278
    @ranvirbhagwan6278 Před rokem +1

    वत्सा मायी न माझी आई जेव्हा खूप मोठ्या आजारा शी झुंजत होती तेव्हा खूप मदत केली होती .. कारण माझ्या आजा लिंबाजी आणि भोंग परिवार चे चांगले संबंध होते ..

  • @appasahebkhalde9870
    @appasahebkhalde9870 Před rokem

    जुनं ते सोनं आजी तुम्हाला पाहुन खुप खुप आनंद झाला,अशीच आमची आजी लहान पणी देवाची कथा सांगितल्या आहेत,

  • @sandipchavan7661
    @sandipchavan7661 Před rokem

    खूपच छान.

  • @kundlikkaranavar308
    @kundlikkaranavar308 Před rokem +1

    आई मायेचा सागर आहे खुप छान गोष्ट आहे nice 👍👍👍👍👍

  • @arungurav7227
    @arungurav7227 Před rokem

    आजी गोष्ट फारच छान होती /

  • @RAJUPATIL-ny9mw
    @RAJUPATIL-ny9mw Před rokem +1

    Khup Sundar aaji ...🙏🙏

  • @yadavdhone8146
    @yadavdhone8146 Před rokem +7

    अगदी बरोबर..आमच्या लहानपणी अशाच गोष्टी आमच्या देखील ऐकण्यात आल्या आहेत..गंगा ची गोष्ट देखील आम्ही आमच्या वडिलांकडून.. आहेरवाडी या बहिणीच्या गावातून ऐकलेल्या आहेत.. धन्यवाद सर अप्रतिम व्हिडिओ जतन करुन ठेवलाय आपणं.. मनापासून शुभेच्छा.. 🌹🌹👏👏🙏😊

  • @allvideo7419
    @allvideo7419 Před rokem +22

    आता आजी ची गोष्ट फक्त मोबाईल वरच कारण आत लुगडयावरची गोष्ट सांगणारी आजी नाही राहली आताच्या आजीला नातवंडे सांभाळायला आवडत नाही जिव्हाळा राहला नाही पुर्विच्या आजी सारखा माझी पण मला गोष्ट सांगत झोपवायची

  • @vilasbansode1663
    @vilasbansode1663 Před rokem +2

    Miss u aaji , tumchya mule majhya balapanichya aathavani jagya jhalya
    Aaji ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @ananadshinde432
    @ananadshinde432 Před rokem

    खूप छान

  • @FrudraFgamer
    @FrudraFgamer Před rokem

    Far chhan gosta 🙏🙏👌👌

  • @priyankaghadi2107
    @priyankaghadi2107 Před rokem

    खुप छान👏

  • @prasadkale2815
    @prasadkale2815 Před rokem

    दंडवत प्रणाम

  • @krushnadome96k
    @krushnadome96k Před rokem

    खुपच छान. माय...

  • @vaishnvikadam4206
    @vaishnvikadam4206 Před rokem +2

    Very amazing may😊😊👌👌👌

  • @dipalikhot-sf7yq
    @dipalikhot-sf7yq Před rokem +1

    खूप मस्त गोष्ट

  • @kailaswaghe4900
    @kailaswaghe4900 Před rokem +1

    Layi bhari Aaji

  • @anjanajadhav5352
    @anjanajadhav5352 Před rokem +7

    आज आजी बाईंची गोष्ट ऐकून । माझ्या आजीची आठवण आली । माझी आजी आज या जगात नाही । आजी बाई खूप छान

  • @atulbedre8475
    @atulbedre8475 Před rokem +10

    खरच आई
    आमची आजी पण अश्या जुन्या गोष्टी खूप सांगायची पण 2वर्ष झाले आमची आजी ला देव अज्ञा झाली तिची आज खूप आठवण आली 🙏

  • @wonderfulife0
    @wonderfulife0 Před rokem +2

    जुनी माणसं फार कमी रहीली आहे
    ओल्ड इज गोल्ड

  • @kypan8569
    @kypan8569 Před rokem

    Ajji ly bhari

  • @rohinideshmukh9000
    @rohinideshmukh9000 Před 3 lety +3

    Story is Intresting
    nice

  • @vidya_d9739
    @vidya_d9739 Před rokem

    Khup chhan aaji

  • @break-up-studio1553
    @break-up-studio1553 Před rokem +1

    Very honest video..!

  • @piyu1697
    @piyu1697 Před rokem

    Khup chan vatlaa balpan athavla Ani maze ajobaa hi ashyach junya goshti sangayche bhutachya sooo touching love u ajji

  • @shilpadandge4488
    @shilpadandge4488 Před rokem

    Khup chan aaji

  • @Anupama_Venkatesan
    @Anupama_Venkatesan Před rokem +6

    Please post more stories from her. Very beautifully narrated! Enjoyed it so much! 👌👌👍

  • @malikarjunkoli2283
    @malikarjunkoli2283 Před rokem +1

    खूप छान आजी सत्य घटना आहे ना

  • @shreyaswardekar9376
    @shreyaswardekar9376 Před rokem

    वा वां वा

  • @geetGitu
    @geetGitu Před rokem

    Ek number aaji

  • @VikasBhosale-eh4vz
    @VikasBhosale-eh4vz Před rokem

    आता.लोक.मानत.नाहीत ह्या.गोष्टी.पण.हे.सत्य आहे.भारी.आहेत.आजी

  • @umeshchavan2208
    @umeshchavan2208 Před rokem +1

    aajinni..saangitleli..gosht..khup...chhaan..hoti..umesh...maaruti
    .chavan...badlaapur..

  • @pratibhaaute3760
    @pratibhaaute3760 Před rokem

    खूप छान मावशी

  • @sandipgaikwad7723
    @sandipgaikwad7723 Před rokem

    खुपचं छान आजि,1 चं नंबर

  • @nandkumardesai7109
    @nandkumardesai7109 Před rokem

    Same amchi nanai 🙏🙏🙏 dhanyawad

  • @vaishaliyadav926
    @vaishaliyadav926 Před rokem +2

    आजीच आवडली .आजी म्हणजे प्रेम .वात्सल्य

  • @dayanandjadhavparitekar7845

    खुप छान गोष्ट सगित्ली आता अशी म्ह्तारी मानस आहे तच कूट अजुन काही गोष्टी असतील तर आजीना सांगा य लावा

  • @bhanjagi2835
    @bhanjagi2835 Před 3 lety +12

    आई गोष्ट खूप छान सांगितलात ,ग्रामीण भागात ह्या घटना घडत होत्या ,आधी धन्यवाद.

  • @akankshadeshmukh9050
    @akankshadeshmukh9050 Před rokem +8

    असच सांगतात माझ्या गावाकडची माणसं, हीच माझी खरी भाषा