घोरपडा आई | रंधा धबधबा | Randha Waterfall | Gavakadche Vlog

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • रंध्याची घोरपडाआई
    जो निसर्ग आपल्याला जगवतो, ज्या रानात आपण वाढतो, आवश्यक त्या बहुतांशी गरजाही याच रानातून भागवल्या जातात आणि या निसर्गासाठी आपलेही काही देणं लागतं आणि म्हणून या निसर्गातील घटकांचेही रक्षण करणे ही आपली जबाबदारीच आहे या भावनेतून जगणारा समाज म्हणजे आदिवासी समाज. "भाऊ, वाळेल लाकूड तोड पण ओल्या काडीवं इळा-कोयता हाणू नको" ही आपल्या वाडवडिलांनी दिलेली शिकवण. या सारख्या शिकवणींतून आणि वेगवेगळ्या चालीरितींतून निसर्गातील वेगवेगळ्या घटकांचे संवर्धन व रक्षण करण्याचे बाळकडू पुढील पिढीला आपोआपच मिळत जाते.
    ज्या जंगलावरच आपले संपुर्ण जीवन अवलंबून आहे, ज्या निसर्गातील अनेक घटक, झाडे आणि प्राणी आपल्याला उपयोगी पडतात कधीकधी माणसाचा जीवही वाचवतात. अशा जित्या-जागत्या गोष्टींना देव मानून त्यांची पूजा करणे ही आदिवासींची परंपरा. आणि म्हणूनच या निसर्गातील घटकांची प्रतिके वेगवेगळ्या आदिवासी भागात पूजली जातात. जसे की १)कळमजाई/कळंबजाई ( कळंबाचे झाड)
    २) वाघोबा/वाघ्या (वाघ प्राणी)
    ३) उंब-यादेव (उंबराचे झाड)
    ४) बैलदेव (बैल प्राणी)
    ५) दर्याबाई (दरी)
    ६) डोंगरदेव (डोंगर)
    ७) कणसरा माता (धान्य,कणीस)
    यासारखी अनेक दैवते व त्यांची प्रतिके कुळसाय/ कुलदैवते म्हणून पूजली जातात. ज्या कुळाचे जे कुलदैवत आहे त्यांनी तो प्राणी मारायचा नसतो किंवा झाड असेल तर ते तोडायचे नसते . त्याचे संवर्धन, रक्षण करायचे असते. अशी पुर्वापार चालत आलेली प्रथा.
    या दैवतांपैकीच एक म्हणजे कुळसाय घोरपडा आई.
    या घोरपडा आईला आम्ही घोरपडाई म्हणतो. घोरपडाई म्हणजे घोरपड हा प्राणी.
    या बाबतीत माझ्या आयुष्यात घडलेला एक प्रसंग. मी साधारण ४-५ वर्षाचा असेल. तेव्हा शाळेत जात नव्हतो. तेव्हा माझी तब्येतही खुप गुटगुटीत. त्यामुळे मला लाडाने 'गल्जू' म्हणायचे. अचानकपणे माझ्या उजव्या डोळ्याजवळ एक फोड आला. तो जाण्याचं नावच घेईना. त्यामुळे नियमित डोळ्यातून पाणी येणे, जेवन न करणे अश्या गोष्टी घडायला लागल्या. तो आजार अधिकच वाढला आणि माझी प्रकृती अधिकच खालावली. तेव्हा परिस्थिती देखील गरीब. जास्त दवाखानाही परवडनारा नव्हता. तरीही घोटी नाशिकचे दवाखाने दाखवून झाले. पण काही केल्या फरक पडत नव्हता. आई तर नेहमी रडायची की मी जगेल की नाही अशी भिती तिच्या मनात यायची.
    असंच एक दिवस पाहूण्या आलेल्या एका आजीने मला पाहिले. ती थोडी जाणकारच असावी. मला पाहून तिने लगेच सांगीतले की हे 'लासरू' आहे. आता लासरू हा आजार सर्वासाठी नविनच होता. मग त्याच आजींनी सांगितले की त्यावर घोरपडीची कवटी उगाळून लावायची.
    घोरपडीच्या कवचीची शोधाशोध सुरू झाली. इंदोरे या गावातील ठाकरांकडे मिळू शकेल अशी माहिती मिळाली. तेथील नातेवाईकांना सांगून ती मिळविली आणि उपचार सुरू केले. आणि काय आश्चर्य. आठ दिवसातच माझा आजार बरा झाला. एक प्रकारे मृत्यूपासून सुटकाच झाली माझी. म्हणजे या घोडपडीचे वैयक्तीक माझ्यावर खुप उपकार आहेत.
    अशा कितीतरी प्राणी, पक्षी, वनस्पती यांचे आपल्या जीवनात अनन्यसाधारण असे महत्व आहे. म्हणून त्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. या संवर्धनासाठी ठराविक कुळांना ते ठरवून द्यायचे व संवर्धन करण्यास सांगायचे. ती कुळे त्या प्राण्याला अथवा झाडाला देव मानतात. त्यातीलच ही घोरपडाई. पण देव म्हटलं की श्रध्दा आलीच. आणि त्यासोबत विश्वास न बसण्यासारख्या अख्याईका देखील आल्याच. पण या श्रध्देपोटी मुळ संकल्पना विसरणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी व जैवविविधता टीकवून ठेवण्यासाठी या निसर्गदेवता निर्माण केल्या आहेत हे नेहमीच प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवे.
    या घोरपड प्राण्याचे प्रतिक म्हणून रंधा, ता.अकोले जि.अ.नगर या ठिकाणी घोरपडा आईचे मंदिर बांधलेले आहे. परिसरातील नवविवाहित जोडपे आपल्या कुळसाय चे दर्शन घेण्यासाठी हमखास या ठिकाणी येत असतात. या ठिकाणाची जशी परिसरातील आदिवासी बाधवांच्या संस्कृतीशी नाळ जोडलेली आहे तसेच हे ठिकाण पर्यटकांनाही भुरळ घालणारे आहे. या ठिकाणापासूनच काही अंतरावर असलेल्या ब्रिटीशकालीन भंडारदरा धरणातून येणारे पाणी जेव्हा उंच कड्यावरून खाली पडते ते ठिकाण म्हणजे रंधा फॉल येथीलच. डोळ्यांचे पारणे फेडणारे निसर्गसौंदर्य असल्याने कित्येक बॉलिवूडच्या चित्रपटांचे चित्रिकरण या परिसरात झालेले आहे.
    या ठिकाणी प्रवेश केल्याबरोबर आपल्याला समोर घोरपडा आईचे मंदिर दिसते. मंदिरात प्रवेश केल्यावर समोर ओबडधोबड आकारातील शेंदूर लावलेला दगड दिसतो, तीच घोरपडाई. अगदी अलिकडेच काही वर्षांपूर्वी देवीचा मुखवटा तयार करून आणून मंदिरात ठेवलेलाही बघायला मिळतो. शेजारीच घोरपड प्राण्याची लाकडी प्रतिकृतीही दिसते. मंदिराच्या बाहेर आल्यावर प्रवरा मातेचं पाणी वाहताना दिसतं. या प्रवरा नदीबद्दल येथे एक अख्याईका सांगितली जाते. मुळा व प्रवरा या दोघी बहिणी. मुळा नदी आजारी पडली. ही खबर ऐकून प्रवरा मुळेला भेटायला निघाली. ती याच रंधा या ठिकाणांपासून कातळापुरमार्गे निघाली. पण कातळापुरचा डोंगराजवळ जाता जाता तिला मुळेने निरोप पोहचवला की मी आत्ता सुखरूप आहे. मला भेटायला येऊ नको. हा निरोप ऐकून प्रवरा पुन्हा मागे फिरली. ती ज्या मार्गे आली होती त्या मार्गाने देखील नदी तयार झाली. उजव्या बाजूने येणारा जो धबधबा आहे तो याच कारणामुळे तयार झालेला आहे असे येथील जुने लोक सांगतात.(अख्याईकांवर किती विश्वास ठेवावा हा वैयक्तीक प्रश्न आहे🙏)
    नदी ओलांडून पलिकडे गेल्यावर अगदी रंधा धबधब्याजवळ खडकाला लागूनच तयार केलेले छोटेसे मंदिर दिसते. हेच घोरपडाआईचे मुळ स्थानक. दर मंगळवारी येथे फुल लावले जाते (प्रसाद लावणे). परिसरातील ग्रामस्थ आपल्या घरात कुठलेही महत्वाचे काम करायचे असेल तर या ठिकाणी फुल लावतात व त्यानुसार आपल्या कामाची दिशा ठरवतात. या मुळ मंदिराकडे यायला प्रवरा नदीचे पात्र ओलांडून यावे लागत असल्यानेच सर्वांच्या सोयीसाठी नदीच्या अलिकडे नवीन मंदिर बांधले आहे जे आपल्याला प्रथमदर्शनीच नजरेत पडते.

Komentáře • 165

  • @manglaniklja7204
    @manglaniklja7204 Před 2 lety

    घोरपडा मंदिर खुप खुप छान निसर्गाने नटलेला परिसर आहे म

  • @asmitamangeshpandit4199
    @asmitamangeshpandit4199 Před 3 měsíci

    छान माहितीपूर्ण विडिओ व लेख 👌घोरपडा आई व मंदिर परिसर सुंदरच 👌🙏

  • @hrutikmalgave
    @hrutikmalgave Před 3 lety +1

    👌👌👌

  • @manglaniklja7204
    @manglaniklja7204 Před rokem

    आईचा व्हिडिओ पाहिला आणि खूप बरे वाटले आनंदही झाला वाईट ही वाटले मुंबई बादरा मंगला निकाळजे

  • @geetagothal1247
    @geetagothal1247 Před 2 lety

    Lay bhari dole. Nivale

  • @manglaniklja7204
    @manglaniklja7204 Před 3 lety

    खुप छान भारी व्हिडिओ होता आवडला नासुर बरा झाला होता घोरपडा आई

  • @KaveriDawkhar
    @KaveriDawkhar Před měsícem

  • @shivamfarmer491
    @shivamfarmer491 Před 3 lety

    खुप सुंदर

  • @vasantkumbhar6826
    @vasantkumbhar6826 Před 2 lety

    एकदम झकास 🙏

  • @shakuntalakachare2430
    @shakuntalakachare2430 Před 3 lety

    Kombadkanda vishyee mahiti

  • @sunitapurane983
    @sunitapurane983 Před 3 lety

    Khup chan

  • @sunitabagad2572
    @sunitabagad2572 Před 3 lety

    Gabhale bhau मस्त

  • @manglaniklja7204
    @manglaniklja7204 Před 2 lety

    एक नंबर व्हिडिओ तुमचे कौतुक मुंबई बादरा मंगला निकाळजे

  • @hirkanichaburuj4373
    @hirkanichaburuj4373 Před 2 lety

    Very nice

  • @vasundharaborgaonkar9770

    छान माहीती

  • @minaxiburud885
    @minaxiburud885 Před 3 lety +2

    भरपुर माहिती देता तुम्ही निसर्ग सौंदर्य दाखवता त्या बद्दल तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत 🙏🙏

  • @sukanyadeokar9072
    @sukanyadeokar9072 Před 3 lety

    Chan

  • @umeshgirpade2204
    @umeshgirpade2204 Před 3 lety +1

    Umesh Ghorpade

  • @BAKASUR_LOVER6300
    @BAKASUR_LOVER6300 Před 3 lety +1

    Amhi kodnichech ahot

  • @minaxiburud885
    @minaxiburud885 Před 3 lety

    बापरे हे काय म्हणायचं कसला आजार घोरपड पण उयोगला पडते हे कुणाला माहीत पण नाही

  • @mahadevbaramate3255
    @mahadevbaramate3255 Před 2 lety

    Havidemalapha

  • @manglaniklja7204
    @manglaniklja7204 Před 3 lety +6

    घोरपडा आई रंधा धबधबा खुप छान आहे हा व्हिडिओ खुपचं छान होता आईनी तुमच्या बद्दल माहिती सांगितली तेव्हा अंगावर शहारे आले

    • @gavakadchevlog
      @gavakadchevlog  Před 3 lety +1

      कुणाच्या तरी लक्षात आलं🙏🙏🤗

  • @bhagwanchamp6963
    @bhagwanchamp6963 Před 3 lety

    आपण आपला अमूल्य वेळ आपल्याला निर्गासाठी देतात त्यामुळे निसर्गाचे देवी देवतांचे दर्शन होते व खूपच चांगली माहिती मिळते व ती जतनातही राहते..
    #एकदा आमच्या #मामाचा गावाचा विडिओ बनवा. #बहिरोबा #देव #शिरपुंजे
    आणि कुमशेत #धारेराव
    MOB.8087305529

  • @hemantgaming7098
    @hemantgaming7098 Před 3 lety +1

    खूपच छान दादा जय आदिवासी😊😊

  • @manglaniklja7204
    @manglaniklja7204 Před 3 lety

    घोरपडा आई मुळें आजार बरा झाला होता खरच परमेश्वर खुप कृपाळू आहे आईनी भारी माहिती सांगितली

  • @madhurijadhav6127
    @madhurijadhav6127 Před 4 měsíci

    घोरपडे देवीची जत्रा कधी असते कोणाला माहिती आहे का

  • @pandu5010
    @pandu5010 Před 2 lety

    आजी बाई छान माहिती दिली आहे परंतु एखाद्या समाज बद्दल जातीवर ऐकेरी उलेख करने चुकीचे आहे

  • @kamalakuwar8122
    @kamalakuwar8122 Před 3 lety

    खुप सुंदर व्हिडिओ झाला...
    सगळचं खुप अदभुतरम्य धबधबा ....
    मंदिरही छान..

  • @manglaniklja7204
    @manglaniklja7204 Před 2 lety

    खुप खुप छान भारी होता व्हिडिओ आवडला तुमचे कौतुक एक नंबर व्हिडिओ घोरपडा आईचे दर्शन घेतले मुंबई बादरा मंगला निकाळजे यांनी बादरा

  • @shraddhabhangare920
    @shraddhabhangare920 Před 3 lety +2

    Rajesh khnnancya 'yeh sham mastani' ya ganyace chitrikrnhi yethec zale ahe....sundr video dada❤️

  • @kalpanabamble4390
    @kalpanabamble4390 Před 3 lety +1

    छान माहिती दिली पावसाळ्यात धबधब्याचे अप्रतिम सौंदर्य दिसते मी पावसाळ्यात दरवर्षी जाते ‌🙏🙏

    • @gavakadchevlog
      @gavakadchevlog  Před 3 lety

      मला पावसाळ्यात जायला नाही जमलं🙆‍♂️🙏🤗

  • @vitthalbhagade9449
    @vitthalbhagade9449 Před 3 lety +2

    जय घोरपडा आई

  • @pradnyasrangoli679
    @pradnyasrangoli679 Před 3 lety

    Dada tumche video baghun ranbhajaychi khup chan mahiti bhetli Ani tumi Ani tumchi aai ch bindast boln khup bhari vatty👍👍👍👍🙏

  • @travellerprashant460
    @travellerprashant460 Před 3 lety

    दादा नेहमीप्रमाणे अतिशय सहज आणि सुंदर असा व्हिडिओ...🤩👌

  • @sushamaporwar6674
    @sushamaporwar6674 Před 3 lety

    फारच सुंदर व्हीडिओ 👌👌👌👍
    अप्रतिम निसर्ग चित्रण असलेले आणि सोबत वेगवेगळी माहिती असलेले तुमचे सर्व vdos मन आणि डोळे तृप्त करतात।

  • @KailasTechnical
    @KailasTechnical Před 3 lety +1

    खूप मस्त 👍

  • @sangeetaahire3920
    @sangeetaahire3920 Před 3 lety +1

    प्रथम घोरपडाआईला 🙏 आम्ही गावाला आलो की घोरपडा आईचे दर्शन घेतोच घेतो खुप छान 🙏🙏

  • @Agro4u
    @Agro4u Před 3 lety +1

    तुमच्या भागामध्ये ऐकेकाळी पर्यटनासाठी मोक्कार फिरलो सर्व ठिकाणी फिरलो खुप छान विभाग आहे तुमचा . जुन्या आठवणी साठी जवळपास सर्व व्हीडीओ पाहतो.

  • @प्रदिपमोरे-ज3न

    छान माहिती आहे दादा घोरपडा आई आमची (मोरे परीवाराची) कुळसाय (कुलदैवता) आहे. तसेच ती एकटीच निम्म्याहून अधिक आपल्या आदिवासी महादेव कोळी बांधवांची कुळसाय आहे. ते एक अतिप्राचीन काळापासून अत्यंत जागृत असे आदिशक्ती पीठ आहे परंतु हि माहिती फारच कमी लोकांना आहे. ,🙏🙏🙏🙏🙏🚩🚩

  • @manishabhat5745
    @manishabhat5745 Před 3 lety

    Nisarga datta putra aahes dada tu ..tuzi naal nisrag shu jodli geliy ani amchy sarkhe saglech amhi pn tumchy mule hi majja gheu shaktoy .❤️.khup Dhanyvad 🙏

  • @archanaparab1534
    @archanaparab1534 Před 3 lety

    Sunder chitrikaran...Apratim scene ahe. Maharashtra madhe ashya jaga ahet he tumchya videos madhun amhi pahatoy. Lahanpani ghadle la kathin prasang mhanje Gorpada aai chi krupa mhanavi lagel. Uttam video ahe.

    • @gavakadchevlog
      @gavakadchevlog  Před 3 lety

      खुप खुप धन्यवाद 🙏🙏🤗

  • @tejashreezagade5843
    @tejashreezagade5843 Před 3 lety +1

    आमच्याकडे गोमेटाच म्हणतात कोकणात

  • @sangeetadeshmukh1094
    @sangeetadeshmukh1094 Před 3 lety

    घोरपङा आई आमची कुलदैवत आहे. 🙏🙏

  • @RM-kn9xf
    @RM-kn9xf Před 2 lety

    Sir thum dongar ahe na tikde.jyacha aakar thum sarkha ahe

  • @BoysWithNature
    @BoysWithNature Před 3 lety +1

    खूपच छान माहिती

    • @gavakadchevlog
      @gavakadchevlog  Před 3 lety +1

      धन्यवाद मित्रा 🙏🙏🤗

  • @vidyaalhat7533
    @vidyaalhat7533 Před 3 lety

    घोरपडाआईला 🙏...धबधबा खूपच सुंदर .....दिवाळीपर्यंत पाणी राहते का ?....🤔पण मूळ मंदिराजवळ धबधब्याला पाणी होते...पलीकडे मंदिराजवळ पाणी नव्हते....🤔असे कसे

    • @gavakadchevlog
      @gavakadchevlog  Před 3 lety

      प्रवरा नदी भंडारदरा धरणापासून येते. त्यामुळे जेव्हा धरणाचे पाणी सोडतात तेव्हा धबधब्याला पाणी असते.(पाणी केव्हा सोडतील याचा काही भरवसा नाही). उजव्या बाजूने येणारा धबधबा पावसाळ्यातच असतो.
      पाणी तर तसे दोन्ही मंदिरापासून जाते. दोन्ही मंदिरे तशी जवळजवळच आहेत. एक नदिच्या या बाजूला तर एक त्या बाजूला. त्या बाजूचे मंदिर तर पावसाळ्यात खुप पुर असल्यावर झाकून देखील जाते. युट्यूबवर पावसाळ्यातले व्हिडिओ पहायला मिळतील. 🙏🙏🤗

  • @tejashreezagade5843
    @tejashreezagade5843 Před 3 lety +1

    पण भंडार धरा बघायच राहीलय नक्की येऊ

  • @chandurokade5994
    @chandurokade5994 Před 3 lety

    Dada asech navnavin video takit ja aamhi vat pahto aahe👌👌👌👌👌😚

  • @sunitabhangare9476
    @sunitabhangare9476 Před 3 lety

    निसर्ग जबरदस्त व्हिडिओ लय भारी

  • @vitthalgabhale7983
    @vitthalgabhale7983 Před 3 lety

    खूप खूप छान माहिती आहे.

  • @tukaramgabhale2999
    @tukaramgabhale2999 Před 3 lety +1

    भावकी येथे दिलीप कुमार व वैजंयती माला यांचा गंगा. जमुना. ही शुटिंग झाली आहे

  • @sahebraosahebrao1mohite763

    अप्रतिम सर, गोमेठी मी खाल्लेली आहे

  • @vaishaligite5667
    @vaishaligite5667 Před 3 lety

    Randha falls , my favourite place ,thanks for sharing dada

  • @latabule6436
    @latabule6436 Před 3 lety

    खूप छान व्हिडीओ भाऊ👌👌👌👌

  • @annudhawre7632
    @annudhawre7632 Před 3 lety

    Khup chhaan aahe he jaga

  • @tejashreezagade5843
    @tejashreezagade5843 Před 3 lety

    खुप छान सांगता माहीती

  • @sadhanabadhe1925
    @sadhanabadhe1925 Před 3 lety

    Yekdam zakkaaas video... Bhau

  • @justsimple7626
    @justsimple7626 Před 3 lety +1

    आमची कुलदैवत आहे

  • @somakedari2436
    @somakedari2436 Před 3 lety

    जय घोरपडा आई.

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 Před 3 lety

    Sundar nisarga darshan Thank-you

  • @machindrakirve2251
    @machindrakirve2251 Před 3 lety

    🙏

  • @vishaligabale9955
    @vishaligabale9955 Před 3 lety

    हे खुप छान आहे हे आमचं कुळदैवत आहे आणि आम्ही पण गभाले आहे

  • @priya-gl7kw
    @priya-gl7kw Před 3 lety

    my fav. place 😊😊

    • @gavakadchevlog
      @gavakadchevlog  Před 3 lety

      Any special reason🤔🙏😊

    • @priya-gl7kw
      @priya-gl7kw Před 3 lety

      @@gavakadchevlog mjya mama ch gav ahe javl amhi lahnpni nehmi yaycho ekda tri vrshatun mdhun devichya darshnla 🙏😊 atach ny jamt yayla khup yr zale 😌 pn tumchi video philyvr vaty jav ata tym kdun😊 thnx for uploading 😊🙏

    • @gavakadchevlog
      @gavakadchevlog  Před 3 lety

      @@priya-gl7kw Thank you 🙏🙏🤗

  • @meenaw2448
    @meenaw2448 Před 3 lety +1

    खुप छान आमी जाउन आलो तीथे

  • @kaminitribhuwane9425
    @kaminitribhuwane9425 Před 3 lety

    Chan khup chan

  • @sharadbarde3854
    @sharadbarde3854 Před 3 lety +1

    सुंदर व्हिडीओ... जम्मू काश्मीर ला गेल्या सारखे वाटले

  • @sunitashendkar3256
    @sunitashendkar3256 Před 3 lety

    हे निघोच आहे का

  • @MrSudhirhire
    @MrSudhirhire Před 3 lety

    All videos are nice and informative.

  • @SaratGodbole
    @SaratGodbole Před 3 lety

    खूप वर्षांपूर्वी भंडारदरा आणि रंधा पाहिला आहे. १९७८. आता पर्यटकांसाठी खूप सोयी केलेल्या दिसताहेत. देऊळ आणि स्थान त्या वेळेस माहिती नव्हते. आता गेलो की नक्की जाईन.
    भिमाशंकरला गणपती घाटातून जाताना खाल्ली आहे गोमेटी. पान विड्याच्या पानासारखे वाटतेय. म्हणजे की वेलही सुंदर दिसतो आहे. वेलाला भरपूर लागतात तर शेतात किंवा घरातही वाढवता येतील बहुतेक. बिया घेऊन ठेवीन मिळाल्या तर
    विडिओ आवडला..

  • @madhuripardhi6591
    @madhuripardhi6591 Před 3 lety +1

    👍👍👍👍👍

  • @pandurangdeshmukh308
    @pandurangdeshmukh308 Před 3 lety

    खुप छान माहिती 👌👌

  • @ravindraburud5054
    @ravindraburud5054 Před 3 lety

    खुपच छान

  • @user-hd3sj2ti8q
    @user-hd3sj2ti8q Před rokem

    भाव ma no पाठव

  • @prakashlangi7894
    @prakashlangi7894 Před 3 lety

    लय भारी

  • @ruchakhaire4879
    @ruchakhaire4879 Před 3 lety

    Kharach khup sundae she . apple Pa na Cato tum cha bola ikala ki.

  • @dhananathwayal1529
    @dhananathwayal1529 Před 3 lety

    Very nice information, please keep it up

  • @v.i.pgaming4787
    @v.i.pgaming4787 Před 3 lety

    Khuppppp chhan 🙏

  • @tejashreezagade5843
    @tejashreezagade5843 Před 3 lety

    दादा आम्ही वारघुशीला आलो होतो रंदा पण बघीतला छान बघण्यासारख आहे

    • @gavakadchevlog
      @gavakadchevlog  Před 3 lety

      मग मला नाही भेटले🤔😀🙏

  • @gulabkadali2717
    @gulabkadali2717 Před 3 lety

    मस्त वाटल

  • @user-hs5kj4ko4b
    @user-hs5kj4ko4b Před 3 lety

    Ak number

  • @akashgengaje2512
    @akashgengaje2512 Před 3 lety

    खुप छान भावा

  • @status9105
    @status9105 Před 3 lety +1

    छान 👌👌👌👌☺️

  • @vishaldighe3087
    @vishaldighe3087 Před 3 lety

    खतरनाक

  • @laxmijadhav8345
    @laxmijadhav8345 Před 3 lety +1

    माया आईला पण लासरू चा फोड नाक व डोळा मध्य ऑपरेशन करने कांबले अरसे आई सवागत होती पण तुम्हारा देवीचा आर्शिवाद असलामुळे तुम्हारा बेर झाला

  • @sunitabamble2350
    @sunitabamble2350 Před 3 lety

    खुपच छान 👌👌

  • @dagadupatil8643
    @dagadupatil8643 Před 3 lety

    Zakkas

  • @guru963
    @guru963 Před 3 lety

    छान

  • @swatidjadhav6780
    @swatidjadhav6780 Před 3 lety

    कसे जायचे देवीचया मंदिरकडे पत्ता कळवा

    • @gavakadchevlog
      @gavakadchevlog  Před 3 lety

      Google Map Location Link 👉 Ghorpada Devi Temple
      Ranad Bk., Maharashtra 422604
      maps.app.goo.gl/hKcBxCdu6ywe59f2A

  • @meerarevade9726
    @meerarevade9726 Před 3 lety

    Good evening dada

    • @gavakadchevlog
      @gavakadchevlog  Před 3 lety

      Good Evening🙏🙏
      या जेवन करायला🙏😊

  • @rekhadeshmukh8495
    @rekhadeshmukh8495 Před 3 lety

    Chhan👌👌

  • @poojamadake1025
    @poojamadake1025 Před 3 lety

    Nice video 👌👌

  • @vaishaligite5667
    @vaishaligite5667 Před 3 lety

    👌👌👌👌👌🙏🙏

  • @balasahebdhadwad5233
    @balasahebdhadwad5233 Před 3 lety

    nice...

  • @m.l.b.1031
    @m.l.b.1031 Před 3 lety

    👌👌👌👌👌👌👌👌

  • @vaishaligite5667
    @vaishaligite5667 Před 3 lety

    Conservation of nature is our true culture,very nice information

    • @andrescase6492
      @andrescase6492 Před 3 lety

      you all probably dont care but does any of you know a tool to log back into an Instagram account..?
      I somehow forgot my account password. I would appreciate any help you can offer me.

    • @rafaelalejandro1671
      @rafaelalejandro1671 Před 3 lety

      @Andres Case Instablaster =)

  • @bharatibande8246
    @bharatibande8246 Před 3 lety

    भाऊ तुझा फोन नंबर दे.मी काल शेंडीला आले होते एका लग्नाला. पुढच्या वेळी तुला भेटता येईल. Vidio एकदम मस्त 👌

  • @vijaypawar7346
    @vijaypawar7346 Před 3 lety

    आमचा राहुरी talukyatun जाते ते प्रवरा नदी

  • @kuchhkissekahanike6830

    Nice .

  • @muskaankalyankar6589
    @muskaankalyankar6589 Před 3 lety

    Mla mhitey aahe nilvnde dharan

  • @Mangoli7037
    @Mangoli7037 Před 3 lety

    खुप छान
    #baiajjichakitchen