विधानसभेला महायुतीचं हे कारखाना पॉलिटिक्स गेमचेंजर ठरणार ? | Mansoon Session 2024 | Vishaych Bhari

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 07. 2024
  • विधानसभेला महायुतीचं हे कारखाना पॉलिटिक्स गेमचेंजर ठरणार ? | Mansoon Session 2024 | Vishaych Bhari
    महाराष्ट्राच्या राजकारणात सहकार क्षेत्राला अनन्यसाधारण महत्व आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीमधील शेकडो नेत्यांचा पायाच सहकार क्षेत्रावर अवलंबून आहे. तळागातील लोकांसाठी सामुहिक प्रयत्नांतून आणि लोककल्याणकारी उद्देशानं सहकारी संस्थांची निर्मिती करण्यात आली. कृषी क्षेत्रात दूधसंघ, साखर कारखाने, कापड गिरण्या या सहकारी संस्थांच्या माध्यमातून चांगले पैसे कमावण्याचा उद्देश ठेवण्यात आला होता. सध्या भारतात सुमारे दोन लाख सहकारी दूध संस्था आणि ३३० सहकारी साखर कारखाने आहेत. साखर उत्पादनात सहकारी साखर कारखान्यांचा वाटा ३५ टक्के आहे. बँकिंग आणि आर्थिक क्षेत्रात देशभरातील ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये सहकारी संस्था आहेत. गावपातळीवर प्राथमिक कृषी पतसंस्था आहेत. आर्थिक घडामोडींची रेलचेल असलेल्या या क्षेत्रात वर्चस्व निर्माण केल्यानेच काँग्रेस-राष्ट्रवादीचे बहुतांश आमदार आपापले गड मजबूत करू शकले. पूर्वाश्रमी काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये असलेले बरेचसे नेते आता भाजपमध्ये गेले असले तरी सहकारी संस्थांची त्यांची मालकी अद्यापही कायम आहे. मागील काही वर्षांत मात्र याच सहकार क्षेत्राकडे भाजपने डोळा ठेवला असून महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र ताब्यात घेण्यासाठी निरनिराळ्या युक्त्या भाजपने लावल्या आहेत. केंद्रात कृषी खात्यातून सहकार खातं बाजूला काढून त्याचं स्वतंत्र खातं तयार करणं आणि त्याचं प्रमुखपद अमित शहांकडे देणं ही भाजपची खेळी देशातील सहकार क्षेत्रावर नियंत्रण ठेवण्यासाठीच होती हे जाणकारांना तात्काळ समजलं. महाराष्ट्रात शरद पवार यांच्यासारखा मुरब्बी राजकारणी सहकार क्षेत्रावर मांड ठोकून आहे हे पुरतं समजलेल्या भाजपने यंदाच्या मंत्रिमंडळात पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सहकार राज्यमंत्रीपद दिलं आहे. लोकसभा निवडणुकीआधी राज्यातील १३ सहकारी साखर कारखान्यांना जवळपास १८०० कोटी रुपयांची थकहमी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून म्हणजेच NCDC कडून हे कर्ज मिळवून देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न होता. शिवाय येत्या विधानसभा निवडणुकीत साखर कारखानदार नेत्यांच्या मतपेट्या महायुतीकडे वळवण्याचा पुरता प्रयत्न महायुतीकडून केला जात आहे. विधानसभा निवडणुक जिंकण्यासाठी कारखाना पॅटर्नचा आधार घेणाऱ्या महायुतीच्या स्ट्रॅटेजीचा थोडक्यात आढावा आपण या व्हिडीओत घेऊयात..!
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #mansoonsession
    #mansoonassemblysession
    #विषयचभारी
    मराठी बातम्या,मराठी समाचारांची बातम्या,महाराष्ट्र न्यूज़,राज ठाकरे,महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२४ २५,abp majha,abp maza live new today,marathi news live today,marathi news video,headlines today,marathi breaking news,maharashtra news live update,abp maza breaking news,uddhav thackeray,vijay wadettiwar,maharashtra government budget 2024 25,budget of maharashtra 2024,ajit pawar live,cm eknath shinde,monsoon session 2024,maharashtra assembly session

Komentáře • 6

  • @user-fl5pi2eu1y
    @user-fl5pi2eu1y Před 15 dny +1

    केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकाच विचाराचे प्रगती व विकास साधय करतात

  • @PSD-d9x
    @PSD-d9x Před 15 dny +2

    Please speak on this for helping students in Maharashtra
    माननीय महोदय मी एक सामान्य 12वी उत्तीर्ण विद्यार्थी आहे.सध्या MHT-CET द्वारे कॉलेज प्रवेश प्रक्रिया येत्या 10 तारखे पासून सुरू होत आहे आणि असा असताना सध्या sebc caste certificate साठी शासनाने 28 june ला नवीन GR काढलेला आहे ज्यात caste certificate आणि Non-creamy layer certificate साठी seperate apply करून वेगळ्या वेगळ्या कागदावर घ्यावे लागणार आहे असे म्हंटले आहे परंतु हे सर्व आधी एकच कागदावर यायचे आणि कॉलेज प्रवेश प्रक्रिया सुरू होईल म्हणून माझ्या सारख्या अनेक विद्यार्थ्यांनी हे sebc च certificate 28 june आधीच काढलेल आहे . तरी आता 28 तारखेच्या GR मुळे जर ते ग्राह्य नाही धरल तर आम्हाला आज परत SEBC certificate काढायला फार वेळ लागेल आणि येवढा वेळ CET -CELL थांबेल का? असा प्रश्न आम्हा विद्यार्थ्यांन समोर आहे. तरी आपण लवकरात लवकर याबाबत काही तरी करावे ही नम्र विनंती आम्हा समस्त विद्यार्थ्यां कडून करत आहे.
    धन्यवाद.

  • @sandipdalavi5012
    @sandipdalavi5012 Před 15 dny

    Nice information

  • @Bhau1111
    @Bhau1111 Před 15 dny

    साखर संघाचे अध्यक्ष असलेल्या नेत्यांचा कारखाना सांगायचा राहून गेला

  • @vitthaldinde-ny3pf
    @vitthaldinde-ny3pf Před 15 dny

    मुंडे चा कारखाना सोडून इतरांनाच मदत केली म्हणून मोदी शहांना हे दिवस आले आहेत